Belagavi Archives | News 24 Tass Marathi

बेळगावच्या माजी उपमहापौर कुसुम कृष्णा टपाले यांचे निधन
बेळगाव : मराठा कॉलनी येथील रहिवासी आणि बेळगावच्या माजी उपममहापौर कुसुम कृष्णा टपाले यांचे, आज गुरूवारी सायंकाळी केएलई रुग्णालयात निधन झाले. उद्या शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

The post बेळगावच्या माजी उपमहापौर कुसुम कृष्णा टपाले यांचे निधन appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शिवानंद निलण्णावरला १० दिवसांची सीआयडी कोठडी
बेळगाव : बहुकोटी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील संशयित आरोपी शिवानंद नीलण्णावर याला न्यायालयाने १० दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. पुढील चौकशीसाठी त्याला बंगळुरू येथे हलविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

बेळगावच्या दुसऱ्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश गंगाधर के. एन. यांनी हा आदेश दिला. सुमारे ३५ हजार गुंतवणूकदारांची हजारो कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा संशय असलेल्या या प्रकरणात राज्याबाहेर जाऊनही तपास करावा लागणार असल्याचे सांगत सीआयडीने कोठडीची मागणी केली होती.

सुनावणीदरम्यान आरोपीने स्वतःला मधुमेह आणि हृदयविकाराचा त्रास असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.

यावेळी न्यायालयात आरोपी आणि न्यायाधीशांमध्ये काही महत्त्वपूर्ण संवादही झाला. “३५ हजार लोकांपेक्षा मला पैशांची गरज आहे,” असे आरोपीने म्हटल्याचे सांगितले जाते. त्यावर न्यायाधीशांनी सामान्य नागरिकांच्या हिताचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे स्पष्ट करत कठोर शब्दांत सुनावल्याची माहिती मिळाली.

न्यायालयातून बाहेर येताना आपल्या भावाला पाहून शिवानंद नीलण्णावर भावूक झाल्याचेही उपस्थितांनी सांगितले.

दरम्यान, सीआयडी डीजीपी भीमाशंकर गुळेड़ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने प्राथमिक तपास पूर्ण केला असून, माळमारुती पोलीस ठाणे यांनी जमा केलेली कागदपत्रे सीआयडीकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. आरोपीला पुढील चौकशीसाठी बंगळुरू येथे नेण्यात येणार आहे.

आरोपीच्या वतीने त्याचे वकील मंजुनाथ जी. एल. यांनी माध्यमांशी बोलताना, हे प्रकरण तांत्रिक स्वरूपाचे असून आरबीआय नियमांच्या कथित उल्लंघनाशी संबंधित असल्याचा दावा केला. कोणत्याही गुंतवणूकदाराने अधिकृत तक्रार केलेली नसून पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

The post बेळगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शिवानंद निलण्णावरला १० दिवसांची सीआयडी कोठडी appeared first on News 24 Tass Marathi.

आरक्षण रोस्टरविरोधात २४ मार्चला बेंगळुरूमध्ये भव्य मोर्चा
बेळगाव / प्रतिनिधी

आरक्षण रोस्टर पद्धतीला विरोध दर्शवण्यासाठी कर्नाटक राज्य आरक्षण महासंघाच्या वतीने २४ मार्च रोजी बेंगळुरू येथील फ्रीडम पार्कवर भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संघटनेचे नेते रवी पुजारी यांनी दिली.

शुक्रवारी बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जुन्या ५० टक्के आरक्षण नियमानुसार भरती व शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सरकारने तातडीने भरतीची अधिसूचना जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

अनुसूचित जाती व जमातींच्या आरक्षणात करण्यात आलेली वाढ संविधानाच्या नवव्या अनुसूचीत समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी त्यांनी केली. यासाठी मुख्यमंत्री यांनी पंतप्रधानांकडे शिष्टमंडळ नेऊन दबाव निर्माण करावा, असेही त्यांनी नमूद केले. देशव्यापी जनगणनेची आकडेवारी जाहीर होईपर्यंत सरकारने कोणताही एकतर्फी निर्णय घेऊ नये आणि अंतर्गत आरक्षण वाटपापूर्वी संबंधित समाजघटकांशी चर्चा करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिक्षण, वसतिगृह आणि नोकरी भरतीसंदर्भातील रोस्टर वाटपाचे जुने आदेश व परिपत्रके मागे घ्यावीत, अशी मागणी करण्यात आली. अनुसूचित जातींच्या प्रवर्गात नव्याने दिलेले जातीचे दाखले रद्द करून जुनी प्रमाणपत्रेच ग्राह्य धरावीत, असेही पुजारी यांनी सांगितले. तसेच एससी-एसटीसाठी असलेला निधी इतर कामांकडे वळवणे थांबवण्यासाठी कायद्यात सुधारणा करावी आणि न्यायमूर्ती नागमोहन दास आयोगाची तालुकानिहाय आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

