woman's day Archives | News 24 Tass Marathi

कॉसमॉस को-ऑप. बॅंकेतर्फे स्त्री सन्मान सोहळा
बेळगाव : येथील कॉसमॉस को-ऑप. बॅंकेच्या मारुती गल्ली शाखेतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त १२ मार्च रोजी स्त्री सन्मान सोहळा साजरा करण्यात आला. यानिमित्त विशेष उल्लेखनीय योगदानाबद्दल विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव करण्यात आला. व्यवस्थापक यदुनाथ नाईक अध्यक्षस्थानी होते.

कवयित्री प्राचार्या मनिषा नाडगौडा, विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द को-ऑप. सोसायटीच्या सेक्रेटरी पद्मा बाडकर, कर्मचारी अर्चना दरवंदर, बेळगांव अर्बन को-ऑप. सोसायटीच्या नेहा नरगुंदकर, अनिता जकाती, उमा मांडके यांचा यदुनाथ नाईक व रुपाली हवालदार यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.अध्यक्षीय समारोप करताना नाईक यांनी महिला दिनाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमास बॅंकेचे कर्मचारी व हितचिंतक उपस्थित होते.

The post कॉसमॉस को-ऑप. बॅंकेतर्फे स्त्री सन्मान सोहळा appeared first on News 24 Tass Marathi.

स्त्रीशक्तीच्या संघर्षाचा इतिहास पुढील पिढीसाठी प्रेरणादायी – अनिल पाटील
जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त विशेष व्याख्यान आणि महिलांचा सत्कार

बेळगाव / प्रतिनिधी

स्त्रीशिक्षण, स्त्रीसमानता आणि सामाजिक न्यायासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श आजही समाजाला दिशा देणारा आहे. शिक्षण, विज्ञान, समाजसुधारणा आणि नेतृत्वाच्या क्षेत्रात महिलांनी दिलेले योगदान पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे, असे प्रतिपादन समाजसेवक व माजी नगरसेवक अनिल पाटील यांनी केले.

जागतिक महिला दिन आणि सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यान कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. विश्वभारत जनकल्याण सामाजिक संस्था, रत्नअर्जुन फाउंडेशन पुणे, जे.के. फाउंडेशन बेळगाव, दीपज्योती फाउंडेशन बेळगाव, अखिल भारतीय प्रगतिशील एल्गार सामाजिक साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्था, विश्वभारत सेवा समिती संचलित मंथन मराठी साहित्य संघ तसेच बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समिती संचलित मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेज टिळकवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मवीर संभाजी चौक येथील श्री शंभू जत्तीमठ येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल पाटील होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी रोपट्याला पाणी घालून आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. या वेळी महिला सक्षमीकरण, शिक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर शिवाजी मेलगे, प्रतीक धामणेकर, श्रीधर पाटील, एस. एस. पाटील, उदय पाटील, प्रकाश नंदीहळी, प्रा. विशाल करंबळकर, प्रा. निलेश शिंदे, प्रा. आर. एम. मोहिते, प्रा. मेघा खन्नूकर, भाग्यश्री पाटील, बाळकृष्ण धामणेकर, विजय देसाई, डॉ. गजानन वरपे, मारुती बेडीगेर, अमोल सुतार, विशाल पाटील, यलाप्पा पाटील, सागर गुंजीकर, सुधीर लोहार, प्रा. एन. जी. पाटील, प्रा. महादेव नार्वेकर, समीर बाळेकुंद्री, एन. एस. हवालदार आणि एन. डी. गिरी आदी मान्यवर उपस्थित होते.

विविध क्षेत्रांतील महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिन आणि सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला. समाजसेविका निर्मला वीरभद्र उचगावकर, अखिल भारतीय जिल्हा महिला परिषद कर्नाटक प्रदेशाध्यक्ष माधुरी मधुकर नेवगिरी, सुमती हरीश पुजारी, वर्षा ज्योतीनाथ चौगुले, विद्या अनिल गिरी, साधना कमलाकर पाटील, साधना शिवाजी मेलगे, प्रियंका शंकर जेलुगडेकर आणि लक्ष्मी बाळकृष्ण धामणेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

