food supply Archives | News 24 Tass Marathi

रेशन सर्व्हरच्या समस्येने दुकानदार , लाभार्थी त्रस्त
वितरण व्यवस्था ठप्प

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील (रेशन) सर्व्हरमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने रेशन दुकानदार आणि लाभार्थी त्रस्त झाले आहेत. एका लाभार्थ्याचा अंगठा घेऊन रेशन वितरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १५ ते २० मिनिटांपासून तब्बल एक तासापर्यंत वेळ लागत असल्याची तक्रार दुकानदारांनी केली आहे.

राज्यभर रेशनची उचल उशिराने झाल्याने महिन्याच्या अखेरच्या टप्प्यातही अनेक रास्तभाव दुकानांमध्ये अद्याप धान्य पोहोचलेले नाही. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली सर्व्हरची समस्या पुन्हा गंभीर झाल्याने नागरिकांना रेशन मिळवण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे.

या समस्येकडे तातडीने लक्ष वेधण्यासाठी सरकारी रेशन दुकानदार संघटनेच्या बेळगाव जिल्हा विभागाच्या वतीने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार विभागाचे बेळगावचे उपसंचालक मल्लिकार्जुन नायक यांना निवेदन देण्यात आले. सर्व्हरची तांत्रिक अडचण दूर करून रेशन वितरण सुरळीत करण्याची मागणी संघटनेने केली.

संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राजशेखर तळवार यांनी सांगितले की, गेल्या २५ वर्षांत एवढी गंभीर सर्व्हर समस्या कधीच निर्माण झाली नव्हती. काही ठिकाणी एका लाभार्थ्याचे रेशन कार्डावरील व्यवहार पूर्ण करण्यासाठी तब्बल एक तास लागत असल्याने दिवसभरात मोजक्याच लाभार्थ्यांना धान्य वितरित करणे शक्य होत आहे.

दुकानदार सकाळी साडेपाच वाजल्यापासून रात्रीपर्यंत दुकाने सुरू ठेवत असले तरी सर्व्हरच्या तांत्रिक बिघाडामुळे व्यवहार पूर्ण होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांमध्ये दुकानदारांविषयी गैरसमज निर्माण होत असून, प्रत्यक्षात सर्व्हरच्या समस्येमुळेच रेशन वितरणात अडथळे येत असल्याचे त्यांनी सांगितले.

ई-केवायसीची प्रक्रिया आणि सर्व्हरवरील वाढता ताण यामुळे ही समस्या आणखी गंभीर झाल्याचा दावा दुकानदारांनी केला आहे. पुढील दोन दिवसांत सर्व्हरची समस्या सोडवून रेशन वितरण सुरळीत न केल्यास बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्तभाव दुकान मालकांच्या वतीने अहोरात्र धरणे सत्याग्रह सुरू करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

यावेळी बेळगाव जिल्हा व तालुक्यातील अनेक रेशन दुकानदार उपस्थित होते.

The post रेशन सर्व्हरच्या समस्येने दुकानदार , लाभार्थी त्रस्त appeared first on News 24 Tass Marathi.

समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहांच्या अन्नपुरवठ्याची कोट्यवधींची बिले थकीत
कंत्राटदारांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी

बेळगाव : समाजकल्याण विभागाच्या अखत्यारीतील दहावीपूर्व व दहावीनंतरच्या शासकीय वसतिगृहांमधील अन्नपुरवठ्याची कोट्यवधी रुपयांची बिले गेल्या १२ ते १४ महिन्यांपासून प्रलंबित असल्याने राज्यभरातील वसतिगृहांच्या व्यवस्थापनासमोर गंभीर आर्थिक संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर कंत्राटदारांनी मुख्यमंत्री यांच्याकडे तातडीने हस्तक्षेप करून निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे.

बेळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांतील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहांमध्ये अन्न पुरविण्याचे काम अधिकृत निविदेद्वारे टीएपीएमसीएस (TAPMCS) या संस्थेकडे आहे. मात्र, नियमित अन्नधान्याचा पुरवठा सुरू ठेवूनही संस्थेला गेल्या वर्षभराहून अधिक काळ सरकारकडून कोणतेही अनुदान मिळालेले नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

निधी रखडल्यामुळे वसतिगृहांतील विद्यार्थ्यांच्या भोजन व्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली असून, दुसरीकडे वॉर्डननाही दैनंदिन कारभार सुरळीत ठेवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून कंत्राटदार आणि वॉर्डन यांनी समाजकल्याण विभागाच्या सहसंचालकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला. तसेच विभागाच्या आयुक्तांनाही या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले. काही वॉर्डननी बेंगळुरू येथे जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र, अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याची माहिती देण्यात आली.

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अशीच परिस्थिती असल्याने हा प्रश्न गंभीर बनला आहे. विद्यार्थ्यांचा अन्नपुरवठा खंडित होऊ नये आणि कंत्राटदारांची आर्थिक अडचण दूर व्हावी, यासाठी मुख्यमंत्री यांनी तातडीने हस्तक्षेप करून प्रलंबित निधी वितरित करावा, अशी मागणी संबंधितांनी केली आहे.

The post समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहांच्या अन्नपुरवठ्याची कोट्यवधींची बिले थकीत appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना निकृष्ट अन्नाचा पुरवठा
सडलेली अंडी दिल्याचा आरोप

बेळगाव / प्रतिनिधी

शहर स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज कष्ट करणाऱ्या बेळगाव महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवले जात असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. चव्हाट गल्ली परिसरात कार्यरत कर्मचाऱ्यांना दिलेल्या जेवणात सडलेली व पिवळी पडलेली अंडी देण्यात आल्याचा आरोप कामगारांनी केला असून या घटनेमुळे महापालिकेच्या अन्न पुरवठा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

शहरातील चव्हाट गल्ली परिसरात काम करणाऱ्या महापालिकेच्या सुमारे ६९ स्वच्छता कर्मचाऱ्यांना रोजच्या जेवणासोबत अंडी पुरवली जातात. मात्र अलीकडे देण्यात आलेली अंडी उकडल्यावर त्यांचा रंग पिवळसर पडल्याचे आणि त्यातून दुर्गंधी येत असल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. निकृष्ट दर्जाचे अन्न पाहून अनेक कामगारांनी ते खाण्यास नकार दिला. काही कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करत सांगितले की, दिलेली अंडी इतकी खराब होती की जनावरेदेखील ती खाणार नाहीत.

दिवसभर शहराची स्वच्छता राखण्यासाठी मेहनत करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरोग्यदायी व पौष्टिक अन्न देणे ही महापालिकेची जबाबदारी असताना त्यांना अशा प्रकारचे अन्न देणे ही गंभीर बाब असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. अशा निकृष्ट अन्नामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, या प्रकरणाबाबत संबंधित कंत्राटदाराला विचारणा करण्यात आली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अंडी जास्त वेळ उकळल्यामुळे त्यांचा रंग बदलला असावा, असा दावा त्याने केला. मात्र कामगारांनी हे स्पष्टीकरण फेटाळून लावत निकृष्ट अन्न पुरवठ्याबाबत जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या प्रकारामुळे बेळगाव महापालिकेच्या देखरेख व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अन्न पुरवठ्याची गुणवत्ता तपासण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य देखरेख होत नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. याबाबत तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांना पुढे दर्जेदार व सुरक्षित अन्न पुरवले जावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

The post बेळगाव महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना निकृष्ट अन्नाचा पुरवठा appeared first on News 24 Tass Marathi.