civic problem Archives | News 24 Tass Marathi

अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी
भररस्त्यात मालाची चढ-उतार ; नागरिक त्रस्त

शहापूरसह उपनगरांमध्ये परिस्थिती गंभीर

बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरांमध्ये वाहतूक कोंडी ही आता केवळ दैनंदिन समस्या न राहता गंभीर नागरी प्रश्न बनला आहे. पोलीस विभागाने अवजड वाहनांच्या शहर प्रवेशावर निर्बंध घातले असतानाही अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसत आहे. भरदिवसा रस्त्यावरच अवजड वाहनांचे थांबणे तसेच मालाची चढ-उतार सुरू असल्याने नागरिक व वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

असाच प्रकार शहापूरमधील भारत नगर तिसरी गल्ली परिसरात सातत्याने पाहायला मिळत आहे. येथे एका ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यालय असून मोठी अवजड वाहने दिवसभर रस्त्यावर उभी केली जातात. याच ठिकाणी मालाची चढ-उतार केली जात असल्याने अरुंद रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी निर्माण होते.

याशिवाय छोट्या मालवाहू वाहनांचीही रस्त्यावरच पार्किंग केली जात असल्याने परिस्थिती अधिकच बिघडते. परिणामी स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि व्यापाऱ्यांना रोजच्या रोज अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकदा वाहनचालक व नागरिकांमध्ये शाब्दिक बाचाबाचीचे प्रकारही घडत असल्याची माहिती मिळत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रात्री किंवा पहाटे मालाची चढ-उतार केल्यास कोणतीही हरकत नाही, मात्र भरदिवसा होणाऱ्या या प्रकारामुळे मोठा त्रास होत आहे. याबाबत संबंधित ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकाला माहिती देऊनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर शहापूर पोलीस तसेच वाहतूक विभागाने तातडीने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. शहर व उपनगरांतील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी घालण्यात आलेल्या वेळेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे तसेच अरुंद रस्त्यांवर अवजड वाहनांच्या लोडिंग-अनलोडिंगवर कठोर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचेही नागरिकांचे मत आहे.

The post अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी appeared first on News 24 Tass Marathi.

येळ्ळूर गावच्या विविध समस्यांकडे समाजसारथी संघटनेने वेधले लक्ष
ग्रामपंचायत पीडीओंना दिले निवेदन

गटार सफाई, स्मशानभूमी सुधारणा व पाणीपुरवठ्याची मागणी

येळ्ळूर : समाज सारथी सेवा संघ यांच्या वतीने गावातील विविध नागरी समस्यांबाबत येळ्ळूर ग्रामपंचायत पीडीओ पूनम गडगे यांना निवेदन देण्यात आले. पावसाळ्यापूर्वी गटारांची स्वच्छता, स्मशानभूमी सुधारणा, नाला सफाई, डास निर्मूलन फवारणी तसेच पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, सिद्धेश्वर गल्लीसह गावातील अनेक भागांतील सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारी गेल्या पाच ते सात वर्षांत साफ करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे गटारी तुंबून पावसाळ्यात सांडपाणी रस्त्यावर येते आणि दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. उपनगरांतील गटारी गवत व झुडपांनी बंद झाल्याने सांडपाणी थेट शेतांमध्ये जाऊन शेतीचे नुकसान होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

गावातील मुख्य स्मशानभूमीसह विविध समाजांच्या स्मशानभूमींमध्ये शेगड्यांची संख्या अपुरी पडत असल्याने ती वाढवावी, नवीन शेड उभारावीत आणि विद्यमान शेडची दुरुस्ती करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच जे. जे. एम. योजनेअंतर्गत होणारा पाणीपुरवठा अपुरा असून तो सुरळीत करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

लक्ष्मी तलाव परिसरातील झाडांच्या वाढलेल्या फांद्या घरांपर्यंत पोहोचल्या असून त्याखालून वीजतारा गेल्याने धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे केईबी आणि वन विभागाशी समन्वय साधून त्या हटवाव्यात, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी पीडीओ पूनम गडगे यांनी पावसाळ्यापूर्वी नाले व गटारी साफ करण्याचे काम दोन दिवसांत सुरू होणार असल्याचे सांगितले. डास निर्मूलनासाठीही उपाययोजना केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. जे. जे. एम. योजनेतील त्रुटींबाबत संबंधित विभाग व जिल्हा परिषदेला पत्र देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष सी. एम. गोरल, उपाध्यक्ष दुदाप्पा बागेवाडी, शिवाजी सायनेकर, हणमंत पाटील, डॉ. पावले, सुरज गोरल, हणमंत कुगजी, राजू पावले, गोविंद काळसेकर, परशराम बिजगरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

The post येळ्ळूर गावच्या विविध समस्यांकडे समाजसारथी संघटनेने वेधले लक्ष appeared first on News 24 Tass Marathi.

