traffic jam Archives | News 24 Tass Marathi

चलवेनहट्टी – अगसगे मार्गावर झाड कोसळून वाहतूक ठप्प
ग्रामपंचायतीच्या तत्परतेने हटविले झाड

काही तासांत रस्ता वाहतुकीसाठी खुला

बेळगाव : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे चलवेनहट्टी–अगसगे मुख्य रस्त्यावर बाभळीचे मोठे झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली. या घटनेमुळे बेळगाव शहराकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. मात्र, अगसगे ग्रामपंचायतीच्या तत्परतेमुळे झाड हटवून काही वेळातच वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

मध्यरात्रीच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मुख्य रस्त्यावर बाभळीचे मोठे झाड कोसळले. पहाटे कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांना तसेच वाहनचालकांना अचानक अडथळा निर्माण झाल्याने मोठी तारांबळ उडाली. झाडामुळे अपघाताचीही शक्यता निर्माण झाली होती. अतिवृष्टीमुळे शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर झाल्याने रस्त्यावरील वर्दळ कमी असल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच अगसगे ग्रामपंचायत उपाध्यक्ष तथा सदस्य गुंडू कुरेण्णवर यांनी ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी उमेश कांबळे आणि लक्ष्मण कंग्राळकर यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या प्रयत्नांतून रस्त्यावर पडलेले झाड हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

पहाटेच्या वेळी संबंधित यंत्रणांशी संपर्क होऊ न शकल्याने काही काळ वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला. दरम्यान, तातडीच्या प्रवासासाठी काही वाहनचालकांना हंदिगनूर- मण्णीकेरे मार्गे वळसा घालावा लागला. रस्ता तातडीने मोकळा केल्याबद्दल प्रवाशांनी ग्रामपंचायतीच्या कार्याचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.

The post चलवेनहट्टी – अगसगे मार्गावर झाड कोसळून वाहतूक ठप्प appeared first on News 24 Tass Marathi.

अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी
भररस्त्यात मालाची चढ-उतार ; नागरिक त्रस्त

शहापूरसह उपनगरांमध्ये परिस्थिती गंभीर

बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरांमध्ये वाहतूक कोंडी ही आता केवळ दैनंदिन समस्या न राहता गंभीर नागरी प्रश्न बनला आहे. पोलीस विभागाने अवजड वाहनांच्या शहर प्रवेशावर निर्बंध घातले असतानाही अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसत आहे. भरदिवसा रस्त्यावरच अवजड वाहनांचे थांबणे तसेच मालाची चढ-उतार सुरू असल्याने नागरिक व वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

असाच प्रकार शहापूरमधील भारत नगर तिसरी गल्ली परिसरात सातत्याने पाहायला मिळत आहे. येथे एका ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यालय असून मोठी अवजड वाहने दिवसभर रस्त्यावर उभी केली जातात. याच ठिकाणी मालाची चढ-उतार केली जात असल्याने अरुंद रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी निर्माण होते.

याशिवाय छोट्या मालवाहू वाहनांचीही रस्त्यावरच पार्किंग केली जात असल्याने परिस्थिती अधिकच बिघडते. परिणामी स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि व्यापाऱ्यांना रोजच्या रोज अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकदा वाहनचालक व नागरिकांमध्ये शाब्दिक बाचाबाचीचे प्रकारही घडत असल्याची माहिती मिळत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रात्री किंवा पहाटे मालाची चढ-उतार केल्यास कोणतीही हरकत नाही, मात्र भरदिवसा होणाऱ्या या प्रकारामुळे मोठा त्रास होत आहे. याबाबत संबंधित ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकाला माहिती देऊनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर शहापूर पोलीस तसेच वाहतूक विभागाने तातडीने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. शहर व उपनगरांतील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी घालण्यात आलेल्या वेळेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे तसेच अरुंद रस्त्यांवर अवजड वाहनांच्या लोडिंग-अनलोडिंगवर कठोर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचेही नागरिकांचे मत आहे.

The post अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी appeared first on News 24 Tass Marathi.

