water crisis Archives | News 24 Tass Marathi

पिण्याच्या पाण्यासाठी चव्हाट गल्लीतील महिलांचे रास्तारोको आंदोलन
बेळगाव : चव्हाट गल्लीत पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक गंभीर हालचालींना सामोरे जात आहेत. अनेक दिवसांचा तुटवडा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त महिलांनी आज रिकामे हंडे घेऊन रास्तारोको आंदोलन केले. त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, तातडीने समस्या सोडवली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढणार आहेत.

चव्हाट गल्लीतील पाणीपुरवठा गेल्या आठ दिवसांपासून विस्कळीत असून, नागरिकांना पाण्यासाठी मैलोन्मैल करावी लागत आहे. पाईपलाईनचे काम निकृष्ट असल्याने अनेक नळांना पाणी पोहोचत नसल्याचे दिसून येत आहे. मिळत असलेले पाणीही ड्रेनेजच्या दूषित पाण्यासोबत मिसळत असल्याने आरोग्यावरील धोका वाढला आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यात कीडे आढळल्याचेही महिलांनी सांगितले. “अधिकारी वॉर्डात येतील, जाब विचारल्याशिवाय सोडणार नाही,” अशी तीव्र प्रतिक्रिया चव्हाट गल्लीतील महिलांची होती.

२४ तास पाणी योजनेसाठी रस्ते खोदून पाईपलाईन टाकण्यात आली, पण व्यवस्थापन पूर्ण कोलमडले असल्याने लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दूषित पाण्यामुळे लहान मुले आणि वृद्धांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महिलांनी महापालिका आयुक्तांकडून या मूलभूत समस्येवर तातडीने उत्तर देण्याची मागणी केली आहे.

The post पिण्याच्या पाण्यासाठी चव्हाट गल्लीतील महिलांचे रास्तारोको आंदोलन appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावात पिण्याच्या पाण्याची टंचाई नाही
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

बेळगाव / प्रतिनिधी

उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना बेळगाव जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याबाबत कोणतीही मोठी अडचण उद्भवू नये यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध उपाययोजना केल्या आहेत. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जलस्रोतांच्या पातळीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून नागरिक आणि पशुधनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली.

आज बेळगावात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सुमारे ५०० ग्रामपंचायतींमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची कमतरता नाही. यासाठी पूर्वीच बैठक घेऊन आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. मात्र, सुमारे १२६ गावांमध्ये भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचे उपाय राबवण्यात येत आहेत.

संबंधित ग्रामपंचायतींना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली टँकरची व्यवस्था करण्यात आली असून काही ठिकाणी खाजगी बोअरवेलही सुरू करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील जलाशयांतील पाणीपातळीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

शहरी भागात पाणीपुरवठ्यासाठी खाजगी टँकरचा वापर वाढवण्यात आला असून, या टँकर चालकांकडून जादा दर आकारले गेल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

The post बेळगावात पिण्याच्या पाण्याची टंचाई नाही appeared first on News 24 Tass Marathi.

पाण्याचा काटकसरीने वापर करा
पालकमंत्री सतीश जारकीहोळींचे नागरिकांना आवाहन

हिडकल जलाशयातून घटप्रभा नदीत पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू

बेळगाव / प्रतिनिधी

पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा मंत्री सतीश जारकीहोळी यांनी घोषणा केली आहे की, ३० मार्चपासून हिडकल जलाशयातून पाणी सोडले जाईल. मागील वर्षांप्रमाणेच, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या गरजा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

हिडकल जलाशयातून सोडले जाणारे पाणी घटप्रभा नदीत प्रवाहित होईल आणि त्याचा वापर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तसेच शेतीसाठी केला जाणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा आणि पाण्याचा अपव्यय टाळावा, असे मंत्री जारकीहोळी यांनी आवाहन केले आहे.

याशिवाय, घटप्रभा उजवा कालवा आणि डावा कालवा यांना ७ एप्रिलपासून पाणीपुरवठा सुरू होईल. हा उपक्रम सुमारे सहा महिन्यांसाठी पाण्याचा पुरेसा साठा सुनिश्चित करण्यासाठी राबवला जात असून, संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे.

मंत्री जारकीहोळी यांनी शेतकरी आणि रहिवाशांना या सुविधेचा जास्तीत जास्त आणि योग्य वापर करण्याचे आवाहन केले आहे.

The post पाण्याचा काटकसरीने वापर करा appeared first on News 24 Tass Marathi.