बळ्ळारी नाल्याच्या दुरावस्थेने ६०० एकर सुपीक शेती धोक्यात
शेतकरी हवालदिल

बेळगाव : बळ्ळारी नाला हा लांबीने मोठा असून शहर परिसरातील अतिरिक्त पावसाचे पाणी आणि सांडपाणी वाहून नेणारा प्रमुख जलमार्ग मानला जातो.या नाल्याच्या आजूबाजूला जवळपास ६०० एकर सुपीक शेती असून, येथे पारंपरिक पद्धतीने भात, ज्वारी, गहू तसेच विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड केली जाते. विशेषत: बासमती भात उत्पादनासाठी हा परिसर प्रसिद्ध आहे. मात्र दरवर्षी पावसाळ्यात नाला ओव्हर फ्लो होऊन पाणी शेतीशिवारात शिरते. यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनात, बळ्ळारी नाल्याचा फटका वडगाव व येळ्ळूर परिसरातील शेतकऱ्यांना सर्वाधिक बसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्याची खोली कमी झाली आहे. त्याचबरोबर नाल्यात जलपर्णी आणि तणाची दाट वाढ झाल्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह खंडित होत आहे. परिणामी पावसाळ्यात नाल्याचे पाणी दोन्ही काठांवरून ओसंडून वाहून लगतच्या शेतांमध्ये पूरस्थिती निर्माण होते. दरवषी पावसाळ्यात दीर्घकाळ शेतजमीन पाण्याखाली राहत असल्याने शेती करणे अशक्मय बनते.

त्यामुळे शेकडो अल्पभूधारक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होत आहे. याशिवाय नाल्यातून ओसंडून वाहणारे सांडपाणी शेतजमिनीमध्ये मिसळत असल्याने मातीचे प्रदूषण वाढत आहे. यामुळे पशुधन व नागरिकांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होण्याची भीती आहे. दूषित पाण्यामुळे भविष्यात विविध रोग पसरण्याची शक्मयता नाकारता येत नाही. या सर्व बाबींकडे गांभीर्याने लक्ष देऊन बळ्ळारी नाल्यातील गाळ तात्काळ काढून त्याची खोली आणि प्रवाह क्षमता पूर्ववत करावी. तसेच नाल्याची उंची वाढवून भविष्यात पूरस्थिती व गाळ साचण्याची समस्या कायमची दूर करण्यासाठी नाल्याचे काँक्रीटीकरण किंवा मजबूत अस्तरीकरण करावे.

यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीची गंभीरता जाणून घ्यावी. वेळेत उपाययोजना झाल्यास सुपीक जमिनीचे नुकसान टळणार असून प्रदूषण कमी होणार आहे. तसेच शेकडो शेतकऱ्यांना पुन्हा उत्पादनक्षम शेती करणे शक्मय होणार असून प्रशासनाने तात्काळा याबाबत पावले उचलावीत, अशीही मागणी करण्यात आली.

The post बळ्ळारी नाल्याच्या दुरावस्थेने ६०० एकर सुपीक शेती धोक्यात appeared first on News 24 Tass Marathi.

टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेटजवळील बॅरिकेट्स हटवण्यासाठी गृहमंत्र्यांना निवेदन
बेळगाव : टिळकवाडीतील पहिल्या रेल्वे गेटजवळ उभारण्यात आलेल्या बॅरिकेट्समुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत बॅरिकेट हटाव संघटनेने राज्याचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

गृहमंत्री बेळगाव दौऱ्यावर असताना संघटनेचे अध्यक्ष सुभाष घोलप यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी संबंधित ठिकाणचे बॅरिकेट्स तातडीने हटवावेत, तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी दोन पोलिसांची नियुक्ती करावी आणि खासगी संकुलासमोरील अडथळे दूर करावेत, अशी मागणी करण्यात आली.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, या बॅरिकेट्समुळे पादचारी, विद्यार्थी तसेच वाहनधारकांना मोठा वळसा घालावा लागत आहे. परिणामी चुकीच्या यू-टर्नमुळे अनेक अपघात घडल्याचेही संघटनेने निदर्शनास आणले. याशिवाय, या अडथळ्यांमुळे स्थानिक व्यापारावर परिणाम होत असून व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत असल्याचेही सांगण्यात आले.

