hutamta din Archives | News 24 Tass Marathi

मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी सीमालढा अधिक तीव्र करणार
म. ए. समितीच्यावतीने कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन

भाषा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी २२ जूननंतर आंदोलनाचा इशारा

बेळगाव : सीमालढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करत मराठी भाषिकांच्या न्याय्य हक्कांसाठीचा संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नाचा निकाल लागेपर्यंत मराठी भाषिकांवरील अन्याय सहन केला जाणार नाही, तसेच २२ जूनपर्यंत भाषा वापराबाबतच्या कायद्याची अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमाभागातील मराठी भाषिकांच्यावतीने १ जून हुतात्मा दिनानिमित्त हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कन्नड सक्तीविरोधी आंदोलनात प्राणांचे बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या प्रतिमांना पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. “बेळगाव, खानापूर, निपाणी, बिदर-भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” तसेच कन्नड सक्तीविरोधी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

आपल्या मनोगतात प्रकाश मरगाळे म्हणाले की, सीमालढ्यातील हुतात्म्यांचे बलिदान मराठी भाषिक कधीही विसरणार नाहीत. त्यांच्या त्यागामुळेच सीमाभागातील मराठी माणूस आजही आपल्या हक्कांसाठी लढत आहे. मराठी भाषिकांच्या न्याय्य मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने शक्य तितकी आंदोलने करून हा लढा पुढे नेला जाईल. सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना मराठी भाषिकांवर कोणत्याही प्रकारचा भाषिक अन्याय होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

ते पुढे म्हणाले की, राज्य सरकारने सरकारी कार्यालये आणि खासगी संस्थांमध्ये ६० टक्के कन्नड व ४० टक्के इतर भाषांच्या वापरास परवानगी दिली आहे. मात्र, या निर्णयाची योग्य अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे २२ जूनपर्यंत संबंधित कायद्याची अंमलबजावणी झाली नाही, तर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच सीमाप्रश्न निकाली निघेपर्यंत सर्व शासकीय कागदपत्रे कन्नडसोबत मराठीतही उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.

यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर यांनी सीमाप्रश्नासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण केले. सरकारने ६० टक्के कन्नड आणि ४० टक्के इतर भाषांच्या वापरास परवानगी दिली असतानाही बेळगाव महापालिकेकडून १०० टक्के कन्नडचा आग्रह धरला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. याच्या निषेधार्थ २२ जून रोजी विराट मोर्चा काढण्यात येणार असून मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

खानापूरचे माजी आमदार दिगंबर पाटील यांनी हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका, एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी संघर्ष करा, असे आवाहन केले. शिवसेना नेते प्रकाश शिरोळकर यांनीही हुतात्म्यांना आदरांजली वाहत मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सीमाभागातील जनतेसोबत ठामपणे उभा असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष तथा माजी आमदार मनोहर किणेकर, शहर समितीचे अध्यक्ष रणजीत चव्हाण-पाटील, रमाकांत कोंडुसकर, खानापूरचे माजी आमदार दिगंबर पाटील, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, आर. एम. चौगुले, सरस्वती पाटील, रवी साळुंके, आर. आय. पाटील, प्रकाश शिरोळकर यांच्यासह समितीचे पदाधिकारी, शिवसेना कार्यकर्ते आणि मराठी भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी सीमालढा अधिक तीव्र करणार appeared first on News 24 Tass Marathi.

हुतात्मा दिन गांभिर्याने पाळा
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्यावतीने आवाहन

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागतर्फे १ जून रोजी पाळल्या जाणाऱ्या हुतात्मा दिनात सीमाभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या निवासस्थानी आयोजित बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, कन्नड सक्तीविरोधी लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकावर अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच कन्नड सक्तीच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या दडपशाहीविरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यास व्यापक पाठिंबा देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी कन्नड सक्तीविरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याबरोबरच सीमाप्रश्नाच्या तातडीच्या सोडवणुकीसाठी राबविण्यात येणाऱ्या एक लाख सह्यांच्या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. या मोहिमेसंदर्भात घटक समित्यांच्या बैठका घेऊन आपला निर्णय कळवावा, असेही सांगण्यात आले.