या पत्रकार परिषदेला राजेश पवार, के. एस. ममदापुरे, विठ्ठल वडर, अविनाश खानापुरे, राजू वडर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

The post आरक्षण रोस्टरविरोधात २४ मार्चला बेंगळुरूमध्ये भव्य मोर्चा appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव – वेंगुर्ला रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग दर्जा द्या
मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

बेळगाव : बेळगाव – वेंगुर्ला या राज्य महामार्गावर वाढत्या वाहतुकीचा ताण लक्षात घेता या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माजी नगरसेविका निलिमा पावशे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

नागपूर येथे मंत्री गडकरी यांची भेट घेऊन पावशे यांनी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. बेळगावसह महाराष्ट्रातील सीमाभागातील नागरिक गोव्यातील नव्याने सुरू झालेल्या मोपा विमानतळ, सिंधुदुर्गातील चिपरी विमानतळ तसेच रेडी बंदर येथे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात या मार्गाचा वापर करतात. चंदगड, आजरा, गडहिंग्लज, दोडा मार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण आणि गोवा येथील वाहतूकही याच रस्त्यावरून होत असल्याने सतत वर्दळ असते.

कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि बेळगाव या जिल्ह्यांना जोडणारा हा महत्त्वाचा दुवा राष्ट्रीय महामार्ग म्हणून विकसित झाल्यास कृषीमाल, भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक अधिक सुलभ होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच गोव्यातील सिमेंट व स्टील, सिंधुदुर्ग–गोवा येथील मासळी तसेच कोकणातील हापूस आंब्याची जलद आणि सुरक्षित वाहतूक करण्यास मदत होईल, असेही पावशे यांनी स्पष्ट केले.

निवेदन सादर करताना वसुंधराराजे भोसले, शैलजा खानविलकर, उज्वला कदम पाटील आणि आमदार आशिष देशमुख उपस्थित होते.

The post बेळगाव – वेंगुर्ला रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग दर्जा द्या appeared first on News 24 Tass Marathi.

व्हॅक्सिन डेपो येथे उद्या मराठी भाषिकांचा महामेळावा
बेळगाव / प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने २००४ साली सीमाप्रश्नी खटला सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्यानंतर कर्नाटक सरकारने बेळगाववर आपला हक्क दाखविण्यासाठी २००६ पासून बेळगावात हिवाळी अधिवेशन भरण्याचा कुटील डाव रचला होता. सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना अशाप्रकारे अधिवेशन हे लोकशाही विरोधी आणि घटनाबाह्य कृत्य आहे तरी देखील कर्नाटक सरकारने बेळगावात सुवर्णसौध उभारून दरवर्षी हिवाळी अधिवेशन भरवतात. या अधिवेशनाचा निषेध करत अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने प्रतिकात्मक महामेळावे आयोजित करून ते यशस्वी देखील केले. पण अलीकडे काही कन्नड संघटनांच्या विरोधी भूमिकेमुळे प्रशासनाने मेळाव्यात अडकाठी आणण्याचे प्रयत्न चालविले आहेत.

यावर्षी ८ डिसेंबर पासून अधिवेशन सुरुवात होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मराठी माणसांचा महामेळावा व्हॅक्सिन डेपो टिळकवाडी बेळगाव येथे सकाळी ठीक ११ वाजता आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यास मराठी भाषिक जनतेने प्रचंड संख्येने उपस्थित राहून आपला निर्धार पुन्हा एकदा व्यक्त करावा, अशी विनंती मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव यांच्या वतीने करण्यात आली आहे. मेळावा अत्यंत शांततापूर्ण वातावरणात वेळेवर सुरुवात होईल याची खबरदारी घेऊन कार्यकर्त्यानी उपस्थित रहावे असे विनंती करण्यात येत आहे.

The post व्हॅक्सिन डेपो येथे उद्या मराठी भाषिकांचा महामेळावा appeared first on News 24 Tass Marathi.

नाथ पै चौक मंडळांने लोकमान्यांना अभिप्रेत उत्सव साजरा केला ; प्रकाश नंदीहळी
बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव अलीकडच्या काही वर्षात डॉल्बी म्हणजे गणेशोत्सव असे एक समीकरण बनलेले पाहायला मिळते.उत्सवातून प्रबोधनात्मक विधायक कार्य घडणे आवश्यक आहे. मात्र असे कार्य कमी घडताना दिसत आहे. मात्र, बॅरिस्टर नाथ पै चौक मंडळांने लोकमान्य टिळकांना अभिप्रेत गणेशोत्सव साजरा केला आहे असे प्रतिपादन, विश्व भारत सेवा समितीचे कार्यकारी प्रकाश नंदीहळी यांनी बोलताना केले.

