winter assembly session Archives | News 24 Tass Marathi

विरोध झुगारून ‘हेट स्पीच’ विधेयक मंजूर
विधानसभा आणि विधानपरिषदेत सत्ताधारी – विरोधकांत जोरदार खडाजंगी

बेळगाव / प्रतिनिधी

प्रचंड गोंधळ आणि विरोधकांचा तीव्र विरोध झुगारून कर्नाटक सरकारने द्वेष भाषण व द्वेषपूर्ण गुन्हे प्रतिबंधक (हेट स्पीच) विधेयक गुरुवारी विधानसभेत मंजूर केले. यानंतर विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी संताप व्यक्त करत विधेयकाची प्रत फाडली. या विधेयकावरून विधान परिषदेतही सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली.

विरोधी पक्षांनी या विधेयकावर टीका करत, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असून काँग्रेसकडून लादलेली ‘दुसरी आणीबाणी’ आहे, असा आरोप केला. दोन्ही सभागृहांत विरोधकांनी तीव्र घोषणाबाजी करत सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शविला.

विधानसभेत चर्चेदरम्यान गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी विधेयकाचे समर्थन केले. या कायद्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था मजबूत होईल, प्रक्षोभक भाषणांमुळे होणारे तणाव आणि जिल्हा बंदीसारख्या परिस्थितींना आळा बसेल, असे त्यांनी स्पष्ट केले. एखाद्या समाज, व्यक्ती किंवा संस्थेला जाणीवपूर्वक लक्ष्य करणाऱ्या भाषणांवर नियंत्रण आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र विरोधकांनी या विधेयकामुळे प्रसारमाध्यमे, पत्रकार, व्यंगचित्रकार आणि टीकाकारांवर कारवाईची टांगती तलवार राहील, असा इशारा दिला. पोलिसांना अमर्याद अधिकार दिल्याने कायद्याचा सूडबुद्धीने गैरवापर होण्याची शक्यता असल्याचा आरोपही करण्यात आला.

चर्चेदरम्यान नगरविकास मंत्री बैरती सुरेश यांनी किनारपट्टी भागातील आमदारांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे भाजप आमदार संतप्त झाले. यावरून सभागृहात मोठा गोंधळ उडाला. विधानसभा अध्यक्ष यू. टी. खादर यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले; मात्र परिस्थिती न सुधारल्याने अखेर संख्याबळाच्या जोरावर विधेयक मंजूर झाल्याची घोषणा करण्यात आली.

दरम्यान, विधान परिषदेतही या विधेयकावर तीव्र वाद झाला. भाजप सदस्य सी. टी. रवी यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांच्या वक्तव्यावरून सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतल्याने सभागृहात कोलाहल झाला. सभापती बसवराज होरट्टी यांनी समज दिल्यानंतर सी. टी. रवी यांनी दिलगिरी व्यक्त केली. चर्चेदरम्यान काही काळ मुख्यमंत्री सिद्धरामय्याही सभागृहात उपस्थित होते.

The post विरोध झुगारून ‘हेट स्पीच’ विधेयक मंजूर appeared first on News 24 Tass Marathi.

दुर्गम भागातील नागरिकांसाठी दिलासा
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याहस्ते ‘आरोग्य संचारी’ योजनेचा शुभारंभ

बेळगाव / प्रतिनिधी

राज्यातील डोंगरदऱ्यातील व रस्त्यांअभावी दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना थेट आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘आरोग्य संचारी’ या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते करण्यात आला. बेळगाव येथील सुवर्णविधानसौध परिसरात फिरत्या आरोग्य पथकांच्या वाहनांना हिरवा झेंडा दाखवून या योजनेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

या योजनेअंतर्गत एकूण ८१ फिरती आरोग्य वाहने राज्यभर सेवा देणार असून , त्यापैकी उत्तर कर्नाटकासाठी ४१ तर दक्षिण कर्नाटकासाठी ४० वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या माध्यमातून आतापर्यंत आरोग्य सेवांपासून वंचित राहिलेल्या नागरिकांपर्यंत उपचार पोहोचवण्याचा सरकारचा मानस आहे.

