chief executive officer Archives | News 24 Tass Marathi

कॅन्टोन्मेंट परिसर सध्या महापालिकेकडे हस्तांतरित होणार नाही
सीईओ सुदाम हरिविजय मंचलवार यांनी हस्तांतरणाबाबतचा संभ्रम केला दूर

बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट परिसर महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या चर्चेमुळे नागरिक आणि कंत्राटदारांनी चिंता करण्याची गरज नाही. सध्या केवळ ११२ एकर क्षेत्र कॅन्टोन्मेंटच्या हद्दीतून वगळण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, त्याला राज्य सरकारची अद्याप कोणतीही अधिकृत लेखी संमती किंवा मंजुरी मिळालेली नाही. अंतिम निर्णयाचा अधिकार केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडेच असल्याचे कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम हरिविजय मंचलवार यांनी स्पष्ट केले.

बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील जमिनीच्या हस्तांतरणासंदर्भातील स्थिती स्पष्ट केली. कॅन्टोन्मेंट मंडळाने ११२ एकर जमीन वगळण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. मात्र, या प्रस्तावावर राज्य सरकारकडून अद्याप अधिकृत निर्णय झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, बेळगावचे जिल्हाधिकारी आणि महापालिकेकडून ७५६ एकर जमीन हस्तांतरित करण्याचा स्वतंत्र प्रस्ताव प्राप्त झाला आहे. या प्रस्तावाला डीओ (DO) तसेच स्थानिक लष्करी अधिकाऱ्यांनी तीव्र आक्षेप नोंदविल्याची माहिती मंचलवार यांनी दिली.

अंतिम निर्णय संरक्षण मंत्रालयाकडून

कॅन्टोन्मेंट परिसराच्या हस्तांतरणाची संपूर्ण प्रक्रिया केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. राज्य सरकारने आपला प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे पाठविल्यानंतरच पुढील कार्यवाहीला दिशा मिळणार असल्याचे मंचलवार यांनी स्पष्ट केले.

कंत्राटदारांना देयके मिळणार

कॅन्टोन्मेंट परिसरातील विकासकामे करणाऱ्या कंत्राटदार आणि निविदाकारांनी आपल्या देयकांबाबत कोणतीही चिंता करू नये. त्यांनी केलेल्या कामाचा योग्य मोबदला नियमानुसार देण्यात येईल, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले.

तसेच, आगामी काळात घेतला जाणारा प्रत्येक निर्णय नागरिक, कंत्राटदार आणि संबंधित हितधारकांच्या हिताचा विचार करूनच घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

The post कॅन्टोन्मेंट परिसर सध्या महापालिकेकडे हस्तांतरित होणार नाही appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव कॅन्टोन्मेंटमधील रस्ते बंद करण्यास नागरिकांचा विरोध
१४ हजारांहून अधिक सह्यांचे कॅन्टोन्मेंट सीईओंना निवेदन

बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट परिसरातील तीन प्रमुख रस्ते लष्कराकडे हस्तांतरित करण्यास तसेच दोन रस्त्यांवर बॅरिकेड्स उभारण्याच्या प्रस्तावाला बेळगाव कॅन्टोन्मेंट रेसिडेन्शियल वेल्फेअर असोसिएशनने (बीसीआरडब्ल्यूए) तीव्र विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात सोमवारी कॅन्टोन्मेंटच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे १४,१३६ सह्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

१७ जुलै रोजी झालेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीतील ठराव क्रमांक २६ आणि २७ नुसार अल्बर्ट एक्का रोड, स्मार्ट रोड आणि क्वीन्स गार्डन रोड हे तीन रस्ते लष्कराकडे सोपविण्याबाबत नागरिकांकडून मते मागविण्यात आली आहेत. त्याचबरोबर इंडिपेंडन्स रोड आणि जिमखाना रोडवर उंच बॅरिकेड्स उभारण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे.

