wrestling Archives | News 24 Tass Marathi

मुचंडी आंतरराष्ट्रीय कुस्ती आखाड्यात महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील अजिंक्य
इराणच्या इरफानला ‘बॅक थ्रो’ डावावर केले चितपट

बेळगाव : मुचंडी येथील श्री महालक्ष्मी – श्री मरगाई यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती आखाड्यात महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील (कोल्हापूर) याने इराणच्या बलदंड पैलवान इरफान इराणला थरारक लढतीत ‘बॅक थ्रो’ डावावर चितपट करत ऐतिहासिक विजय मिळवला. तब्बल ३२ मिनिटे रंगलेल्या या रोमहर्षक लढतीने हजारो कुस्तीप्रेमींना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.

बेळगाव तालुक्यातील मुचंडी गावातील सिद्धेश्वर मंदिर मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाला प्रचंड गर्दी झाली होती. अंतिम फेरीतील पृथ्वीराज आणि इरफान यांच्यातील लढत विशेष आकर्षण ठरली. सुरुवातीपासूनच दोन्ही मल्लांनी एकमेकांना जोरदार झुंज दिली. निर्धारित वेळेत निकाल न लागल्याने नवीन नियमानुसार नाणेफेक करण्यात आली. त्यानंतर प्रत्येकी दोन मिनिटांच्या नियंत्रणाच्या संधीमध्ये पृथ्वीराज पाटीलने अफलातून ‘बॅक थ्रो’ डाव टाकत इरफानला चितपट केले आणि मैदानात जल्लोष उसळला.

दुसऱ्या प्रमुख कुस्तीमध्ये पैलवान प्रशांत शिंदे याने ‘एकलांगी’ व ‘एकेरी हात’ या प्रभावी डावांच्या जोरावर अवघ्या आठव्या मिनिटाला विरेंद्र कुमारचा पराभव केला. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये कर्नाटकचा कंठीरवा केसरी कामेश पाटील (कंग्राळी) याने कोल्हापूरच्या सूरज मुंडेला ‘घुटणाचित’ करत १६व्या मिनिटाला विजय मिळवला.

चौथ्या सामन्यात कर्नाटक चॅम्पियन प्रकाश इंगळगी याने सांगलीच्या मनोज पाटीलवर ‘नाकपट्टी’ डावावर मात केली. प्रेम जाधव आणि अक्षय चौगुले यांच्यातील सामना रंगतदार झाला; मात्र अक्षयला दुखापत झाल्याने ही कुस्ती अनिर्णित राहिली.

याशिवाय सचिन शिरगुप्पी, साताप्पा कोल्हापूर, कार्तिक इंगळगी, बाबू नरळे, विनायक येळ्ळूर, संभाजी परमोजी (काकती), पिल्ल्या कोल्हापूर, रामदास मोळेराखी (काकती), महांतेश (संतीबस्तवाड), सुफियान सय्यद, प्रणव (उचगाव), मंथन तिप्पानाचे, संग्राम गावडा, अफान (माजगाव), सिद्धार्थ काकतकर (मजगाव), स्वराज (सावगाव), प्रथमेश वकुंद, प्रतीक वकुंद (गणेशपूर), ओंकार पुजारी आणि प्रवीण गंदिगवाड आदी मल्लांनीही आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत मैदान गाजवले.

आखाड्याचे पंच म्हणून विश्वनाथ पाटील, शिवाजी पाटील, अतुल शिरोळे, बाळाराम पाटील, गणपत बन्नोशी, बाहुबली बस्तवाड, राजू माजगाव, परशुराम मोदगेकर, पिराजी मुचंडीकर, गंगाराम बाळेकुंद्री आणि बाबू कल्लेहोळ यांनी काम पाहिले. कुस्तीचे समालोचन कृष्णकांत राशिवडे यांनी केले. तर अमोल निपाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रणहलगीच्या ठेक्यावर वातावरण भारावून टाकले.

The post मुचंडी आंतरराष्ट्रीय कुस्ती आखाड्यात महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील अजिंक्य appeared first on News 24 Tass Marathi.

