anniversary Archives | News 24 Tass Marathi

जनकल्याण फौंडेशनचा ९ वा वर्धापनदिन उत्साहात
हळदीकुंकू, सत्कार व विविध उपक्रमांनी रंगला सोहळा

मण्णूर : जय जन कल्याण सौहार्द सहकारी संघ नियमित, मण्णूर संचलित जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक फौंडेशनचा ९ वा वर्धापनदिन आणि हळदीकुंकू समारंभ अनन्य फार्म हाऊस येथे उत्साहात पार पडला. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक आणि महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांना विशेष अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन संस्थापक सहकाररत्न एल. के. कालकुंद्री सर व चेअरमन लक्ष्मण मंडोळकर यांच्या हस्ते करण्यात आले. सरस्वती मातेस पुष्पांजली बेळगावच्या माजी उपमहापौर सौ. रेणू किल्लेकर यांनी अर्पण केली, तर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन महिला संचालक मंडळाच्या हस्ते झाले. यानंतर सर्व संचालक मंडळांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले.

प्रास्ताविकात एल. के. कालकुंद्री यांनी सहकारी संस्था ही कोणत्याही व्यक्तीची नसून ती सर्व सभासदांची असते, विश्वास हा सहकाराचा कणा आहे आणि सामाजिक बांधिलकीतूनच संस्थेचे कार्य सुरू असल्याचे नमूद केले. व्यवस्थापक महेश काकतकर यांनी संस्थेच्या उद्दिष्टांचा व कार्याचा आढावा घेतला.

प्रमुख पाहुण्या सौ. रेणू किल्लेकर यांनी महिलांना स्वयंपूर्णतेसाठी स्वतंत्र उद्योग सुरू करण्याचे आवाहन केले. प्रमुख वक्ते अनिल चौधरी सर यांनी महिलांनी जीवनातील अडचणींना समर्थपणे सामोरे जावे, मुलांना स्वावलंबनाचे व संस्कारांचे धडे द्यावेत, असे मार्गदर्शन केले. अल्पावधीतच संस्थेने केलेल्या प्रगतीचे त्यांनी कौतुक केले.

यावेळी फौंडेशनमार्फत आयोजित विविध स्पर्धांतील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. अग्निवीरमध्ये भरती झालेल्या युवक-युवतींचा तसेच गावातील पदवीधर विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला व्हा. चेअरमन संदीप कदम, संचालक जोतिबा शहापूरकर, विनायक कालकुंद्री, सागर डोणकरी, संतोष केंचनावर, भरमा आनंदाचे, कल्लाप्पा तोरे, बसवंत नाईक, सुधा बाळेकुंद्री, कविता सांबरेकर, सल्लागार नारायण शहापुरकर, सिद्राय बाळेकुंद्री, परशराम कदम, जयवंत मंडोळकर, जोतिबा चौगुले, मल्लाप्पा कोतेकर, कल्लाप्पा अष्टेकर, मारुती बामणे, नारायण कालकुंद्री, दत्तू चौगुले, एम. बी. सांबारेकर, रामा चौगुले, तानाजी तरळे, आनंद बाळेकुंद्री, शीतल चौगुले, लता कडोलकर तसेच कर्मचारी पूनम डोंगरे, प्रतीक्षा चौगुले, सुनील सांबरेकर, मेघा बांदेकर, पिग्मी कलेक्टर यलाप्पा पाटील, प्रभाकर देसुरकर आणि अ वर्ग सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नावगेकर टीचर यांनी केले, तर व्यवस्थापक महेश काकतकर यांनी आभार मानले.

The post जनकल्याण फौंडेशनचा ९ वा वर्धापनदिन उत्साहात appeared first on News 24 Tass Marathi.

येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज सोसायटीचा वर्धापन दिन उत्साहात
येळळूर, ता. २३ : येथील नेताजी मल्टीपर्पज को – ऑप. सोसायटीचा २५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोसायटीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील होते. सोसायटीचे चेअरमन डी.जी. पाटील व व्हाईस चेअरमन रघुनाथ मुरकुटे यांच्याहस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. तर नेताजी युवा संघटनेचे अध्यक्ष किरण गिंडे, संचालक प्रा.सी.एम गोरल व रवींद्र गिंडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

यावेळी बोलताना चेअरमन डी. जी. पाटील म्हणाले, गेल्या २४ वर्षांपूर्वी म्हणजेच २००१ साली आम्ही नेताजी मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना स्वातंत्र सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून केली. सोसायटीला आज २५ वर्षे पूर्ण होत आहेत. संस्था दिवसेंदिवस प्रगतीचे अनेक टप्पे ओलांडत आहे. संस्थेचे संचालक मंडळ, सभासद, ठेवीदार व हितचिंतक तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणामुळे व झोकून देऊन काम करण्याच्या प्रवृत्तीमुळे संस्थेने अल्पावधीतच गरुड झेप घेत, येळ्ळूर व परिसरात आपला नावलौकिक मिळवला आहे. वडगाव व येळ्ळूर येथे स्वतःच्या इमारती उभारण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर परमेश्वरनगर येळ्ळूर येथे नेताजी मराठी सांस्कृतिक भवनाची उभारणी करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. यावेळी व्हाईस चेअरमन रघुनाथ मुरकुटे यांनीही संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी संचालक बी. डी. छत्र्यान्नावर, संजय मजुकर, सी. एम. उघाडे, परशराम गिंडे, शंकर मुरकुटे, पांडुरंग घाडी, अनिल मुरकुटे, डॉ. कुलदीप लाड, सेक्रेटरी दीपक हट्टीकर, चांगदेव मुरकुटे, विजय धामणेकर, रवि कणबरकर, कांचन पाटील, ज्योती यरमाळकर,सोनाली सायनेकर, संगीता दणकारे आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सी. एम. गोरल यांनी केले. तर आभार दीपक हट्टीकर यांनी मानले.

