baramati Archives | News 24 Tass Marathi

बारामतीत सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक विजय
२.१४ लाख मताधिक्याने विरोधकांवर मात

अजित पवारांचा विक्रम मोडला

बारामती : बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तब्बल २ लाख १४ हजार ९३ मताधिक्याने दणदणीत विजय मिळवत नवा विक्रम प्रस्थापित केला. त्यांना २ लाख १८ हजार ९३० मते मिळाली, तर विरोधातील २२ उमेदवार आणि ‘नोटा’ यांना मिळून केवळ ४८३७ मतांवर समाधान मानावे लागले.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०१९ मध्ये प्रस्थापित केलेला मताधिक्याचा विक्रम यावेळी मोडीत निघाला. त्यावेळी त्यांनी १ लाख ६५ हजार २६५ मताधिक्याने विजय मिळवला होता. सुनेत्रा पवार यांनी हा विक्रम मोठ्या फरकाने मागे टाकत ऐतिहासिक कामगिरी केली.

अजित पवार यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असे प्रयत्न झाले होते. मात्र २२ उमेदवारांनी माघार न घेतल्याने मतदान झाले. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार विक्रमी मताधिक्य मिळवतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.मतदानात सुमारे ५८.२७ टक्के मतदान झाले. एकूण ३ लाख ८४ हजार ५७९ मतदारांपैकी २ लाख २४ हजार ८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

एमआयडीसी येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी पार पडली. पहिल्या फेरीपासूनच सुनेत्रा पवार आघाडीवर राहिल्या. पहिल्या फेरीत ६५०० मते मिळवत त्यांनी आघाडी घेतली, तर दुसऱ्या, तिसऱ्या आणि पुढील फेऱ्यांमध्ये ही आघाडी वाढतच गेली. अखेर २४ व्या फेरीअखेर त्या विक्रमी मतांनी विजयी घोषित झाल्या.

या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांचा एकही उमेदवार नव्हता. नोंदणीकृत पक्ष व अपक्ष मिळून एकूण २३ उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये विविध अपक्ष उमेदवारांसह काही लहान पक्षांचे उमेदवार होते.

‘अजित पवारांच्या स्मृतींना विजय समर्पित’ :

विजयानंतर सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांना जल्लोष न करण्याचे आवाहन केले. “हा विजय अजितदादांच्या स्मृतींना समर्पित आहे. कुणीही मिरवणुका काढू नयेत, गुलाल उधळू नये आणि संयम राखावा,” असे त्यांनी नमूद केले.

The post बारामतीत सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक विजय appeared first on News 24 Tass Marathi.

महाराष्ट्रातील जनसामान्यांचे ‘अजितदादा’ अनंतात विलीन
बारामतीत लाखोंच्या जनसागराचा लाडक्या दादाला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

बारामती : ‘एकच वादा, अजित दादा, ‘अमर रहे, अमर रहे, अजित दादा अमर रहे,’ ‘परत या, परत या, अजित दादा परत या… दादा, दादा… असा हंबरडा फोडत हजारोंच्या साश्रू नयनांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अखेरचा निरोप दिला. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजित दादांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, राज्य सरकारमधील मंत्री, खासदार, आमदार आणि राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अजित दादांना श्रद्धांजली अर्पण केली. असा मनमिळाऊ, दिलखुलास, दिलदार नेता परत होणार नाही. अशा अवेळी अजित दादांसारखा उमदा नेता गमावल्याने धक्का बसल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांनी पार्थिवाला अग्नी दिला. त्यानंतर हजारो उपस्थितांनी हळहळ व्यक्त केली. “महाराष्ट्राची शान, पुणे जिल्ह्याचा अभिमान, बारामतीचा आत्मा … राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार अमर रहे… शेतकरी, कष्टकरी, बहुजनांचे कैवारी अजित दादा अमर रहे, अमर रहे’ अशा घोषणा देण्यात आल्या. दादा, दादाचा हंबरडा फोडत आक्रोश व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, बुधवारी सकाळी बारामतीत विमान कोसळून अजित पवार यांचे निधन झाले. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अजित दादांच्या अंत्यदर्शनासाठी दादांवर प्रेम करणाऱ्या हजारो कार्यकर्ते, नागरिकांनी बारामतीत गर्दी केली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात नागरिकांची रीघ लागली होती. गुरुवारी सकाळी काटेवाडी येथे अजित दादांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. काटेवाडी येथे दादांच्या घरी अंत्यदर्शनासाठी नागरिकांची रीघ लागली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही कुटुंबीयांसह काटेवाडीत अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. ज्येष्ठ नेते शरद पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह कुटुंबीयांचे सांत्वन केले.

The post महाराष्ट्रातील जनसामान्यांचे ‘अजितदादा’ अनंतात विलीन appeared first on News 24 Tass Marathi.