दक्षिण भारत कुस्ती स्पर्धेत साईराम आठवणीला सुवर्णपदक
बेळगाव : २०२६ च्या दक्षिण भारत कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत कर्नाटक स्पोर्ट्स हॉस्टेल, बेळगाव येथील कुस्तीपटू साईराम मोहन आठवणी याने सुवर्णपदक पटकावत खानापूर तालुक्यासह बेळगाव जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.

बिडी (ता. खानापूर) येथील साईरामने फ्रीस्टाईल, ग्रीको-रोमन व महिला गटांच्या स्पर्धेत दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत विजय मिळवला. कठोर परिश्रम, शिस्तबद्ध सराव आणि एकाग्रतेच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले.

त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कर्नाटक स्पोर्ट्स हॉस्टेल, बेळगाव येथील प्रशिक्षक आणि क्रीडा अधिकाऱ्यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. साईरामच्या सुवर्ण विजयामुळे कर्नाटक राज्यासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.

The post दक्षिण भारत कुस्ती स्पर्धेत साईराम आठवणीला सुवर्णपदक appeared first on News 24 Tass Marathi.

मुचंडी येथे १८ मे रोजी भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान
बेळगाव : मुचंडी (ता. जि. बेळगाव) येथे श्री महालक्ष्मी देवी व श्री मरगाई देवी यात्रेनिमित्त येत्या सोमवार दि. १८ मे २०२६ रोजी दुपारी ठीक ३ वाजता भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे.

गोकाक रोड, मुचंडी येथील श्री सिद्धेश्वर मंदिराच्या पायथ्याशी हे कुस्ती मैदान होणार आहे. या मैदानातील प्रथम क्रमांकाची कुस्ती कोल्हापूरचा महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील आणि वर्ल्ड चॅम्पियन पै. इरफान इराण यांच्यात खेळविली जाणार आहे. त्याचप्रमाणे २ ते ५ क्रमांकापर्यंतच्या कुस्त्या अनुक्रमे भोसले व्यायाम शाळा सांगलीचा पै. प्रशांत शिंदे विरुद्ध हरियाणा केसरी पै. वीरेंद्र कुमार, लहान कंग्राळीचा कर्नाटक केसरी पै. कामेश पाटील विरुद्ध भोसले व्यायाम शाळा सांगलीचा महाराष्ट्र चॅम्पियन पै. बाळू अपराध, मुधोळचा कर्नाटक केसरी पै. सदाशिव नलवडे विरुद्ध तालीम गंगावेस कोल्हापूरचा महाराष्ट्र चॅम्पियन पै. विश्वचरण सोलनकर आणि लहान कंग्राळीचा डबल कर्नाटक चॅम्पियन पै. प्रेम जाधव विरुद्ध कोल्हापूरचा पै. दादू चौगुले यांचा नातू पै. अक्षय चौगुले अशा होणार आहेत.

वरील कुस्त्यांव्यतिरिक्त सदर कुस्ती मैदानात लहान – मोठ्या ५० हून अधिक चटकदार कुस्त्या लावल्या जाणार आहेत. मेंढ्याच्या बक्षीसासाठी ४ कुस्त्या होणार असून त्यामध्ये पै. बलराज चौगुले विरुद्ध पै. विक्रम हुबळी, पै. प्रल्हाद हुलीकोतली विरुद्ध पै. तुषार शिंदे, पै. श्रेयस खाडली विरुद्ध पै. विनायक गौंडवाड आणि पै. स्वराज पाखरे विरुद्ध पै. तन्मय मो. कंग्राळी या कुस्त्यांचा समावेश आहे. कुस्ती आखाडा व तालमीच्या वस्तादांसह हौशी पैलवानांनी सदर कुस्ती मैदानासंदर्भात अधिक माहितीसाठी पै. अतुल सुरेश शिरोले (मो. क्र. ८८६११६९२१७) अथवा पै. परशुराम पुंडलिक मोदगेकर (मो. क्र. ९७३९१८४९३३) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच कुस्ती शौकिनांनी बहुसंख्येने या कुस्ती मैदानाला हजेरी लावून कुस्त्यांचा आनंद लुटण्याबरोबरच मैदान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

The post मुचंडी येथे १८ मे रोजी भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान appeared first on News 24 Tass Marathi.