पहिले रेल्वे गेट कोसळल्याने टिळकवाडीत वाहतूक विस्कळीत
बेळगाव : टिळकवाडी येथील पहिल्या रेल्वे गेटचे एका बाजूचे लोखंडी गेट अचानक तुटून पडल्याने सोमवारी सकाळी काही काळ वाहतूक ठप्प झाली. सुदैवाने त्यावेळी परिसरात तुरळक रहदारी असल्याने मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार पेठ बाजूचे रेल्वे गेट अचानक कोसळले. गेट तुटून पडताच दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहनचालकांनी प्रसंगावधान राखत आपली वाहने जागेवरच थांबवली. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच टिळकवाडी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने पहिले रेल्वे गेट तात्पुरते बंद करून वाहतूक अन्य मार्गाने वळवली. त्यामुळे काही काळ परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती.

दरम्यान, वाहनांची मोठी वर्दळ असलेल्या ठिकाणी रेल्वे गेट अशा प्रकारे तुटून पडल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भविष्यात अशा धोकादायक घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने गेटची नियमित तपासणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

The post पहिले रेल्वे गेट कोसळल्याने टिळकवाडीत वाहतूक विस्कळीत appeared first on News 24 Tass Marathi.

नगरसेवक रवी साळुंखे यांच्या प्रयत्नांतून खासबाग आठवडी बाजारात शिस्त
बेळगाव / प्रतिनिधी

खासबाग परिसरातील बसवेश्वर चौक ते नाथ पै चौक दरम्यान दर रविवारी भरणाऱ्या खासबागच्या आठवडी बाजारात शिस्त लावण्यास पोलीस प्रशासन व महापालिकेने सुरुवात केली असून, यासाठी स्थानिक नगरसेवक रवी साळुंखे यांचा महत्त्वपूर्ण पाठपुरावा सुरू आहे.

बेळगाव शहरातील हा मोठा आठवडी बाजार असल्याने दर रविवारी मोठ्या प्रमाणात भाजी विक्रेते व नागरिकांची गर्दी होते. परिणामी वाहतुकीची कोंडी, चोरीच्या घटना तसेच स्थानिक नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर आज रविवारी सकाळी नगरसेवक रवी साळुंखे यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह बाजार मार्गावर प्रत्यक्ष आरेखन करून रस्त्यावर बसून विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना ठराविक जागेतच बसण्याच्या सूचना दिल्या.

बेळगाव तालुक्यातील अनेक छोटे भाजी विक्रेते तसेच उपनगरातील नागरिक मोठ्या संख्येने या बाजारात येत असल्याने सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाजार परिसर गजबजलेला असतो. याच मार्गावरील दुभाजकावर उभारलेले गाळे मात्र गेल्या चार वर्षांपासून रिकामे असून, ते बाजार व्यवस्थापनासाठी अडचणीचे ठरत आहेत.

महापालिका आयुक्त व नगरसेवक रवी साळुंखे यांनी यापूर्वी या मार्गाची पाहणी करून स्थानिक नागरिकांशी चर्चा केली होती. त्यानंतर आठवडी बाजाराच्या दिवशी आरेखन करून दिलेल्या जागेतच विक्रेत्यांना बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मागील रविवारी या उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून, नेहमी गजबजलेले रस्ते काहीसे मोकळे झाले होते. आजही नगरसेवक रवी साळुंखे यांनी विक्रेत्यांना बाजार मार्गावर दोन्ही बाजूंनी आरेखनानुसारच विक्री करण्याच्या सूचना दिल्या.

The post नगरसेवक रवी साळुंखे यांच्या प्रयत्नांतून खासबाग आठवडी बाजारात शिस्त appeared first on News 24 Tass Marathi.

खासबाग आठवडी बाजारातील कोंडी दूर करण्यासाठी हालचाली
बेळगाव / प्रतिनिधी

शहापूर – खासबाग येथील ‘संडे मार्केट’मध्ये दर रविवारी होणारी प्रचंड वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी आज महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी प्रत्यक्ष बाजारपेठेला भेट देऊन पाहणी केली. नगरसेवक रवी साळुंखे यांनी या गंभीर समस्येकडे आयुक्तांचे लक्ष वेधत त्यांना घटनास्थळी पाचारण केले होते.

ज्यानुसार आयुक्तांनी सर्व विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून विक्रेत्यांसाठी जागा निश्चित करणे आणि ग्राहकांना मोकळा रस्ता उपलब्ध करून देणे, यावर आयुक्तांनी यावेळी विशेष भर दिला.