अनिल पाटील पुढे म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांनी समाजातील तीव्र विरोधाला तोंड देत मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यांच्या क्रांतिकारी कार्यामुळे आज स्त्रिया शिक्षण, प्रशासन, विज्ञान, साहित्य आणि विविध क्षेत्रांत मोठी प्रगती करत आहेत. धैर्य, जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर जगभरातील अनेक महिलांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या संघर्षमय प्रवासातून समाजाला समानता, स्वाभिमान आणि प्रगतीचा मार्ग मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिलांनी शिक्षण, स्वावलंबन आणि सामाजिक जागृतीच्या माध्यमातून समाजपरिवर्तनात सक्रिय भूमिका बजावावी, असेही त्यांनी आवाहन केले.

कार्यक्रमाचे स्वागत प्रा. मयुर नागेनहट्टी यांनी केले, तर प्रास्ताविक प्रा. शशिकांत धामणेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. निलेश शिंदे यांनी केले आणि आभार अनिल गिरी यांनी मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, महिला, युवक तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post स्त्रीशक्तीच्या संघर्षाचा इतिहास पुढील पिढीसाठी प्रेरणादायी – अनिल पाटील appeared first on News 24 Tass Marathi.

रोटरी दर्पणतर्फे आर्ष विद्या आश्रमात महिला दिन साजरा
बेळगाव : टिळकवाडी येथील आर्ष विद्या आश्रमात रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण व पॅटसन मल्टिपर्पज सौहार्द सहकारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिन साध्या आणि अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत आश्रमातील मुलींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान आश्रमातील ४६ मुलींना किराणा साहित्य, दैनंदिन वापराच्या वस्तू तसेच सॅनिटरी पॅड्सचे वितरण करण्यात आले. तसेच मुलींच्या कल्याणासाठी आर्थिक मदतही देण्यात आली. या वेळी मुलींशी संवाद साधण्यात आला आणि महिला दिनानिमित्त केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला.

हा कार्यक्रम क्लबच्या अध्यक्षा रोटेरियन ॲड. विजयलक्ष्मी मन्निकेरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी त्यांनी आश्रमातील मुलींसोबत महिला दिन साजरा करणे आनंददायी असल्याचे सांगत त्यांच्या प्रोत्साहनासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे असल्याचे नमूद केले. क्लबच्या सचिव कावेरी करूर यांनीही सहकार्य केले.

कार्यक्रमाचे संयोजन आशा पाटील यांनी केले. यावेळी खजिनदार सुरेखा मुम्मिगट्टी, सविता वेसणे, आणि रोटेरियन डॉ. श्रीदेवी रेवण्णवर उपस्थित होत्या. पॅटसन मल्टिपर्पज सौहार्द सहकारी संघाचे अध्यक्ष श्री. अनिल पाटील आणि पॅटसन समूहाच्या कर्मचाऱ्यांनीही कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य केले. महिला दिन साजरा करण्याची संधी दिल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे आर्ष विद्या आश्रमाचे आभार मानण्यात आले.

The post रोटरी दर्पणतर्फे आर्ष विद्या आश्रमात महिला दिन साजरा appeared first on News 24 Tass Marathi.

खुल्या कवी संमेलनात मराठी भाषा आणि स्त्रीमनाचा भावस्पर्शी जागर
मराठी भाषा गौरव दिन व जागतिक महिला दिनानिमित्त शब्दगंध कवी मंडळ संघाचा उपक्रम

बेळगाव : मराठी भाषा गौरव दिन आणि जागतिक महिला दिनाच्या दुहेरी औचित्य साधत शब्दगंध कवी मंडळ संघातर्फे आयोजित खुले कवी संमेलन उत्स्फूर्त प्रतिसादात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडले. येथील मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहात भरलेल्या या काव्यमहोत्सवात मराठी भाषेचा गौरव आणि स्त्रीमनातील विविध भावछटा कवींनी आपल्या आशयघन कवितांमधून प्रभावीपणे व्यक्त केल्या. त्यामुळे सभागृहात मराठीच्या गोडीचा आणि स्त्रीसंवेदनांच्या सामर्थ्याचा एक अनोखा जागर अनुभवायला मिळाला.

