News 24 Tass Marathi

कावळेवाडीत हरिपाठ अभंग व मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा उत्साहात
ग्रामीण विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

विजेत्यांचा रोख रक्कम, गौरवपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव

कावळेवाडी : राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कावळेवाडी येथे हरिपाठ अभंग व मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभलेल्या या स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप एम. पी. मोरे होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी उपस्थित मान्यवरांचे सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. नामदेव मोरे यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी आदर्श सोसायटीचे चेअरमन एस. एम. जाधव, शिवनेरी सोसायटीचे अध्यक्ष पुंडलिक जाधव, ग्रामस्थ मंडळाचे चेअरमन जोतिबा मोरे, पारायण मंडळाचे अध्यक्ष हभप शिवाजी जाधव, निवृत्त मुख्याध्यापक अशोक येटले, सैनिक प्रशिक्षक बाळासाहेब पसारे, यल्लापा बुरुड, अर्जुन सुतार, केदारी कणबरकर, वाय. एन. गावडा, एस. एन. गावडे, ए. एम. यळुरकर, मारुती भ. मोरे, अण्णापा अष्टेकर, लक्ष्मण जाधव, पी. एस. मोरे आदी उपस्थित होते.

यावेळी पुंडलिक जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थीदशेतच संत साहित्याची ओळख झाल्याने संतांचे विचार जीवनासाठी प्रेरणादायी ठरतात. संतविचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन गरजेचे आहे. या माध्यमातून संत साहित्याचा जागर होतो, तर पाठांतरामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.

स्पर्धेतील विजेते :

हरिपाठ अभंग पाठांतर स्पर्धा :

प्रथम : श्रावणी शशिकांत गावडे – प्राथमिक शाळा, कावळेवाडी

द्वितीय : श्रुती शशिकांत गावडे – प्राथमिक शाळा, कावळेवाडी

तृतीय : वरद विनायक सुतार – बालवीर, बेळगुंदी

मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा :

प्रथम : दिव्या दत्तात्रय कोले – अतिवाड प्राथमिक शाळा

द्वितीय : हर्षिता दत्तू चौगुले – मराठी शाळा, बेळवट्टी

तृतीय : सानिका सुधीर बाचीकर – बिजगर्णी हायस्कूल

स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. स्पर्धेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आयोजकांनी समाधान व्यक्त केले. शिक्षक के. जी. मेणसे आणि अशोक येटले यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सूत्रसंचालन श्री. मेणसे यांनी केले, तर के. आर. भाष्कर यांनी आभार मानले.

The post कावळेवाडीत हरिपाठ अभंग व मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा उत्साहात appeared first on News 24 Tass Marathi.

नवकर्नाटक शेतकरी संघटनेची महिला कार्यकारिणी जाहीर
बेळगाव : नवकर्नाटक शेतकरी संघटनेच्या बेळगाव जिल्हा महिला आघाडीच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड शनिवारी (दि. ५) करण्यात आली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दयानंद पाटील यांनी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या.

या नव्या कार्यकारिणीत बेळगाव जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी लता अनसकर, उपाध्यक्षपदी विजयलक्ष्मी धारवाडकर, सरचिटणीसपदी रक्षा उपाध्ये, सचिवपदी शीला, संघटन सचिव अंजुमा शेख, माध्यम प्रतिनिधी गीता शेट्टर यांची निवड करण्यात आली.

बेळगाव शहर अध्यक्ष संजय परदेशी, उपाध्यक्ष स्वस्तिक मेदार उपस्थित होते. राज्य महिला आघाडीच्या नेत्या दिव्या हादरगी यांनी बोलताना शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी संघटनेची मोठी गरज आहे. या लढ्यात विशेषतः महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे सांगितले. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य बसवराज भारिगिडद यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

The post नवकर्नाटक शेतकरी संघटनेची महिला कार्यकारिणी जाहीर appeared first on News 24 Tass Marathi.

