sub registrar office Archives | News 24 Tass Marathi

खानापूर उपनिबंधक कार्यालयात एजंटांचा वावर वाढल्याचा आरोप
नागरिकांमध्ये संताप

खानापूर : येथील उपनिबंधक व विवाह नोंदणी कार्यालयात एजंटांचा वावर वाढल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. कार्यालय प्रमुख रेणुका वक्कुंड वेळेवर उपस्थित राहत नसल्याने नागरिकांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत असून, या परिस्थितीचा काही एजंटांकडून गैरफायदा घेतला जात असल्याचे चित्र दिसत आहे.

कार्यालयातील शिस्त पूर्णपणे ढासळल्याची चर्चा सुरू आहे. अधिकारी वेळेत कार्यालयात हजर नसल्यामुळे कामासाठी आलेल्या नागरिकांना उन्हात थांबावे लागत आहे. त्याचवेळी एजंट मात्र आधीच कार्यालय परिसरात उपस्थित राहून व्यवहार करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

नोंदणीच्या कामासाठी दूरवरून येणाऱ्या नागरिकांना केवळ प्रतीक्षा करावी लागत असून, सरकारी सेवांपेक्षा एजंटांना अधिक प्राधान्य दिले जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे कार्यालयातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या संपूर्ण प्रकाराकडे तहसीलदार आणि जिल्हा निबंधकांनी तातडीने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, तसेच कार्यालयात वेळेचे पालन सुनिश्चित करावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

The post खानापूर उपनिबंधक कार्यालयात एजंटांचा वावर वाढल्याचा आरोप appeared first on News 24 Tass Marathi.

लोकायुक्तांच्या पथकाकडून उपनोंदणी ; जिल्हा रुग्णालयाची झाडाझडती
अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ

बेळगाव / प्रतिनिधी

उपनोंदणी कार्यालयाच्या कामकाजाबद्दल नेहमीच तक्रारी केल्या जातात. सध्या काहीजणांनी तक्रारी केल्यामुळे लोकायुक्त विभागाचे अधिवक्ता शुभवीर जैन यांनी बुधवारी (दि. ६) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या उपनोंदणी कार्यालयात जाऊन कागदपत्रांची पाहणी केली. अचानक दाखल झालेल्या या पथकामुळे उपनोंदणी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली होती.

उपनोंदणी कार्यालयामध्ये शुभवीर जैन दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रथम कागदपत्राची पाहणी केली. काही अधिकारी गैरहजर होते. याबद्दल उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. त्या ठिकाणी योग्य प्रकारे नोंदी नसल्याचेही आढळून आले. काही रजिस्टरमध्ये चुकीचा उल्लेख केला होता. याबाबत त्यांनी चौकशी केली, त्यावर थातूरमातूर उत्तरे देण्यात आली. त्यामुळे अधिकाऱ्यांची चांगली झाडाझडती घेतली. या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.

त्यामुळे जैन यांनी तुम्ही योग्य प्रकारे व वेळेत जनतेची कामे करत नसल्यामुळे ही गर्दी आहे. तेव्हा कार्यालयाच्या वेळेत हजर राहून जनतेची कामे भ्रष्टाचार न करता करावी, अशी सक्त ताकीद त्यांनी दिली आहे. अशोकनगरमधील मनपा कार्यालयाला भेट अशोकनगरमधील महापालिकेच्या विभागीय कार्यालयाला त्यांनी भेट दिली. त्यावेळी लोकायुक्त पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तेथील कागदपत्राची पाहणी करून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. जनतेच्या कामांचा निपटारा तातडीने करा अशी सूचना त्यांनी केली.

जिल्हा रुग्णालयात तपासणी :

लोकायुक्त अधिकारी जैन यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हा रुग्णालयात भेट देऊन रुग्णालयातील व्यवस्थेची पाहणी करण्यात आली. दरम्यान, रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या सेवासुविधांबरोबरच नोंदणी पुस्तकांचीही तपासणी करण्यात आली. रुग्णांशी संवाद साधून आरोग्य व्यवस्थेची माहिती जाणून घेण्यात आली. यावेळी बिम्स संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी यांनी रुग्णालयातील व्यवस्थेची माहिती दिली. रुग्णालयातील बाळंतिणींच्या मृत्यूबरोबरच बालमृत्यू प्रमाणासंदर्भातील माहिती जाणून घेण्यात आली.

The post लोकायुक्तांच्या पथकाकडून उपनोंदणी ; जिल्हा रुग्णालयाची झाडाझडती appeared first on News 24 Tass Marathi.