इराणचा पैलवान मिर्झाने मारले बी. के. कंग्राळीचे मैदान
गुणांच्या आधारावर विजय

पंजाब केसरी भूपेंद्र अजनालाने दिली कडवी झुंज

बी. के. कंग्राळी : तब्बल ४३ वर्षांनंतर साजऱ्या होत असलेल्या ग्रामदेवी श्री महालक्ष्मी जत्रा महोत्सवानिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इराणचा पैलवान मिर्झा याने गुणांच्या आधारावर विजय मिळवत मैदान गाजवले.

ग्रामदेवी जत्रेच्या निमित्ताने आयोजित या कुस्ती स्पर्धेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले होते. पहिल्याच फेरीतील सर्वाधिक उत्कंठावर्धक लढतीत इराणचा मिर्झा आणि पंजाब केसरी भूपेंद्र अजनाला आमनेसामने आले. अनुभवी दोन्ही पैलवानांनी दमदार खेळ करत प्रेक्षकांना खिळवून ठेवले. भूपेंद्रने कडवी झुंज दिली असली, तरी निर्धारित वेळेत निकाल स्पष्ट न झाल्याने अखेरीस गुणांच्या आधारे मिर्झाला विजेता घोषित करण्यात आले.

सुमारे चार दशकांनंतर कंग्राळी गावात आयोजित करण्यात आलेल्या या महालक्ष्मी जत्रेमुळे धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणाला क्रीडा स्पर्धेची जोड मिळाली. कुस्ती सामने पाहण्यासाठी परिसरातील हजारो कुस्तीप्रेमी दाखल झाले होते.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील पैलवानांची कामगिरी पाहून उपस्थितांनी दाद दिली. धार्मिक विधींसह पार पडणाऱ्या या महोत्सवात कुस्ती स्पर्धेमुळे विशेष रंगत निर्माण झाली असून गावात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

The post इराणचा पैलवान मिर्झाने मारले बी. के. कंग्राळीचे मैदान appeared first on News 24 Tass Marathi.

सांबरा येथे उद्या जंगी कुस्ती मैदान
‘मल्लविद्येचा महासंग्राम’ रंगणार

सांबरा : बेळगाव तालुक्यातील सांबरा येथे रविवारी (दि. २६ एप्रिल) दुपारी ३ वाजता ‘मल्लविद्येचा महासंग्राम’ या भव्य निकाली कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. कमल (कम्मार) तलाव परिसरात रंगणाऱ्या या मैदानासाठी आयोजकांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.

या कुस्ती मैदानातील पहिल्या क्रमांकाची मुख्य कुस्ती पुण्याचा ‘हिंदू गर्जना केसरी’ पै. शुभम सिधनाळे आणि हरियाणातील सोनीपतचा ‘भारत केसरी’ पै. अजय वरण यांच्यात होणार असून, ही लढत विशेष आकर्षण ठरणार आहे.

तसेच अन्य प्रमुख कुस्त्यांमध्ये दसरा कंठीरवा केसरी पै. कामेश विरुद्ध दिल्लीचा पै. करण, उत्तर कर्नाटक केसरी पै. शिवा दड्डी विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पै. सत्पाल, कर्नाटक चॅम्पियन पै. प्रेम विरुद्ध इस्लामपूरचा पै. शिवकुमार जंगम, तसेच शिरगुप्पीचा पै. सचिन विरुद्ध सांगलीचा पै. सौरभ मरकड यांच्या कुस्त्या रंगणार आहेत. याशिवाय ५० हून अधिक लहान-मोठ्या चुरशीच्या कुस्त्यांची मेजवानी कुस्तीप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे.

सांबरा कुस्तीगीर कमिटीचे पदाधिकारी यल्लाप्पा हरजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मैदानासाठी नव्याने आखाडा उभारण्यात आला असून गावकऱ्यांच्या सहकार्याने सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महासंग्रामाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

The post सांबरा येथे उद्या जंगी कुस्ती मैदान appeared first on News 24 Tass Marathi.

सांबरा कुस्ती कमिटीचा गतवर्षीच्या आखाड्याचा अहवाल सादर
२६ एप्रिलच्या जंगी मैदानासाठी तयारी सुरू

सांबरा : सांबरा कुस्ती कमिटीच्या वतीने गतवर्षी यशस्वीरीत्या पार पडलेल्या कुस्ती आखाड्याचा जमा-खर्च अहवाल हनुमान मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात सादर करण्यात आला. या प्रसंगी अहवालाचे वितरणही करण्यात आले.