दुसऱ्या रेल्वे गेटप्रमाणे येथेही प्रभावी पोलीस बंदोबस्त ठेवून सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी, तसेच गतिरोधक बसवावेत, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.

या समस्येवर लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी दिले. यावेळी अनंत पाटील, अमित जोशी यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

The post टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेटजवळील बॅरिकेट्स हटवण्यासाठी गृहमंत्र्यांना निवेदन appeared first on News 24 Tass Marathi.

मारुती गल्लीतील अनधिकृत इमारतीवर महापालिकेची कारवाई
लोकायुक्त न्यायालयाच्या आदेशानुसार राबवली मोहीम

बेळगाव : लोकायुक्त न्यायालयाच्या आदेशानुसार बेळगाव महापालिकेने आज मारुती गल्ली कॉर्नर येथील एक इमारत अनधिकृत घोषित करत ती हटविण्याची कारवाई केली. या कारवाईमुळे संबंधित मालक व व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त करण्यात येत आहे.

महापालिकेने कोणतीही पूर्वसूचना किंवा इशारा न देता ही कारवाई केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. संबंधित इमारतीबाबत आमच्याकडे अधिकृत विक्रीपत्र असून, आम्ही गेली सुमारे ६० वर्षे येथे वास्तव्यास आहोत. बांधकामासाठी आवश्यक परवानग्याही घेण्यात आल्या आहेत. तरीही कोणतीही कागदपत्रे नसलेल्या व्यक्तीच्या दाव्यावर विश्वास ठेवून महापालिका कारवाई करत असल्याचा आरोप शिवाजीराव हैबत्ती यांनी केला. मोहम्मद शरीफ मुल्ला यांनी कोणत्याही पुराव्याशिवाय मालकी हक्क सांगितल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या अचानक झालेल्या कारवाईमुळे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे. पूर्वसूचना न देता जागा खाली करण्याची मोहीम राबवण्यात आल्याने आमचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून याची भरपाई कोण देणार, असा सवाल व्यापारी नूर जहाँ यांनी उपस्थित केला.

दरम्यान, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र संबंधितांना पूर्वसूचना दिल्याचे सांगितले आहे. या कारवाईनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

The post मारुती गल्लीतील अनधिकृत इमारतीवर महापालिकेची कारवाई appeared first on News 24 Tass Marathi.

कसाई गल्ली – भीमज्योती मार्ग समस्यांच्या गर्तेत
बेळगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती काही दिवसांवर आली असून शहरात विविध ठिकाणी तयारीला वेग आला आहे. मात्र कसाई गल्ली परिसरातील रस्ते आणि स्वच्छतेची दयनीय अवस्था पाहता प्रशासनाच्या उदासीनतेवर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

भीमज्योती मिरवणूक कसाई गल्ली मार्गावरून जाणार आहे. या पार्श्वभूमीवर रस्ते दुरुस्ती, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांची कामे १३ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांच्या बैठकीत देण्यात आले होते. मात्र जयंतीला अवघे काही दिवस उरले असतानाही प्रत्यक्षात कोणतीही कामे सुरू न झाल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.

कसाई गल्ली परिसरात गटारींचे काँक्रीटीकरण नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर साचून दुर्गंधी पसरली आहे. रस्त्यांवरील डांबर उखडल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले असून स्वच्छता यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

स्वच्छतेअभावी साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली असल्याचे स्थानिक बाबू पुजारी यांनी सांगितले. दरम्यान, भीमज्योती मिरवणुकीचा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने खड्डेमय रस्ते आणि साचलेले सांडपाणी यामुळे मिरवणुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तातडीने स्वच्छता व दुरुस्तीची कामे सुरू करावीत, अन्यथा जयंतीच्या दिवशी अस्वच्छ परिस्थितीत मिरवणूक काढावी लागेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

The post कसाई गल्ली – भीमज्योती मार्ग समस्यांच्या गर्तेत appeared first on News 24 Tass Marathi.

