eco friendly Archives | News 24 Tass Marathi

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी रोटरी क्लब उत्तरच्या हरित अभियानाला सुरूवात
शहरातील १० प्रमुख केंद्रांवर शाडूच्या मूर्ती उपलब्ध करून देणार

पर्यावरण संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनाचे सहकार्य

बेळगाव : आगामी गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याच्या उद्देशाने बेळगाव जिल्हा प्रशासन आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष जनजागृती अभियानाला प्रारंभ करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील १० प्रमुख केंद्रांवर शाडूच्या गणेशमूर्ती उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली असून, प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तींना पर्याय म्हणून पर्यावरणपूरक मूर्तींचा स्वीकार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन अभियानाची माहिती दिली. या उपक्रमाचे स्वागत करत जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक तसेच घरगुती गणेशोत्सवात शाडूच्या मूर्तींचीच प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन केले. पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांनी पीओपी मूर्तींचा वापर टाळून हरित गणेशोत्सव साजरा करावा, असे त्यांनी सांगितले.

रोटरी क्लबतर्फे हा उपक्रम सलग सातव्या वर्षी राबविण्यात येत आहे. यावर्षीही नागरिकांनी रासायनिक रंगांनी रंगविलेल्या आणि पीओपीच्या मूर्तींऐवजी शाडूच्या मूर्तींना प्राधान्य द्यावे, असे क्लबचे पदाधिकारी सुधीर यांनी सांगितले.

क्लबचे माजी अध्यक्ष इरफान शेख यांनी सांगितले की, पीओपीच्या मूर्तींमुळे नद्या, तलाव आणि इतर जलस्रोतांचे प्रदूषण वाढते. विसर्जनानंतर मूर्तींचे पूर्णपणे विरघळत नसल्याने पर्यावरणासह धार्मिक भावनांनाही धक्का पोहोचतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

या अभियानांतर्गत बामणे टॉवर्स (गोवा वेस), कुमारस्वामी लेआउट, भाग्यनगर, किर्लोस्कर रोड, वडगाव, खासबाग सर्कल, शिवबसवनगर, टिळकवाडी, हिंडलगा आणि मदनोली रोड या शहरातील १० ठिकाणी शाडूच्या गणेशमूर्तींचे बुकिंग आणि वितरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थतर्फे करण्यात आले आहे.

The post पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी रोटरी क्लब उत्तरच्या हरित अभियानाला सुरूवात appeared first on News 24 Tass Marathi.