theft Archives | News 24 Tass Marathi

शहापूर पोलिसांकडून १५.७३ लाखांचे सोने जप्त ; आरोपी अटकेत
बेळगाव : विश्वासाने सांभाळण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी दिलेले सोन्याचे दागिने व हार मालकाला न सांगता अपहार करणाऱ्या आरोपीला शहापूर पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून १५.७३ लाख रुपये किमतीचे १०३.९७ ग्रॅम वजनाचे सोने जप्त करण्यात आले आहे.

कृष्णा मोहन मैती (वय ३६, मूळ रा. विजयवाडा, आंध्र प्रदेश, सध्या रा. शहापूर, बेळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नार्वेकर गल्ली परिसरात घडलेल्या या प्रकरणात विश्वासाने दिलेले सोन्याचे दागिने आणि दुरुस्तीसाठी दिलेला सोन्याचा हार आरोपीने परस्पर लंपास केल्याची तक्रार प्राप्त झाली होती.

तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीचा शोध घेतला. चौकशीनंतर आरोपीकडून १५ लाख ७३ हजार ३७० रुपये किमतीचे एकूण १०३.९७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६३/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३१६(२) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

बेळगावचे पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि साहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस. एस. सिमानी, पीएसआय मणिकंठ पुजारी, महिला पीएसआय एस. एन. बस्वा तसेच त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस आयुक्तांनी तपास पथकाचे अभिनंदन करून कौतुक केले आहे.

The post शहापूर पोलिसांकडून १५.७३ लाखांचे सोने जप्त ; आरोपी अटकेत appeared first on News 24 Tass Marathi.

भवानी नगर येथील घरफोडी प्रकरणाचा छडा
बेळगाव ग्रामीण पोलिसांकडून एकाला अटक

१६.९ लाखांचे सोने-चांदीचे दागिने हस्तगत

बेळगाव : बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत एका आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे १६.९ लाख रुपये किमतीचे चोरीस गेलेले सोने-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.

मंडोळी रोडवरील भवानी नगर येथील रहिवासी रोहन जाधव यांनी त्यांच्या घरातून सोने व चांदीचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला.

तपासादरम्यान भोवी गल्ली येथील निलेश भरमा सुतार (वय ४१) याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने भवानी नगरमधील घरफोडीसह मच्छे गावातील गंगा गल्ली येथील एका घरात चोरी केल्याची कबुली दिली. तसेच मच्छे येथील एका सराफाच्या दुकानातूनही दागिने चोरल्याचे त्याने कबूल केले.

आरोपीच्या माहितीनुसार पोलिसांनी सुमारे ४५ ग्रॅम वजनाचे ७ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि सुमारे ४.१७८ किलो वजनाचे १०.९ लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने जप्त केले. हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १६.९ लाख रुपये आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बेळगाव ग्रामीण पोलीस करत आहेत.

The post भवानी नगर येथील घरफोडी प्रकरणाचा छडा appeared first on News 24 Tass Marathi.

दुचाकी चोरट्याला अटक ; २.५५ लाखांच्या पाच दुचाकी जप्त
बेळगाव : शहरासह परिसरात घडलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांचा तपास करताना हिरेबागेवाडी पोलिसांनी एका सराईत चोरट्याला अटक करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईदरम्यान आरोपीच्या ताब्यातून सुमारे २ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव लक्ष्मण विरूपाक्षी कणबर्गी (वय ३१, रा. अडीवेप्पन अंकलगी, ता. गोकाक) असे आहे. बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.

पोलीस आयुक्त भूषण बोरसे, पोलीस उपायुक्त नारायण भरमणी, निरंजन राजे अरस तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त बी. एम. गंगाधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस. के. होळेंनवर, पीएसआय बी. के. मिटगार, अविनाश यरगोप्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १ जून रोजी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

या प्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. यशस्वी कारवाईबद्दल पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित पथकाचे अभिनंदन केले आहे.

The post दुचाकी चोरट्याला अटक ; २.५५ लाखांच्या पाच दुचाकी जप्त appeared first on News 24 Tass Marathi.

घरकाम करणाऱ्याचाच कोट्यवधींच्या सोन्यावर डल्ला
तिजोरीची चावी चोरून ९३० ग्रॅम दागिने लंपास

कॅम्प पोलिसांकडून संशयिताला अटक

बेळगाव : घरातील विश्वासू व्यक्तीनेच मालकाच्या तिजोरी फोडून तब्बल ९३० ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना बेळगावातील कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. तिजोरीची चावी चोरून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चोरी करणाऱ्या घरकाम करणाऱ्या संशयिताला कॅम्प पोलिसांनी अटक करत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे.

शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकार परिषदेत या गुन्ह्याचा पर्दाफाश केला. कॅम्प परिसरातील रहिवासी डॉ. विश्वनाथ धडेद यांच्या घरातून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याप्रकरणी त्यांच्या पत्नी अन्नपूर्णा धडेद यांनी ११ मे रोजी तक्रार दाखल केली होती.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेचे उपायुक्त निरंजनराजे अर्स, खडे बाजारचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखरप्पा आणि कॅम्पचे पोलीस निरीक्षक आनंद यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले. तपासा दरम्यान घरातच काम करणारा कागवाड येथील राहुल सतीश कांबळे याच्यावर संशय बळावला आणि पोलिसांनी त्याला अटक केली.

तपासात राहुलने कागवाडमधील बाबासाहेब कटगेरी याच्या माध्यमातून चोरीचे सोने विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. पोलिसांनी आरोपींकडून ५२.५ लाख रुपये किमतीचे ३५० ग्रॅम सोने हस्तगत केले असून, काही सोने खाजगी फायनान्स कंपन्यांमध्ये गहाण ठेवून त्यावर २२.८ लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचेही समोर आले आहे.

या कारवाईत पोलिसांनी एकूण ७३.३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून उर्वरित सोन्याचा शोध सुरू आहे. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस आयुक्तांनी तपास पथकाला रोख बक्षीस जाहीर केले. तसेच नागरिकांनी घरात मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने न ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

The post घरकाम करणाऱ्याचाच कोट्यवधींच्या सोन्यावर डल्ला appeared first on News 24 Tass Marathi.

बसस्थानकांवर दागिने चोरी करणाऱ्या दोन महिलांना अटक
अथणी पोलिसांची कारवाई ; लाखो रुपयांचे सोने जप्त

अथणी : बसस्थानकांवरील गर्दीचा फायदा घेत महिला प्रवाशांचे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या महाराष्ट्रातील दोन महिलांना अथणी पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

अथणी बसस्थानक परिसरात संशयास्पद हालचाली करत असलेल्या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोरीच्या अनेक घटनांचा उलगडा झाला. अटक करण्यात आलेल्या महिलांची ओळख हेमा कसबेकर आणि नीलम कांबळे अशी झाली असून त्या महाराष्ट्रातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तपासात या महिला बसमध्ये चढताना किंवा उतरताना होणारी गर्दी, धक्काबुक्की आणि गोंधळ याचा फायदा घेत महिला प्रवाशांचे सोन्याचे दागिने लंपास करत असल्याचे समोर आले. प्रवासी असल्याचे भासवत त्या चोरी करून कोणालाही संशय न येऊ देता पसार होत असत.

कसून चौकशीत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या चार मोठ्या चोरीच्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग उघड झाला आहे. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे ६८ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केल्याची माहिती दिली.

या कारवाईमुळे अथणी परिसरातील प्रवासी आणि नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, चातुर्याने तपास करून आरोपींना अटक करणाऱ्या अथणी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.

The post बसस्थानकांवर दागिने चोरी करणाऱ्या दोन महिलांना अटक appeared first on News 24 Tass Marathi.

दुचाकी चोरीच्या दोन प्रकरणांचा छडा ; सहाजण ताब्यात
संकेश्वर पोलिसांची कारवाई

६ लाखांहून अधिक किमतीच्या गाड्या जप्त

संकेश्वर : संकेश्वर आणि जिल्ह्यातील विविध भागांतून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीविरोधात कारवाई करत संकेश्वर पोलिसांनी दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत सुमारे ६ लाख १० हजार रुपये किमतीच्या १४ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

पहिल्या प्रकरणात गिरिष तुकाराम सत्यनाईक (रा. भीमनगर, संकेश्वर) यांची दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार संकेश्वर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. त्यानंतर बाबुगोडा चंद्रगौडा पाटील (रा. हुक्केरी रोड, संकेश्वर) यांच्या घरासमोरूनही दुचाकी चोरी झाली होती.

