campaign Archives | News 24 Tass Marathi

एसआयआर मोहिमेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल महापालिका कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक
विशेष सघन पुनरावलोकन मोहिमेची पाहणी

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समर्पित कार्याचा गौरव

बेळगाव : मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावलोकन (SIR – Special Intensive Revision) मोहिमेचे प्रभावीपणे कामकाज पार पाडणाऱ्या बेळगाव महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मुक्तकंठाने कौतुक केले. मोहिमेच्या प्रगतीची पाहणी करण्यासाठी त्यांनी बुधवारी सायंकाळी महापालिकेच्या निवडणूक शाखेला आकस्मिक भेट दिली.

यावेळी उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघांत सुरू असलेल्या एसआयआर मोहिमेची तसेच संगणकीकरणाच्या कामाची सविस्तर माहिती त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. मोहिमेच्या यशासाठी विश्रांती न घेता परिश्रम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.

विशेष म्हणजे, बोलण्यात अडचण असतानाही उत्कृष्ट कामगिरी करणारे कर्मचारी विशाल माविनकट्टी यांच्या समर्पित सेवाभावाचे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले. महापालिका आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन व समन्वयामुळे एसआयआर मोहिमेत उल्लेखनीय प्रगती साधता आली असून, हे कार्य इतर कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भेट देऊन परिसरातील उद्यानाच्या सुस्थितीबद्दल समाधान व्यक्त केले.

महापालिकेचे महसूल विभागाचे उपआयुक्त तथा दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी डॉ. सिद्धू हुल्लोळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एसआयआर मोहिमेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. यावेळी महापालिकेतील अधिकारी, पर्यवेक्षक तसेच एसआयआर मोहिमेतील कर्मचारी उपस्थित होते.

The post एसआयआर मोहिमेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल महापालिका कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावात विना नंबरप्लेट दुचाकींवर कारवाई
वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम ; १०५ वाहनचालकांना दंड

बेळगाव : शहरात विना नंबरप्लेट किंवा सदोष नंबर प्लेट असलेल्या दुचाकींचा वाढता वापर लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम राबवत नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कठोर कारवाई केली. या मोहिमेत एकूण १०५ दुचाकी चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.

२३ जुलै २०२६ रोजी राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेदरम्यान वाहतूक पोलिसांनी नोंदणी क्रमांक नसलेल्या, नंबर प्लेट लपवलेल्या तसेच वाहनाच्या पुढील किंवा मागील बाजूस नंबर प्लेट नसलेल्या दुचाकींची तपासणी केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व वाहनचालकांवर दंड आकारण्यात आला.

यावेळी वाहनचालकांना वाहतूक नियमांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच नियमानुसार नंबर प्लेट बसवल्यानंतरच संबंधित वाहने सोडण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

बेळगाव शहरात विना नंबरप्लेट किंवा सदोष नंबर प्लेट असलेल्या वाहनांविरोधातील ही विशेष मोहीम आगामी काळातही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

सर्व वाहनमालक आणि वाहनचालकांनी आपल्या वाहनांवर शासनाने निर्धारित केलेली नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसवून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

The post बेळगावात विना नंबरप्लेट दुचाकींवर कारवाई appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावात मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला वेग
जिल्ह्यात १०० टक्के अर्ज वाटप पूर्ण ; डिजिटायझेशनचे काम अंतिम टप्प्याकडे

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला वेग आला असून, सर्व १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदारांना अर्ज वाटपाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी ही माहिती देत प्रत्येक मतदाराने आपल्या नावाची आणि मतदान केंद्राची खातरजमा करणे आवश्यक असल्याचे आवाहन केले.

जिल्ह्यातील एकूण ४१.०७ लाख मतदारांसाठी राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत आज दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मतदार यादी अधिक अचूक आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन अर्ज आणि स्टिकर्सचे वितरण करत असून, अनुपस्थित, स्थलांतरित, मृत तसेच दुबार मतदारांची माहिती संकलित केली जात आहे.

मतदार यादीच्या डिजिटायझेशनचे कामही वेगाने सुरू असून, जिल्ह्यात आतापर्यंत ७६ टक्के माहिती ऑनलाइन करण्यात आली आहे. बेळगाव दक्षिण मतदारसंघात ६० टक्के, तर उत्तर मतदारसंघात ५१ टक्के डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. बीएलओ सुविधा केंद्रांवर प्राप्त होणारे अर्ज तातडीने ऑनलाइन नोंदवले जात असून, आवश्यक असल्यास अंतिम मतदार यादी जाहीर करण्यापूर्वी आणखी एक आठवड्याचा अवधी दिला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

जे मतदार अर्ज वितरणावेळी घरी उपलब्ध नव्हते किंवा ज्यांचे निवासस्थान बदलले आहे, तसेच मतदान केंद्राबाबत माहिती हवी आहे, त्यांनी आपल्या परिसरातील बीएलओशी संपर्क साधावा. प्रत्येक मतदान केंद्राला ‘बीएलओ सुविधा केंद्र’ म्हणून घोषित करण्यात आले असून, नागरिकांना तेथे जाऊन आवश्यक अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मृत, स्थलांतरित आणि दुबार मतदारांची यादी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदार यादीत एखादी त्रुटी आढळल्यास किंवा जिवंत असलेल्या व्यक्तीची नोंद चुकून मृत म्हणून झाल्यास, ती दुरुस्त करण्यासाठी ८ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

मतदार यादी अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी नागरिकांनी तसेच सर्व राजकीय पक्षांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले आहे.

The post बेळगावात मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला वेग appeared first on News 24 Tass Marathi.