कार्यक्रमात आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी प्रास्ताविक करताना, दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांना तात्काळ आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, यासाठीच ही योजना आखण्यात आल्याचे स्पष्ट केले.

यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, “आजपर्यंत ज्यांना आरोग्य सेवा मिळू शकली नाही, अशा प्रत्येक घटकापर्यंत सरकार पोहोचणार आहे. आरोग्य संचारी योजना ही सर्वसामान्यांच्या हिताची योजना असून तिचा लाभ नागरिकांनी घ्यावा.”

गरीब, वनवासी आणि डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांना वेळेवर उपचार मिळावेत आणि राज्यातील प्रत्येक व्यक्ती निरोगी राहावी, हेच सरकारचे मुख्य ध्येय असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री यांनी केला.

The post दुर्गम भागातील नागरिकांसाठी दिलासा appeared first on News 24 Tass Marathi.

राजकीय स्वार्थासाठी कन्नड – मराठी वादाचे विष पेरू नका
विधान परिषद सदस्य नागराज यादव

बेळगाव / प्रतिनिधी

राजकीय स्वार्थासाठी कन्नड – मराठी भाषिक वाद निर्माण करू नये. सरकारने कित्तूर कर्नाटक आणि कल्याण कर्नाटकच्या विकासाला प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट मत विधान परिषद सदस्य नागराज यादव यांनी व्यक्त केले.

बुधवारी विधान परिषदेच्या सभागृहात बोलताना त्यांनी उत्तर कर्नाटकच्या विकासाशी संबंधित विविध मुद्दे मांडले. शिक्षण, उद्योग आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये भरीव गुंतवणूक होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

बेळगावचा विकास बेंगळुरूच्या धर्तीवर व्हावा, जेणेकरून मोठ्या उद्योगपतींची गुंतवणूक या भागात येईल, अशी मागणी त्यांनी केली. यासोबतच सरकारी रुग्णालयांचा दर्जा सुधारणे, रिंग रोडची निर्मिती, नवीन विद्यापीठ सुरू करणे, आलमट्टी धरणाची उंची वाढवणे आणि केपीएस शाळांची संख्या वाढवणे या मुद्द्यांवर त्यांनी भर दिला.

कर्नाटक राज्य देशाला मोठ्या प्रमाणावर जीएसटी देत असल्याने, राज्यातील विकासकामे आणि राष्ट्रीय महामार्गांची कामे वेगाने पूर्ण केली पाहिजेत, असेही त्यांनी नमूद केले. शिक्षण क्षेत्राच्या विस्तारासाठी सरकारी क्षेत्रासोबत खासगी संस्थांनाही प्रोत्साहन द्यावे, असे ते म्हणाले.

बेळगावमधील कामगारांच्या समस्या, स्मार्ट सिटीची प्रलंबित कामे आणि पिण्याच्या पाण्याची योजना लवकर पूर्ण व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. कर्नाटकच्या एकत्रीकरणासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत स्वतंत्र राज्याची मागणी करणे चुकीचे आहे. केवळ राजकारणासाठी भाषिक वादाला खतपाणी न घालता सर्वसमावेशक विकासावर लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

The post राजकीय स्वार्थासाठी कन्नड – मराठी वादाचे विष पेरू नका appeared first on News 24 Tass Marathi.

सशक्त राष्ट्रासाठी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती महत्त्वाची
शालेय शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावमध्ये बुधवारी आयोजित प्रतिभा शोध परीक्षा-२०२५ कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री मधू बंगारप्पा यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर दिला. मंत्री म्हणाले, “विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट शिक्षण मिळवून देशासाठी योगदान द्यावे. प्रतिभा शोध परीक्षा केवळ जिल्ह्यापुरती मर्यादित राहणार नाही, तर राज्य पातळीवरही आयोजित केली जाईल, जेणेकरून सर्व सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना समान संधी मिळेल.”