महापालिका बैठकीत प्रलंबित समस्यांवरून अधिकारी धारेवर
महापौरांकडून कानउघडणी अन् तातडीने कार्यवाहीचे आदेश

बेळगाव : शहरातील प्रलंबित नागरी कामे, ड्रेनेज समस्या आणि मूलभूत सुविधांतील त्रुटींवरून महापालिकेच्या प्रशासकीय बैठकीत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला. संतप्त सदस्यांच्या भूमिकेनंतर महापौर प्रीती कामकर यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी करत तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले.

बेळगाव महानगरपालिकेच्या परिषद सभागृहात महापौर प्रीती कामकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत शहरातील विविध प्रलंबित नागरी कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी अनेक समस्यांवरून वातावरण चांगलेच तापले.

ड्रेनेजच्या प्रश्नावरून नगरसेविका रेश्मा भैरकदार यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांच्या प्रभागात पावसाळ्यात सांडपाणी रस्त्यावर येत असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही अधिकारी दुर्लक्ष करत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मन्नत कॉलनीतील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरत असल्याची बाब नगरसेवक रियाज किल्लेदार यांनी मांडली. या पार्श्वभूमीवर महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन समस्या त्वरित सोडवण्याचे निर्देश दिले.

राष्ट्रीय महामार्गालगतच्या खड्ड्यांच्या दुरुस्तीबाबतही अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त करण्यात आली. नामनिर्देशित सदस्य दिनेश नाशिपुडी यांनी जबाबदारी स्वीकारूनही कामात गती नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. एल अँड टी कंपनीच्या कामामुळे सिडी वर्कचे नुकसान होऊन पावसाचे पाणी दुकानांत शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाल्याचा प्रश्न नगरसेवक जयतीर्थ सवदत्ती यांनी उपस्थित केला. कलमठ रोड परिसरातील परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

शहरातील नागरी तक्रारींचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन रस्ते व ड्रेनेजची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, अशी सूचना स्थायी समिती अध्यक्षा लक्ष्मी राठोड यांनी केली.

दरम्यान, २०१६ मध्ये टाकण्यात आलेल्या भूमिगत केबल्सचा मुद्दाही बैठकीत गाजला. जवळपास ८० टक्के काम पूर्ण असूनही उर्वरित काम रखडल्याने नागरिकांना त्रास होत असल्याची नाराजी रेश्मा भैरकदार यांनी व्यक्त केली. यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नगरसेवक रवी धोत्रे आणि संदीप जिरग्याळ यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

महापालिकेची हेल्पलाइन कार्यरत नसल्याने तक्रारी नोंदवताना अडचणी येत असल्याचा मुद्दा नगरसेविका वीणा विजापूरे यांनी उपस्थित केला. या मुद्द्याला नगरसेवक राजशेखर ढोणी यांनी पाठिंबा देत नागरिकांना उत्तर द्यायचे कसे, असा सवाल उपस्थित केला.

अखेर महापौर प्रीती कामकर यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी करत प्रलंबित कामे आणि तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

The post महापालिका बैठकीत प्रलंबित समस्यांवरून अधिकारी धारेवर appeared first on News 24 Tass Marathi.

तिसऱ्या रेल्वे ओव्हरब्रिजवर बॅरिगेट्स कोसळले
अपघाताचा धोका वाढला

बेळगाव : शहरातील तिसऱ्या रेल्वे ओव्हरब्रिजवर लावण्यात आलेले बॅरिगेट्स अचानक कोसळल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे वाहतूक करणाऱ्यांसमोर मोठा अपघाताचा धोका निर्माण झाला असून नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

ओव्हरब्रिजवर पडलेली बॅरिगेट्स रस्त्याच्या मध्यभागी अडथळा निर्माण करत असल्यामुळे वाहनांची गती मंदावली आहे आणि वाहतुकीवर थेट परिणाम झाला आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक आहे, तसेच रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी करत, संबंधित विभाग आणि रहदारी पोलिसांना घटनास्थळी त्वरित दाखल होऊन बॅरिगेट्स हटवण्याचे आवाहन केले आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

The post तिसऱ्या रेल्वे ओव्हरब्रिजवर बॅरिगेट्स कोसळले appeared first on News 24 Tass Marathi.

पिण्याच्या पाण्यासाठी रयत गल्लीतील नागरिकांचे महापालिकेसमोर आंदोलन
बेळगाव / प्रतिनिधी

वडगावमधील रयत गल्ली परिसरात पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये सांडपाणी मिसळत असल्याच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी महापालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढून जोरदार आंदोलन केले. प्रशासनाकडून वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी रिकाम्या घागरी फोडून संताप व्यक्त केला.

