enforcement directorate Archives | News 24 Tass Marathi

अबकारी आयुक्तांच्या निवासस्थानावरील ईडीच्या छाप्यात १३.३ कोटींची मालमत्ता जप्त
बेळगाव : बेळगाव विभागाचे अतिरिक्त अबकारी आयुक्त वाय. मंजुनाथ यांच्या निवासस्थानावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या छाप्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, दागदागिने आणि महत्त्वाची आर्थिक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईनंतर ईडीने तपासासंदर्भातील अधिकृत माहिती जाहीर केली आहे.

ईडीच्या शोधमोहिमेदरम्यान एकूण १३.३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. यामध्ये ५.५ कोटी रुपयांची रोख रक्कम, ७.८ कोटी रुपये मूल्याचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच ३.३ लाख रुपयांचे परदेशी चलन समाविष्ट आहे. याशिवाय कॅश बुक, मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची नोंद असलेले अनेक दस्तऐवजही जप्त करण्यात आले आहेत.

ईडीने बेळगाव, म्हैसूर आणि बेंगळुरू येथील एकूण १४ ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत अतिरिक्त अबकारी आयुक्त वाय. मंजुनाथ, वरिष्ठ अधिकारी जगदीश नायक आणि के. एम. तम्मण्णा यांच्याशी संबंधित ठिकाणांचा समावेश होता.

तपासादरम्यान अधिकाऱ्यांच्या हाती एक महत्त्वाची डायरी लागली असून, त्यामध्ये अबकारी परवाने मंजूर करणे, नूतनीकरण करणे आणि इतर प्रशासकीय प्रक्रियांशी संबंधित कथित आर्थिक व्यवहारांच्या नोंदी असल्याचे सांगितले जात आहे. तसेच विविध दारू विक्री परवानाधारकांकडून नियमित स्वरूपात रक्कम गोळा केल्याच्या नोंदीही आढळल्याची माहिती समोर आली आहे.

ईडीच्या प्राथमिक तपासात या कथित व्यवहारांमधून मिळालेल्या निधीचा वापर बेनामी मालमत्ता खरेदी, नातेवाईकांच्या नावावर गुंतवणूक आणि इतर आर्थिक व्यवहारांसाठी करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. जप्त कागदपत्रांच्या आधारे ईडीकडून पुढील तपास सुरू असून, या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी केली जात आहे.

The post अबकारी आयुक्तांच्या निवासस्थानावरील ईडीच्या छाप्यात १३.३ कोटींची मालमत्ता जप्त appeared first on News 24 Tass Marathi.

ईडीच्या कारवाईनंतर वाय. मंजुनाथ बेळगावात दाखल
निवासस्थानी चार्टर्ड अकाउंटंटसोबत दीर्घ चर्चा

बेळगाव : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विविध ठिकाणी टाकलेल्या धाडीनंतर उत्पादन शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त वाय. मंजुनाथ बेळगावात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. छापेमारीनंतरच्या घडामोडींमुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेळगावातील टीव्ही सेंटर परिसरातील निवासस्थानी पोहोचल्यानंतर वाय. मंजुनाथ यांनी आर्थिक आणि कायदेशीर बाबींवरील मार्गदर्शनासाठी शहरातील ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट सीए पी. जी. गाली यांची भेट घेतली. ही बैठक सुमारे तीन तास चालल्याचे सांगितले जाते.

या चर्चेदरम्यान ईडीकडून तपासण्यात आलेले आर्थिक व्यवहार, जप्त करण्यात आलेली कागदपत्रे, संभाव्य नोटिसा तसेच पुढील चौकशीच्या प्रक्रियेला सामोरे जाण्यासंदर्भातील विविध मुद्द्यांवर विचारविनिमय झाल्याची चर्चा आहे. भविष्यात उद्भवू शकणाऱ्या कायदेशीर बाबींविषयीही मार्गदर्शन घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दीर्घ चर्चेनंतर सीए पी. जी. गाली यांनी निवासस्थानातून प्रस्थान केले. ईडीच्या धाडीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे वाय. मंजुनाथ यांच्या पुढील भूमिकेकडे आणि तपासातील आगामी घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

The post ईडीच्या कारवाईनंतर वाय. मंजुनाथ बेळगावात दाखल appeared first on News 24 Tass Marathi.