तसेच १ जून रोजी हिंडलगा येथील कार्यक्रमास सीमावासीयांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती ज्या दिवशी मोर्चाचे आयोजन करेल, त्या मोर्चातही उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन युवा समिती सीमाभागतर्फे करण्यात आले.

बैठकीस सरचिटणीस मनोहर हुंदरे, पिराजी मुंचडीकर, इंद्रजित धामणेकर, नारायण मुंचडीकर, मोतेश बारदेसकर, सुधीर शिरोळे, सचिन दळवी, रमेश माळवी, सुरज जाधव, श्रीकांत नांदुरकर, निलेश काकतकर, राजू पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

The post हुतात्मा दिन गांभिर्याने पाळा appeared first on News 24 Tass Marathi.

कन्नडसक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे आवाहन

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक युवा समिती कार्यालय कावळे संकुल टिळकवाडी बेळगाव येथे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

बैठकीच्या सुरवातीला मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, ज्येष्ठ नेते अर्जुन गोरल तसेच इतर समिती कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अध्यक्ष अंकुश केसरकर म्हणाले कर्नाटक शासनाने डॉ. गोकाक अहवाल मान्य केल्यानंतर सर्व ठिकाणी कन्नड भाषा सक्ती करण्यास सुरवात केली. त्याला विरोध करण्यासाठी समितीच्या वतीने सत्याग्रहाच्या माध्यमातून आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आले. १ जून १९८६ रोजी मा. शरद पवार गनिमी काव्याने कित्तूर राणी चन्नमा चौकात दाखल झाले आणि त्यांनी सत्याग्रह केला. महाराष्ट्राच्या नेत्यांना बेळगाव बंदी असून देखील सत्याग्रह यशस्वी झाल्याने प्रशासनाने शरद पवाराना अटक केली, ही बातमी सर्वदूर सीमाभागात पसरली लोक रस्त्यावर उतरून निदर्शने करू लागली बेळगावात हरताळ पाळला गेला, परिस्थिती स्पोटक बनली, आंदोलकांवर गोळीबार झाला या गोळीबारात नऊ निष्पाप मराठी भाषिकांना हौतात्म्य आले. शिवाय कित्येक कार्यकर्त्यांना अटक करून वेगवेगळ्या तुरुंगात डांबण्यात आले. हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण ठेवून सीमाप्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध रहाणे गरजेचे आहे.

यावर्षी सोमवार दिनांक १ जून रोजी सकाळी ८.३० वाजता हुतात्मा स्मारक हिंडलगा हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे तरी सर्व मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले.

शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा निर्णय :

दरवर्षी प्रमाणे युवा समितीच्या वतीने मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येते. यावर्षी उपक्रमाचे हे नववे वर्ष असून यावर्षी ३०० शाळांना ही साहित्य वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दहावीच्या गुणवंतांचा होणार सत्कार :

युवा समितीच्या वतीने येणाऱ्या जुलै महिन्यात मराठी माध्यमातील १० वी मध्ये बेळगाव शहर, बेळगाव तालुका आणि खानापूर विभागातील पहिला दुसरा आणि तिसरा क्रमांक आलेल्या विद्यार्थांचा सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सुरज कुडूचकर, किरण हुद्दार, संतोष कृष्णाचे, अक्षय बांबरकर, सुरज चव्हाण, महांतेश अलगोंडी, अश्वजीत चौधरी, रोहन कुंडेकर, आनंद पाटील, आकाश भेकणे, आशिष कोचेरी, प्रकाश हेब्बाजी आदी उपस्थित होते. चिटणीस प्रतीक पाटील यांनी आभार मानले.

