temple Archives | News 24 Tass Marathi

सौंदत्ती यल्लम्मा मंदिर विकासासाठी २१५ कोटींचा निधी मंजूर
भाविकांसाठी अत्याधुनिक सुविधा उभारण्याची तयारी अंतिम टप्प्यात

बेळगाव : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रेणूका यल्लम्मा मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने २१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या विकासकामांच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यासंदर्भात बेळगावमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली.

बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना आमदार विश्वास वैद्य यांनी प्रस्तावित विकास आराखड्याची माहिती दिली. पुढील आठवड्यात सोमवार किंवा मंगळवारपर्यंत भूमिपूजनाची तारीख निश्चित होण्याची शक्यता असून त्यानंतर कामांना प्रत्यक्ष सुरुवात केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकल्पांतर्गत भाविकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. यामध्ये भव्य क्यू कॉम्प्लेक्स, सुसज्ज अन्नदान भवन, नवीन प्रशासकीय कार्यालय तसेच वॉकर्स झोन उभारण्याचा समावेश आहे. मंजूर निधीपैकी सुमारे १८० कोटी रुपयांच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित ३५ कोटी रुपयांच्या कामांचा आराखडा तयार करण्यात येत आहे.

या विकासकामांमुळे यल्लम्मा डोंगरावर येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी अधिक सुलभ आणि सुरक्षित सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, मंदिराच्या गाभाऱ्यात पावसाळ्यात शिरणाऱ्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटविण्याची मोहीमही सुरू करण्यात आली आहे. पुढील पावसाळ्यापासून गाभाऱ्यात पाणी जाणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

यल्लम्मा डोंगरावरील विद्यमान दुकानदारांना लिलाव प्रक्रियेद्वारे पुन्हा जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच, एक जुने व्यापारी संकुल पाडण्यात येणार असून संबंधित दुकानदारांना पर्यायी जागा देण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.

मंदिर परिसराचा संपूर्ण कायापालट करणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात येणार असल्याचे सांगण्यात आले.

The post सौंदत्ती यल्लम्मा मंदिर विकासासाठी २१५ कोटींचा निधी मंजूर appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावात दि. २ जून पासून डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या श्रीराम कथेचे आयोजन
बेळगाव : आंतरराष्ट्रीय व्याख्याते,प्रवचनकार आणि साहित्यिक असलेल्या डॉ. सच्चिदानंद शेवडे यांची ‘श्रीराम कथा’ बेळगावात आयोजण्यात आली आहे. दि. २ जून ते दि. ७ जून या कालावधीत केळकर बाग येथील काणे महाराज राममंदिरात दररोज सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत ही रामकथा सादर होणार आहे.

वाचकप्रिय असलेल्या डॉ. शेवडे यांची विविध विषयांवरील ५१ पुस्तके प्रकाशित झालेली असून अनेक पुस्तकांच्या आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. तसेच देशाविदेशात त्यांचे सात हजारांहून अधिक व्याख्यान आणि प्रवचनांचे कार्यक्रम झाले आहेत. अधिक महिन्यात त्यांच्या रसाळ व मार्मिक वाणीतून रामकथा ऐकण्याचा योग बेळगावकरांना आला आहे. तरी श्रोत्यांनी याचा लाभ घ्यावा असे कळविण्यात आले आहे.

The post बेळगावात दि. २ जून पासून डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या श्रीराम कथेचे आयोजन appeared first on News 24 Tass Marathi.

सौंदत्तीच्या श्री रेणुका मंदिराला ३१ कोटींचे विक्रमी दान
बेळगाव : महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशसह विविध राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रेणुका देवी मंदिर येथे २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल ३१ कोटी रुपयांची देणगी जमा झाली आहे. या विक्रमी देणगीमुळे कर्नाटकातील सर्वाधिक देणगी प्राप्त करणाऱ्या मंदिरांच्या यादीत या मंदिराने पाचवे स्थान मिळवले आहे.

कर्नाटक धर्मादाय विभाग यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली. धर्मादाय विभागाच्या अखत्यारीतील प्रमुख मंदिरांच्या वार्षिक देणगी अहवालात सौंदत्तीच्या रेणुका मंदिराने उल्लेखनीय स्थान पटकावले आहे.