बॅरिस्टर नाथ पै चौक गणेशोत्सव मंडळ यावर्षी सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षात मंडळाने अनेक सामाजिक सांस्कृतिक विधायक आणि समाजप्रबोधनात्मक उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमांतर्गत शुक्रवारी सकाळी महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा शाल, पुष्प आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी महापालिकेचे शहापूर विभागातील आरोग्य निरीक्षक हनुमंत पाटील, महापालिकेच्या सेवेतून नुकतेच निवृत्त झालेले श्याम चौगुले तसेच शहापूर पोलीस स्थानकाचे एएसआय धनकवडे यांचाही मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील, उपाध्यक्ष सचिन रंगरेज परशुराम घाडी , प्रदीप मुजूकर, लक्ष्मण छत्र्याण्णावर,हिरालाल चव्हाण, यल्लाप्पा बसरीकट्टी, अण्णाप्पा मुगळीकर व अन्य पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

दि. ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून मंडळाच्या वतीने सायंकाळी प्रकाश नंदीहळी, शेखर करंबळकर, दीपक धामणेकर, किरण कदम, एम. एन. पाटील, एम.बी बाचीकर, वासुदेव कदम, शंकर चव्हाण आदी शिक्षकांचा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्याहस्ते शाल भेटवस्तू आणि पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित सन्माननीय शिक्षकांनी मंडळांने सुवर्ण महोत्सवी वर्षात राबविलेल्या विधायक उपक्रमांची प्रशंसा केली. मंडळाने बेळगावातील इतर मंडळांसमोर कार्याचा आदर्श निर्माण केल्याचेही मान्यवर शिक्षकांनी मनोगत यावेळी व्यक्त केले. यावेळी शेखर करंबळकर यांनी मंडळाला ५०००१ रुपयांची देणगी दिली.

The post नाथ पै चौक मंडळांने लोकमान्यांना अभिप्रेत उत्सव साजरा केला ; प्रकाश नंदीहळी appeared first on News 24 Tass Marathi.

पत्रकारांनी आधुनिक तंत्रज्ञान अवगत करणे आवश्यक – प्रवीण टाके
बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचा वर्धापन दिन साजरा

बेळगाव / प्रतिनिधी

माध्यम क्षेत्रात अनेक बदल घडत असून डिजिटल मीडियाचे महत्त्व वाढले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे पत्रकारिता सोपी झाली असली तरीही, पत्रकारांवरील जबाबदारी वाढली आहे. आजच्या युगातील पत्रकारांनी आधुनिक तंत्रज्ञान अवगत करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक प्रवीण टाके यांनी बोलताना केले. जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते.

आज शुक्रवारी रविवार पेठ येथील जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात पत्रकार संघाचा ४८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या वर्धापन दिन कार्यक्रमाला प्रवीण टाके यांच्यासह, पुणे मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष समीर देशपांडे तसेच कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंपादक रणजीत पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमात पुढे बोलताना टाके म्हणाले, भावी काळात पत्रकारांना जबाबदारीने काम करणे महत्त्वाचे आहे. बेळगाव सीमा भागातील पत्रकार अत्यंत तळमळीने कार्य करत आहेत. सीमा भागातील पत्रकारांच्या मागण्यांना शासनाकडून निश्चितच चांगला प्रतिसाद मिळेल. मुख्यमंत्री स्वतः जातीने पत्रकारांच्या मागण्यांचा आस्थेने विचार करतात. सीमाभागातील पत्रकारांच्या मागण्यासंदर्भात आपण जातीने शासन दरबारी पाठपुरावा करून असे आश्वासनही टाके यांनी यावेळी दिले.

समीर देशपांडे म्हणाले , कोल्हापुरातील पत्रकारांनी बेळगाव सीमा भागातील मराठी जनतेची बाजू लावून धरण्याचे काम सातत्याने केले.महाराष्ट्रातील नेत्यांना सीमा प्रश्नाचा जाब विचारण्याचे काम ही करत आहेत.बेळगाव सीमा भागातील मराठी जनता आणि पत्रकार जे सोसत आहेत त्याची आम्हाला जाणीव आहे. बेळगावात वृत्तपत्र चालविणे अत्यंत कठीण कार्य आहे.सीमाभागात पत्रकारिता करणे आव्हानात्मक आहे. कोरोना नंतर माध्यमांची स्थिती बिकट बनली आहे. पत्रकारांचे प्रश्नही दूर राहिले आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी रणजीत पवार यांनी, महाराष्ट्र शासनाच्या वतीने पत्रकारांसाठी जाहीर झालेल्या योजनांची माहिती दिली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी सर्वांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. शेखर पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर सुहास हुद्दार यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला माजी महापौर मालोजी अष्टेकर, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी, प्रा. आनंद आपटेकर यांच्यासह बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.