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे तीन शिक्षकांचा गौरव
‘टीचर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मान

बेळगाव : शिक्षक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या इंग्रजी, मराठी आणि उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तीन प्रेरणादायी शिक्षकांचा गौरव करण्यात आला. अध्यापनातील समर्पण, संयम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांना प्रतिष्ठेचा ‘टीचर ऑफ द इयर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

उर्दू माध्यमासाठी श्रीमती वजीदा भानू, मराठी माध्यमासाठी श्री. तुषार कांबळे आणि इंग्रजी माध्यमासाठी श्री. विलास कार्येनावर यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रमाचे ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण आणि उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी या शिक्षकांनी केलेल्या कार्याचे यावेळी कौतुक करण्यात आले.

हा पुरस्कार रोटरी क्लबच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तीहोळी, सचिव रोटेरियन ज्योती कुलकर्णी आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. अनुपमा कल्लोळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी डॉ. स्मिता आणि रोटेरियन सविता वेसणे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी शिक्षकांच्या कार्याचा गौरव करत कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

शिक्षक हा केवळ धडे शिकविणारा नसतो, तर विद्यार्थ्यांना प्रेरणा, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देत त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक असतो. अशा शिक्षकांच्या योगदानाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून शिक्षकी पेशाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

The post रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे तीन शिक्षकांचा गौरव appeared first on News 24 Tass Marathi.

वीस कोटींची घरपट्टी थकीत ; थकबाकीदारांना नोटिसा पाठविण्यास सुरुवात
थकबाकी वसुलीवर महापालिकेचा भर

बेळगाव : शहरातील एक लाख रुपयांहून अधिक घरपट्टी थकीत असलेल्या मिळकतधारकांची यादी महानगरपालिकेच्या महसूल विभागाने तयार केली आहे. संबंधित थकबाकीदारांना नोटिसा बजावून कर वसुलीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या थकबाकीदारांकडून सुमारे २० कोटी रुपयांची घरपट्टी वसूल होणे बाकी असल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली.

गतवर्षी महानगरपालिकेला महसूल वसुलीचे निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करता आले नव्हते. त्यामुळे चालू आर्थिक वर्षासाठी १०३ कोटी रुपयांचे महसूल वसुलीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. आतापर्यंत ५४ कोटी रुपयांहून अधिक महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.

मध्यंतरी एसआयआरच्या कामामुळे घरपट्टी वसुलीच्या प्रक्रियेकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाले होते. मात्र, आता मनपा आयुक्त कार्तिक एम. यांनी महसूल विभागाला घरपट्टी वसुलीवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार महसूल विभागाने थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे.

पहिल्या टप्प्यात एक लाख रुपयांपेक्षा अधिक कर थकीत असलेल्या मिळकतधारकांना नोटिसा पाठविण्यात येत आहेत. त्यानंतर ५० हजार रुपयांपर्यंत कर थकीत असलेल्या मिळकतधारकांकडूनही नोटिसा बजावून थकबाकी वसूल केली जाणार आहे.

एक लाख रुपयांहून अधिक कर थकीत असलेल्या मिळकतधारकांनी आपली थकबाकी भरल्यास महापालिकेच्या तिजोरीत सुमारे २० कोटी रुपयांचा महसूल जमा होऊ शकतो, अशी माहिती महसूल उपायुक्त डॉ. सिद्धू हुल्लोळी यांनी दिली.

The post वीस कोटींची घरपट्टी थकीत ; थकबाकीदारांना नोटिसा पाठविण्यास सुरुवात appeared first on News 24 Tass Marathi.