The post येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज सोसायटीचा वर्धापन दिन उत्साहात appeared first on News 24 Tass Marathi.

शहापूर येथे अनुभव वैदिक शाळेचा वर्धापन दिन साजरा
बेळगाव : शहापूर बॅरिस्टर नाथ पै चौक येथील अनुभव वैदिक शाळेचा पहिला वर्धापन दिन बुधवारी सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. वर्धापन दिन कार्यक्रमाला केएलई इंजिनिअरिंग कॉलेजचे डी. एस. रेवणकर, एन. एस. गुंजाळ, कोटक महिंद्रा बँकेचे शाखा व्यवस्थापक देवीप्रसाद पाटील व पत्रकार श्रीकांत काकतीकर अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी अनुभव वेदिक शाळेचे डॉक्टर विनोद यांनी उपस्थित आमचे स्वागत करून आपल्या प्रास्ताविक विचारात वेदिक शाळेत दिल्या जाणाऱ्या ध्यानधारणा, तंत्र-मंत्र साधना, त्याचबरोबर शारीरिक व्याधींवर मात करण्यासाठी हिलिंगचे महत्व यावर माहिती दिली.

यावेळी बोलताना श्रीकांत काकतीकर म्हणाले, चिंता, नैराश्य, नकारात्मक विचार, झोपेचे विकार आणि जुनाट आजारांपासून मुक्तता मिळवण्यासाठी लोक दूरदूरून या ठिकाणी येत असतात. डॉ. विनोद हे सामाजिक बांधिलकीच्या ध्येयाने,समाज विसरलेल्या प्राचीन तंत्रांद्वारे लोकांना निरोगी जीवन जगण्याचे ज्ञान देत आहेत.अनुभव वेदिक शाळेच्या माध्यमातून अनेक गंभीर व्याधींनी त्रस्त असलेल्या रुग्णांवर मेराकी हिलींगच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने उपचार करण्यात आले आहेत. अनेक रुग्णांना हीलिंगचा चांगला अनुभव आला आहे.शारीरिक व्याधी विकारांवर मात करण्यासाठी हिलिंग उपचार पद्धतीचे महत्त्व जाणून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. अन्य मान्यवरांनी ही यावेळी डॉक्टर विनोद यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी चालविलेल्या कार्याचे कौतुक केले. वर्धापन दिनानिमित्त वैदिक होम आणि इच्छापूर्ती श्री हनुमंताचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

The post शहापूर येथे अनुभव वैदिक शाळेचा वर्धापन दिन साजरा appeared first on News 24 Tass Marathi.

मैत्रेयी कलामंच वर्धापन दिनानिमित्त महिला दिन साजरा
बेळगाव : मैत्रेयी कलामंचचा पाचव्या वर्धापन दिनी महिला विद्यालय हायस्कूल सभागृहात महिला दिन साजरा करण्यात आला.प्रमुख पाहुण्या म्हणून जेष्ठ लेखिका, दिग्दर्शिका नीता कुलकर्णी या उपस्थित होत्या.या कार्यक्रमासाठी अपंग जोडीदाराची स्वखुशीने निवड करुन जिद्दीने संसार करणारी कर्तृत्ववान महिला मनाली कुगजी तसेच धुणीभांडी, काबाडकष्ट करून आपल्या मुलांना स्वावलंबी बनविणारी सामर्थ्यशील महिला इंदुबाई कडु यांना सन्मानार्थ बोलाविण्यात आले होते.

या महिलांना सन्मानित करण्यासाठी सौ.स्मिता किल्लेकर यांनी आपली आई कै. कमल माळवी यांच्या स्मरणार्थ आर्थिक स्वरूपात मदत केली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा.मनिषा नाडगौडा यांनी सर्वांचे स्वागत करुन स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविक सौ. अपर्णा पाटील यांनी केले. प्रमुख पाहु्ण्यांचा परिचय सौ. अक्षता पिळणकर यांनी करून दिला. सत्कारमूर्ती सौ. मनाली कुगजी यांचा परिचय प्रतिभा सडेकर तर दुसऱ्या सत्कारमूर्ती इंदुबाई कडू यांचा परिचय सौ. मनिषा मोरे यांनी करून दिला. प्रमुख पाहुण्या मा. नीता कुलकर्णी यांचा सन्मान सौ.रोशनी हुंद्रे यांनी केला. दोन्ही सत्कारमूर्तींचा सन्मान सौ. स्मिता किल्लेकर यांच्याहस्ते करण्यात आला.

प्रमुख पाहुण्या नीता कुलकर्णी यांनी मार्गदर्शकपर भाषण केले.या कार्यक्रमात मैत्रेयी कलामंच मंडळाच्या मैत्रिणींच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. प्रा मनिषा नाडगौडा, सौ. अक्षता यळ्ळूरकर, सौ.स्नेहल बर्डे, सौ. अक्षता पिळणकर, सौ.रोशनी हुंद्रे, ईशानी जाधव यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. मैत्रेयी कलामंचच्या सर्व महिलांचा सन्मान नीता कुलकर्णी यांच्याहस्ते भेटवस्तू देऊन करण्यात आला.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मेघा भंडारी यांनी केले. शेवटी सौ.अस्मिता आळतेकर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

The post मैत्रेयी कलामंच वर्धापन दिनानिमित्त महिला दिन साजरा appeared first on News 24 Tass Marathi.