या प्रस्तावांमुळे सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने बीसीआरडब्ल्यूएने जनजागृती मोहीम राबवून नागरिकांच्या सह्या घेतल्या. या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला असून, नागरिकांची नावे, पत्ते, दूरध्वनी क्रमांक आणि सह्यांसह निवेदन कॅन्टोन्मेंट सीईओंकडे सादर करण्यात आले.

शेतकरी, कामगार, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, व्यावसायिक, गृहिणी, वकील, डॉक्टर यांच्यासह समाजातील विविध घटकांनी या मोहिमेला पाठिंबा दिल्याचे संघटनेने सांगितले.

कॅन्टोन्मेंट परिसरातील रस्ते बंद केल्यास शहरातील दळणवळणावर परिणाम होऊन स्थानिक नागरिकांच्या रोजगारासह बेळगावच्या आर्थिक विकासालाही फटका बसू शकतो, असा आक्षेप बीसीआरडब्ल्यूएने नोंदविला आहे. तसेच बेळगावचा स्मार्ट सिटी म्हणून विकास करण्याच्या उद्दिष्टाशीही अशा प्रकारची रस्तेबंदी विसंगत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

अनेक दशकांपासून नागरिकांच्या वापरात असलेले कॅन्टोन्मेंटमधील रस्ते कोणत्याही प्रकारे बंद किंवा अडवू नयेत, अशी मागणी संघटनेने केली. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, संरक्षण मंत्रालय तसेच लष्कर मुख्यालयाने दिलेल्या आदेशांचे योग्य प्रकारे पालन करण्यात यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

जनतेच्या मागणीचा विचार करून लष्कर आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाने रस्ते बंद करण्याचा तसेच बॅरिकेड्स उभारण्याचा प्रस्ताव मागे घ्यावा, असे आवाहन बीसीआरडब्ल्यूएने केले आहे.

यावेळी माजी आमदार अनिल बेनके, बेळगाव कॅन्टोन्मेंट रेसिडेन्शियल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष फारुक नवाब, सचिव रंजन शेट्टी, डॉ. नितीन खोत, अजय पै, साजिद शेख, कॅन्टोन्मेंट सदस्य सुधीर तुपेकर, डॉ. सोनाली खोत, डॉ. राहिला शेख, नयना नेरली, ॲड. सुलतानपुरे तसेच बार असोसिएशनचे प्रतिनिधी आणि कॅन्टोन्मेंट परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post बेळगाव कॅन्टोन्मेंटमधील रस्ते बंद करण्यास नागरिकांचा विरोध appeared first on News 24 Tass Marathi.

हलगा-बस्तवाड मार्गावर गतिरोधक बसवण्याची ग्रामस्थांची मागणी
जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

अतिवेगामुळे अपघातांचा धोका

बेळगाव : हलगा-बस्तवाड मार्गावर वाढत्या वाहनांच्या वेगामुळे अपघातांचा धोका निर्माण झाला असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी या मार्गावर तातडीने गतिरोधक उभारण्यात यावेत, अशी मागणी हलगा ग्रामस्थांनी जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने राहुल शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. बेळगाव-हलगा सर्व्हिस रोडला जोडणाऱ्या हलगा-बस्तवाड मार्गावर दुचाकींसह इतर वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक, कामगार तसेच पाळीव प्राण्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर जैन स्मशानभूमीसमोर, सुभाऊ सागर नगर कॉर्नर, कन्नड प्राथमिक शाळेसमोर, लक्ष्मी गल्लीचे पश्चिम टोक, न्यू गल्ली, बसवण्णा गल्ली आणि ओंकार नगर क्रॉस या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवावेत, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली.

यावेळी राहुल शिंदे यांनी हा विषय सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित असून अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगत, संबंधित विभागाला आवश्यक सूचना देऊन लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.

या प्रसंगी ॲड. अण्णासाहेब घोरपडे, स्नेहा घोरपडे-लाड, गणेश भाविकट्टी, शरद देसाई, रामनाथ नलावडे, महेंद्र कांबळे आणि गुरुदेव मठपती यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

The post हलगा-बस्तवाड मार्गावर गतिरोधक बसवण्याची ग्रामस्थांची मागणी appeared first on News 24 Tass Marathi.