कुसुमाग्रज आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना बी. जी. पाटील, प्रा. अशोक आलगोंडी, सुधाकर गावडे, बसवंत शहापूरकर, उर्मिला शहा, रेखा गद्रे, श्री हसबे

कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी विद्यानिकेतनचे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी सुधाकर गावडे यांनी कुसुमाग्रजांची प्रेरणादायी “प्रेम कर” ही कविता सादर केली, तर रेखा गद्रे यांनी सावित्रीबाईंची समाजजागृतीची जाज्वल्य कविता “याला मानव म्हणावे का?” प्रभावी स्वरात सादर करून उपस्थितांना विचारप्रवृत्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शब्दगंध कवी मंडळ संघाचे उपाध्यक्ष बसवंत शहापूरकर यांनी केले. त्यांनी मराठी भाषेची समृद्ध परंपरा आणि स्त्रीशक्तीच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करत या कवी संमेलनाच्या उद्देशाची मांडणी केली.

या कवी संमेलनात अनेक कवींनी आपल्या हृदयस्पर्शी कविता सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. मराठी भाषेप्रती असलेले प्रेम व्यक्त करत गुरुनाथ किरमटे यांच्या “अनन्य तुझ्या उपकारांचे फेडू कसे मी पांग, गे मातृभाषे मराठी फक्त एवढे सांग…” या ओळींनी सभागृह भारावून गेले.

स्त्रीस्वातंत्र्याचा विचार मांडताना तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देत सुधाकर गावडे यांनी “तीला हवे ते तीने करावे त्याला हवे ते त्याने, मनाप्रमाणे स्वैर आपल्या वागावे ज्याने त्याने…” अशा अर्थबोध ओळी सादर केल्या.

प्रा. महादेव खोत यांनी “बेळगावात मराठीला मान कुठे आहे हो? अन् सांगा मराठी मर्द मावळा बाणा कुठे आहे हो?” असे म्हणत बेळगावच्या सांस्कृतिक वास्तवावर भाष्य करत त्यांनी मराठी अस्मितेचा सवाल उपस्थित केला. त्यांच्या प्रभावी सादरीकरणाने सभागृहात चिंतनशील वातावरण निर्माण झाले. कवितेतील ओळींनी उपस्थितांच्या मनाला चटका लावला.

स्त्रीच्या वेदना आणि सामाजिक वास्तवाचे चित्रण करत रोशनी हुंद्रे यांच्या “गोंदण” कवितेतील “बाईनेच गोंदवून घ्याव का गोंदन, गोंदन तरी असत कुठं तिच्या मालकीचे…तेही देत असत असह्य वेदना.” ओळींनी श्रोत्यांच्या मनाला स्पर्श केला.

तर उर्मिला शहा यांनी “बाई, तुझं जगणंच मुळी कठपुतळीचं. दोरी तीच रहाते, फक्त नाचवण्याचे प्रकार वेगळे असतात.” असे म्हणत स्त्रीजीवनाचे मार्मिक चित्रण केले.

“धन्य त्यांची साधना,धन्य ते सारे साधक, धन्य माझी माय मराठीआणि धन्य तिचे उपासक.” मराठी भाषेचा गौरव व्यक्त करत आनंद मेणशी यांनी सादर केलेल्या या ओळींनी उपस्थितांना अभिमानाची जाणीव करून दिली.

समाजातील बदलत्या भाषिक प्रवाहांवर भाष्य करत जोतिबा नागवडेकर यांनी हलक्या-फुलक्या शैलीत म्हणाले – “इकडे तिकडे हॅलो हाय, जाताना म्हणतात बाय बाय,हे ऐकून पाहून तंग झालो, बिन तालाचा मृदंग झालो.”

यांच्यासह या कवी संमेलनात किरण पाटील यांनी “स्त्री जन्मा तुझी कहाणी” या कवितेतून स्त्रीजीवनातील संघर्ष आणि जिद्दीचे चित्रण केले. सौ. स्नेहल बर्डे यांनी “स्त्री तुझी रूपे” या कवितेतून स्त्रीच्या विविध रूपांचा गौरव केला. प्रा संजय बंड यांनी “लळा माय मराठीचा” या कवितेतून मायमराठीप्रती असलेले प्रेम व्यक्त केले. प्रा. शुभदा प्रभू खानोलकर यांनी “सावित्रींच्या लेकी” हा पोवाडा सादर करून क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या विचारांची परंपरा पुढे नेणाऱ्या स्त्रीशक्तीचा गौरव केला. प्रा. मनीषा नाडगौडा यांनी “रंग स्त्रीत्वाचा” या कवितेतून स्त्रीत्वाच्या विविध छटा उलगडल्या.