The post पत्रकारांनी आधुनिक तंत्रज्ञान अवगत करणे आवश्यक – प्रवीण टाके appeared first on News 24 Tass Marathi.

मुलींच्या वाढविसानिमित्त वह्या वाटप
कल्लेहोळ येथील गोपाळ नेमाणी पाटील यांचा स्तुत्य उपक्रम

सुळगा (हिं.) / वार्ताहर

कल्लेहोळ (ता. बेळगाव) येथील प्रतिष्ठित नागरिक तथा शिक्षणप्रेमी पालक श्री. गोपाळ नेमाणी पाटील यांनी ‘रुतिका’ आणि ‘रुतुजा’ या स्वतःच्या जुळ्या मुलींचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. वादविसानिमित्त करण्यात येणाऱ्या इतर खर्चाला फाटा देत कल्लेहोळ प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी वह्यांचे वाटप केले. याबद्दल शाळेच्यावतीने मुख्याध्यापकांनी त्यांचे आभार मानले. यावेळी शाळेतील शिक्षक – शिक्षिका यांच्यासह इयत्ता पहिलीचे विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते.

The post मुलींच्या वाढविसानिमित्त वह्या वाटप appeared first on News 24 Tass Marathi.

उचगाव उपकेंद्रावरील भागात उद्या वीज नाही
बेळगाव / प्रतिनिधी

दुरुस्तीच्या कामानिमित्त उद्या गुरुवार दि. २९ ११० के. व्ही. उचगाव उपकेंद्राद्वारे होणाऱ्या भागात वीजपुरवठा खंडित होणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ४ पर्यंत वीजपुरवठ्यात व्यत्यय येणार आहे, असे हेस्कॉमच्या ग्रामीण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी कळविले आहे. बिजगर्णी, बोकमूर, कावळेवाडी, बेळवट्टी, बाकनूर, बेळगुंदी, सोनोली, येळेबैल, राकसकोप, कुद्रेमानी, कल्लेहोळ, बेळगुंदी औद्योगिक वसाहत यासह उचगाव, मण्णूर, बेकिनकेरे, सुळगा, तुरमुरी, कोनेवाडी, बाची, बेनकनहळ्ळी, सावगाव, अंगडी कॉलेज, गणेशपूर, महालक्ष्मीनगर, आर्मी कॉलनी, केएचबी ले आउट यासह या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पंपसेट परिसरातील वीजपुरवठा खंडित होणार आहे.

The post उचगाव उपकेंद्रावरील भागात उद्या वीज नाही appeared first on News 24 Tass Marathi.

संवेदनशील परिस्थितीत अफवा पसरवल्यास कठोर कारवाई !
जिल्हापोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद

बेळगाव / प्रतिनिधी

सद्यस्थितीत संवेदनशील परिस्थितीमध्ये खोट्या बातम्या पसरवून गैरसमज निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा बेळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. भीमशंकर गुळेद यांनी दिला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या आदेशानुसार आज बैठक घेण्यात आली असल्याचे डॉ. भीमशंकर गुळेद यांनी सांगितले. महत्त्वाच्या मंदिरांना, जलाशयांना सुरक्षा पुरवण्यात आली असून, जिल्ह्यातील प्रमुख कारखान्यांनाही योग्य ती सुरक्षा व्यवस्था दिली जाईल, असे ते म्हणाले. जातीय सलोखा बिघडवणारे पोस्ट डिलीट करण्यात आले असून, जिल्ह्यातील अशा एकूण १४ पेजेसवरील पोस्ट हटवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

बेळगाव जिल्हा दोन राज्यांच्या सीमेवर असल्याने विशेष सतर्कता बाळगली जात आहे. जिल्ह्यातील गॅस उत्पादन करणाऱ्या कारखान्यांनाही योग्य ती सुरक्षा पुरवली जाईल, असे पोलीस अधीक्षक डॉ. गुळेद यांनी स्पष्ट केले.

The post संवेदनशील परिस्थितीत अफवा पसरवल्यास कठोर कारवाई ! appeared first on News 24 Tass Marathi.