या यादीत कुक्के सुब्रमण्यम मंदिर हे मंदिर प्रथम क्रमांकावर असून, भाविकांकडून वर्षभरात सुमारे १६८ कोटी रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे. त्यानंतर राज्यातील अन्य प्रमुख देवस्थानांचा क्रम लागतो.

बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील श्री रेणुका देवी मंदिराला मिळालेल्या मोठ्या देणगीतून या मंदिरावरील भाविकांची श्रद्धा आणि वाढती लोकप्रियता अधोरेखित होत असल्याचे मानले जात आहे.

The post सौंदत्तीच्या श्री रेणुका मंदिराला ३१ कोटींचे विक्रमी दान appeared first on News 24 Tass Marathi.

कपिलेश्वर तलावानजीकची तीन घरे महापालिकेकडून सील
दुसरी संरक्षक भिंतही कोसळली ; बॅरिकेड्स लावून परिसरात प्रवेश बंदी

बेळगाव : कपिलेश्वर मंदिरामागील ऐतिहासिक तलावाची संरक्षक भिंत कोसळून दोन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी पहाटे आणखी एक भिंत कोसळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन महापालिकेने तातडीने कारवाई करत तीन घरे सील केली आहेत.

रविवारी पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास तलावाची दुसरी संरक्षक भिंत कोसळली. यापूर्वी सकाळी तलावात पोहण्यासाठी गेलेल्या शिवम सुंडीकर आणि परशराम निलजकर या दोन बालकांचा अंगावर भिंत कोसळल्याने मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेनंतरही पुन्हा भिंत कोसळल्याने धोका अधिक वाढला आहे.

परिसरातील काही घरांच्या भिंतींना तडे गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित तीन घरे सील केली. रहिवाशांना तत्काळ घराबाहेर काढून त्यांचे साहित्य सुरक्षितस्थळी हलवण्यात आले.

तसेच, तलावाच्या चोहोबाजूंनी बॅरिकेड्स लावून संपूर्ण परिसरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

The post कपिलेश्वर तलावानजीकची तीन घरे महापालिकेकडून सील appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावातच मिळणारं तिरुपती बालाजीचे दर्शन…
तालुक्यात के.के.कोप्पनजीक उभारणार मंदिर

७ एकर जागेवर १०० कोटींचा भव्य प्रकल्प

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील के.के.कोप्प गावाजवळ सात एकर प्रशस्त जागेवर तिरुपती बालाजी मंदिर उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकार घेत आहे. तिरूमला तिरुपती देवस्थान आणि बेळगाव रेड्डी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जात असून, यासाठी जमीन हस्तांतरणाचा कार्यक्रम मंगळवारी सदाशिवनगर येथील रेड्डी भवनमध्ये पार पडला.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना तिरूमला तिरुपती देवस्थान प्रशासन मंडळाचे सदस्य एस. नरेश कुमार यांनी सांगितले की, मंदिरासाठी आवश्यक सात एकर जमीन रेड्डी संघाने स्वखर्चाने उपलब्ध करून दिली आहे. सध्या मंदिराचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, येत्या महिन्यात भूमिपूजन आणि पायाभरणी करण्याचे नियोजन आहे.

सुमारे १०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून त्यापैकी ८० टक्के निधी तिरूमला तिरुपती देवस्थानकडून, १० टक्के रेड्डी संघाकडून आणि उर्वरित १० टक्के निधी स्थानिक भाविक व नागरिकांच्या देणगीतून उभारला जाणार आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी ट्रस्टमार्फत केली जाणार असून, स्थानिकांना ट्रस्टमध्ये प्रतिनिधित्व देण्याचाही विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बेळगाव हे तीन राज्यांच्या सीमेवर असल्यामुळे या मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. तिरुपतीप्रमाणेच येथे नित्यपूजा, विविध धार्मिक कार्यक्रम, अन्नदान सेवा आणि प्रसाद वितरणाची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच भाविकांसाठी निवास, प्रशस्त पार्किंग आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

तिरुपतीपर्यंत सुमारे ९०० किलोमीटर प्रवास करण्याऐवजी भाविकांना आता बेळगावातच तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येणार असल्याने हा प्रकल्प धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे.

The post बेळगावातच मिळणारं तिरुपती बालाजीचे दर्शन… appeared first on News 24 Tass Marathi.