नगरसेवक रवी साळुंखे यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे पाठपुरावा करून या समस्येवर प्रशासकीय पातळीवरून तोडगा काढण्याची विनंती केली होती. त्यानुसार, आज मनपा आयुक्त कार्तिक एम. यांनी आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह खासबाग मार्केटला भेट दिली. यावेळी त्यांनी बाजारपेठेचा सविस्तर फेरफटका मारला आणि ग्राहक तसेच विक्रेत्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना आयुक्त कार्तिक एम. यांनी तातडीच्या उपाययोजना जाहीर केल्या. ते म्हणाले, “दर रविवारी या ठिकाणी खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होते, ज्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. हे लक्षात घेऊन विक्रेते आणि ग्राहक या दोघांच्याही सोयीसाठी आम्ही सोयी-सुविधा उपलब्ध करून देणार आहोत.

आज आम्ही या परिसरातील ‘मार्किंग स्पेस’ आयडेंटिफाय केली आहे. विक्रेत्यांनी आता महापालिकेने आखून दिलेल्या मर्यादेतच (मार्किंगच्या आत) बसून व्यवसाय करायचा आहे, जेणेकरून रस्ता मोकळा राहील. या संदर्भात आम्ही वाहतूक पोलीस विभागाशीही चर्चा केली असून, त्यांच्या समन्वयाने ही समस्या कायमस्वरूपी मिटवण्याला आमचे प्राधान्य असेल. तात्पुरती सोय म्हणून त्वरित मार्किंगचे काम हाती घेतले जाईल” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

यावेळी  बोलताना नगरसेवक रवी साळुंखे म्हणाले, मनपा आयुक्तांना बाजारपेठेतील प्रत्यक्ष स्थिती दाखवून दिली. ते म्हणाले की, “या ठिकाणी वाहतुकीची समस्या खूप गंभीर झाली आहे. गेल्या रविवारी एसीपी निकम यांनी भेट देऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. महानगरपालिकेनेही यामध्ये पुढाकार घ्यावा, यासाठी मी आयुक्त कार्तिक एम. यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना येथे भेट देण्याचे आवाहन केले होते. आयुक्तांनी आमच्या विनंतीला मान देऊन आज सर्व अधिकाऱ्यांसह पाहणी केली आहे. महानगरपालिकेच्या समन्वयातून या समस्येवर योग्य तोडगा काढला जाईल आणि येथील जनतेला दिलासा मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे.”

या भेटीमुळे शहापूर-खासबाग परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच सुटण्याची चिन्हे निर्माण झाली असून, नगरसेवक रवी साळुंखे यांनी केलेल्या पाठपुराव्याचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.

The post खासबाग आठवडी बाजारातील कोंडी दूर करण्यासाठी हालचाली appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावातील वाहतूक कोंडीवर उपाय
खासगी बससाठी चार स्वतंत्र थांबे निश्चित करण्याचा निर्णय

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी खासगी बससाठी चार स्वतंत्र थांबे निश्चित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या संदर्भात आज पोलीस आयुक्तालयात खासगी बस चालक व मालकांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

सध्या शहरातून दररोज सुमारे ७९ खासगी लांब पल्ल्याच्या बसेस धावत असून, आरटीओ कार्यालय, रामदेव सर्कल यांसारख्या वर्दळीच्या ठिकाणी बस थांबवून प्रवासी चढवले जात असल्याने विशेषतः सुटीच्या दिवशी वाहतुकीची कोंडी होत आहे. या समस्येवर उपाय म्हणून शहराबाहेरील तसेच महामार्गालगत ठिकाणी बस थांबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

यामध्ये भरतेश कॉलेज परिसर, धर्मनाथ सर्कलसह महामार्गालगतच्या जागांचा समावेश असून, या ठिकाणी खासगी बससाठी स्वतंत्र थांबे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या नव्या व्यवस्थेमुळे शहरातील वाहतूक अधिक सुरळीत होईल, असा विश्वास पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी व्यक्त केला.

या बैठकीस डीसीपी निरंजनराजे अर्स, एसीपी ज्योतिबा निकम, सीपीआय श्रीकांत तोटगी यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते.

The post बेळगावातील वाहतूक कोंडीवर उपाय appeared first on News 24 Tass Marathi.

खासबाग आठवडी बाजारातील गर्दी – वाहतूक कोंडी रोखण्यासाठी कडक उपाययोजना
नगरसेवक रवी साळुंके व एसीपी निकम यांच्याकडून संयुक्त पाहणी

बेळगाव / प्रतिनिधी

खासबाग सर्कलमधील आठवडी बाजारात वाढती गर्दी आणि सतत होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता पोलिस प्रशासन व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. बाजारातील परिस्थिती सुधारण्यासाठी शहर सेवक रवी साळुंके आणि वाहतूक विभागाचे एसीपी निकम यांनी संयुक्तपणे बाजार परिसराची पाहणी केली.

