West Bengal Archives | News 24 Tass Marathi

सुवेंदू अधिकारी होणार पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजपाला मिळालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर सुवेंदू अधिकारी यांची भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली असून, ते राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा पक्षाकडून करण्यात आली आहे.

कोलकाता येथील बिस्वा बांगला कन्व्हेन्शन सेंटरमध्ये भाजपाच्या पश्चिम बंगाल कार्यकारिणी आणि नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि प्रदेशाध्यक्ष शमिक भट्टाचार्य उपस्थित होते. बैठकीत सुवेंदू अधिकारी यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.

यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले की, “निवडणुका संपल्या असून पक्षाला मोठा विजय मिळाला आहे. सर्व आमदार आणि नेत्यांनी सुवेंदू अधिकारी यांचेच नाव पुढे केले. दुसरे कोणतेही नाव समोर आले नाही. त्यामुळे सुवेंदू अधिकारी हेच पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री असतील.”

५५ वर्षीय सुवेंदू अधिकारी यांनी २०२१ मध्ये नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा पुन्हा पराभव केला.

सुवेंदू अधिकारी यांचा राजकीय प्रवास :

सुवेंदू अधिकारी यांनी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. १९९५ मध्ये ते प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले. १९९८ मध्ये ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसची स्थापना केल्यानंतर ते पक्षात दाखल झाले.

२००६ मध्ये ते कांथी दक्षिण मतदारसंघातून आमदार झाले. नंदीग्राम आणि सिंगूर येथील जमीन अधिग्रहणविरोधी आंदोलनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ‘भूमी उच्छेद प्रतिरोध समिती’चे नेतृत्व करत त्यांनी आंदोलन उभारले. या आंदोलनामुळे पश्चिम बंगालमधील डाव्या आघाडीची ३४ वर्षांची सत्ता संपुष्टात आली आणि २०११ मध्ये ममता बॅनर्जी मुख्यमंत्री बनल्या.

The post सुवेंदू अधिकारी होणार पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री appeared first on News 24 Tass Marathi.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले
एप्रिलमध्ये मतदान ; ४ मे रोजी निकाल

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करताच राजकीय वातावरण तापले आहे. आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी रविवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरळ या राज्यांतील निवडणुकांचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला. या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल ४ मे रोजी घोषित करण्यात येणार आहे.

घोषित कार्यक्रमानुसार, पश्चिम बंगालमधील २९४ विधानसभा मतदारसंघांसाठी दोन टप्प्यांत २३ आणि २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या राज्यात सुमारे ६.४४ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर तामिळनाडूतील २३४ मतदारसंघांसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून सुमारे ४.६७ कोटी मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.

आसाममधील १२६, केरळमधील १४० आणि पुद्दुचेरीतील ३० विधानसभा मतदारसंघांसाठी ९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. या तीन राज्यांमध्ये अनुक्रमे सुमारे २.५ कोटी, २.७ कोटी आणि ४.४४ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पाचही राज्यांतील एकूण ८२४ विधानसभा मतदारसंघांसाठी सुमारे १७.४ कोटी मतदार मतदान करणार आहेत.

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पाच राज्यांमध्ये सुमारे २.१९ लाख मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यासाठी जवळपास २५ लाख निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत राहणार असून सुमारे ८.५ लाख सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी १,४४४ निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

The post पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले appeared first on News 24 Tass Marathi.