कपिलेश्वर तलावात गोकुळ मूर्तींच्या विसर्जनासाठी पाणीच नाही
अवघ्या ७-८ इंच पाण्यात विसर्जन

महापालिकेच्या नियोजनावर भाविकांचा संताप

बेळगाव : गोकुळाष्टमीच्या पूजेनंतर दुसऱ्या दिवशी गोकुळाच्या मूर्तीचे विसर्जन करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आजही जपली जाते. रात्री बारा वाजता पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी नदी, तलाव किंवा कुंडात मूर्तीचे विसर्जन केले जाते. मात्र, बेळगावातील कपिलेश्वर तलावात यंदा विसर्जनासाठी पुरेसे पाणीच उपलब्ध नसल्याने भाविकांची मोठी गैरसोय झाली.

बेळगाव शहरात नदी नसल्याने दरवर्षी गोकुळाच्या मूर्तींचे विसर्जन कपिलेश्वर तलावात केले जाते. याठिकाणी विसर्जनासाठी आवश्यक पाण्याची व्यवस्था असते. मात्र, यंदा तलावातील पाण्याची पातळी एक फुटापेक्षाही कमी असल्याचे दिसून आले. त्यामुळे भाविकांना नाईलाजाने अवघ्या ७–८ इंच पाण्यात गोकुळाच्या मूर्तींचे विसर्जन करावे लागले.

महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

विसर्जनासाठी आलेल्या भाविकांना निर्माण झालेली अडचण पाहून उपस्थितांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. धार्मिक परंपरेनुसार होणाऱ्या विसर्जनासाठी आवश्यक पाण्याची व्यवस्था आधीच का करण्यात आली नाही, असा सवाल भाविकांकडून उपस्थित करण्यात आला.

महापालिकेचे कर्मचारी तसेच परिसरातील नगरसेवकांना या समस्येची पूर्वकल्पना असूनही वेळीच उपाययोजना का करण्यात आली नाही, अशी चर्चा भाविकांमध्ये सुरू होती.

परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर, रामराज दरवंदकर आणि माजी नगरसेवक राजू बिरजे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.

गोकुळाष्टमीसारख्या पारंपरिक धार्मिक उत्सवासाठी भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी होत असताना, मूर्ती विसर्जनासाठी आवश्यक पाण्याची व्यवस्था न होणे ही महापालिका प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब असल्याचे नागरिकांनी सांगितले.

भविष्यात अशा धार्मिक उत्सवांच्या वेळी भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेने आवश्यक सुविधा आणि योग्य नियोजन वेळेत करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली.

The post कपिलेश्वर तलावात गोकुळ मूर्तींच्या विसर्जनासाठी पाणीच नाही appeared first on News 24 Tass Marathi.

सरकारी नियमांचे उल्लंघन करून साकारलेल्या पीओपी गणेशमूर्तींवर कारवाई
८७२ मूर्ती जप्त ; बेळगावसह नऊ शहरांत विशेष पथके

बेंगळुरू : राज्यभरात १८ ऑगस्ट ते दोन सप्टेंबर २०२६ या कालावधीत राबविलेल्या विशेष मोहिमेदरम्यान १५३ दुकाने व गोदामांची तपासणी केली. तसेच, सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून तयार केलेल्या ८७२ पीओपी गणेशमूर्ती जप्त केल्या.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तींची निर्मिती, साठवणूक, वाहतूक, विक्री आणि विसर्जनावर बंदी घातली आहे. या बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी वन विभागाने विशेष कार्यदलाची स्थापना केली आहे. बेळगाव, बेंगळुरू, रामनगर, म्हैसूर, मंगळूर, दावणगिरी, धारवाड, गुलबर्गा आणि विजयनगर येथे विशेष पथके तैनात केली आहेत. या पथकांकडून पीओपीच्या गणेशमूर्ती ओळखणे, त्यांची विक्री रोखणे, तसेच मूर्ती जप्त करण्याची कारवाई केली जात आहे.

सरकारने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मूर्ती जप्त करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. वन व पर्यावरण मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. मातीच्या मूर्तीमुळे जलप्रदूषण आणि कचऱ्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे पीओपीच्या मूर्तीचा वापर टाळून पर्यावरणपूरक मूर्तींची प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन त्यांनी केले.

