Gadag Archives | News 24 Tass Marathi

कारागृहातील पतीचे आधारकार्ड मिळवण्यासाठी महिलेची धावपळ
मुलीच्या शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा

बेळगाव : जातीधर्माच्या बंधनांना झुगारून प्रेमविवाह केलेल्या एका महिलेच्या आयुष्यातील संघर्षाला आता नवे वळण मिळाले आहे. पहिल्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी पती सध्या हिंडलगा कारागृहात शिक्षा भोगत असताना, दुसऱ्या मुलीच्या शाळा प्रवेशासाठी आणि एसआयआर नोंदणीसाठी आवश्यक असलेले पतीचे आधार कार्ड मिळविण्यासाठी ही आई गदग ते बेळगाव अशी वारंवार धावपळ करत आहे.

संपूर्ण समाजाचा विरोध पत्करून गदग येथील एका मुस्लिम महिलेने हिंदू तरुणाशी प्रेमविवाह केला होता. त्यांच्या संसारात दोन मुलींचा जन्म झाला. मात्र, मुलगी झाल्याच्या कारणावरून पतीने पहिल्या मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणात तो सध्या बेळगावच्या हिंडलगा कारागृहात आहे.

दरम्यान, दुसऱ्या मुलीच्या शिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये वडिलांच्या आधार कार्डची गरज भासत आहे. त्यासाठी संबंधित महिला हिंडलगा कारागृहात वारंवार फेऱ्या मारत असली, तरी तिला अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची खंत तिने व्यक्त केली आहे. गुन्हेगार पतीची साथ नव्हे, तर केवळ मुलीचे भविष्य घडविण्यासाठी त्याच्या आधार कार्डाची आवश्यकता असल्याचे तिने सांगितले.

या प्रकरणात कारागृह प्रशासनासह संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून मुलीच्या शिक्षणातील अडथळा दूर करावा, अशी मागणी होत आहे.

The post कारागृहातील पतीचे आधारकार्ड मिळवण्यासाठी महिलेची धावपळ appeared first on News 24 Tass Marathi.

ऑल इंडिया ओपन कराटे काता स्पर्धेत बेळगावचे घवघवीत यश
गदग : लक्ष्मेश्वर तालुका गदग येथे आयोजित करण्यात आलेल्या ऑल इंडिया ओपन कराटे काता स्पर्धेत बेळगाव येथील मानस कराटे अकॅडमीने आपले वर्चस्व सिद्ध करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशाचे श्रेय मानस कराटे अकॅडमीचे (शिहान )भरमाणी म. पाटील व ज्ञानेश्वर चिक्के यांच्या मार्गदर्शनाला जाते. या स्पर्धेमध्ये बेळगाव शहर, शिवम गणेशपूर, विजयनगर, बेकिनकेरे तसेच महाराष्ट्रातील कुदनूर आणि निट्टूर या विविध ग्रामीण भागातून आलेल्या अनेक तरुण आणि उत्साही कराटेपटूंनी सहभाग घेतला होता.

स्पर्धेत खालील खेळाडूंनी विविध क्रमांक पटकावले : प्रथम क्रमांक: साक्षी कांबळे, करण पुजारी, पृथ्वीराज कांबळे, अनिरुद्ध पवार, साई पाटील, आदित्य गुरव, सानवी पाटील आणि सुकन्या कडोलकर.

दुसऱ्या क्रमांकाचे विजेते : शेखर पुजारी, अमर मुरचुटे, पृथ्वी घेवडे, प्रांजल जाधव, सानवी पाटील, तन्वी जाधव, श्रेया चौगुले, वेदांती पाटील, श्रेया मिश्रीकोटी, अनिरुद्ध सातेरी, तुषार वाडकर, शिवप्रसाद कौजलगी, आणि अस्मी पाटील.

