halga - machhe bypass work Archives | News 24 Tass Marathi

संतप्त शेतकऱ्यांनी पुन्हा रोखले हालगा – मच्छे बायपासचे काम
न्यायालयीन आदेशाचा अवमान केल्याचा आरोप ; शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

बेळगाव : न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन करून हालगा – मच्छे बायपास रस्त्याचे काम सुरू ठेवण्यात आल्याच्या आरोपावरून संतप्त शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा काम बंद पाडल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

या बायपास रस्त्याच्या कामाला २०१९ पासून स्थानिक शेतकऱ्यांकडून सातत्याने विरोध केला जात आहे. उच्च न्यायालयाच्या मनाई आदेशासह जिल्हा न्यायालयानेही ‘झिरो पॉईंट’ निश्चित होईपर्यंत शेतजमिनींना हात लावू नये, असे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, या आदेशांकडे दुर्लक्ष करून काम सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

वर्क ऑर्डरबाबतही शंका उपस्थित करत पोलिसांची भीती दाखवून काम सुरू ठेवण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दोन दिवसांपूर्वी अनगोळ शिवारात आंदोलन करून काम थांबवण्यात आले होते. तरीही मंगळवारी मुसळधार पावसात काम सुरूच ठेवण्यात आल्याने शेतकरी संतप्त झाले.

चिखलामुळे वाहतूक अडथळे निर्माण झाल्याने कच्च्या रस्त्यावर दगड टाकण्याचे काम सुरू होते. हे काम न्यायप्रविष्ट प्रकरणातील शेतकरी हणमंत बाळेकुंद्री यांच्या शेतातही सुरू करण्यात आले. याची माहिती मिळताच त्यांनी पत्नीसमवेत घटनास्थळी धाव घेत ठेकेदाराला जाब विचारला.

यावेळी दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वाद झाला. “आमच्या शेतातील दगड तात्काळ काढा, अन्यथा रोडरोलरखाली जीव देऊ,” असा इशारा बाळेकुंद्री यांनी दिला. त्यांच्या भूमिकेला उपस्थित शेतकऱ्यांनी पाठिंबा देत काम बंद पाडले.

शेतकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेऊन ठेकेदाराने अखेर नमते घेत जेसीबीच्या साहाय्याने टाकलेले दगड पुन्हा ट्रकमध्ये भरून काम थांबवले. या घटनेनंतर परिसरात तणाव कायम आहे.

The post संतप्त शेतकऱ्यांनी पुन्हा रोखले हालगा – मच्छे बायपासचे काम appeared first on News 24 Tass Marathi.

हलगा–मच्छे बायपास प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक
दोन दिवसांत निर्णय घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

बेकायदेशीर कामकाजाबाबत शेतकरी व वकिलांची ठाम भूमिका

बेळगाव / प्रतिनिधी

हलगा–मच्छे बायपास प्रकरणी मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस बायपास प्रकल्पाविरोधात न्यायालयात लढा देणारे वकील तसेच बाधित शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आमंत्रित केले होते.

बैठकीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन संपादन प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती घेत प्रकरणातील सर्व बाबींचा अभ्यास केला. या विषयावर पुढील दोन दिवसांत पुन्हा बैठक घेऊन निर्णय जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी वकील रविकुमार गोकाककर यांनी हलगा- मच्छे बायपासचे काम कोणत्या पद्धतीने बेकायदेशीररीत्या सुरू आहे, याची सविस्तर माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. फिश मार्केटजवळ झिरो पॉईंट असताना चुकीच्या पद्धतीने नोटिफिकेशन काढण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच फिश मार्केट ते मच्छे रस्ता हा केवळ रुंदीकरणासाठी असताना, राष्ट्रीय महामार्ग एनएच-४ आणि एनएच-४ए यांना जोडणाऱ्या बायपासचा कोणताही उल्लेख नसतानाही काम सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले.