या उपक्रमाचे आयोजन जिल्हा पंचायत, शालेय शिक्षण विभाग, बेळगाव आणि चिक्कोडी यांनी संयुक्त विद्यमाने सुवर्णसौधच्या सेंट्रल हॉलमध्ये केले.

आमदार एन. रविकुमार यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी असे कार्यक्रम उपयुक्त ठरतात असे सांगितले. तसेच बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास करून पालकांचा अभिमान वाटेल अशी कामगिरी करावी, असे आवाहन केले.

शिक्षण विभागाच्या उपसंचालिका लीलावती हिरेमठ यांनी सांगितले की, ५२ हजार विद्यार्थ्यांपैकी १२२ विद्यार्थ्यांनी टॅलेंट सर्च चाचणीत उच्च गुण मिळवले आहेत. या चाचणीद्वारे बेळगाव जिल्ह्यातील सरकारी शाळांमध्ये गुणात्मक शिक्षण आणि विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण सुनिश्चित केले जात आहे.

कार्यक्रमात चिक्कोडी आणि बेळगाव जिल्ह्यातील उच्च गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी चिक्कोडी सदलगा विधानसभा मतदार गणेश हुक्केरी, बैलहोंगलचे आमदार, कर्नाटक सरकार वित्तीय संस्थेचे अध्यक्ष महांतेश कौजलगी, रमेश बाबू, तसेच शैक्षणिक अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला.

The post सशक्त राष्ट्रासाठी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती महत्त्वाची appeared first on News 24 Tass Marathi.

अंगणवाडी केंद्रांसाठी स्वतंत्र इमारती उभारण्याचा सरकारचा निर्णय
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची माहिती

भाडोत्री इमारतींतील ३,५०० अंगणवाड्यांसाठी जागा व निधीनुसार बांधकाम

बेळगाव / प्रतिनिधी

राज्यातील अनेक अंगणवाडी केंद्रे सध्या भाडोत्री किंवा पर्यायी इमारतींमध्ये कार्यरत असून, जमीन आणि निधी उपलब्धतेनुसार त्यांच्या स्वतःच्या इमारती उभारण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत, अशी माहिती महिला व बाल विकास, अपंग सक्षमीकरण आणि ज्येष्ठ नागरिक मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात बुधवारी आमदार काशप्पा शिवशंकरप्पा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या की, इलकल आणि हुनगुंद तालुक्यांतील एकूण ३५८ अंगणवाडी केंद्रांपैकी २१७ केंद्रांना स्वतःच्या इमारती आहेत. ४१ केंद्रे सरकारी किंवा इतर इमारतींमध्ये पर्यायी स्वरूपात सुरू असून, १०० केंद्रे भाडोत्री इमारतींमध्ये कार्यरत आहेत.

राज्यभरात सुमारे ३,५०० अंगणवाडी केंद्रे भाडोत्री इमारतींमध्ये सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सर्व केंद्रांसाठी स्वतंत्र इमारती उभारण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रक्रिया सुरू असून, ज्या ठिकाणी नवीन इमारती बांधणे शक्य नाही, त्या ठिकाणी जीर्ण किंवा अयोग्य इमारतींमधून केंद्रे इतर सुरक्षित इमारतींमध्ये स्थलांतरित केली जातील.

स्वतःच्या इमारतींसाठी जमीन उपलब्ध करून देण्याबाबत महसूल विभागाला आधीच पत्र पाठवण्यात आले असून, या दिशेने ठोस कार्यवाही केली जात असल्याचे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

The post अंगणवाडी केंद्रांसाठी स्वतंत्र इमारती उभारण्याचा सरकारचा निर्णय appeared first on News 24 Tass Marathi.

