Ramdurg Archives | News 24 Tass Marathi

हलगट्टीनजीक भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
भरधाव दुचाकीची केएसआरटीसी बसला जोराची धडक

रामदुर्ग तालुक्यातील घटना

रामदुर्ग : तालुक्यातील हलगट्टी गावाजवळ झालेल्या भीषण रस्ता अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सौंदत्ती आगाराच्या केएसआरटीसी बसला भरधाव वेगातील दुचाकीची जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत मल्लेश हणमंत लमाणी यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, हलगट्टी गावाजवळून जात असताना भरधाव वेगातील दुचाकी थेट बसवर आदळली. या धडकेत दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच रामदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रामदुर्ग सार्वजनिक रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी रामदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सुरू आहे.

The post हलगट्टीनजीक भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू appeared first on News 24 Tass Marathi.

कालव्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू
रामदुर्ग तालुक्याच्या चूंचनूर गावातील घटना

रामदुर्ग / वार्ताहर

बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील चूंचनूर गावात कालव्यात बुडून दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. बसय्या सोमनवर (वय १०) आणि हनुमंत हगेद (वय १०) अशी मृत बालकांची नावे असून शुक्रवारी दुपारी दोघेही गावाजवळील कालव्यावर पोहण्यासाठी गेले होते. मात्र, अचानक वाढलेल्या पाण्याच्या वेगवान प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात वाहून गेले.

मुले बराच वेळ घरी न परतल्याने ग्रामस्थांनी शोध सुरू केला. कालव्याच्या काठावर त्यांचे कपडे आढळल्यानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी शोधमोहीम राबवून दोघांचे मृतदेह बाहेर काढले.

या घटनेमुळे चूंचनूर गावात शोककळा पसरली असून पालकांनी आक्रोश केला आहे. घटनेची नोंद कटकोळ पोलीस स्थानकात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

The post कालव्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू appeared first on News 24 Tass Marathi.

नवजात बालिकेच्या हत्येप्रकरणी आईवर कायदेशीर कारवाई
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव जिल्ह्याच्या रामदुर्ग तालुक्यातील हिरेमलंगी गावात तीन दिवसांच्या नवजात बालिकेची गळा दाबून खून हत्या केल्याप्रकरणी आरोपी आईविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली.

मंगळवारी बेळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, अश्विनी हलकट्टी या महिलेने स्वतःच्या नवजात बालिकेच्या मानेवर दाब देऊन श्वास रोखल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. तिला आधीपासून तीन मुली असून पुन्हा मुलगीच जन्मल्याने हा प्रकार घडल्याचा संशय तपासात निष्पन्न झाला आहे.

या प्रकरणाची तक्रार आरोपीची आई रेणुका हलकट्टी यांनी पोलिसांकडे नोंदवली असून, गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपी महिला सध्या गर्भवती असल्याने तिच्या आरोग्याचा आणि डॉक्टर्सच्या अहवालाचा विचार करून पुढील कायदेशीर पावले उचलली जाणार असल्याचे एसपी गुळेद यांनी स्पष्ट केले.

The post नवजात बालिकेच्या हत्येप्रकरणी आईवर कायदेशीर कारवाई appeared first on News 24 Tass Marathi.

‘पुत्र’ हव्यासापोटी मातेकडूनच नवजात बालिकेची निर्घृण हत्या
रामदुर्ग तालुक्यातील धक्कादायक घटना

रामदुर्ग / वार्ताहर

रामदुर्ग तालुक्यातील हिरेमलंगी गावात एक धक्कादायक घटना घडली असून, तीन दिवसांच्या नवजात मुलीचा तिच्या स्वतःच्या आईने गळा दाबून जीव घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अश्विनी हळकट्टी (वय २८) असे त्या निर्दयी मातेचे नाव आहे.

याबाबत घटना स्थळावरून प्राप्त माहिती अशी की, अश्विनी हिला यापूर्वी सलग तीन मुली झाल्या होत्या, त्यामुळे ती मुलाच्या प्रतिक्षेत होती. २३ नोव्हेंबर रोजी तिची मुदकवी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती झाली. बालिका जन्मल्यावर दुसऱ्याच दिवशी ती आपल्या माहेरी हिरेमलंगी येथे आली होती.

मंगळवारी सकाळी घरातील लोक बाहेर गेल्याची संधी पाहून अश्विनीने नवजात बालिकेचा गळा दाबला आणि मुलगी श्वास घेत नाही असा बनाव रचला. नंतर तिने बाळाला रामदुर्ग सरकारी रुग्णालयात आणले. रामदुर्गचे टीएचओ नवीन निजगुली यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी तपासणी केली असता मृत्यू हा श्वास गुदमरल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. शवविच्छेदन अहवालातही गळा दाबल्याचे निशाण असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी संशयित आईविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून रामदुर्गचे डीवायएसपी चिदंबर मडिवाळर यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. ही घटना सुरेबान पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे.

The post ‘पुत्र’ हव्यासापोटी मातेकडूनच नवजात बालिकेची निर्घृण हत्या appeared first on News 24 Tass Marathi.

रामदुर्ग येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांवर हल्ला
जमिनीच्या व्यवहारातून उद्भवलेल्या वादाचे पर्यावसान हाणामारीत

रामदुर्ग / वार्ताहर

जमिनीच्या व्यवहारातून दोन कुटुंबामध्ये उद्भवलेल्या वादाचे पर्यावसान वकिलाच्या कुटुंबातील ९ जणांवर २० हून अधिक जणांच्या जमावाने अंगावर ट्रॅक्टर घालण्याबरोबरच खुरपे, कोयता, लोखंडी रॉड वगैरेंनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यामधील चेन्नापूर डीएलटी तांडा येथे घडली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार कृष्णाप्पा लमानी कुटुंबातील सदस्यांनी वकील असलेल्या ॲड. विनोद पाटील यांच्या कुटुंबावर हल्ला केल्याचा आरोप आहे. चेन्नापूर डीएलटी तांडा येथे घडलेल्या या घटनेत गंभीरित्या जखमी झालेल्या ९ जणांना उपचारासाठी बागलकोट सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

हल्ल्यामध्ये ॲड. विनोद पाटील यांच्यासह त्यांचे वडील आणि भावाच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. एकंदर संपूर्ण पाटील कुटुंबीय सध्या बागलकोट सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. रामदुर्ग पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली असून जमिनीच्या वादातून सदर घटना घडली आहे.

The post रामदुर्ग येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांवर हल्ला appeared first on News 24 Tass Marathi.