अक्षता यळ्ळूरकर यांनी “दुरावलेली छकुली” या कवितेतून सामाजिक वास्तव अधोरेखित केले. डॉ. प्रेमा मेणशी यांनी “प्रिय मराठी” या कवितेतून मराठी भाषेप्रती असलेले प्रेम व्यक्त केले, तर सौ. नेहा जोशी यांनी “महिला दिन” या कवितेतून स्त्रीशक्तीचा गौरव केला. श्री. निलेश शिंदे यांनी “तीच ती स्त्री संघर्षाची रागिणी” या कवितेतून स्त्रीच्या संघर्षमय प्रवासाचे प्रभावी चित्रण केले. सीमा कणबरकर यांनी “शेतकऱ्यांची बायको” या कवितेतून ग्रामीण स्त्रीचे कष्टमय जीवन उलगडले. सौ. रेखा गद्रे यांनी “महिला दिन” या कवितेतून स्त्रीच्या स्वाभिमानाचा संदेश दिला.

परशुराम खेमणे यांनी “शब्दांनो तुम्ही माणसांना जिवंत ठेवा” या कवितेतून शब्दांच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली. व्ही. एस. वाळवेकर यांनी “द्रौपदीचे वस्त्र” या कवितेतून स्त्रीअवमानाच्या प्रश्नावर तीव्र भाष्य केले. बसवंत शहापूरकर यांनी “झोप आता बाई” या कवितेतून स्त्रीजीवनातील वेदना व्यक्त केल्या. कु. अनुजा लोहार यांनी “जगात भारी माझी मराठी” या कवितेतून मराठी भाषेचा अभिमान व्यक्त केला.

अस्मिता देशपांडे यांनी “मलाही अभिमान आहे मराठी असल्याचा” या कवितेतून मराठी अस्मितेचा अभिमान व्यक्त केला. श्री. मधु पाटील यांनी “मायबोली” या कवितेतून मातृभाषेचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. मयुरी जाधव यांनी “स्त्री सामर्थाची कहाणी” या कवितेतून स्त्रीच्या जिद्दीचा आणि सामर्थ्याचा गौरव केला. कार्यक्रमाच्या अखेरीस प्रा. अशोक आलगोंडी यांनी सादर केलेल्या “बेळगाव अभिमान गीत” या कवितेने कार्यक्रमाचा समारोप अभिमानाच्या सुरावटीत झाला.

कवींच्या ओजस्वी सादरीकरणाला उपस्थित रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अस्मिता देशपांडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन परशुराम खेमणे यांनी केले.

मराठी भाषेच्या गौरवाची आणि स्त्रीशक्तीच्या संवेदनशील जाणिवांची सुंदर सांगड घालणारे हे खुले कवी संमेलन साहित्यरसिकांसाठी अविस्मरणीय ठरले.

The post खुल्या कवी संमेलनात मराठी भाषा आणि स्त्रीमनाचा भावस्पर्शी जागर appeared first on News 24 Tass Marathi.

विवेकानंद सौहार्द सोसायटीतर्फे महिला दिन साजरा
भगिनी निवेदिता ठेव योजनेचा प्रारंभ

बेळगाव : येथील सहकार क्षेत्रातील ग्राहकांच्या विश्वासास अल्पावधीत पात्र ठरलेल्या विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द को-ऑप. सोसायटीतर्फे सोमवारी महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सोसायटीतर्फे केवळ महिलांसाठी भगिनी निवेदिता ठेव योजनेचा शुभारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालिका नीता कुलकर्णी होत्या.

कर्मचारी सौ.अर्चना दरवंदर यांनी प्रास्ताविक व सेक्रेटरी पद्मा बाडकर यांनी स्वागत केले. यानंतर प्रज्ञा शानभाग, रजनी गुर्जर, सुमन नाडगौडा, धनुजा पाटील, रुपाली हवालदार यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.भगिनी निवेदिता ठेव योजना ही महिलांसाठी लाभदायक आहे. या ठेवींतर्गत किमान दहा हजार वा त्याहून अधिक रक्कम ३० महिन्यांच्या कालावधीसाठी ठेवता येते, असे यावेळी सांगण्यात आले.