तिसऱ्या क्रमांकाचे विजेते : आरुष यादव, विराज टवकरी, रिदम गोरे, अपेक्षा घेवडे, साची गांगरकर , प्रीती पाटील, सृष्टी भोगण, अर्पणा इंटुरी, मार्लिंग इंटुरी, आर्यांश गिरी, सर्वेश कुंडेकर, श्रद्धा चौगुले, सचिन नंदी, साई श्री निकम, मृणाली घुमटे आणि मशनू पाटील या सर्व कराटेपटूनी यश संपदान केले.

The post ऑल इंडिया ओपन कराटे काता स्पर्धेत बेळगावचे घवघवीत यश appeared first on News 24 Tass Marathi.

पेटत्या कारमध्ये होरपळून लोकायुक्त पोलीस निरीक्षकाचा मृत्यू
हुबळी / वार्ताहर

अन्नीगेरी तालुक्यातील भद्रापूरजवळ शुक्रवारी सायंकाळी भीषण अपघातात धारवाड लोकायुक्त विभागाचे पोलीस निरीक्षक पंचाक्षरी सालीमठ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

शुक्रवारी सायंकाळी सुमारे ७.३० वाजता गदग – हुबळी राष्ट्रीय महामार्गावरील अरेरा पुलाजवळ ही घटना घडली. गदग येथून हुबळीच्या दिशेने येत असताना सालीमठ यांची कार नियंत्रण सुटून रस्त्याच्या दुभाजकावर आदळली. या धडकेनंतर पेट्रोल टाकीला गळती होऊन ठिणगी लागल्यामुळे कारने क्षणार्धात पेट घेतला, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

आग इतकी भयानक होती की सालीमठ यांना कारच्या बाहेर पडण्याचा मार्गच मिळाला नाही. काही क्षणांतच संपूर्ण कार ज्वाळांनी वेढली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर वाहन पूर्णपणे भस्मसात झाले आहे. त्या दिवशी ते स्वतः कार चालवत हावेरीतील लोकायुक्त कार्यालयातील कामकाजातून गदग येथे कुटुंबीयांना भेटून परतत होते. मात्र वाटेतच नियतीने घाला घातला.

अपघाताची माहिती मिळताच धारवाडचे पोलीस अधीक्षक गुंजन आर्य यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

The post पेटत्या कारमध्ये होरपळून लोकायुक्त पोलीस निरीक्षकाचा मृत्यू appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव इलेव्हन संघ विभागीय हॉकी स्पर्धेत उपविजेता
बेळगाव : कर्नाटक सरकार, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभाग, गदग यांच्या सहकार्याने बेळगाव विभागीय स्तरावरील दसरा गेम्स 2025 (हॉकी) महात्मा गांधी हॉकी स्टेडियम, बेटगेरी-गदग येथे झालेल्या बेळगाव विभागीय स्तरावरील दसरा क्रीडा स्पर्धेच्या हॉकी स्पर्धा संपन्न झाल्या.

सदर हॉकी स्पर्धेत बेळगाव इलेव्हन संघाने डी वाय एस एस धारवाड संघाच्या विरोधात ३ – ० ने विजय प्राप्त करून विभागीय स्पर्धेत उपविजेता ठरला. बेळगाव इलेव्हन संघाने कर्णधार प्राजक्ता निलजकर हिच्या नेतृत्वाखाली भूमी कुगजी, नंदिनी गुरव, सविता गोरल, श्रेया पाटील, आदिती ठक्कर, सानिका पाटील, निकिता कवळेकर, नेत्रा गुरव, भावना किल्लारगी, प्रतीक्षा गुरव, सुकृती कासार, खुशी गुरव, राधिका धबाले, धनश्री शिंदे, प्रीती नांदूडकर, श्रुती हिरेमठ, वैष्णवी माळवणकर यांचा हॉकी संघात समावेश होता.

यावेळी हॉकी बेळगावचे पदाधिकारी अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सचिव सुधाकर चाळके, प्रशिक्षक उत्तम शिंदे, गणपत गावडे, प्रकाश कालकुंद्रीकर, सविता वेसणे आदी उपस्थित होते.

The post बेळगाव इलेव्हन संघ विभागीय हॉकी स्पर्धेत उपविजेता appeared first on News 24 Tass Marathi.