रविवारच्या बाजारादरम्यान विक्रेत्यांचा रस्त्याच्या कडेला पसारा, नागरिकांची गैरसोय आणि त्यामुळे वाढणाऱ्या मोबाईल चोरीच्या घटनांबाबत अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतली. या सर्व समस्यांवर लवकरच ठोस उपाययोजना राबविल्या जातील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

बाजारात शिस्त राखण्यासाठी प्रत्येक व्यापाऱ्याला ठरवून दिलेल्या मर्यादेतच व्यवसाय करावा लागेल. व्यापाऱ्यांसाठी निश्चित खुणा आखण्यात येणार असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा एसीपी निकम यांनी दिला.

यावेळी बोलताना नगरसेवक रवी साळुंके यांनी सांगितले की, सामान्य नागरिकांची सुरक्षित व सोयीस्कर हालचाल तसेच सुरळीत वाहतूक यासाठी ही व्यवस्था राबविण्यात येत आहे. या नव्या नियोजनामुळे खासबाग आठवडी बाजारात लवकरच सुव्यवस्था व सुरक्षिततेचा अनुभव नागरिकांना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

The post खासबाग आठवडी बाजारातील गर्दी – वाहतूक कोंडी रोखण्यासाठी कडक उपाययोजना appeared first on News 24 Tass Marathi.

शहरातील रस्त्यावर अडथळा ठरणारी बेवारस वाहने हटविण्यासाठी पोलिसांची मोहीम
बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरातील प्रमुख रस्त्यांवर आणि सार्वजनिक स्थळी अनेक वाहने दीर्घकाळापासून विनाशोध उभी असल्याचे समोर आले आहे. ही वाहने जागा व्यापत असून, वाहतुकीच्या प्रवाहात अडथळे निर्माण करत आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शहर पोलिसांनी आता विशेष मोहीम राबवण्याचे निश्चित केले आहे.

या उपक्रमाच्या अंतर्गत, रस्त्याच्या कडेला सोडून दिलेली किंवा अडथळा निर्माण करणारी सर्व वाहने टोईंग करून पोलिस ठाण्यात हलवली जाणार आहेत. त्यामुळे शहरातील मार्ग अधिक मोकळे आणि सुरक्षित होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

याचबरोबर पोलिसांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले असून, आपल्या परिसरात बेवारस अवस्थेत उभी राहिलेली कोणतीही वाहने दिसल्यास त्यांची छायाचित्रे घेऊन शहर पोलिसांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवर पाठवावीत, असे सांगितले आहे. नागरिकांच्या सूचनेवर तत्काळ कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

The post शहरातील रस्त्यावर अडथळा ठरणारी बेवारस वाहने हटविण्यासाठी पोलिसांची मोहीम appeared first on News 24 Tass Marathi.

कचेरी रोड ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्ग बनला ‘वन वे’
बेळगाव / प्रतिनिधी

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रणासाठी आणि रस्ते सुरक्षेला चालना देण्यासाठी पोलिस आयुक्तालयाकडून महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी (दि. ४) रोजी घेण्यात आला. कचेरी गल्लीतील रस्त्यावरून भडकल गल्लीपर्यंत एकेरी (वन-वे) वाहतुकीबाबत महत्त्वाची घोषणा पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी केली. त्यामुळे या भागामधील वाहतूक कोंडी सुटेल आणि सुरळीत वाहतुकीला चालना मिळण्याची शक्यता आहे.

वाहतुकीसाठी नवीन मार्गव्यवस्था लागू :

पोलिस आयुक्त बोरसे यांनी बजाविलेल्या वाहतूक विभागाच्या आदेशानुसार, कचेरी गल्ली रस्त्यावरून शनिवार खुटमार्गे भडकल गल्ली क्रॉसपर्यंत ये-जा करणाऱ्या वाहनांपैकी चारचाकी आणि तीनचाकी वाहनांना शनिवार खुटहून भडकल गल्लीला जाता येणार आहे. मात्र, भडकल गल्लीहून शनिवार खुटकडे येता येणार नाही. मात्र, हा नियम दुचाकी वाहनांना नाही. दुचाकींना दोन्ही दिशेने ये-जा करण्यासाठी मुभा असणार आहे.