मागण्या मान्य न झाल्यास स्वतंत्र उत्तर कर्नाटकची मागणी
सुवर्णसौध परिसरात ठिय्या आंदोलन ; आमरण उपोषणाचा इशारा

बेळगाव / प्रतिनिधी

उत्तर कर्नाटकावर सातत्याने अन्याय व भेदभाव केला जात असून या भागाला सावत्र वागणूक दिली जात आहे. प्रशासकीय दुर्लक्षामुळे उत्तर कर्नाटकाचा अपेक्षित विकास होत नाही. गेल्या सुमारे १५ वर्षांपासून विविध सरकारांकडे मागण्या मांडूनही केवळ आश्वासनेच मिळाली आहेत. त्यामुळे उत्तर कर्नाटकाचा विकास करा, अन्यथा वेगळे राज्य द्या, असा कडक इशारा उत्तर कर्नाटकातील विविध संघटनांनी दिला आहे.

मंगळवारी (दि. १६) बेळगाव येथील बी. एस. येडियुराप्पा रोडवरील सुवर्णसौध परिसरात या संघटनांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलनकर्त्यांनी तीन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. बेळगावला कर्नाटकाची दुसरी राजधानी घोषित करावी, बंगळूरहून किमान दहा महत्त्वाची राज्यस्तरीय कार्यालये सुवर्णसौध, बेळगाव येथे स्थलांतरित करावीत आणि कित्तूर येथे कर्नाटक विकास प्राधिकरण (केडीए) स्थापन करावे.

यासोबतच सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात उत्तर कर्नाटकाच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करून ठोस विकास आराखडा तयार करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. अधिवेशनात या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास स्वतंत्र उत्तर कर्नाटकची मागणी लावून धरली जाईल, तसेच १२ जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू केले जाईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

हे आंदोलन अशोक पुजारी, अ‍ॅड. बी. डी. हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून सुभाष शिरबूर, आप्पासाहेब बुगडे, नागेश गोलशेट्टी, उदय करंगीमठ, वीलनकुमार तारीहाळ यांच्यासह उत्तर कर्नाटकातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

The post मागण्या मान्य न झाल्यास स्वतंत्र उत्तर कर्नाटकची मागणी appeared first on News 24 Tass Marathi.

विधान परिषदेत शामनूर शिवशंकरप्पा यांना श्रद्धांजली
राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना

बेळगाव / प्रतिनिधी

माजी खासदार, माजी मंत्री आणि दावणगेरे दक्षिणचे ज्येष्ठ आमदार शामनूर शिवशंकरप्पा यांच्या निधनाबद्दल सोमवारी सकाळी विधान परिषदेत शोक व्यक्त करण्यात आला. सभापती बसवराज होरट्टी यांनी शोक प्रस्ताव मांडला. यावेळी सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील सदस्यांनी शिवशंकरप्पा यांच्या निधनामुळे कर्नाटकाने एक अजातशत्रू, साधा-सज्जन आणि सर्वसमावेशक नेता गमावल्याची भावना व्यक्त केली.

शोक प्रस्ताव मांडताना सभापती होरट्टी यांनी सांगितले की, १६ जून १९३१ रोजी दावणगेरे येथे जन्मलेल्या शामनूर शिवशंकरप्पा यांनी इंटरमिजिएटपर्यंत शिक्षण घेतले होते. मूळचे व्यापारी असलेल्या शिवशंकरप्पा यांनी १९६९ मध्ये दावणगेरे नगर परिषदेचे सदस्य म्हणून राजकारणात प्रवेश केला. १९७१ मध्ये त्यांनी नगर परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.

दावणगेरे — ‘कर्नाटकचे मँचेस्टर’ — येथे त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था उभारून हजारो विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय व उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. शिक्षण क्षेत्रासोबतच त्यांनी अपंग आशाकिरण ट्रस्ट, स्पोर्ट्स क्लब, बापूजी इंजिनिअरिंग असोसिएशन यांसारख्या अनेक सामाजिक संस्थांची स्थापना केली. अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ नेतृत्व केले.

शामनूर शिवशंकरप्पा हे १९९४ मध्ये प्रथम दावणगेरे विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर २००४, २००८, २०१३, २०१८ आणि २०२३ मध्ये ते आमदार राहिले. त्यांनी कृषी, पणन व फलोत्पादन मंत्री म्हणून जबाबदारीने काम केले. १९९८ मध्ये ते लोकसभेचे सदस्यही होते. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, धार्मिक आणि औद्योगिक क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे सदस्यांनी नमूद केले.