या घटनांचा तपास करताना पोलिसांनी संशयितांचा मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास पुढे नेला. तपासादरम्यान संकेश्वर, चिकोडी, यमकनमर्डी, बेळगाव शहर आणि गडहिंग्लज परिसरातून तब्बल १० दुचाकी चोरी केल्याचे उघड झाले. या प्रकरणात अंदाजे ४ लाख ३० हजार रुपये किमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

या गुन्ह्यात अमित बसवराज कोळी (वय २१) आणि आनंद यल्लाप्पा घस्ती (वय ३८, दोघे रा. मुत्नाळ, ता. गडहिंग्लज) यांना अटक करण्यात आली आहे.

दुसऱ्या प्रकरणात सुमित गंगाराम कम्मार (वय २१, रा. निडसोशी), शिवराज निगौंडा पाटील (वय २१, रा. कमतनूर), ओंकार मोहन कडलगी (वय २०, रा. कडलगे, ता. गडहिंग्लज) आणि किरण हेमंत कम्मार (वय १८, रा. निडसोशी) या चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिल्यानंतर निडसोशी, अंकले आणि गोकाक परिसरातून चोरी करण्यात आलेल्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या. या वाहनांची किंमत सुमारे १ लाख ८० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या सर्व आरोपींविरोधात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख रामराजन यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ पोलीस निरीक्षक गणपती कोगनोळी, उपनिरीक्षक विठ्ठल नाईक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उमेश शेट्टण्णावर, सी. जी. सारापुरे आणि पोलिस पथकाने केली.

The post दुचाकी चोरीच्या दोन प्रकरणांचा छडा ; सहाजण ताब्यात appeared first on News 24 Tass Marathi.

लॉक्ड हाऊस बीट सिस्टीमचा राज्यभर विस्तार
बेळगावातील उपक्रम ठरला प्रभावी : २८६ घरफोड्या रोखण्यात यश

बेळगाव : घरफोडी आणि चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी बेळगाव पोलिसांनी सुरू केलेली ‘लॉक्ड हाऊस बीट सिस्टीम’ आता संपूर्ण कर्नाटकात लागू करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने राज्यभर त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर आणि राज्य पोलीस महासंचालक डॉ. एम. ए. सलीम यांनी या उपक्रमाची दखल घेत सर्व जिल्हे आणि पोलीस आयुक्तालयांच्या कार्यक्षेत्रात तो राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शहर आणि उपनगरांमध्ये फळे, भाजीपाला किंवा कपडे विक्रीच्या निमित्ताने फिरणाऱ्या काही गुन्हेगारांकडून बंद घरांवर लक्ष ठेवून चोरी आणि घरफोड्यांचे प्रकार घडत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. तसेच दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि तामिळनाडूसह विविध राज्यांतील गुन्हेगारांच्या हालचालीही आढळून आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर हा उपक्रम सुरू करण्यात आला.

२६ जानेवारीपासून बेळगाव शहरात या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. प्रवास, कौटुंबिक कार्यक्रम किंवा इतर कारणांमुळे घर बंद ठेवून बाहेर जाणाऱ्या नागरिकांनी जवळच्या पोलीस स्थानकाला माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यासाठी विशेष मोबाईल क्रमांक आणि व्हॉट्सअ‍ॅप सुविधाही सुरू करण्यात आली. नागरिकांनी घराचा फोटो, लोकेशन, बाहेर जाण्याचा व परतण्याचा कालावधी तसेच घरासमोरील सेल्फी पाठवायची व्यवस्था करण्यात आली होती. ११२ या हेल्पलाईनवर संपर्क साधूनही माहिती देता येत होती.

माहिती मिळाल्यानंतर संबंधित भागातील पोलीस कर्मचारी त्या घराभोवती नियमित गस्त घालत होते. त्याची नोंदही पोलीस स्थानकात ठेवण्यात येत होती. या उपाययोजनेमुळे बेळगावात तब्बल २८६ संभाव्य घरफोड्या रोखण्यात यश आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

हा उपक्रम चोरी आणि घरफोडी रोखण्यासाठी प्रभावी ठरल्याने आता तो राज्यभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सांगितले.

The post लॉक्ड हाऊस बीट सिस्टीमचा राज्यभर विस्तार appeared first on News 24 Tass Marathi.

दिल्लीतील चोरट्याला अटक
शहापूर पोलिसांकडून ४५ लाखांहून अधिक किमतीचे सोनं जप्त

बेळगाव : शहरातील शहापूर परिसरात घरफोडी करून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या एका आरोपीला शहापूर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून ४५ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४२/२०२६ नोंद करण्यात आला होता. भारतनगर, शहापूर येथील एका घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत सोन्याचे दागिने चोरून नेल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार बीएनएस २०२३ अंतर्गत संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला.

