winter Archives | News 24 Tass Marathi

बेळगावचा पारा ९.८ अंशांवर ; शहरात थंडीचा कडका वाढला
हुडहुडी भरल्याने नागरिक गारठले : गरम कपड्यांसह शेकोट्यांचा आधार

बेळगाव : शहरात नोव्हेंबर महिन्यातच थंडीने जोर धरला असून किमान तापमानात मोठी घट नोंदवली जात आहे. शनिवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी पहाटे शहराचे किमान तापमान ९.८ अंश सेल्सिअसवर घसरले. विशेष म्हणजे, एका दिवसात तापमानात तब्बल ६.९ अंशांची घट झाल्याने शहरवासीयांना हुडहुडी भरली आहे. वाढत्या थंडीचा परिणाम पहाटेच्या जनजीवनावरही दिसू लागला आहे.

यंदा ऑक्टोबरमधील उष्णतेनंतर नोव्हेंबरमध्येच थंडीचा प्रभाव वाढला आहे. सर्वसाधारणपणे डिसेंबरमध्ये थंडीचा कडाका अधिक जाणवतो; मात्र यंदा नोव्हेंबरच्या उत्तरार्धातच तापमानाचा पारा एक अंकी स्तरावर पोहोचला आहे. यापूर्वी १८ नोव्हेंबर रोजी बेळगावात ७.७ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली होती.

शहरात सायंकाळी सहा वाजल्यापासूनच हवेत गारवा जाणवू लागतो. पहाटेच्या वेळी थंडी अधिक तीव्र होत असल्याने नियमित फिरायला जाणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली आहे. थंडीपासून बचावासाठी नागरिकांनी स्वेटर, जॅकेट आणि इतर उबदार कपड्यांचा वापर सुरू केला आहे. उपनगरांसह ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून नागरिक ऊब घेत असल्याचे चित्र दिसत आहे.

थंडीचा परिणाम बाजारपेठेतील व्यवहारांवरही जाणवत आहे. गरम कपड्यांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची वर्दळ वाढली असून चहा आणि गरम खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरही गर्दी होत आहे. पहाटेच्या वेळी रस्त्यांवर वाहनांची वर्दळ तुलनेने कमी दिसत असून वाहनचालकांनाही थंडी आणि धुक्यामुळे सावधगिरी बाळगावी लागत आहे.

दरम्यान, बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला आणि ताप यांसारख्या आजारांचा त्रास वाढत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. नोव्हेंबरमध्येच थंडीने वाढवलेला हा गारठा पाहता आगामी दिवसांत बेळगावकरांना आणखी कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

The post बेळगावचा पारा ९.८ अंशांवर ; शहरात थंडीचा कडका वाढला appeared first on News 24 Tass Marathi.