blood donation camp Archives | News 24 Tass Marathi

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे जिल्हास्तरीय रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
रोटरी बेळगाव परिवाराच्या सहकार्याने सामाजिक उपक्रम यशस्वी

विद्यार्थी, रोटेरियन आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग

बेळगाव : रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० च्या “Create Lasting Impact” या संकल्पनेअंतर्गत रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण आणि रोटरी बेळगाव परिवारातर्फे बुधवारी, १ जुलै रोजी शिवबसवनगर येथील एसजीबीआयटी महाविद्यालयात जिल्हास्तरीय रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला रोटेरियन, विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिबिरामध्ये अनेक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. रुग्णालयांमध्ये सुरक्षित रक्ताचा तुटवडा भरून काढणे तसेच स्वेच्छा रक्तदानाबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

यावेळी अध्यक्ष रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तिहोळी यांनी रोटरीच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती दिली. पूज्य गुरूजी डॉ. अल्लमप्रभू महास्वामीजी यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांना आशीर्वाद दिले. सहाय्यक राज्यपाल रोटेरियन रमेश रामगुरवाडी यांनी आभार प्रदर्शन केले.

या उपक्रमाचे नियोजन कार्यक्रम अध्यक्षा रोटेरियन लक्ष्मी चवळी, सचिव रोटेरियन ज्योती कुलकर्णी तसेच क्लबच्या सर्व सदस्यांनी केले. सुरेखा मुम्मिगट्टी, दिव्या मुडीगौडर, संध्या तिम्मापूर, उर्मिला गणी, डॉ. स्मिता गुडगणट्टी, डॉ. स्मृती प्रधान, डॉ. शिवलीला कांपली, शीला पाटील, सविता हेब्बार, आशा पाटील, मनीषा कलघटकर, पुष्पा पर्वतराव आणि रक्षा उपाध्ये यांच्यासह सर्व सदस्य, स्वयंसेवक आणि सहकाऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळे रक्तदान शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

The post रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे जिल्हास्तरीय रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद appeared first on News 24 Tass Marathi.

शिवबसवज्योती मध्ये रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद
बेळगाव / प्रतिनिधी

रक्तदान हे महादान म्हणून गणले जाते. त्यामुळे रक्तदानाबद्दल कोणतेही गैरसमज ठेवून घेऊ नयेत. तसेच स्वयंप्रेरणेतून रक्तदान करावे. असे मार्गदर्शन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ. डी. टी.बामणे यांनी केले. आधार एज्युकेशन सोसायटीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थ संस्थेच्या सहकार्यातून हा उपक्रम पार पडला. यामध्ये 30 हून अधिक सदस्यांनी आणि विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन रक्तदान शिबिर यशस्वी केले. तसेच बिम्स हॉस्पिटल, बेळगाव ब्लड बँक आणि विनायक नगर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने या शिबिरात रक्तदान करून घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

रोटरीचे माजी प्रांतपाल अविनाश पोतदार यांनी या उपक्रमासाठी उपस्थित राहून संस्थेच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. विनायक नगर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल वड्डर यांनी फीत कापून कक्षाचे उद्घाटन केले. तत्पूर्वी झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर डॉ. प्रशांत भोसले यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगितले.

व्यासपीठावर संस्थेच्या व्हाईस चेअरमन डॉ. पूजा बामणे, उपप्राचार्य डॉ. एम. एम. साणिकोप, रोटरी नॉर्थ चे अध्यक्ष विकास गाडवी, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. चंद्रशेखर, संस्थेचे संचालक डॉ. रोहित बामणे, डॉ. अभिषेक बामणे आणि निमंत्रित मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मानसी चिंचणीकर यांनी केले. शिबिर संयोजनासाठी कॉलेजच्या कर्मचारी वर्गाने पुढाकार घेतला होता.

The post शिवबसवज्योती मध्ये रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद appeared first on News 24 Tass Marathi.

श्री शनैश्वर जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
बेळगाव : सालाबाद प्रमाणे श्री शनैश्वर एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटी, बेळगाव यांच्यावतीने श्री शनैश्वर जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिर आज शनिवारी उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले.

सदर रक्तदान शिबिराच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे ॲड. सुधीर सक्री व डॉ. संतोष पत्तार यांच्यासह डॉ. श्रीकांत विरगी, डॉ. विठ्ठल माने आदी मान्यवर उपस्थित होते. ॲड. सक्री आणि डॉ. पत्तार यांनी अनुक्रमे छ. शिवरायांची मूर्ती व जगद्गुरु बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गजानन पाटील आणि शिवराज पाटील यांच्या हस्ते होण्यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे संचालक श्रीकांत देसाई, संजय शहा, महांतेश देसाई, शिवाप्पा इटगी, महादेव चौगुले, नितीन कपिलेश्वरकर, महेश नावगेकर, सुनील वर्टी, किरण परब, राजू वर्पे, राजू मरवे आदी उपस्थित होते. रक्तदान शिबिराला सकाळी ९ वाजता प्रारंभ झाल्यानंतर अनेक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. त्यामुळे सुमारे १५० युनिट रक्ताचे संकलन झाले. यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे रक्तदानामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. प्रत्येक रक्तदात्याला कर्नाटक बँकेच्यावतीने सफरचंदाचे वाटप करण्यात आले.