कार्यक्रमाचा शुभारंभ इराप्पा जोई, शिवाजी जत्राटी, नागो यड्डी, सिद्राई यड्डी आणि लक्ष्मण यड्डी यांच्या हस्ते करण्यात आला. मागील वर्षीच्या आखाड्याचा आर्थिक व्यवहार पारदर्शक पद्धतीने मांडण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

रविवार दि. २६ एप्रिल रोजी होणाऱ्या भव्य कुस्ती मैदानाच्या आयोजनासाठी तयारीला वेग देण्यात आला असून, हा उपक्रम यशस्वी करण्याचा निर्धार कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

आखाडा उभारणीसाठी सहकार्य करणाऱ्या देणगीदार व ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले. तसेच नवीन तलाव परिसरात उभारण्यात येणाऱ्या आखाड्याबाबत यल्लाप्पा हरजी यांनी सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमास लक्ष्मण सुळेभावी, मोहन हरजी, महेंद्र गोठे, भरमा चिंगळी, भुजंग धर्मोजी, भुजंग गिरमल, शिवानंद पाटील, कृष्णा जोई, शीतल तिप्पाण्णाचे, शिवाजी मालाई, लक्ष्मण जोई, सिद्राई तिप्पाण्णाचे, परशराम हरजी, आप्पानी यड्डी, विनायक चिंगळी, प्रकाश बसरीकट्टी यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

The post सांबरा कुस्ती कमिटीचा गतवर्षीच्या आखाड्याचा अहवाल सादर appeared first on News 24 Tass Marathi.

येळ्ळूर येथे महाराष्ट्र कुस्ती मैदानाला प्रारंभ
येळ्ळूर : येथील कलमेश्वर, चांगळेश्वरीदेवी यात्रोत्सव व महालक्ष्मीदेवी वाढदिवसानिमित्त आज गुरुवारी येळळूर महाराष्ट्र मैदानात आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाला मोठा उत्साहात प्रारंभ झाला. माजी आमदार परशुराम भाऊ नंदीहळ्ळी यांच्याहस्ते आखाड्याचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष प्रमोद पाटील, अध्यक्ष अजित गोरल, प्रदीप देसाई, भोला पाखरे, राजू पावले, मोहन कुजी, दुदाप्पा बागेवाडी, हणमंत पाटील, सतिश कुगजी, यलुप्पा पाटील, विलास नंदी, तानाजी हलगेकर, पिंटु चौगले, मधु मुचंडी, राजु डोण्याण्णावर, परशराम घाडी, राहुल कुगजी, मधु पाटील, नंदू पाटील, नारायण कंग्राळकर, श्रीधर कानशिडे यांच्यासह कमिटीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

उतम दर्जाचा आखाडा तयार केला आहे. प्रेक्षकांना बसण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचा मल्ल मिर्झा इराण वि. हिंदकेसरी साहिल कोहली पंजाब यांच्यात प्रथम क्रमाकांची कुस्ती होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची लढत डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर विरुद्ध सोनीपत हरियाणाचा मल्ल निरु गुर्जर यांच्यात होणार आहे. तिसऱ्या क्रमांकाची लढत महाराष्ट्रकेसरी पृथ्वीराज पाटील व पंजाब केसरी मुसा पंजाब यांच्यात, चौथ्या क्रमांकाची लढत राहुल सुळ पुणे वि. राघू ठोंबरे कोल्हापूर, पाचव्या क्रमांकाची लढत हितू ठाकूर मथुरा व महाराष्ट्र चॅम्पियन सुबोध पाटील यांच्यात होणार आहे. सहावी कुस्ती बाळू अपराध वि. अनुजकुमार दिल्ली, सातवी कुस्ती शिवा दड्डी वि. उदयकुमार दिल्ली अशा कुस्त्या रंगणार आहेत. नवहिंद कुमार केसरीसाठी प्रथमेश हट्टीकर व अक्षय तांबे शाहुपुरी यांच्यात लढत होणार आहे.  या मैदानात दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, सांगली, कोल्हापूर, पुणे, कर्नाटक परिसरातील मल्लांच्या चटकदार कुस्त्या होणार आहेत.

