Dakshin Kannada Archives | News 24 Tass Marathi

राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
किनारपट्टी आणि दक्षिण कर्नाटकातील जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा

बेंगळुरू : राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. विशेषतः किनारपट्टी आणि दक्षिण कर्नाटकातील अंतर्गत जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने विविध स्तरांवर सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहेत.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, किनारपट्टी भागात व्यापक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उडुपी, दक्षिण कन्नड आणि उत्तर कन्नड या जिल्ह्यांमध्ये आठवडाभर पावसाचा जोर कायम राहू शकतो. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, २७ ते २९ जूनदरम्यान यलो अलर्ट लागू राहणार आहे.

दरम्यान, २४ ते २९ जून या कालावधीत बेंगळुरूसह म्हैसूर, कोडगू, हसन, चिक्कमंगळुरू, मंड्या, रामनगर, चामराजनगर, तुमकूर, कोलार, चिक्कबळ्ळापूर, चित्रदुर्ग आणि दावणगेरे जिल्ह्यांतील काही भागांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

उत्तर कर्नाटकातील काही जिल्ह्यांनाही पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. बिदर, कलबुर्गी, बागलकोट, यादगीर, बळ्ळारी आणि विजयनगर या जिल्ह्यांसाठी २४ ते २६ जून या कालावधीत यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नदी-नाल्यांच्या परिसरात सावधगिरी बाळगावी आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

The post राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज appeared first on News 24 Tass Marathi.

सीईटी परीक्षा केंद्रावर जानवे काढण्याची घटना
ब्राह्मण समाजाकडून निषेध

विजयपूर / दीपक शिंत्रे

बीदर आणि शिमोगा येथे सीईटी (CET) परीक्षा देण्यासाठी जात असलेल्या ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्याच्या यज्ञोपवीताला (जानवे) काढल्याची घटना निषेधार्ह असल्याचे मत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष रोहन विनय आपटे सह विप्र समाजाचे प्रमुख गोपाळ नाईक, प्रकाश अक्कलकोट, विजय जोशी, राकेश कुलकर्णी, व्यंकटेश जोशी, गुरुराज राव व इतरांनी निषेध व्यक्त केले आहे.

या प्रकरणाबाबत त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या पत्रकात सांगितले की, हे कृत्य करणाऱ्या अधिकाऱ्याला त्वरित निलंबित करून त्याच्याविरुद्ध चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

ब्राह्मण व्यक्तीला यज्ञोपवीत बदलण्यासाठी विशिष्ट नियम आणि परिस्थिती असतात. त्यामुळे यज्ञोपवीत जबरदस्तीने काढून घेणे हे ब्राह्मण समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे. सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे जानवे काढणे हे अत्यंत निंदनीय घटना आहे सीईटी कडून अशाप्रकारे कुठलेही मार्गदर्शक सूचना जारी केलेली नाही हे कृत्य म्हणजे ब्राह्मणांच्या संविधानिक हक्कांवर घाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ब्राह्मण समाज हा शांतताप्रिय असून मात्र, अशा घटना सहन करु शकत नाही पुन्हा अशा घटना होऊ नयेत यासाठी सरकार आणि जिल्हा प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी व संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी असे त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

The post सीईटी परीक्षा केंद्रावर जानवे काढण्याची घटना appeared first on News 24 Tass Marathi.