तपासादरम्यान पोलिसांनी मिंटू विश्वास उर्फ चिंटू (वय ५२, रा. तिलक नगर, पश्चिम दिल्ली) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याच्याकडून सुमारे २९४.१९० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. या दागिन्यांची अंदाजे किंमत ४४ लाख ८६ हजार ३९० रुपये असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय चोरीसाठी वापरण्यात आलेली होंडा अॅक्टिव्हा दुचाकीही पोलिसांनी जप्त केली असून तिची किंमत सुमारे ७० हजार रुपये आहे. अशा प्रकारे एकूण ४५ लाख ५६ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पडली. तपास मोहिमेत पोलीस निरीक्षक एस. एस. सिमानी, पीएसआय मणिकंठ पुजारी, प्रवीण बिरादार, मंजुनाथ भजन्त्री (सीसीबी) यांच्यासह विविध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. तांत्रिक व फिंगरप्रिंट विभागानेही तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. या यशस्वी कारवाईबद्दल संबंधित पथकाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

The post दिल्लीतील चोरट्याला अटक appeared first on News 24 Tass Marathi.

एपीएमसी पोलिसांची घरफोडी प्रकरणी मोठी कारवाई
तिघांना अटक ; ४.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त

बेळगाव : एपीएमसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घरफोडी प्रकरणाचा यशस्वी छडा लावत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल ४ लाख ७१ हजार ७४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये रोख रक्कम, सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच दुचाकी वाहनांचा समावेश आहे.  देवेंद्र उर्फ डेब्या रमेश वाघमोरे (वय ३९), सचिन दत्तात्रय गवळी (वय ३९) आणि कपिल उर्फ आप्पा बजरंग जाधव (वय २३) अशी अटक केलेल्यांची नावे  असून तिघेही कोल्हापूर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मे २०२६ रोजी एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुवेंपु नगर येथे राहणारे अरुण जाधव हे घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटे फोडून रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेण्यात आले. घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर जाधव यांनी एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने संशयितांचा शोध घेण्यात आला.

तपासादरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी घरफोडीची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्या ताब्यातून १ लाख ६७ हजार १८६ रुपये रोख रक्कम, १२.०८० ग्रॅम सोन्याचे दागिने, १ लाख ८३ हजार ८८८ रुपये किमतीचे ७४४.५ ग्रॅम चांदीचे दागिने तसेच १ लाख २० हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी असा एकूण ४ लाख ७१ हजार ७४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई एपीएमसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली असून आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील तपास सुरू आहे.

The post एपीएमसी पोलिसांची घरफोडी प्रकरणी मोठी कारवाई appeared first on News 24 Tass Marathi.

यमकनमर्डीतील दुचाकी चोरी प्रकरणाचा उलगडा
तिघांना अटक ; १२ मोबाईल फोन जप्त

पोलिसांकडून चोरीचा मुद्देमाल वारसांकडे सुपूर्द

बेळगाव : यमकनमर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकल चोरीच्या प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी तिघा चोरट्यांना अटक केली आहे. यासोबतच हरवलेले १२ मोबाईल फोन जप्त करून संबंधित मालकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

हुक्केरी तालुक्यातील हंचिनाळ गावातील इरापन्ना सिद्धराई रेवण्णावर यांच्या मोटारसायकल चोरीच्या (प्रकरण क्र. १४४/२०२६) तक्रारीच्या आधारे तपास सुरू करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने तपास करून शंकर भीमा आदिनावर, परशुराम कल्लप्पा शिरनागी आणि परशुराम भरमप्पा पांडी यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली.

दरम्यान, सीईआयआर (CEIR) पोर्टलच्या साहाय्याने तांत्रिक तपास करत जप्त केलेले १२ मोबाईल फोन शोधून काढण्यात आले. हे मोबाईल फोन संबंधित मालकांना पोलीस ठाण्यात बोलावून अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आले.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक बी. के. पाटील, व्ही. डी. गुंजागी, तसेच जी. बी. नागनवर आणि पी. के. किल्लिकेट्टर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

The post यमकनमर्डीतील दुचाकी चोरी प्रकरणाचा उलगडा appeared first on News 24 Tass Marathi.