रयत गल्ली परिसरातील रहिवासी गेल्या १५ ते २० दिवसांपासून दूषित पाणीपुरवठ्याच्या समस्येला तोंड देत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये सांडपाणी मिसळत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून याबाबत महापालिकेला अनेकदा निवेदने देण्यात आली होती. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संतप्त नागरिकांनी थेट महापालिका कार्यालय गाठून आंदोलन छेडले.

दरम्यान काही आंदोलकांनी महापालिका कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी संतप्त नागरिकांनी कार्यालयाच्या आवारात रिकाम्या घागरी फोडून प्रशासनाच्या दिरंगाईचा निषेध नोंदवला.

पाणीपुरवठा दूषित झाल्यामुळे नागरिकांना तसेच पाळीव प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेचे पाणी येत नसल्यामुळे खासगी टँकरसाठी ८०० रुपये खर्च करावे लागत असल्याची व्यथा आंदोलक महिलांनी मांडली. समस्या तातडीने न सोडवल्यास संपूर्ण वडगावमधील नागरिक महापालिकेला घेराव घालतील, असा इशारा राजू मरवे यांनी दिला.

घटनेची माहिती मिळताच मार्केट पोलीस ठाण्याचे निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व उपनिरीक्षक विठ्ठल हावन्नवर यांनी घटनास्थळी भेट देत आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर महापालिका आयुक्त कार्तिक एम. तसेच अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांनी नागरिकांचे निवेदन स्वीकारले.

दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन प्रशासनाकडून मिळाल्यानंतर नागरिकांनी अखेर आपले आंदोलन मागे घेतले.

The post पिण्याच्या पाण्यासाठी रयत गल्लीतील नागरिकांचे महापालिकेसमोर आंदोलन appeared first on News 24 Tass Marathi.

आठवड्यात मूलभूत सुविधा पुरवा
अन्यथा २६ जानेवारीला रास्तारोको

बुरुड कॉलनी रहिवासी संघाचे आंदोलन

सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावातील नेहरू नगर येथील बुरुड कॉलनीत मूलभूत सुविधांचा अभाव कायम असल्याने रहिवासी संतप्त झाले आहेत. एका आठवड्यात पायाभूत सुविधा उपलब्ध न झाल्यास २६ जानेवारी रोजी रस्ता रोखून आंदोलन करण्याचा तसेच आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा कॉलनीवासीयांनी दिला आहे.

या मागणीसाठी आज राणी चन्नम्मा सर्कल येथे बुरुड कॉलनीतील नागरिकांनी जोरदार निदर्शने केली. कॉलनीमध्ये ड्रेनेज, रस्ते, पिण्याचे पाणी व स्वच्छतेच्या समस्या अत्यंत गंभीर असून, दूषित सांडपाणी थेट घरांमध्ये शिरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

३० ते ३५ वर्षांपूर्वी सांडपाणी निर्मूलन मंडळाकडून येथे घरे देण्यात आली; मात्र त्यानंतर कोणतीही पायाभूत सुविधा विकसित करण्यात आल्या नाहीत, असा आरोप रहिवाशांनी केला. निवडणुकीपुरते दिसणारे लोकप्रतिनिधी केवळ आश्वासने देतात, नगरसेवक व संबंधित विभागांकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याची नाराजी आंदोलकांनी व्यक्त केली.

कॉलनीतील रहिवासी रमेश कुडची यांनी सांगितले की, ३०-४० वर्षांपूर्वी बांधलेले गटार आज पूर्णपणे अपुरे ठरले आहे. पावसाळ्यात परिस्थिती अधिकच भयावह होत असून, नाले भरून वाहत असल्याने परिसर सांडपाण्याच्या विळख्यात अडकतो. महिलांनीही स्वच्छतेच्या प्रश्नावर तीव्र संताप व्यक्त केला.

“आम्ही गेली ३६ वर्षे नियमित कर भरत आहोत; मात्र महानगरपालिकेकडून कोणत्याही मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत,” अशी ठाम भूमिका नागरिकांनी मांडली. एकमेकांवर जबाबदारी ढकलली जात असून, प्रत्यक्षात विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला.

शेवटी या सर्व मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. यावेळी नेहरू नगर बुरुड कॉलनीतील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post आठवड्यात मूलभूत सुविधा पुरवा appeared first on News 24 Tass Marathi.