The post कन्नडसक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे appeared first on News 24 Tass Marathi.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना बेळगावात अभिवादन
महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे किर्लोस्कर रोडवर अभिवादन कार्यक्रम

बेळगाव / प्रतिनिधी

मराठी भाषिकांच्या न्याय हक्कांसाठी संयुक्त महाराष्ट्र सीमालढ्यात प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना आज बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहरातील किर्लोस्कर रोडवर आयोजित अभिवादन कार्यक्रमात हुतात्म्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात रणजीत चव्हाण – पाटील यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर १७ जानेवारी १९५६ रोजी झालेल्या पहिल्या सीमालढ्यासह आजवरच्या संघर्षातील हुतात्म्यांच्या प्रतिमांचे पूजन केल्यानंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती, शहर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्यावतीने पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अमर रहे अमर रहे हुतात्मे अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्या.

यावेळी प्रमुख वक्ते ॲड. राजाभाऊ पाटील म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्रासाठीचा संघर्ष गेल्या सात दशकांपासून अखंडपणे सुरू आहे. स्वातंत्र्य चळवळीपासून पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेला हा लढा बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर व भालकीसह संयुक्त महाराष्ट्र साकार होईपर्यंत थांबणार नाही. यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले असून, हा वाद संसदेत पाठवून तेथे निर्णय व्हावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. तोपर्यंत हा संघर्ष सुरू ठेवत हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करूया, असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी रणजीत चव्हाण पाटील यांच्यासह उपस्थित इतर नेत्यांनीही आपले विचार मांडले. सर्व वक्त्यांनी आपल्या भाषणातून सीमाभाग महाराष्ट्रात विलीन करण्याचा दृढ निश्चय व्यक्त केला. दरवर्षीप्रमाणे १७ जानेवा हा कार्यक्रम शांततेत पार पडला असला, तरी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी म्हणून हुतात्मा चौक आणि परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

तत्पूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे रामदेव गल्ली, खडेबाजार, मारुती गल्ली, अणसुरकर गल्ली, किर्लोस्कर रोड मार्गे हुतात्मा चौकापर्यंत शांततेत मुक फेरी काढण्यात आली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी “संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे”, “रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. कडेकोट पोलीस बंदोबस्तात पार पडलेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने मराठी भाषिक सहभागी झाले होते.

या कार्यक्रमास मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी नगरसेवक रणजीत चव्हाण–पाटील, रमाकांत कोंडुसकर, मदन बामणे, माजी महापौर सरिता पाटील, नगरसेविका वैशाली भातखांडे, शिवानी पाटील, नगरसेवक रवी साळुंखे, किरण गावडे, माजी उपमहापौर संजय शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, शहरप्रमुख बंडू केरवाडकर, ॲड. अमर येळळूरकर, महेश जुवेकर, मनोहर हलगेकर, सुनील बाळेकुंद्री, सागर पाटील, किरण हुद्दार, ॲड. महेश बिर्जे, आप्पासाहेब गुरव, बापू जाधव, मदन बामणे, धनराज गवळी, शिवाजी हावळानाचे, शुभम शेळके, मोतेश बार्देसकर, सचिन केळवेकर, महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, श्रीकांत कदम यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना बेळगावात अभिवादन appeared first on News 24 Tass Marathi.

खानापूरमध्ये हुतात्मा दिनाचे गांभीर्याने आचरण
महाराष्ट्र एकीकरण समितीकडून हुतात्म्यांना अभिवादन

खानापूर / प्रतिनिधी

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने १७ जानेवारी रोजी हुतात्मा दिन अत्यंत गांभीर्यपूर्ण वातावरणात पाळण्यात आला. यानिमित्त स्टेशन रोड, खानापूर येथील हुतात्मा कै. नागाप्पा होसुरकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.

यावेळी समितीचे अध्यक्ष सूर्याजी पाटील यांनी हुतात्म्यांना अभिवादन करताना सांगितले की, “जोपर्यंत संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात विलीन होत नाही, तोपर्यंत रस्त्यावरची चळवळ थांबवणार नाही. सीमाभाग महाराष्ट्रात विलीन करण्यासाठी अखेरपर्यंत लढत राहणे हीच कै. हुतात्मा नागाप्पा होसुरकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल.”

