indian premier league Archives | News 24 Tass Marathi

आरसीबी सलग दुसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन !
अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा ५ गडी राखून पराभव

अहमदाबाद : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात दमदार कामगिरी करत गुजरात टायटन्सवर मात केली आणि सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याचा मान मिळवला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या रंगतदार सामन्यात बंगळुरूने १५६ धावांचे लक्ष्य १८ षटकांत पूर्ण करत ट्रॉफीवर पुन्हा एकदा आपले नाव कोरले.

लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात भक्कम झाली. सलामीवीर विराट कोहली आणि वेंकटेश अय्यर यांनी पहिल्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी उभारून संघाचा पाया मजबूत केला. अय्यरने ३२ धावांचे योगदान दिले, तर विराट कोहलीने नाबाद ७५ धावांची खेळी साकारत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. देवदत्त पडिक्कलला मोठी खेळी करता आली नाही. त्यानंतर टीम डेव्हिडने २४ धावा केल्या, तर कृणाल पंड्या एक धावेवर बाद झाला. अखेरीस विराटच्या षटकाराने बंगळुरूच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

यापूर्वी नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीस उतरलेल्या गुजरात टायटन्सला अपेक्षित सुरुवात मिळाली नाही. साई सुदर्शन १२ आणि कर्णधार शुबमन गिल १० धावांवर माघारी परतल्याने संघ दबावात आला. निशांत सिंधूने २० धावा केल्या, तर जोस बटलर १९ धावांवर बाद झाला. मधल्या फळीत अर्शद खानने १५, राहुल तेवतिया आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी ७ धावांचे योगदान दिले. अखेर वॉशिंग्टन सुंदरने संयमी अर्धशतक झळकावत नाबाद ५० धावा केल्या. त्याच्या खेळीमुळे गुजरातने २० षटकांत ८ बाद १५५ धावांपर्यंत मजल मारली.

सलग दोन हंगामांतील ऐतिहासिक यश :

आयपीएलच्या सुरुवातीपासून अनेक वर्षे विजेतेपदाची प्रतीक्षा करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गेल्या दोन हंगामांत इतिहास रचला आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली संघाने प्रथम मागील हंगामात पंजाब किंग्सचा पराभव करून पहिले जेतेपद जिंकले होते. त्यानंतर २०२६ च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सवर विजय मिळवत बंगळुरूने विजेतेपदाचे यशस्वी संरक्षण केले आणि सलग दुसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन बनण्याचा पराक्रम केला.

The post आरसीबी सलग दुसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन ! appeared first on News 24 Tass Marathi.

बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मृतांच्या कुटुंबियांना १० ऐवजी २५ लाखांची मदत
कर्नाटक सरकारची घोषणा

बेंगळुरू : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएलची ट्रॉफी जिंकल्यानंतर बंगळुरूमध्ये विजय परेड काढण्यात येत होती. मात्र, या कार्यक्रमावेळी अचानक एम चिन्नास्वामी स्टेडियमजवळ चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत तब्बल ११ जणांचा मृत्यू झाला तसेच ४७ जण जखमी झाले. या घटनेनंतर कर्नाटक सरकारने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची घोषणा केली होती. मात्र, या मदतीत आता वाढ करण्याची घोषणा सरकारने केली आहे. त्यामुळे आता या चेंगराचेंगरीच्या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांऐवजी २५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

दरम्यान, या संदर्भात कर्नाटकच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले की, “चिन्नास्वामी स्टेडियममधील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना जाहीर केलेली मदत २५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचे आदेश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले आहेत. यापूर्वी सरकारने प्रत्येकी १० लाख रुपयांची भरपाई जाहीर केली होती”, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून शनिवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनेही म्हटले आहे की कर्नाटक सरकारच्यावतीने पीडितांच्या कुटुंबियांना जाहीर केलेल्या मदतीव्यतिरिक्त जखमी झालेल्यांसाठी एक मदत निधी स्थापन करण्यात येईल.

The post बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मृतांच्या कुटुंबियांना १० ऐवजी २५ लाखांची मदत appeared first on News 24 Tass Marathi.

कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या सचिव आणि कोषाध्यक्षांचा राजीनामा
बेंगळूर : बेंगळुरू संघाने १८ वर्षांनंतर आयपीएलची ट्रॉफी जिंकल्याच्या पार्श्वभूमीवर विजय परेड काढण्यात येणार असताना बेंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमजवळ चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणात कर्नाटक सरकारने कारावाईचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत रायल चॅलेंज बंगळूरु (आरसीबी) आणि कार्यक्रम व्यवस्थापन (इव्हेंट मॅनेजमेंट) संस्थेच्या अधिकाऱ्यांसह ४ जणांना अटक केली. दरम्यान, या प्रकरणात आता आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे (केएससीए) सचिव ए.शंकर आणि कोषाध्यक्ष ई.एस. जयराम यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती सांगितली जात आहे. चेंगराचेंगरीच्या संदर्भात दाखल केलेल्या एफआयआर संदर्भात केएससीए आणि आरसीबीने कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे सचिव आणि कोषाध्यक्षांनी राजीनामे दिले आहेत.

The post कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या सचिव आणि कोषाध्यक्षांचा राजीनामा appeared first on News 24 Tass Marathi.

मुंबई इंडियन्सचा गुजरात टायटन्सवर दणदणीत विजय
क्वॉलिफायर २ मध्ये धडक ; गुजरात टायटन्सचे आव्हान संपुष्टात

चंडीगढ : आयपीएल 2025 मध्ये चांगली सुरुवात करणाऱ्या गुजरात टायटन्सला स्पर्धेतील एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. यासह गुजरात टायटन्सचा प्रवास संपला आहे. तर पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्सने सहाव्या विजेतेपदाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सचा 20 धावांनी पराभव केला आणि दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केला. आता क्वालिफायर-2 मध्ये पंजाबशी भिडणार आहे.

रोहित शर्माचा ‘हिटमॅन’ शो !

पहिल्यांदा खेळताना मुंबई इंडियन्सची सुरुवात एकदम तुफानी झाली. रोहित शर्मा आणि त्याचा नवीन सलामीवीर जोडीदार जॉनी बेअरस्टो यांनी जीटी गोलंदाजांना चांगलेच धारेवर धरले. पॉवरप्लेमध्ये हिटमॅनला दोन जीवदान मिळाले आणि त्याने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. दोघांनी मिळून पहिल्या 6 षटकात 79 धावा केल्या. पण साई किशोरने ही जोडी फोडली. 22 चेंडूत 47 धावा काढून बेअरस्टो आऊट झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव संघाच्या माजी कर्णधाराला पाठिंबा देण्यासाठी क्रीजवर आला.

रोहितने वादळी खेळी खेळली आणि 50 चेंडूत 81 धावा केल्या. या धमाकेदार खेळीदरम्यान रोहितने दोन मोठे विक्रमही आपल्या नावावर केले. खरं तर, हिटमन आता आयपीएलमध्ये 300 षटकार मारणारा एकमेव भारतीय फलंदाज बनला आहे. याशिवाय, त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 7000 धावांचा टप्पाही ओलांडला.

त्याच वेळी, सूर्यकुमारने 33 धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकांमध्ये, तिलक वर्मा (25) आणि कर्णधार हार्दिक पांड्या (22) यांनी काही शानदार शॉट्स खेळले. अशा प्रकारे, मुंबईने संपूर्ण षटक खेळल्यानंतर 5 विकेट गमावून 228 धावा केल्या.

कर्णधार शुभम गिल फेल :

लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात खुपच खराब झाली आणि पहिल्याच षटकात कर्णधार शुभम गिल (1) ची विकेट पडली. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर शुभम एलबीडब्ल्यू झाला. त्यानंतर साई सुदर्शन आणि कुशल मेंडिस यांनी 64 धावांची भागीदारी करत डावाची सूत्रे हाती घेतली. 20 धावा काढल्यानंतर मिशेल सँटनरच्या चेंडूवर कुशल मेंडिस हिटविकेटवर आऊट झाला.

साई सुदर्शनची जबरदस्त बॅटिंग :

येथून साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी तिसऱ्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली, ज्यामुळे गुजरात टायटन्स पुन्हा सामन्यात परतले. पण सुंदर-सुदर्शनची भागीदारी जसप्रीत बुमराहने मोडली. वॉशिंग्टन सुंदर 48 धावा केल्यानंतर जसप्रीत बुमराहने बाद झाला. सुंदरने 24 चेंडूंच्या खेळीत 5 चौकार आणि 3 षटकार मारले. त्यानंतर साई सुदर्शन पण वेगवान गोलंदाज रिचर्ड ग्लीसनच्या चेंडूवर आऊट झाला. सुदर्शनने 49 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 80 धावा केल्या.

The post मुंबई इंडियन्सचा गुजरात टायटन्सवर दणदणीत विजय appeared first on News 24 Tass Marathi.