The post सरकारी नियमांचे उल्लंघन करून साकारलेल्या पीओपी गणेशमूर्तींवर कारवाई appeared first on News 24 Tass Marathi.

श्री. गंगाधर जोतिबा पाटील यांचे निधन
बेळगाव : मूळचे कंग्राळ गल्लीचे व काकतीवेस गल्ली येथील रहिवासी गंगाधर जोतिबा पाटील (वय ७४) यांचे शनिवार दि. ५ सप्टेंबर रोजी आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, तीन विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि. ७ रोजी सकाळी ८ वा. सदाशिवनगर स्मशानभूमीत होणार आहे.

The post श्री. गंगाधर जोतिबा पाटील यांचे निधन appeared first on News 24 Tass Marathi.

इंचलमध्ये कामादरम्यान सापडली १४ सोन्याची नाणी
माती उकरताना मडक्यात सापडला ऐतिहासिक ठेवा

कामगारांनी प्रामाणिकपणे प्रशासनाकडे केली सुपूर्द

बैलहोंगल : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील इंचल गावात काम सुरू असताना कामगारांना १४ सोन्याची नाणी सापडल्याची घटना समोर आली आहे. सापडलेली नाणी कोणतीही हयगय न करता कामगारांनी ग्रामपंचायत आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. त्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

इंचल गावातील शासकीय वसतिगृहाजवळ काही काम सुरू होते. यावेळी माती उकरताना कामगारांना एका मडक्यात सोन्याची नाणी आढळून आली. एकूण १४ नाणी असून त्यांचे वजन सुमारे ५४.८ ग्रॅम आहे. या नाण्यांची किंमत आठ लाख रुपयांहून अधिक असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

नाणी सापडताच कामगारांनी ती तातडीने ग्रामपंचायत आणि महसूल अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केली. महसूल विभागाने घटनास्थळी पंचनामा करून नाणी ताब्यात घेतली. त्यानंतर सवदत्तीचे तहसीलदार मल्लिकार्जुन हेग्गण्णावर यांच्या माध्यमातून हा ऐतिहासिक ठेवा सरकारी तिजोरीत जमा करण्यात आला.

पश्चिम गंग किंवा विजयनगर काळातील नाणी?

प्राथमिक माहितीनुसार, ही सोन्याची नाणी दहाव्या ते पंधराव्या शतकाच्या कालखंडातील असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पश्चिम गंग घराणे किंवा विजयनगर साम्राज्याच्या काळाशी त्यांचा संबंध असू शकतो, असा प्राथमिक अंदाज आहे.

या नाण्यांवर हत्तीचे चित्र अंकित असून त्यांना ‘गजपती गद्याण’ किंवा ‘गजपती वराह’ असे संबोधले जाते. नाण्यांचा नेमका कालखंड, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि पुरातत्त्वीय महत्त्व निश्चित करण्यासाठी ती तज्ज्ञांकडे तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत.

सापडलेला मौल्यवान ऐतिहासिक ठेवा स्वतःकडे न ठेवता प्रशासनाच्या स्वाधीन करणाऱ्या कामगारांच्या प्रामाणिकपणाचे तालुका प्रशासन आणि ग्रामस्थांनी कौतुक केले. त्यांच्या या कृतीबद्दल त्यांचा गौरवही करण्यात आला.

The post इंचलमध्ये कामादरम्यान सापडली १४ सोन्याची नाणी appeared first on News 24 Tass Marathi.