खानापूर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती सुरेशराव देसाई यांनीही यावेळी विचार व्यक्त करताना म्हटले की, “ज्या ध्येयासाठी हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले, ते कार्य पूर्ण करण्यासाठी खानापूर तालुक्यासह संपूर्ण सीमाभागातील मराठी जनतेने एकसंघ होऊन केंद्र व राज्य सरकारविरोधात हा लढा अधिक तीव्रतेने सुरू ठेवणे आवश्यक आहे. येणाऱ्या पिढीलाही या चळवळीत सामावून घेऊन समितीच्या झेंड्याखाली एकत्रितपणे कार्यरत राहूया.”

या अभिवादन कार्यक्रमास समितीचे ज्येष्ठ नेते पी. एच. पाटील, रविंद्र पाटील, युवा समितीचे कार्याध्यक्ष किरण पाटील, राजू पाटील, प्रभाकर बिरजे, अर्जुन देसाई यांच्यासह तालुका समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post खानापूरमध्ये हुतात्मा दिनाचे गांभीर्याने आचरण appeared first on News 24 Tass Marathi.

कंग्राळी खुर्द येथे संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन
बेळगाव / प्रतिनिधी

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बलिदान दिलेल्या पहिल्या हुतात्म्यांना बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कंग्राळी खुर्द येथे अभिवादन करण्यात आले. कंग्राळी गावचे सुपुत्र हुतात्मा मारुती बेन्नाळकर आणि हुतात्मा बाळू निलजकर यांच्या स्मृतीस मानवंदना अर्पण करण्यात आली.

या कार्यक्रमात कमल मन्नोळकर, मनोहर हुंदरे, पियूष हावळ, आर. के. पाटील, डॉ. राजगोळकर, तालुका समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, अध्यक्ष मनोहर किणेकर आणि सचिव एम. जी. पाटील यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे ऐतिहासिक महत्त्व, हुतात्म्यांचे बलिदान आणि ते जपण्याची आजच्या पिढीची जबाबदारी यावर विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अध्यक्षा माजी आमदार बी. आय. पाटील यांच्या पत्नी पौर्णिमा पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत, हुतात्म्यांचा त्याग कधीही विसरता कामा नये, असे प्रतिपादन केले. यावेळी हुतात्मा मारुती बेन्नाळकर यांच्या कन्येला साडी-चोळी देऊन समितीच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. हुताम्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post कंग्राळी खुर्द येथे संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन appeared first on News 24 Tass Marathi.

हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी उद्या मराठी भाषिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे आवाहन

बेळगाव / प्रतिनिधी

१७ जानेवारी १९५६ रोजी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या मराठी भाषिक हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी शनिवार, दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ठीक ९.३० वाजता बेळगाव येथील हुतात्मा चौकात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशी मान्य करत तत्कालीन केंद्र सरकारने बेळगावसह मराठी बहुल भाग कर्नाटकात समाविष्ट केल्याची घोषणा केल्यानंतर सीमाभागात तीव्र उद्रेक उसळला होता. या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरलेल्या मराठी भाषिकांवर १७ जानेवारी १९५६ रोजी तत्कालीन मुंबई सरकारने अमानुष गोळीबार केला. या गोळीबारात पैलवान मारुती बेन्नाळकर, महादेव बारागडी, लक्ष्मण गावडे, मधु बांदेकर तसेच निपाणी येथील कमळाबाई मोहिते यांनी हौतात्म्य पत्करले. त्यानंतर झालेल्या सत्याग्रह आंदोलनात खानापूरचे नागप्पा होसुरकर यांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला.

या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानाला वंदन करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्व मराठी भाषिकांनी हुतात्मा चौकात एकत्र येऊन अभिवादन करावे, असे समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

हे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष वासू सामजी, राजू कदम, सिद्धार्थ चौगुले, सरचिटणीस श्रीकांत कदम, खजिनदार विनायक कावळे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

The post हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी उद्या मराठी भाषिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे appeared first on News 24 Tass Marathi.