त्यांना भारत गौरव पुरस्कार, शिरोमणी विकास इंदिरा प्रियदर्शिनी पुरस्कार, विद्याश्री सेवा पुरस्कार, सिरिगेरे तारालाबालु मठाचा धर्मचूडामणी सन्मान, इंटरनॅशनल ग्लोबल पुरस्कार यांसह अनेक मानाचे पुरस्कार मिळाले होते.

या शोक प्रस्तावावर मंत्री भोसराजू, विरोधी पक्षनेते चालवादी नारायणस्वामी, ऊर्जा मंत्री के. जे. जॉर्ज, उच्च शिक्षण मंत्री डॉ. एम. सी. सुधाकर, अन्न व नागरी व्यवहार मंत्री मुनियप्पा, तसेच सी. टी. रवी, इवान डिसोझा, प्रदीप शेट्टर, मंजुनाथ भंडारी यांच्यासह अनेक सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यानंतर एक मिनिट स्तब्धता पाळून विधान परिषदेच्या वतीने शामनूर शिवशंकरप्पा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या निधनाच्या शोकार्थ विधान परिषदेचे काम दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

The post विधान परिषदेत शामनूर शिवशंकरप्पा यांना श्रद्धांजली appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावात इंडस्ट्रीयल पार्क उभारणार – मंत्री एम. बी. पाटील
बेळगाव / प्रतिनिधी

उत्तर कर्नाटकाच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी बेळगावात इंडस्ट्रीयल पार्क उभारण्यात येणार असल्याची घोषणा अवजड व मध्यम उद्योग मंत्री एम. बी. पाटील यांनी विधानसभेत केली.

विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्षाचे उपनेते अरविंद बेल्लद यांनी बेळगाव परिसरात एअरोस्पेस पार्क आणि डिफेन्स पार्क सुरू करण्याची मागणी केली. उत्तर कर्नाटकात मोठे उद्योगधंदे उभे राहिले तर बेरोजगारी कमी होईल, विशेषतः बेळगाव आणि हुबळी-धारवाड दरम्यान एअरोस्पेस पार्क सुरू केल्यास मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल, असे बेल्लद यांनी सांगितले.

या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री एम. बी. पाटील यांनी स्पष्ट केले की, बेंगळूर ग्रामीण जिल्ह्यात चन्नरायपट्टणजवळील १३ गावांमध्ये १,७७७.२ एकर जमीन संपादित करून एअरोस्पेस आधारित उद्योग सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, सर्व उद्योग केवळ दक्षिण कर्नाटकातच केंद्रित राहिल्यास उत्तर कर्नाटकाचा विकास कसा होणार, असा सवाल उपस्थित करत त्यांनी बेळगावात इंडस्ट्रीयल पार्क उभारण्याची घोषणा केली.

बेळगावात इंडस्ट्रीयल कॉरिडॉरसाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्र्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

तसेच, बेळगाव, हुबळी-धारवाड आणि विजापूर परिसरात डिफेन्स कॉरिडॉर सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्याशी चर्चा झाल्याची माहितीही मंत्री पाटील यांनी सभागृहात दिली. या निर्णयामुळे उत्तर कर्नाटकात उद्योग, रोजगार आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

The post बेळगावात इंडस्ट्रीयल पार्क उभारणार – मंत्री एम. बी. पाटील appeared first on News 24 Tass Marathi.

आंदोलक अतिथी शिक्षिकेचा आत्महत्येचा प्रयत्न
बेळगाव / प्रतिनिधी

अतिथी शिक्षिकांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान कोप्पळ जिल्ह्यातील लता पाटील या महाविद्यालयीन पदवीधर अतिथी शिक्षिका प्राध्यापकांनी आंदोलनस्थळीच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला यापूर्वी पात्रतेअभावी त्यांना नोकरीवरून कमी करण्यात आले होते. त्या शिक्षिका काही दिवसांपासून आंदोलनात सहभागी होत्या व मानसिक तणावाखाली असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर आंदोलनस्थळी बराच गोंधळ निर्माण झाला होता.