सोनम मंगनाकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास संचालिका, सभासद महिला व हितचिंतक उपस्थित होत्या.

The post विवेकानंद सौहार्द सोसायटीतर्फे महिला दिन साजरा appeared first on News 24 Tass Marathi.

‘जागतिक महिला दिनी’ स्मशानभूमी स्वच्छतेचा उपक्रम !
‘शक्ती सामर्थ्य फाउंडेशन’चा अनोखा सामाजिक संदेश

बेळगाव / प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर समाजासाठी वेगळा आदर्श घालून देत बेळगावमधील ‘शक्ती सामर्थ्य फाउंडेशन’च्या महिलांनी स्मशानभूमी स्वच्छतेचा अनोखा उपक्रम राबवला. आज रविवार दि. ८ मार्च रोजी सकाळी सदाशिवनगर येथील गणाचारी स्मशानभूमी परिसर स्वच्छ करून त्यांनी सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचा संदेश दिला.

महिला दिन साजरा करण्याबरोबरच समाजात अर्थपूर्ण योगदान द्यावे या उद्देशाने फाउंडेशनच्या सदस्यांनी सदाशिवनगर तिसरा क्रॉस येथील स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम हाती घेतली. यावेळी परिसरातील वाढलेले तण काढणे तसेच साचलेला कचरा साफ करून स्मशानभूमी परिसर स्वच्छ करण्यात आला.

या उपक्रमात फाउंडेशनच्या संस्थापक संचालिका लता बी. अनसकर, संचालिका श्वेता लक्ष्मण महेंद्रकर, सगाई मेरी फ्रान्सिस यांच्यासह कविता के. मुदलियार, जॅसिंथा मुदलियार, नितीन के. मुदलियार, स्वस्तिक मेदार, हृतिक मेदार, किरण कोरडा आणि शोभा घोडके यांनी सक्रिय सहभाग घेतला.

स्वच्छता मोहिमेदरम्यान वॉर्ड क्रमांक २५ चे पर्यवेक्षक संजू मोरे आणि सज्जन सुळेभावी यांनी कचरा विल्हेवाट लावण्यासाठी सहकार्य केले. या निःस्वार्थ सामाजिक उपक्रमाबद्दल स्थानिक नागरिकांकडून फाउंडेशनच्या सदस्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

The post ‘जागतिक महिला दिनी’ स्मशानभूमी स्वच्छतेचा उपक्रम ! appeared first on News 24 Tass Marathi.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बेळगावात उद्या कवी संमेलन
बेळगाव : शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने मराठी भाषा गौरव दिवस आणि जागतिक महिला दिनानिमित्त कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार दिनांक ७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता मराठी विद्यानिकेतन, बेळगाव येथे होणार आहे.

या कवी संमेलनात मराठी भाषा तसेच महिला विषयावर आधारित कविता सादर केल्या जाणार आहेत. परिसरातील कवींनी या संमेलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन शब्दगंध कवी मंडळ संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून सचिव श्री. सुधाकर गावडे यांनी सर्व कवींना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

The post मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बेळगावात उद्या कवी संमेलन appeared first on News 24 Tass Marathi.

विजयपूर भावसार समाजाच्यावतीने महिला दिन कार्यक्रम
उपनयन व गुरु दिक्षा कार्यक्रमाचेही आयोजन

विजयपूर / दिपक शिंत्रे

विजयपूर भावसार क्षत्रिय समाज महिला मंडळाच्या वतीने भावसार समाज भवन येथे दि. ५ एप्रिल २०२५ शनिवार रोजी सायंकाळी ४ वा. आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. समाजातील महिला,मुलींना आपल्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी एक चांगले व्यासपीठ असून ज्यांना आपली कला सादर करायचे आहे त्यांनी आपल्या नावाची नोंद अध्यक्षा सौ. पद्मा इजंतकर यांच्या कडे करावीत असे कळविण्यात आले आहे. याच कार्यक्रमात श्री हिंगुलांबिका देवीस अर्पण केलेल्या साड्या महिलांना लकी ड्रॉ द्वारे वाटप करण्यात येणार आहेत.