चिक्कोडी उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक विश्वनाथ गणिगेर यांच्या निवासस्थानी ईडीची कारवाई
मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासाचा विस्तार ; कागदपत्रांची तपासणी सुरू

चिक्कोडी : उत्पादन शुल्क विभागाशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहारांच्या तपासात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आणखी एक पाऊल पुढे टाकत चिक्कोडी उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक विश्वनाथ गणिगेर यांच्या निवासस्थानी छापेमारी केली आहे. या कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांकडून विविध कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

यापूर्वी उत्पादन शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त वाय. मंजुनाथ यांच्याशी संबंधित विविध ठिकाणी ईडीने छापे टाकले होते. त्यानंतर तपासाची व्याप्ती वाढवत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्कात असलेल्या काही व्यक्ती आणि अधिकाऱ्यांच्या ठिकाणांचीही तपासणी सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या पथकाने बेळगाव शहरातील बसव कॉलनी परिसरातील विश्वनाथ गणिगेर यांच्या निवासस्थानी भेट देऊन आवश्यक कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित नोंदींची छाननी सुरू केली आहे.

राज्यात सुरू असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासाअंतर्गत ईडी विविध ठिकाणी शोधमोहीम राबवत असून, यापूर्वी अतिरिक्त आयुक्त वाय. मंजुनाथ तसेच इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंधित ठिकाणीही कारवाई करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सध्याची छापेमारी तपासाचा भाग असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, या कारवाईबाबत ईडीकडून अधिकृत तपशील जाहीर करण्यात आलेला नसून, तपास पूर्ण झाल्यानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

The post चिक्कोडी उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक विश्वनाथ गणिगेर यांच्या निवासस्थानी ईडीची कारवाई appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावचे अतिरिक्त उत्पादन शुल्क आयुक्त वाय. मंजुनाथ यांच्यावर ईडीची कारवाई
बेळगाव, म्हैसूर, बेंगळुरूसह सहा ठिकाणी कारवाई एकाचवेळी छापेमारी

कागदपत्रांची तपासणी सुरू

बेळगाव : अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने अतिरिक्त उत्पादन शुल्क आयुक्त वाय. मंजुनाथ यांच्याशी संबंधित विविध ठिकाणांवर छापेमारीची कारवाई केली आहे. बेळगाव, म्हैसूर, बेंगळुरू आणि हसन जिल्ह्यातील आरसिकेरेसह एकूण सहा ठिकाणी एकाच वेळी ही मोहीम राबविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या पथकाने वाय. मंजुनाथ यांच्याशी संबंधित मालमत्ता आणि व्यवहारांशी निगडित कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. यामध्ये त्यांच्या परिचित आणि निकटवर्तीयांच्या निवासस्थानांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

कारवाईदरम्यान म्हैसूरमधील एका मित्राचे घर, बेंगळुरूमधील एक अपार्टमेंट, हसन जिल्ह्यातील आरसिकेरे येथील निकटवर्तीयाचे निवासस्थान तसेच अथणी तालुक्यातील ऐनापूर गावातील एका व्यक्तीच्या घराचीही तपासणी करण्यात आली. विविध ठिकाणांहून कागदपत्रे आणि इतर माहिती संकलित करण्याचे काम सुरू असल्याचे समजते.

वाय. मंजुनाथ यांच्यावर बेनामी व्यवहारांच्या माध्यमातून जमीन, बार आणि रेस्टॉरंट व्यवसायाशी संबंधित मालमत्ता उभारल्याचा आरोप असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर ईडीकडून आर्थिक व्यवहार आणि मालमत्तेच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.

दरम्यान, बेंगळुरूमधील त्यांच्या निवासस्थानीही अधिकाऱ्यांकडून तपास सुरू असून, या कारवाईबाबत ईडीकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

The post बेळगावचे अतिरिक्त उत्पादन शुल्क आयुक्त वाय. मंजुनाथ यांच्यावर ईडीची कारवाई appeared first on News 24 Tass Marathi.