bsnl Archives | News 24 Tass Marathi

दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांसाठी बेळगावात बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
७ ऑगस्टला संसदेला घेरावाचा इशारा

बेळगाव : विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेळगावमध्ये बीएसएनएल (BSNL) कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी धरणे आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले. रखडलेली वेतनवाढ, पेन्शन दुरुस्ती आणि बीएसएनएलची ४जी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

आंदोलकांनी सांगितले की, गेल्या नऊ वर्षांपासून वेतनवाढीचा प्रश्न प्रलंबित असून, पेन्शनधारकांच्या मागण्यांकडेही दुर्लक्ष केले जात आहे. तसेच बीएसएनएलला खाजगी दूरसंचार कंपन्यांप्रमाणे आधुनिक उपकरणे खरेदी करण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध करून देता येईल, अशी मागणीही करण्यात आली.

मागण्यांवर लवकर निर्णय न झाल्यास येत्या ७ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील संसद भवनाला घेराव घालण्यात येईल, असा इशारा कर्मचारी संघटनेचे नेते अरविंद चौगुले आणि रामू तटपटी यांनी दिला.

या आंदोलनात बीएसएनएलचे कर्मचारी, अधिकारी आणि पेन्शनधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी सरकारने कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.

The post दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांसाठी बेळगावात बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन appeared first on News 24 Tass Marathi.

बीएसएनएल निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित महागाई भत्त्यासाठी आंदोलन
बेळगाव : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या निवृत्त कर्मचाऱ्यांना थकीत असलेला महागाई भत्ता तात्काळ अदा करावा, या मागणीसाठी ऑल इंडिया बीएसएनएल पेन्शनर्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात असोसिएशनच्या बेळगाव जिल्हा शाखेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने सदस्य सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान प्रलंबित महागाई भत्ता त्वरित देण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच शासनाच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

या संदर्भात माहिती देताना एआयबीडीपीएचे अखिल भारतीय उपाध्यक्ष रामू तटपटी यांनी सांगितले की, प्रलंबित महागाई भत्ता मिळावा यासाठी देशभरातील १२ संघटनांनी एकत्र येत हे आंदोलन उभारले आहे. महागाई भत्ता मंजूर झाल्यानंतर त्याचे वितरण तात्काळ करण्यात यावे, तसेच पूर्वीप्रमाणे तो पुनर्संचयित करावा, अशीही मागणी त्यांनी केली.

मागण्या मान्य न झाल्यास २५ एप्रिल रोजी धरणे सत्याग्रह आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी महागाई भत्ता वेळेवर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

The post बीएसएनएल निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित महागाई भत्त्यासाठी आंदोलन appeared first on News 24 Tass Marathi.