दि. १० एप्रिल रोजी उपनयन व गुरु दिक्षा कार्यक्रम :

त्याचप्रमाणे भावसार क्षत्रिय समाजाच्या वतीने गुरुवर्य ह.भ.प प्रभाकर बुवा बोधले महाराज आणि ह.भ.प.यशवंत बोधले महाराज यांच्या उपस्थितीत समाज मधील वय वर्षे 5 च्या पुढील मुलांना उपनयन व गुरु दिक्षा कार्यक्रम गुरुवार दि. १० मार्च रोजी सकाळी ठीक ९.३० वाजता आनंदनगर येथील भावसार सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आला आहे.

आपल्या समाजातील परंपरे प्रमाणे आपल्याला जे १६ संस्कार सांगितले आहेत त्यामधील हे दोन मुख्य संस्कार आहेत. जीवनामध्ये सांसारिक जीवन व परमार्थिक जीवन जगण्यासाठी हे संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत तरी समाजातील सर्व बांधवानी याचा लाभ घ्यावा अशी विनंती अध्यक्ष राजेश देवगिरी यांनी केली आहे.  त्यादिवशी सकाळी ८ ते ९ वाजेपर्यंत पूजा ठीक ९. ३० वाजता उपनयनाचा (मुंजीचा) कार्यक्रम दुपारी १.३० वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

उपनयन इच्छुकांनी आपले नावे दि. २ एप्रिल ते दि. ९ एप्रिल पर्यंत आपली नोंदणी सराफ बाजार कार्यालय येथे सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत येऊन नोंद करावीत. कन्हैया पेठकर ८८६११८९२८३ , उमेश देवगिरी ९४८०४३१५३५ यांच्याशी संपर्क साधावा, तरी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन अध्यक्ष राजेश देवगिरी आणि पंचमंडळ सदस्यांचा वतीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात केले आहे.

The post विजयपूर भावसार समाजाच्यावतीने महिला दिन कार्यक्रम appeared first on News 24 Tass Marathi.

महिला सक्षमीकरणाला सरकार प्राधान्य देत आहे ; मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर
बेळगाव / प्रतिनिधी

महिलांनी सक्षम होऊन देशाचे नेतृत्व केले पाहिजे. सिद्धरामय्या यांच्या सरकार पुढे स्त्री-पुरुष समान आहेत.विद्यमान सरकार बसवण्णा यांच्या तत्त्वानुसार चालत आहे. राज्यातील प्रत्येक अंगणवाडीला शासनाकडून उच्च दर्जा दिला जाईल असे प्रतिपादन महिला व बालविकास आणि दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक सक्षमीकरण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज सोमवारी (२४ मार्च) येथील सीपीईडी मैदानावर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पंचायत विभागाच्या महिला विकास विभागाच्या वतीने विविध साहित्य वितरण, दिव्यांगांना विविध साधने व उपकरणांचे वाटप, विभागीय स्तरावर महिला शक्ती गटांच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री स्टॉलच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी पुढे बोलताना मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या, राज्यातील हा एक अनोखा आणि नाविन्यपूर्ण कार्यक्रम आहे. जिल्ह्यातील गरोदर महिलांना विभागामार्फत वेळोवेळी पोषण आहार व वैद्यकीय उपचार देण्यात येत आहेत. पाच हमी योजनांपैकी एक असलेल्या शक्ती योजनेतून महिलांना मोफत बस सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.गृहज्योती अंतर्गत प्रत्येक घरात मोफत वीज दिली जात आहे. गर्भवती महिलांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी सिमंता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या जिल्हा समितीच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे कार्यक्रम यशस्वी झाला आहे. येत्या काही दिवसांत प्रत्येक जिल्ह्यात सीमावर्ती कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश शासन जारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले मुलाच्या नावाने वृक्षारोपण कार्यक्रम, भाग्यलक्ष्मी योजनेच्या सुकन्या समृद्धी, उत्कृष्ट अंगणवाडी सेविका व सर्वोत्कृष्ट स्त्री शक्ती संघाच्या ५ लाभार्थ्यांना पास बुक वाटप, सत्कार आदी उपक्रम यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमात जनजागृती रांगोळी प्रतिमा प्रदर्शित करण्यात आल्या. विविध महिला शक्ती गटांतर्फे स्टॉल व वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.यावेळी विधान परिषद सदस्य चन्नराज हत्तीहोळी, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, बेळगाव विभाग अधिकारी श्रावण नायक, महिला व बालविकास विभागाचे उपसंचालक आर. नागराज, अपंग कल्याण अधिकारी नामदेव बिलकारा, विविध ग्रामपंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व महिला सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध भागातील हजारो महिला सहभागी झाल्या होत्या.