अध्यात्मिक चळवळ पुढे नेण्याची जबाबदारी तरुण पिढीवर
भक्ती रसामृत स्वामी महाराज

बेळगाव : “श्रील प्रभूपादानी कठोर तपस्या करून सुरू केलेले इस्कॉनचे आंदोलन जगभर पसरले आहे. पूर्वी भक्तांची संख्या कमी होती आणि ते फक्त मंदिरात राहात होते. पण आता मंदिराबाहेर राहणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. ही चळवळ अशीच पुढे चालू ठेवण्याची व त्याला कोणतेही गालबोट न लागण्याची जबाबदारी यापुढे तरुण पिढीवर आहे” असे प्रतिपादन इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांनी बोलताना केले.

इस्कॉन चे संस्थापक श्रील प्रभुपाद यांचा जन्मदिवस हा जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी इस्कॉन चळवळीत”व्यास पूजा” म्हणून साजरा केला जातो. तो 130 वा अविर्भाव दिन यंदाही मोठ्या उत्साहाने रविवारी साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी श्रील प्रभुपाद यांना आदरांजली वाहताना महाराज बोलत होते.

श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरा शेजारील पटांगणात उभारण्यात आलेल्या शामियाण्यात प्रभूपादांचा विग्रह ठेवण्यात आला होता. अतिशय सुंदर अशी आरास करण्यात आली होती.

सकाळी अभिषेक झाल्यानंतर प्रभु पादांच्या विग्रहाला महाराजांनी हार घालून नंतर अभिषेक केला, त्यानंतर दीक्षित भक्तांनी अभिषेक केले. पन्नास हून अधिक भक्तांनी प्रभुपादांच्या बद्दल आपले विचार व्यक्त केले आणि त्यांना पुष्पांजली वाहिली.

दहीहंडीचा कार्यक्रम

शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता मंदिराच्या आवारात लहान मुलांसाठी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिल्याबद्दल इस्कॉन तर्फे त्यांचे आभार मानण्यात आले.

The post अध्यात्मिक चळवळ पुढे नेण्याची जबाबदारी तरुण पिढीवर appeared first on News 24 Tass Marathi.

शहरातील विविध भागात उद्या वीजपुरवठा खंडित
बेळगाव : वीजवाहिन्यांची तपासणी व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने काही उपनगरांत रविवार दि. ६ रोजी वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे हेस्कॉम शहर विभागाने कळविले आहे.

राणी चन्नम्मानगर पहिला व दुसरा क्रॉस, बुडा लेआऊट, सुभाषचंद्रनगर, उत्सव हॉटेल, तिसरे रेल्वे गेट, वसंत विहार कॉलनी, विष्णू गल्ली, धामणे रोड, कलमेश्वर रोड, देवांगनगर पहिला ते दुसरा क्रॉस, रयत गल्ली, मलप्रभानगर, कल्याणनगर, तेरगिन गल्ली, व्हडर छावणी, डोर गल्ली, गणेशपेठ, कुलकर्णी गल्ली, रेणुकानगर, देवांगनगर बस्ती गल्ली, माधव रोड, कपिलेश्वर कॉलनी, महावीर कॉलनी, समर्थनगर, ओमनगर, पाटील गल्ली, सुभाष मार्केट, आर. के. मार्ग, हिंदवाडी कॉर्पोरेशन कॉम्प्लेक्स, अथर्व टॉवर, आरपीडी रोड, भाग्यनगर १० क्रॉस, रानडे कॉलनी पहिला ते दुसरा क्रॉस, सर्वोदय मार्ग, महावीर गार्डन व परिसर, आनंदवाडी, अनगोळ, वडगाव मुख्य रस्ता, सह्याद्री कॉलनी, पारिजात कॉलनी, साईश्रद्धा कॉलनी, अनगोळ मुख्य रस्ता, सत मीरा रोड, वाडा कंपाऊंड, रघुनाथपेठ, सुभाष गल्ली, मारुती गल्ली, कनकदास कॉलनी, महावीरनगर, आंबेडकरनगर, भाग्यनगर पहिला ते दहावा क्रॉस, संभाजीनगर, केशवनगर, येळ्ळूर केएलबी, अन्नपूर्णेश्वरीनगर, आनंदनगर, आदर्शनगर पहिला ते पाचवा क्रॉस, पटवर्धन लेआऊट, मेघदूत हाऊसिंग सोसायटी, घुमटमाळ, नाय पै सर्कल, जेल शाळा, गोमटेश या भागाचा वीजपुरवठा रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत खंडित होणार आहे.

