South Goa Archives | News 24 Tass Marathi

प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉ. केतन भाटीकर यांचे सर्पदंशाने निधन
अनमोड घाटात घडली दुर्दैवी घटना

खानापूर : प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट आणि काँग्रेसचे सक्रिय नेते डॉ. केतन भाटीकर यांचे सर्पदंशामुळे दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे फोंडा आणि परिसरात शोककळा पसरली असून राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. भाटीकर हे दिल्लीला जाण्याच्या तयारीत होते. मात्र त्यांनी प्रवास रद्द करून बेळगावला भेट दिली होती. त्यानंतर बेळगावहून फोंडा (गोवा) येथे परतत असताना अनमोड घाट परिसरात ते लघुशंकेसाठी थांबले. यावेळी त्यांच्या हातातील मोबाईल खाली पडला. मोबाईल उचलण्यासाठी त्यांनी झुडपात हात घातला असता विषारी सापाने त्यांच्या हाताला दंश केला.

घटनेनंतर वाहनचालकाने त्यांना तातडीने धारबांदोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

डॉ. भाटीकर हे गोव्यातील नामांकित फिजिओथेरपिस्ट म्हणून परिचित होते. त्यांनी अलीकडेच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष सोडून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

भाजप नेते रवी नाईक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली होती. त्यांच्या विजयाबाबत राजकीय वर्तुळात सकारात्मक चर्चा सुरू असतानाच उच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर ती निवडणूक रद्द करण्यात आली होती.

डॉ. केतन भाटीकर यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक सक्रिय आणि लोकप्रिय नेतृत्व गमावल्याची भावना व्यक्त होत असून, विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. डॉ. भाटीकर यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाने एक सक्रिय आणि लोकप्रिय नेता गमावला असून त्यांच्या अकाली जाण्यामुळे सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.

The post प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉ. केतन भाटीकर यांचे सर्पदंशाने निधन appeared first on News 24 Tass Marathi.

मोलेम तपासणी नाक्यावर गोमांसाने भरलेली झायलो कार जप्त
एक संशयित ताब्यात ; दुसरा फरार

खानापूर / प्रतिनिधी

मोलेम  येथील तपासणी नाक्यावर शनिवारी रात्री अंदाजे ९. १५ वा. गोव्याच्या दिशेने जाणारी बेकायदेशीर गोमांस वाहतूक करणारी टाटा झायलो कार पोलिसांनी ताब्यात घेतली. वाहनातून मोठ्या प्रमाणात गोमांस आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या करवाईत एक संशयित व्यक्ती पोलिसांच्या हाती लागला असून दुसरा आरोपी फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जीए ०७ ई १५८२ क्रमांकाची झायलो गोव्याच्या दिशेने जात असताना तपासणी नाक्यावर तैनात कर्मचार्‍यांना वाहन संशयास्पद वाटले. त्यानंतर कारची तपासणी केली असता आत मोठ्या प्रमाणात गोमांस साठवलेले आढळले. वाहन आणि अटक केलेला संशयित यांना तात्काळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच मोलेम परिसरातील हिंदुत्ववादी व बजरंग दलाचे कार्यकर्ते तपासणी नाक्यावर मोठ्या संख्येने एकत्र आले. पोलिसांसह तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी मिळून फरार आरोपीचा शोध मोहीम हाती घेतली; मात्र रात्री उशिरापर्यंत तो सापडला नाही. या प्रकरणाचा पुढील तपास मोलेम (गोवा) पोलीस करीत असून फरार आरोपीला पकडण्यासाठी शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.

The post मोलेम तपासणी नाक्यावर गोमांसाने भरलेली झायलो कार जप्त appeared first on News 24 Tass Marathi.

गोव्याला तीर्थक्षेत्राचे स्थान लाभणार
पणजी / प्रतिनिधी

गोवा पर्यटन खात्याने राज्यातील आध्यात्मिक पर्यटनाला नवसंजीवनी देण्यासाठी ‘एकादशा तीर्थयात्रा’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील अकरा प्रमुख मंदिरांना एका सुसंगत प्रवास मार्गात एकत्रित करणाऱ्या या यात्रेला आकार देण्यासाठी पर्यटन संचालक केदार नाईक यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकील जीटीडीसीचे विपणन व हॉटेल विभागाचे उपमहाव्यवस्थापक दीपक नार्वेकर, साहाय्यक पर्यटन संचालक जयेश काणकोणकर तसेच संबंधित अकरा मंदिर समित्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीची सुरूवात एकादशी तीर्थयात्रेची संकल्पना आणि नियोजन स्पष्ट करणाऱ्या सविस्तर सादरीकरणाने झाली. यात दररोज चार मंदिरांना भेट देत एकूण तीन दिवसांच्या आध्यात्मिक अनुभवाचा आराखडा मांडण्यात आला. यामध्ये पुढील अकरा मंदिरांच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला. श्री मंगेश मंदिर, मंगेशी, श्री महालसा नारायणी मंदिर, म्हार्दोळ, श्री महादेव मंदिर, तांबडी-सुर्ला, श्री सप्तकोटेश्वर मंदिर, नार्वे ,श्री ब्रह्मा मंदिर, सत्तरी, श्री शांतादुर्गा मंदिर, फातर्पा श्री हरी मंदिर, मडगाव, श्री दामोदर मंदिर, जांबावली, श्री परशुराम मंदिर, पैंगीणश्री महागणपती मंदिर, खांडोळा, श्री दत्तात्रेय मंदिर, साखळी अशी ही मंदिरे आहेत.

The post गोव्याला तीर्थक्षेत्राचे स्थान लाभणार appeared first on News 24 Tass Marathi.