सोमवारी आमदार एस. व्ही. संकनूर आंदोलकांच्या मागण्या ऐकण्यासाठी आंदोलनस्थळी दाखल झाले होते. मात्र त्यांना पाहताच संबंधित शिक्षिका संतापल्या. ” आम्हाला आमच्या व्यथा तुम्हाला सांगायच्या नाहीत, मंत्र्यांना प्रत्यक्ष भेटायला पाठवा,” असे त्यांनी संकनूर यांना स्पष्ट सांगितले. यावर आमदारांनी, “तुमच्या सर्व मागण्या मला सांगा, मी त्या मुख्यमंत्रीना कळवतो, ” असे उत्तर दिल्यानंतर आंदोलनस्थळी तणाव निर्माण झाला. या गोंधळातच शिक्षिकेने पेंडॉलमध्ये विष पिण्याचा प्रयत्न केला. सहकाऱ्यांनी आणि पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्यांना रोखले आणि सुरक्षित ठिकाणी हलवले. घटना होताच पोलीस बंदोबस्त वाढवला

घटनेची माहिती मिळताच पोलीस बंदोबस्त तात्काळ वाढवण्यात आला. डीसीपी बरमणी स्वतः आंदोलनस्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी आंदोलक अतिथी शिक्षिकांशी संवाद साधत त्यांची समजूत काढली. “तुमच्या मागण्या मी वरिष्ठांकडे कळवतो, आम्ही तुमच्यासाठी आहोत, ” असे आश्वासन देत त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर आंदोलक शिक्षक शांत झाले.

The post आंदोलक अतिथी शिक्षिकेचा आत्महत्येचा प्रयत्न appeared first on News 24 Tass Marathi.

विणकरांना मोफत वीज ; चर्चा करुन योग्य निर्णय
वस्त्रोद्योग मंत्री शिवानंद पाटील

बेळगाव / प्रतिनिधी

विणकरांच्या मोफत वीज पुरवठ्याच्या मागणीवर सरकार गंभीर असून लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन वस्त्रोद्योग मंत्री शिवानंद पाटील यांनी विधानसभेत दिले. नोव्हेंबर २०२३ पासून दहा अश्वशक्तीपर्यंतच्या यंत्रमागांना मोफत वीज देण्याचा आदेश जारी झाला असून, विणकरांची ही योजना एप्रिलपासून लागू करण्याची मागणी सरकार विचारात घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री पाटील म्हणाले, “मोफत वीज योजनेचा वार्षिक खर्च १२० ते १३० कोटी रुपये आहे. आदेश लागू असूनही, ती सरकार अस्तित्वात आल्यापासून लागू करावी अशी मागणी वित्त विभागाच्या मान्यतेशी निगडीत आहे. याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू.”

शुक्रवारी सभागृहातील प्रश्नोत्तराच्या तासात आमदार शशिकला जोले यांनी केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. यावेळी बी. वाय. विजयेंद्र, सिद्धू सावदी, तसेच जोले यांनी विणकरांच्या मागण्यांवर जोर दिला.

मंत्री पाटील यांनी भाजपवर टीका करत, “विणकरांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजप सरकारने काहीच केले नाही. आता चर्चा सुरु असताना राजकारण करणे योग्य नाही,” असे सांगितले.

विणकरांकडून मोफत वीज योजनेपूर्वी काहींनी बिल भरले असून काहींच्या थकबाकी राहिल्याचेही त्यांनी नमूद केले. “कोणतीही योजना अधिकृत आदेश जारी झाल्यानंतरच लागू होते. तरीही आदेशापूर्वीचा कालावधी समाविष्ट करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

The post विणकरांना मोफत वीज ; चर्चा करुन योग्य निर्णय appeared first on News 24 Tass Marathi.