Job Archives | News 24 Tass Marathi

बेळगावमध्ये १९ जून रोजी ‘विकसित भारत रोजगार’ राष्ट्रीय कार्यक्रम
बेळगाव : पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत १९ जून रोजी बेळगावमध्ये राष्ट्रीय स्तरावरील ‘विकसित भारत रोजगार’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शहरातील फाउंड्री क्लस्टर येथे होणाऱ्या या कार्यक्रमात रोजगार, सामाजिक सुरक्षा आणि कामगार कल्याणाशी संबंधित विविध योजनांची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे.

ही माहिती हुबळी विभागाचे भविष्य निर्वाह निधी प्रादेशिक आयुक्त निरंजन गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितले की, या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना तसेच सामाजिक सुरक्षा योजनांबाबत जनजागृती करणे आणि उद्योग क्षेत्रातील मालक व लाभार्थी यांच्यात थेट संवाद घडवून आणणे हा आहे.

कार्यक्रमादरम्यान नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात येणार असून, कामगार कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि अलीकडील कामगार सुधारणा यांची सविस्तर माहितीही उपस्थितांना देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर उपस्थित राहणार असून सुमारे २०० जण सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. रोजगार आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या पत्रकार परिषदेला सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त शुभम मीना, अंमलबजावणी अधिकारी महेश जिंदे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

The post बेळगावमध्ये १९ जून रोजी ‘विकसित भारत रोजगार’ राष्ट्रीय कार्यक्रम appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावात ७ मार्चला भव्य रोजगार मेळावा
जिल्ह्यातील तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : जि. पं. सीईओ राहुल शिंदे

बेळगाव : जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना थेट उद्योगविश्वाशी जोडण्याच्या उद्देशाने ७ मार्च रोजी बेळगावात जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत शिवबसवनगर येथील एस. जी. बाळेकुंद्री तांत्रिक महाविद्यालयात हा मेळावा पार पडणार असून, तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी केले आहे.

जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत व विविध विभागांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मेळाव्याचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम व जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी आणि महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ राहतील, तर वैद्यकीय शिक्षण व कौशल्य विकास मंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

बेळगाव, हुबळी आणि बंगळुरू येथील १०० हून अधिक कंपन्या या मेळाव्यात सहभागी होणार असल्याने विविध क्षेत्रांत नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. एसएसएलसी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर किंवा इतर शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना थेट मुलाखतीची संधी मिळणार आहे.

जिल्ह्यातील युवक-युवतींनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

The post बेळगावात ७ मार्चला भव्य रोजगार मेळावा appeared first on News 24 Tass Marathi.