कल्लेहोळ येथे २२ एप्रिलपासून श्री वैजनाथ मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि लोकार्पण सोहळा
उचगाव : बेळगाव तालुक्यातील कल्लेहोळ येथे सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या श्री वैजनाथ मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून, या मंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा २२ ते २४ एप्रिल २०२६ दरम्यान मंदिराची वास्तुशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण अशा विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जाणार आहे.

सोहळ्याच्या पहिल्या दिवशी, बुधवार दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत ग्रामस्थ, देवस्थान पंचकमिटी आणि सुवासिनींच्या उपस्थितीत सर्व देवतांचे आवाहन करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत सनई-ताशा, वारकरी संप्रदायाच्या गजरात देवतांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी ६ ते ७ या वेळेत ह.भ.प. निवृत्ती मारुती मुचंडीकर महाराज यांचे प्रवचन, तर रात्री ७ ते ९ या वेळेत ह.भ.प. भवताचार्य यतिराज महाराज (आळंदी) यांचे कीर्तन होणार आहे.

गुरुवार दि. २३ एप्रिल रोजी सकाळी देवस्थान समितीच्या हस्ते मंदिराची वास्तुशांती, गृहप्रवेश आणि होमहवन विधी पार पडतील. सायंकाळी ६ ते ७ या वेळेत ह.भ.प. बाळू मारुती भक्तीकर महाराज यांचे प्रवचन होणार असून, रात्री ७ ते ९ या वेळेत ह.भ.प. गुरु पुंडलिक महाराज देहुकर (संत तुकाराम महाराजांचे वंशज, श्रीक्षेत्र देहू) यांचे कीर्तन होईल.

शुक्रवार दि. २४ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत महर्षी धर्म, तपोरत्न शिवसिद्ध सोमेश्वर शिवाचार्य महाराज (मुक्ती मठ) यांच्या हस्ते कळसारोहण सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, विविध पूजाविधी तसेच दुपारी मान्यवरांच्या उपस्थितीत मंदिराचे उद्घाटन होणार आहे. दुपारी ३ नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या तीन दिवसीय सोहळ्याचे आयोजन ग्रामस्थ, देवस्थान समिती, ग्रामपंचायत तसेच वेदशास्त्र संपन्न पुरोहित सजीव रामचंद्र जोशी आणि सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. या पवित्र सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

The post कल्लेहोळ येथे २२ एप्रिलपासून श्री वैजनाथ मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि लोकार्पण सोहळा appeared first on News 24 Tass Marathi.

श्री दत्त पद्मनाभ पीठात ‘श्री दत्त गुरुवार भक्ती उत्सव’ उत्साहात संपन्न
खानापूर : श्री दत्त पद्मनाभ पिठाधीश्वर, अध्यात्म शिरोमणी, पद्मश्री विभूषित, गोवा स्वामी, प पू.सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी महाराजांच्या दिव्य कृपाशीर्वादाने संत समाज खानापूर विभागाच्या वतीने गोवा राज्यातील कुंडई येथील श्री दत्त पद्मनाभ पीठात श्री दत्त गुरुवार भक्ती उत्सव’ अत्यंत भक्तिभावाने व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या सकाळच्या सत्रात सद्गुरुंची पाद्यपूजा आणि महाआरती अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडली. त्यानंतर राष्ट्रसंत सद्गुरु ब्रह्मानंद स्वामी समाधी मंदिरात पूजन, एकमुखी दत्त मंदिरात पूजा तसेच हातुर्ली मठात विधिवत पूजाविधी संपन्न झाले. संपूर्ण परिसर दत्तनामाच्या गजराने आणि भक्तीमय वातावरणाने भारावून गेला होता.

दुपारच्या सत्रात पूज्य सद्गुरु माऊलींचे विशेष मार्गदर्शन सर्व शिष्यांना लाभले आणि दत्तमाला मंत्राचे अखंड नामस्मरण करण्यात आले.

संध्याकाळच्या प्रकट कार्यक्रमात पूज्य सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी महाराजांनी आशीर्वादपर निरूपण करताना सांगितले की प्रत्येकाने आपल्या जीवनात अध्यात्माला सर्वोच्च स्थान दिले पाहिजे आणि आध्यात्मिक मूल्यांनुसार जीवन जगले पाहिजे. विशेषतः तरुणाईने देव, देश आणि धर्मकार्यामध्ये अग्रभागी राहून आपला मनुष्य जन्म सार्थकी लावावा.”