तीव्र उन्हामुळे बैलहोंगल तालुक्यातील तलाव कोरडा
पाण्याअभावी हजारो माशांचा मृत्यू

बैलहोंगल : बेळगाव जिल्ह्यात वाढत्या उन्हामुळे जलस्रोत आटत असून बैलहोंगल तालुक्यातील चिक्कबागेवाडी येथील तलाव कोरडा पडल्याने हजारो मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने घटल्याने ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आणि मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत्यू झाला. तलावाच्या काठावर पडलेल्या माशांच्या ढिगाऱ्यांमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक मत्स्यपालक शंकरगौडा पाटील यांनी गेल्या तीन ते चार वर्षांपासून या तलावात मासेमारीचा व्यवसाय सुरू ठेवला होता. यंदा त्यांनी तलावात सुमारे ५० हजारांहून अधिक मासे सोडून लाखो रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र, तीव्र उन्हामुळे तलावातील पाणी पूर्णपणे आटल्याने माशांना हालचाल करण्यास जागा उरली नाही आणि ऑक्सिजनअभावी ते गुदमरून मृत्युमुखी पडल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

या घटनेमुळे मत्स्यपालकाला मोठा आर्थिक फटका बसला असून गुंतवलेले भांडवलही परत मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे शंकरगौडा पाटील यांनी शासनाने तातडीने लक्ष घालून नुकसानग्रस्तांना योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. वाढत्या उष्णतेमुळे जलस्रोत आटत असून जैवविविधतेवरही त्याचा गंभीर परिणाम होत असल्याची चिंता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

The post तीव्र उन्हामुळे बैलहोंगल तालुक्यातील तलाव कोरडा appeared first on News 24 Tass Marathi.

शिवारात कुपनलिका खोदून केली सहा गल्ल्यांमध्ये पाण्याची सोय
ग्रामपंचायत अध्यक्षा व सदस्यांचा पुढाकार ; नागरिकांतून समाधान व्यक्त

येळ्ळूर : येथील मुल्याची वाट या पाणंद रस्त्यावर दोन ठिकाणी कुपनलिका खोदून, सिद्धेश्वर गल्ली, संभाजी गल्ली, सुभाष गल्ली, वाडी भाग अशा सहा गल्ल्यांमध्ये येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी मासेकर, ग्रामपंचायत सदस्य विलास बेडरे, राजू डोन्यान्नावर यांच्या प्रयत्नातून व ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून विविध ठिकाणी नळांच्या चाव्या बसवून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. त्यामुळे येथील महिला व नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

ग्रामपंचायत व्याप्तीमध्ये येणाऱ्या प्रभाग क्रमांक तीन चार यामध्ये प्रामुख्याने सुभाष गल्लीच्या दोन्ही बाजू. सिद्धेश्वर गल्ली, संभाजी गल्ली व संभाजी गल्लीच्या पाठीमागील बाजूचा काही भाग येथे गेल्या ५० वर्षापासून पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती होती. ऐन उन्हाळ्यात या भागातील महिलांना पाण्यासाठी वाडी भागात असणाऱ्या गोड्या भावीच्या पाण्यावरती अवलंबून राहावे लागत होते. यासाठी या भागातील पाण्याची समस्या दूर व्हावी यासाठी ग्रामपंचायत सदस्य विलास बेडरे, ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी मासेकर यांनी स्वतः संभाजी गल्ली, सिद्धेश्वर गल्ली या भागातील महिलांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. तसेच या प्रभागातील ग्रामपंचायत सदस्य विलास बेडरे, रुक्मिणी नाईक व राजू डोन्यान्नावर यांनी ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीमध्ये अनेक वेळा याविषयी आवाज उठवून ही समस्या दूर करण्याची पि.डि.ओ. पुनम गडगे तसेच ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी मासेकर यांना विनंती केली होती. त्यामुळे पंधराव्या वित्त आयोगातून या भागांमध्ये दोन ठिकाणी कुपनलिकेची खुदाई करून, सर्व सहा गल्ल्यांमध्ये नवीन पाईपलाईन घालून प्रत्येक गल्लीमध्ये नळ जोडण्यात आले. आज या संपूर्ण भागामध्ये पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. त्यामुळे या भागातील महिलांनी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

The post शिवारात कुपनलिका खोदून केली सहा गल्ल्यांमध्ये पाण्याची सोय appeared first on News 24 Tass Marathi.