रक्तदान शिबिर यशस्वी करण्यात डॉ. विरगी आणि डॉ. माने यांच्या मार्गदर्शनाखाली केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांचे विशेष योगदान लाभले. विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्यासह सुनील कुडची ॲड. सुहास किल्लेकर आदी मान्यवरांनी शिबिराला विशेष भेट देऊन उपक्रमाची प्रशंसा केली. शिबिर यशस्वी करण्यासाठी सतीश गोरगोंडा, विकास कलघटगी, पवन पाटील, किरण सव्वाशेरी, प्रभाकर हलगेकर वगैरेंनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी श्री शनैश्वर एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटी अध्यक्ष अनिल चौधरी यांनी सर्वांचे आभार मानले.

The post श्री शनैश्वर जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद appeared first on News 24 Tass Marathi.

अनगोळ येथे श्रीराम सेना हिंदुस्थानचे भव्य रक्तदान शिबिर
सुमारे ५०० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

बेळगाव / प्रतिनिधी

देव, धर्म आणि समाजसेवेच्या भावनेतून कार्यरत असलेल्या श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने रविवारी सकाळी अनगोळ येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

बेळगावातील अनगोळ राजहंस गल्ली येथे आयोजित या रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते, मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. शिबिरात संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने युवकांनी स्वेच्छेने रक्तदान केले. आयोजकांच्या माहितीनुसार, सुमारे ५०० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

यावेळी माध्यमांशी बोलताना अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर म्हणाले की, “गेल्या दहा वर्षांपासून श्रीराम सेना हिंदुस्थानचे हजारो कार्यकर्ते सातत्याने रक्तदान करत असून, जात-धर्म-भाषेचा कोणताही भेद न ठेवता अनेक गरजू रुग्णांना जीवनदान देत आहेत. रक्तदान हा आमच्यासाठी केवळ उपक्रम नसून समाजसेवेची जबाबदारी आहे.”

ते पुढे म्हणाले की, “अलीकडे काही समाजकंटकांनी रक्तदान शिबिराच्या बॅनर व होल्डिंग्जचे नुकसान केले, मात्र हा उपक्रम संपूर्ण समाजाच्या हिताचा असल्याने कोणीही यात वादग्रस्त मुद्दे आणू नयेत.” शेवटी त्यांनी रक्तदान करणाऱ्या सर्व तरुणांचे व रक्तदात्यांचे आभार मानले. या यशस्वी रक्तदान शिबिरामुळे सामाजिक एकोपा आणि मानवतेचा संदेश अधिक दृढ झाला.

The post अनगोळ येथे श्रीराम सेना हिंदुस्थानचे भव्य रक्तदान शिबिर appeared first on News 24 Tass Marathi.

प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या महारक्तदानाला शेकडो रक्तदात्यांचा प्रतिसाद
बेळगाव : देश विदेशात सामाजिक एकता, शांतता आणि विश्वबंधुत्वासाठी कार्यरत असलेल्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या बेळगाव युनिट वतीने ब्रह्माकुमारी दादी प्रकाशमणी यांच्या स्मृतिदिनानिमित्त 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान बेळगावात सलग तीन दिवस महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सलग तीन दिवस चाललेल्या या महा रक्तदान शिबिरात बेळगावातील शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला.

प्रजापिता ब्रह्माकुमारी यांच्या वतीने देश – विदेशात सामाजिक एकता आणि शांततेतेचे कार्य अखंडितपणे सुरू आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी वतीने सामाजिक उन्नतीसाठी अध्यात्मिक कार्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रमही आयोजित केले जात असतात.रुग्णांना वेळेवर रक्त न मिळाल्यामुळे अनेकांचे जीव गमावा लागत आहे. आजही रुग्णालयांमध्ये रक्तांची कमतरता भासत आहे. याकडे लक्ष देऊन प्रजापिता ब्रह्माकुमारी यांच्या वतीने बेळगावात तीन दिवस महा रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते.सदर शिबिर रेडक्रोस सोसायटी, जिल्हा रुग्णालय तसेच बॅरिस्टर नाथ पै चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आले होते. तीन दिवस चाललेले महा रक्तदान शिबिरात बेळगाव शहरातील शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य बजावले.

बेळगावात दि. 22 रोजी लक्ष्मी नगर प्रजापिता ब्रह्माकुमारी सेंटर, दि. 23 शेख होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज तर आज रविवारी शहापूर कंकणवाडी आयुर्वेदिक हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदाते तसेच गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले.

महा रक्तदान शिबिराच्या सांगता समारंभाला, कंकणवाडी आयुर्वेदिक रुग्णालयाचे प्राचार्य सुहास शेट्टी,बॅरिस्टर नाथ पै चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील,उपाध्यक्ष सचिन रंगरेज केएलई ब्लड बँकेचे प्रमुख अशोक अलतगी, जीवन जोशी, शेख होमिओपॅथिक कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर डिसूजा, डॉक्टर संगीता बेळगावीमठ, जिल्हा रुग्णालयाच्या मेडिकल ऑफिसर श्रीदेवी, डॉक्टर सुजाता गावकर, ब्रह्माकुमार महांतेश हिरेमठ, ब्रह्माकुमारी अन्नपूर्णा, ब्रह्माकुमार काशिनाथ भाई, ब्रह्माकुमारी शोभा,  ब्रह्माकुमार दत्तात्रय भाई, ब्रह्माकुमार श्रीकांत भाई, सचिन पवार, हिरालाल चव्हाण, पी. जी. घाडी, श्रीकांत काकतीकर यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर तसेच रक्तदाते उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या माध्यमातून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या रक्तदानाबद्दल उपस्थित मान्यवरांनी कौतुक व्यक्त केले.

The post प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या महारक्तदानाला शेकडो रक्तदात्यांचा प्रतिसाद appeared first on News 24 Tass Marathi.