वाहतूक कोंडी सुटण्याची अपेक्षा :

कचेरी गल्ली परिसर व्यापारी आणि शासकीय कार्यालयांचा केंद्रबिंदू असल्याने येथे दिवसभर वाहनांची वर्दळ असते. खासकरून शनिवारी आणि सोमवारी रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे हा रस्ता एकेरी केल्यास वाहतूक सुरळीत होईल. अपघातांची शक्यता कमी होईल आणि आपत्कालीन सेवांना जलद मार्ग मिळेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. यामुळे त्याचा अभ्यास करून एकेरी वाहतूक घोषित केली आहे. नवीन व्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी पहिल्या काही दिवसांमध्ये वाहतूक पोलिस कर्मचारी रस्त्यावर तैनात राहून वाहनचालकांना मार्गदर्शन करतील. नागरिकांना गोंधळ होऊ नये म्हणून रस्त्यांवर नवीन दिशादर्शक फलक, माहिती फलक लावले जातील.

जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील या रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी हे पाऊल आवश्यक होते. त्यानुसार निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे येथे थोडा त्रास होऊ शकतो. पण, सर्वांना माहिती झाल्यास वाहतूक कोंडी कमी होईल.

एक नजर :

फक्त चारचाकी व तीनचाकी वाहनांसाठी एकेरीचे लागू

दुचाकींना दोन्ही दिशेने ये-जा करण्यासाठी मिळणार मुभा

सुरुवातीच्या काळात मार्गावर वाहतूक पोलिस तैनात

मार्गावर दिशादर्शक फलक लावण्यात येणार

वाहतूक नियोजनांत सुधारणा :

वाहतूक विभागाने अलीकडे शहरातील प्रमुख रस्त्यांचे सर्वेक्षण करून सुगम वाहतूक प्रणाली लागू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या अंतर्गत अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर एकल मार्ग, पार्किंग झोन व सिग्नल समन्वय प्रणाली लागू करण्याची योजना आहे. नवीन बदलांमुळे शहरामधील नागरिकांना अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि जलद वाहतुकीचा अनुभव मिळेल, असा विश्वास आहे.

The post कचेरी रोड ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्ग बनला ‘वन वे’ appeared first on News 24 Tass Marathi.

शालेय वेळेत अवजड वाहनाची वाहतूक थांबवा
युवा समितीचे पोलीस आयुक्तांना निवेदन

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरात अवजड वाहनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा मुद्दा गंभीर झाला असून शहरात शालेय वेळेत अवजड वाहनाची वाहतूक थांबवावी यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने बेळगावच्या पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले.

ऑगस्ट २०२२ मध्ये कॅम्प येथे अवजड वाहनाच्या धडकेत एका मुलाचा मृत्यू झालेल्या दुःखद घटनेनंतर, पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले अन शाळेच्या वेळेत अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध लादण्यात आले होते. दुर्दैवाने, आता शाळेच्या वेळेत पुन्हा एकदा अवजड वाहने बिनदिक्कतपणे धावत आहेत. यामुळे शहरातील रेल्वे उड्डाणपुलावर तसेच प्रमुख चौकात आणि शाळा परिसरात गंभीर वाहतूक कोंडी होत आहे.  यामुळे पालकांची तसेच सामान्य जनतेची मोठी गैरसोय होत आहे. हे लक्षात घेऊन, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी युवा समितीचे अध्यक्ष श्री. अंकुश केसरकर यांनी पदाधिकाऱ्यां समवेत पोलीस आयुक्तांची भेट घेत, सकाळी ०८:०० ते १०:३० शाळा भरण्याच्या वेळेत व दुपारी ०३:०० ते संध्याकाळी ०६:०० शाळा सुटण्याच्या दरम्यान शहरात अवजड वाहनांना निर्बंध करावेत अशी मागणी केली.

पोलीस आयुक्तांनी याप्रश्नी आवश्यक पावले उचलली जातील असे आश्वासन युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. यावेळी युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर उपाध्यक्ष वासू सामजी, सरचिटणीस श्रीकांत कदम, विनायक कावळे, सुरज कुडूचकर, किरण हुद्दार, संतोष कृष्णाचे,ॲड. वैभव कुट्रे, शेखर तळवार, शांताराम होसुरकर, सुरज चव्हाण, ॲड. अश्वजीत चौधरी आदी उपस्थित होते.

The post शालेय वेळेत अवजड वाहनाची वाहतूक थांबवा appeared first on News 24 Tass Marathi.