The post येळ्ळूर येथे महाराष्ट्र कुस्ती मैदानाला प्रारंभ appeared first on News 24 Tass Marathi.

सांबरा येथे २६ एप्रिलला भव्य कुस्ती आखाडा
नामवंत मल्लांचा सहभाग निश्चित

बेळगाव : सांबरा येथे येत्या २६ एप्रिल रोजी भव्य कुस्ती आखाडा भरवण्यात येणार आहे. याबाबत निर्णय कुस्ती कमिटीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेतला असून, आयोजनासाठी सर्व तयारी सुरू झाली आहे.

कुस्ती आखाड्याच्या नियोजनासाठी साई जिम येथे बैठक झाली, जिथे पैलवानांच्या जोड ठरवणे, देणगी जमा करणे, आखाडा भरवण्याचे ठिकाण व इतर आवश्यक तयारीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्र, कर्नाटक तसेच उत्तर भारतातील नामवंत मल्लांना पाचरण करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

यल्लाप्पा हरजी, लक्ष्मण सुळेभावी, महेंद्र गोठे, भरमा चिंगळी, नितीन चिंगळी, कृष्णा जोई, शीतलकुमार तिप्पाण्णाचे, शिवानंद पाटील, भुजंग गिरमल, भुजंग धर्मोजी, मोहन हरजी, शिवाजी मालाई, प्रवीण ताडे, सिद्राई जाधव यांसह कुस्तीगीर संघटनेचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुस्तीप्रेमींमध्ये उत्सुकता वाढत असून, येत्या आठवड्यात होणाऱ्या या आखाड्याला मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

The post सांबरा येथे २६ एप्रिलला भव्य कुस्ती आखाडा appeared first on News 24 Tass Marathi.

मुतगा कुस्ती मैदानात जयदीप ‘अजिंक्य’
बेळगाव / प्रतिनिधी

श्री हनुमान यात्रेनिमित्त मुतगे येथील हनुमान कुस्ती संघटना आणि स्थानिक गावकऱ्यांच्या सहकार्याने दमनी तलावाजवळ आयोजित आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर गंगावेस तालमीतील उदयोन्मुख मल्ल जयदीप पाटीलने इराणच्या आंतरराष्ट्रीय पैलवान इरफानवर जोरदार विजय मिळवला. या स्पर्धेत एकूण ६० हून अधिक कुस्त्या रंगल्या, ज्या काटा-कुस्त्या प्रकारातल्या होत्या आणि प्रेक्षकांनी जोरदार दाद दिली.

मुख्य कुस्ती पॅरिश पंचायत, ग्राम सुधारणा मंडळ आणि देवस्थान समितीच्या हस्ते पार पडली. जयदीप पाटील आणि इरफान यांनी एकमेकांच्या ताकदीची चाचणी करत आक्रमक कुस्ती केली. कुस्तीतील प्रत्येक डाव-प्रतिडावाने प्रेक्षकांचे मन जिंकले. अखेरीस २६ व्या मिनिटाला जयदीपने इरफानवर विजय मिळवला.

दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत सचिन ठोंबरेने पंजाबच्या गोगीसिंगवर विजय मिळवला, तर नेपाळच्या देवा थापाने मनोरंजक कुस्ती केली आणि प्रेक्षकांनी त्याला भरभरून दाद दिली.

तिसऱ्या कुस्तीत दिल्लीतील करणने शिवा दड्डीला ‘कोंदण एकचाक’ डावावर फक्त एका मिनिटात हरवले. याशिवाय पृथ्वीराज (कंग्राळी) वि. सनि कुसाळे, विनायक (येळ्ळूर) वि. आर्यन (कोल्हापूर), महेश (तीर्थकुंडे) वि. तेजस (राशिवडे), हर्ष (कंग्राळी) वि. पंकज (चापगाव) यांच्यातील कुस्त्या बरोबरीत संपल्या.

सातव्या कुस्तीत भूमिपुत्र (मुतगा) यांनी अनिल (चिकोडी) याला पराभूत केले. दहाव्या कुस्तीत दादा कोळेकरने ‘हप्ता’ डावावर आयुष (दिल्ली) याला हरवले.