दिव्यांगांना उपकरणे, ब्रेल, लॅपटॉप, ब्रेल घड्याळ, होळी मशीन व स्कूटरचे वाटप करण्यात आले. त्यानंतर दिव्यांग ज्येष्ठ नागरिक सक्षमीकरण विभागाच्या वतीने शंभर दिव्यांगांना प्रतिकात्मक दुचाकींचे वाटप करण्यात आले. यानंतर कलाकृती, खादी कापड, गृहोपयोगी वस्तू विक्री स्टॉल आणि विविध श्री शक्ती संघांच्या प्रदर्शनी स्टॉलचे उद्घाटन केले.

The post महिला सक्षमीकरणाला सरकार प्राधान्य देत आहे ; मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर appeared first on News 24 Tass Marathi.

मैत्रेयी कलामंच वर्धापन दिनानिमित्त महिला दिन साजरा
बेळगाव : मैत्रेयी कलामंचचा पाचव्या वर्धापन दिनी महिला विद्यालय हायस्कूल सभागृहात महिला दिन साजरा करण्यात आला.प्रमुख पाहुण्या म्हणून जेष्ठ लेखिका, दिग्दर्शिका नीता कुलकर्णी या उपस्थित होत्या.या कार्यक्रमासाठी अपंग जोडीदाराची स्वखुशीने निवड करुन जिद्दीने संसार करणारी कर्तृत्ववान महिला मनाली कुगजी तसेच धुणीभांडी, काबाडकष्ट करून आपल्या मुलांना स्वावलंबी बनविणारी सामर्थ्यशील महिला इंदुबाई कडु यांना सन्मानार्थ बोलाविण्यात आले होते.

या महिलांना सन्मानित करण्यासाठी सौ.स्मिता किल्लेकर यांनी आपली आई कै. कमल माळवी यांच्या स्मरणार्थ आर्थिक स्वरूपात मदत केली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा.मनिषा नाडगौडा यांनी सर्वांचे स्वागत करुन स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविक सौ. अपर्णा पाटील यांनी केले. प्रमुख पाहु्ण्यांचा परिचय सौ. अक्षता पिळणकर यांनी करून दिला. सत्कारमूर्ती सौ. मनाली कुगजी यांचा परिचय प्रतिभा सडेकर तर दुसऱ्या सत्कारमूर्ती इंदुबाई कडू यांचा परिचय सौ. मनिषा मोरे यांनी करून दिला. प्रमुख पाहुण्या मा. नीता कुलकर्णी यांचा सन्मान सौ.रोशनी हुंद्रे यांनी केला. दोन्ही सत्कारमूर्तींचा सन्मान सौ. स्मिता किल्लेकर यांच्याहस्ते करण्यात आला.

प्रमुख पाहुण्या नीता कुलकर्णी यांनी मार्गदर्शकपर भाषण केले.या कार्यक्रमात मैत्रेयी कलामंच मंडळाच्या मैत्रिणींच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. प्रा मनिषा नाडगौडा, सौ. अक्षता यळ्ळूरकर, सौ.स्नेहल बर्डे, सौ. अक्षता पिळणकर, सौ.रोशनी हुंद्रे, ईशानी जाधव यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. मैत्रेयी कलामंचच्या सर्व महिलांचा सन्मान नीता कुलकर्णी यांच्याहस्ते भेटवस्तू देऊन करण्यात आला.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मेघा भंडारी यांनी केले. शेवटी सौ.अस्मिता आळतेकर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

The post मैत्रेयी कलामंच वर्धापन दिनानिमित्त महिला दिन साजरा appeared first on News 24 Tass Marathi.