या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री. रवी कोकितकर (अध्यक्ष – हिंदू राष्ट्र सेना, कर्नाटक राज्य) , श्री. चेतन मनेरिकर (भाजप) , डॉ. स्वप्नील नागवेकर अध्यक्ष सद्गुरु कौन्सिल दुबई आणि श्री रोहन देसाई (बीसीसीआय माजी सचिव ) उपस्थित होते. त्यांनी सद्गुरुंचे आशीर्वाद प्राप्त केले.

या भक्ती उत्सवामुळे खानापूर विभागात गुरुभक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा दिव्य संगम अनुभवास आला. हजारो भाविकांनी सद्गुरुंचे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले आणि आध्यात्मिक जीवन जगण्याचा दृढ संकल्प केला. या भक्ती उत्सवासाठी खानापूर–बेळगाव विभागातून हजारो सद्गुरुभक्त, सेवक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्मिकतेच्या दिव्य संगमाने ओतप्रोत भरून गेला.

The post श्री दत्त पद्मनाभ पीठात ‘श्री दत्त गुरुवार भक्ती उत्सव’ उत्साहात संपन्न appeared first on News 24 Tass Marathi.

सौंदत्ती यल्लम्मा देवीच्या चरणी ३.०७ कोटींची विक्रमी देणगी
रोख रकमेसह सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा समावेश

निधी मंदिर विकासासाठी वापरणार

सौंदत्ती / वार्ताहर

बेळगाव जिल्ह्यातील ऐतिहासिक श्री रेणुका यल्लम्मा मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या देणगीने यंदा विक्रमी पातळी गाठली आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेली दानपेटी मोजणी पूर्ण झाली असून देवीच्या चरणी एकूण ३ कोटी ७ लाख रुपयांचे रोख दान तसेच सोन्या-चांदीचे दागिने जमा झाल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली.

सौंदत्ती तालुक्यातील यल्लम्मा डोंगरावर असलेल्या या मंदिरात दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. ९ ते १२ मार्चदरम्यान पार पडलेल्या दानपेटी मोजणीमध्ये भाविकांकडून मोठ्या प्रमाणात देणगी अर्पण करण्यात आली. गेल्या आठवड्यातच एकदा मोजणी पार पडली असतानाही या फेरीतही लक्षणीय रक्कम जमा झाल्याचे दिसून आले.

दानपेटीत जमा झालेल्या देणगीपैकी २ कोटी ७८ लाख रुपये रोख रक्कम आहे. याशिवाय सुमारे १०० ग्रॅम सोन्याचे दागिने (सुमारे १६.१६ लाख रुपये किंमत) तसेच ४ किलो ५४७ ग्रॅम चांदीचे अलंकार (सुमारे १२.३५ लाख रुपये किंमत) भाविकांनी अर्पण केले आहेत. मोजणी प्रक्रियेत मंदिर प्रशासनातील कर्मचाऱ्यांसह स्थानिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत पारदर्शकपणे काम पूर्ण केले.

मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या वर्षागणिक वाढत असून जमा झालेला निधी मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी वापरण्यात येणार आहे. विशेषतः पिण्याच्या पाण्याची सोय, भाविकांसाठी निवास व्यवस्था, स्वच्छतागृहे तसेच मंदिर परिसराचे सुशोभीकरण यांसारख्या पायाभूत सुविधांसाठी या निधीचा उपयोग केला जाणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली.

The post सौंदत्ती यल्लम्मा देवीच्या चरणी ३.०७ कोटींची विक्रमी देणगी appeared first on News 24 Tass Marathi.

आश्वासनांची पूर्तता ही माझी नैतिक जबाबदारी ; मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर
सुळगा (हिं.) येथे महालक्ष्मी मंदिराचे लोकार्पण

सुळगा (हिं.) / वार्ताहर

राजकारणात आश्वासने दिली जातात, पण ती पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारणारे नेतृत्व दुर्मिळ असते. मी दिलेल्या प्रत्येक आश्वासनाची पूर्तता ही माझी नैतिक जबाबदारी आहे, असे ठाम मत महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सुळगा (हिं.) येथे व्यक्त केले.

सुळगा (हिं.) गावात नव्याने उभारण्यात आलेल्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या वास्तुशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळ्यानिमित्त आयोजित लोकार्पण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या धार्मिक सोहळ्याला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला.

मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या की, गेल्या सात वर्षांत मतदारसंघातील १५० पेक्षा अधिक मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात आला असून यासोबतच रस्ते, पाणी, वीज आणि इतर मूलभूत सुविधांच्या विकासावर सातत्याने भर देण्यात येत आहे. प्रत्येक गावातील यात्रांसाठी ३ ते ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मतदारसंघातील विकासकामांसाठी मी कधीही मागे हटले नाही, असे सांगत मंत्री हेब्बाळकर यांनी केवळ निवडणुकीपुरते सक्रिय होणाऱ्या लोकांपेक्षा सातत्याने काम करणाऱ्यांवर विश्वास ठेवावा, असे आवाहन उपस्थितांना केले.

या प्रसंगी मंदिर उभारणीसाठी योगदान देणाऱ्या ग्रामस्थ व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला काडा अध्यक्ष युवराज कदम, बाळू देसुरकर, भागाण्णा नरोटी, संजय पाटील, रमेश खन्नुकर, पंचायत विकास अधिकारी वीणा हलवाई, जयवंत बाळेकुंद्री, मारुती पाटील, मल्लाप्पा सुळगेकर, काशीराम पाटील, अजित कलखांबकर, पप्पू पाटील, यल्लप्पा कलखांबकर, मनोज कलखांवकर, शेखर पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post आश्वासनांची पूर्तता ही माझी नैतिक जबाबदारी ; मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर appeared first on News 24 Tass Marathi.

चव्हाट गल्लीतील बालाजी मंदिराचा चौकट उभारणी सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न
बेळगाव : चव्हाट गल्लीतील पौराणिक बालाजी मंदिराचा सध्या जीर्णोद्धार करण्यात येत आहे. लाखो रुपये खर्चून मंदिराचे नव्याने बांधकाम सुरू असून, बुधवारी सकाळी ११ वाजता मंदिराच्या चौकट उभारणीचा कार्यक्रम विधिवत पूजनासह मोठ्या उत्साहात पार पडला.पी.बी.रोड येथील मुख्य प्रवेशद्वारासह गाभाऱ्याची चौकट भव्य मिरवणुकीने मंदिरात आणण्यात आली. प्रारंभी चव्हाट गल्ली परिसरातून चौकट मिरवणुकीला प्रारंभ झाला. संपूर्ण परिसरात भक्तीमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

बालाजी मंदिराचा चौकट उभारणी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजी मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष अरुण धमुने हे होते. मंदिराच्या जीर्णोद्धारामुळे परिसरात आनंदाचे वातावरण पसरले होते.

समोरील चौकटीचे पूजन विश्वास धुराजी, विश्वजित हसबे व दीपक गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. गाभाऱ्याच्या चौकटीचे दीपप्रज्वलन दिगंबर पवार, सुनील जाधव, चंद्रकांत कणबरकर, जोतिबा नाईक, मोहन किल्लेकर व विनायक मोहिते यांच्याहस्ते करण्यात आले. यानंतर चव्हाट गल्लीतील पंच कमिटी व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

‘चौकट पूजन’ सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडला. मंदिरात विधिवत पूजा, अभिषेक तसेच होम-हवन करण्यात आले. मुख्य पुजाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रोच्चारात चौकटीचे पूजन करण्यात आले.

या मंगलप्रसंगी परिसरातील शेकडो भाविकांनी दर्शनासाठी व सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठी गर्दी केली होती. ‘व्यंकटेश स्तोत्र’ आणि ‘गोविंदा-गोविंदा’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. चव्हाट गल्लीतील परंपरेनुसार चौकटीला गंध-अक्षता लावून व फुलांच्या माळांनी सजविण्यात आले होते. हा सोहळा मंदिराच्या पुढील बांधकामाची नांदी मानला जातो. सोहळ्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

मंदिराच्या ट्रस्टतर्फे उपस्थित सर्व मान्यवर व भाविकांचे आभार मानण्यात आले. या कार्यक्रमाला श्री व्यंकटेश मंदिर पंच कमिटी अध्यक्ष अरुण धमुने, लक्ष्मण धमुने, चंद्रकांत घगणे, राजाराम धमुने, मोहनसिंग टिंबरे, प्रकाश धमुने, प्रतापसिंह वंटमुरी, दिगंबर धमुने, गजानन शंकपुरे तसेच भजनी मंडळाचे कार्यकर्ते, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post चव्हाट गल्लीतील बालाजी मंदिराचा चौकट उभारणी सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न appeared first on News 24 Tass Marathi.