इतर विजेत्यांमध्ये भरत (मुतगे), श्री घाडी, ध्रुव (मणिकेरी), करण (खादरवाडी), नचिकेत (रणकुंडये), प्रथमेश पावशे, श्रीनंद (निलजी), देवा (येळ्ळूर), समर्थ (हिंडलगा), रिद्धांत (मजगाव), आर्यन (मुचंडी), स्वराज (मुचंडी), पृथ्वीराज (अवचारहट्टी), रोहन (येळ्ळूर), रितेश (धामणे), नागेश (येळ्ळूर), स्वप्निल (सावगाव) यांचा समावेश होता.

पंच म्हणून नवीन पाटील, भावकांना पाटील, हणमंत पाटील, पै. श्रीकांत, विलास पाटील, चेतन बुद्धन्नावर, नितीन चिंगळे, अतुल शिरोळे, सुहास पाटील, भरमा गोमान्नाचे, नितीन बिरादार यांच्याकडून काम पाहिले गेले.

The post मुतगा कुस्ती मैदानात जयदीप ‘अजिंक्य’ appeared first on News 24 Tass Marathi.

आनंदवाडीत रविवारी कुस्ती मैदान ; महिलाही भिडणार
बेळगाव / प्रतिनिधी

मिशन ऑलिम्पिक गेम असोसिएशनतर्फे रविवार दि. ८ महिला दिनानिमित्त आनंदवाडी आखाड्यात महिला कुस्ती मैदान भरविण्यात आले आहे. या मैदानात कर्नाटक व महाराष्ट्रातील नामवंत महिला मल्ल सहभागी होणार असून एकूण ६० हून अधिक कुस्त्या होणार आहेत. महिलांच्या कुस्तीत महाराष्ट्र चॅम्पियन प्रीतम दाभाडे पुणे वि. कर्नाटक चॅम्पियन सुजाता हल्याळ, प्रांजल तुळजाई बेळगाव स्पोर्ट्स हॉस्टेल वि. रिंकु नलवडे पुणे, खुशी खादरवाडी वि. ऋतुजा रावळ शहापूर, भक्ती गावडा मोदेकोप वि. रिया बस्तवाड, शृती खादरवाडी वि. प्रणोती पाटील कोल्हापूर, सुषमा शिंदे खादरवाडी वि. सई किल्लेकर मजगाव, समिधा बिर्जे वडगाव वि. प्रीतम हुले पुणे अशा १५ हून अधिक लढती होणार आहेत.

पुरुषांच्या कुस्तीत प्रथम क्रमांकांची लढत महाराष्ट्र चॅम्पियन बाळू अपराध वि. हरियाणा केसरी हरिषकुमार यांच्यात होणार आहे. द्वितीय कुस्ती कर्नाटक कंठीरेवा कामेश पाटील कंग्राळी वि. आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेता हितेश पाटील (पुणे), तृतीय कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन दिग्विजय जाधव वि. कर्नाटक चॅम्पियन प्रेम जाधव, चौथी कुस्ती पार्थ पाटील कंग्राळी वि. बबलू नरळे सातारा, पाचवी कुस्ती प्रथमेश हट्टीकर कंग्राळी वि. धीरज पाटील (पुणे), सहावी कुस्ती कार्तिक इंगळगी वि. पृथ्वीराज पाटील कंग्राळी यांच्यात रंगणार आहे. पुरुष विभागात आकर्षक कुस्ती श्रेयस हट्टीकर वि गगन अलावाड यांच्यात तर महिलांच्या विभागात प्रभा खादरवाडी वि. कल्याणी अंबोळकर, प्रांजल बिर्जे वि. रिया बेळगाव यांच्यात होतील. आखाड्यातील पहिली कुस्ती साई गावडे मुचंडी वि. सम्राट पाटील बेनकनहळ्ळी, राजवीर पाटील मंडोळी वि. शेखर खादरवाडी यांच्यात होणार आहे. कुस्ती शौकीनांनी याचा लाभघ्यावा, असे संघटनेचे अध्यक्ष अतुल शिरोळे यांनी कळविले आहे.

The post आनंदवाडीत रविवारी कुस्ती मैदान ; महिलाही भिडणार appeared first on News 24 Tass Marathi.