या प्रकल्पासाठी अद्याप वर्क ऑर्डर जारी करण्यात आलेली नसतानाही बायपासचे काम सुरू करण्यात आल्याचा गंभीर आरोप शेतकरी व वकिलांनी केला. त्यामुळे हे काम तात्काळ बंद करण्यात यावे, अशी ठाम मागणी बैठकीत करण्यात आली. सर्व मुद्द्यांवर सखोल चर्चा करून येत्या दोन दिवसांत योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी उपस्थितांना दिले.

The post हलगा–मच्छे बायपास प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक appeared first on News 24 Tass Marathi.

हलगा – मच्छे बायपाससह राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मार्फत सुरू असलेल्या विविध रस्ते विकास प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आला. यामध्ये हलगा – मच्छे बायपास रस्त्यासह इतर महत्त्वाच्या महामार्ग कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीत बायपास रस्त्याच्या भूसंपादनाची स्थिती, सुरू असलेल्या कामांची सद्यःस्थिती, तांत्रिक अडचणी आणि अडथळ्यांवर चर्चा झाली. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा बायपास अत्यंत महत्त्वाचा असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद करत विभागांमध्ये समन्वय साधून अडथळे तातडीने दूर करण्याचे निर्देश दिले.

काही ठिकाणी कामांना होत असलेल्या विलंबाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. भूसंपादन, विद्युत खांब, पाणी पाइपलाइन व दूरसंचार वाहिन्यांचे स्थलांतर यासंदर्भातही स्पष्ट सूचना देण्यात आल्या. रस्ते कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, तसेच कामे ठरलेल्या मानकांनुसार आणि वेळेत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.

दरम्यान, सुरू असलेल्या कामांमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी योग्य वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. बैठकीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम, महसूल, पोलिस विभाग तसेच कंत्राटदारांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

The post हलगा – मच्छे बायपाससह राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा appeared first on News 24 Tass Marathi.

हलगा – मच्छे बायपासच्या कामाला पुन्हा सुरुवात
शेतकऱ्यांचा विरोध कायम

बेळगाव / प्रतिनिधी

हलगा–मच्छे बायपासच्या कामाला पुन्हा गती देण्यात आली असून अनगोळ शिवारात मंगळवारपासून रस्ता सपाटीकरणाचे काम सुरू झाले आहे. मात्र, या कामाला सुरुवातीपासून विरोध करणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा नाराजी व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की बायपासचा मार्ग सुपीक जमिनीतून नेला जात आहे. हा रस्ता पडीक जमिनीतून करावा अशी त्यांची मागणी अनेक वर्षांपासून आहे. यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली, परंतु तरीही काम दडपशाहीने सुरू ठेवले जात असल्याचा आरोप ते करत आहेत.

रस्त्याबाबतचे नोटिफिकेशन आणि प्रत्यक्षात होत असलेला मार्ग यामध्ये तफावत असल्याचाही शेतकरी आरोप करतात. झिरो पॉईंटबाबत न्यायालयाने स्पष्ट आदेश दिल्यानंतरही महामार्ग प्राधिकरणाने अलारवाड क्रॉसला झिरो पॉईंट दाखवून दिशाभूल केली, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

न्यायालयीन लढा, खर्च आणि वेळ यामुळे अनेक शेतकरी हतबल झाले असून काहींनी नुकसानभरपाई स्वीकारली आहे. मात्र, काही शेतकऱ्यांचा खटला अद्यापही न्यायालयात प्रलंबित आहे. असे असतानाही पुन्हा युद्धपातळीवर काम सुरू झाल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढला आहे.

सध्या अनगोळ परिसरात माती टाकून रस्ता सपाटीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याची तयारी कंत्राटदाराने केली असून पुढील काही दिवसांत काम आणखी गती घेणार आहे.

The post हलगा – मच्छे बायपासच्या कामाला पुन्हा सुरुवात appeared first on News 24 Tass Marathi.