श्रीनगर परिसरातील चन्नम्मा सोसायटी, श्रीनगर परिसर, महांतेशनगर सेक्टर नं. ८ ते १२, रुक्मिणीनगर, आश्रय कॉलनी, शिवतीर्थ कॉलनी, वृंदावन कॉलनी, रामतीर्थनगर, कणबर्गी रोड, केएमएफ डेअरी परिसर, शिवबसवनगरचा काही भाग, एसबीआय ते धर्मनाथ भवन, अशोकनगर, कॅन्सर हॉस्पिटल, ईएसआय हॉस्पिटल, वीरमद्रनगर, शिवाजीनगर, पोलीस हेडक्वार्टर्स, केएसआरटीसी क्वॉर्टर्स, त्रिवेणी हॉटेल परिसर, मेटगूड हॉस्पिटल, राणी चन्नम्मा चौक, कॉलेज रोड, काकतीवेस, क्लब रोड, डीसी ऑफिस, कोर्ट कंपाऊड, अलारवाड परिसरातील केएचबी कॉलनी, महालक्ष्मीनगर, आर्मी कॉलनी, केएचबी लेआऊट व या गावातील शेती पंपसेटचा वीजपुरवठा खंडित होणार आहे.

वृद्धाश्रम परिसर, अलारवाड, सुवर्णसौध लाईन १ व २, बसवेश्वर चौक, शहापूर परिसरातील जोशी गल्ली, नार्वेकर गल्ली, आचार्य गल्ली, गाडेमार्ग, गणेशपूर गल्ली, पवार गल्ली, बसवाण गल्ली, सराफ गल्ली, बिच्छू गल्ली परिसर, मारुतीनगर, हरिकाका कंपाऊंड, साई कॉलनी, येडियुराप्पा मार्ग, हलगा रोड या भागात सकाळी ९ ते सायंकाळी ४ पर्यंत वीजपुरवठा खंडित होणार आहे.

उचगाव, हिंडलगा परिसरात उद्या वीजपुरवठा खंडित

बेळगाव दुरुस्तीच्या कारणास्तव ११० केव्ही उचगाव उपकेंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या काही गावांचा वीजपुरवठा रविवार दि. ६ रोजी सकाळी ९ ते १२ यावेळेत खंडित होणार आहे.

बिजगर्णी, बोकमूर, कावळेवाडी, बेळवट्टी, बाकनूर, बेळगुंदी, सोनोली, येळेबैल, राकसकॉप, कुंद्रेमनी, कल्लेहोळ, बेळगुंदी औद्योगिक वसाहत, उचगाव, बसूर्ते, बेकिनकेरे, सुळगा, तुरमुरी, कोनवाडी, वाची, बेनकनहळ्ळी, सावगाव, मंडोळी, हंगरगा, अंगडी महाविद्यालय, गणेशपूर.

हिंडलगा उपकेंद्रावरून वितरण होणाऱ्या हिंडलगा पप हाऊस, गणेशपूर, हिंडलगा, मण्णूर, सरस्वतीनगर, लक्ष्मीनगर, विजयनगर, डिफेन्स कॉलनी, क्रांतीनगर, मारुतीनगर, शिवमनगर, गोजगा, आंबेवाडी व तेथील शेती पंपसेटचा वीजपुरवठा खंडित होणार असल्याचे हेस्कॉम ग्रामीण विभागाने कळविले आहे.

The post शहरातील विविध भागात उद्या वीजपुरवठा खंडित appeared first on News 24 Tass Marathi.