stray dog attack Archives | News 24 Tass Marathi

निपाणीत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी
निपाणी : शहरातील साई शंकर नगर परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. विहान तुषार कांबळे असे जखमी मुलाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विहान हा आपल्या घराजवळील गल्लीत इतर मुलांसोबत खेळत होता. त्यावेळी अचानक दोन भटकी कुत्री तेथे आली आणि त्यांनी विहानवर हल्ला चढवला. अनपेक्षितपणे झालेल्या या हल्ल्यामुळे मुलाला स्वतःचा बचाव करता आला नाही. कुत्र्यांनी त्याच्या हातावर, पायावर आणि मांडीवर चावे घेतल्याने तो गंभीर जखमी झाला.

हल्ल्यानंतर विहानने मोठ्याने आरडाओरडा केल्याने त्याचे आई-वडील आणि परिसरातील नागरिक तत्काळ घटनास्थळी धावून आले. त्यांनी कुत्र्यांना हुसकावून लावत मुलाची सुटका केली. त्यानंतर जखमी अवस्थेतील विहानला तातडीने उपचारासाठी महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर आवश्यक उपचार सुरू केले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने मुलगा धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

The post निपाणीत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी appeared first on News 24 Tass Marathi.

खानापुरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ
१० हून अधिक नागरिकांचा घेतला चावा

नगरपंचायतीच्या अधिकाऱ्याचा पाय फ्रॅक्चर

खानापूर : शहरातील विद्यानगर रेल्वे स्टेशन परिसरात गुरुवारी एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत १० ते १५ नागरिकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जखमींमध्ये महिला आणि पुरुषांचा समावेश आहे.

घटनेनंतर जखमींना तातडीने खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात हलविण्यात आले.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी नगरपंचायतीचे अधिकारी प्रेमानंद नाईक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित कुत्र्याचा पाठलाग करून त्याला ठार केले. मात्र, या कारवाईदरम्यान कुत्र्याने प्रेमानंद नाईक यांच्यावर हल्ला केल्याने ते खाली पडले आणि त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यांच्यावर खानापूर येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बेळगावला पाठविण्यात आले आहे. या झटापटीत तीन कामगार किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

गुरुवारी सायंकाळी विद्यानगर परिसरात आरती सुतार (वय २१), ज्योती सुतार (वय २५), विठ्ठल सुतार (वय ७०), पार्वती दाभिलकर (वय ७०), निसार अहमद बचोळी (वय ७६) आणि सुप्रिया पाटील (वय २७) यांना कुत्र्याने घरात घुसून चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांना बेवारस कुत्र्यांसाठी स्वतंत्र निवारा, अन्न आणि औषधोपचाराची व्यवस्था करण्याचे आदेश दिले असतानाही याबाबत प्रभावी उपाययोजना होत नसल्याची नाराजी नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. विद्यानगर आणि रेल्वे स्टेशन परिसरात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

The post खानापुरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ appeared first on News 24 Tass Marathi.

शहापूरमध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद
१२ हून अधिक नागरिक जखमी ; दुचाकींचेही नुकसान

बेळगाव : शहापूर परिसरातील जेड गल्ली, अळवण गल्ली आणि आसपासच्या भागात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांत या कुत्र्यांच्या हल्ल्यात १२ हून अधिक नागरिक जखमी झाले असून अनेक दुचाकींचेही नुकसान झाले आहे.

स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, सुमारे सात कुत्र्यांचा एक कळप अचानक आक्रमक बनला असून रस्त्याने ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांवर हल्ले करत आहे. विशेष म्हणजे, पूर्वी शांत असलेली ही कुत्री गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झाली आहेत.

कुत्र्यांकडून रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकींच्या सीट कव्हरचेही नुकसान केले जात आहे. शुक्रवारी सकाळी जेड गल्लीत उभ्या असलेल्या तीन दुचाकींच्या सीट कुशन फाडण्यात आल्याची घटना घडली.

स्थानिक रहिवासी जॉर्ज रॉड्रिग्ज हे देखील या हल्ल्याचे बळी ठरले. घरासमोर दुचाकी पार्क करत असताना एका कुत्र्याने त्यांच्या पायाचा चावा घेतला. “मी नेहमी या कुत्र्यांशी प्रेमाने वागतो, मात्र त्यांची अचानक वाढलेली आक्रमकता धक्कादायक आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. हल्ल्यानंतर त्यांच्या दुचाकीच्या सीटचेही नुकसान करण्यात आले.

या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून बेळगाव महानगरपालिका आणि स्थानिक नगरसेवकांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. नगरसेवक जयंत जाधव यांनी सांगितले की, महापालिकेचे पथक अनेकदा कुत्र्यांना पकडण्यासाठी आले होते, मात्र पथक येताच कुत्री पसार होत आहेत. प्रशासनाकडून लवकरच ठोस उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन देण्यात आले आहे.

The post शहापूरमध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद appeared first on News 24 Tass Marathi.

रयत गल्लीत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात १० वर्षांची चिमुरडी जखमी
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

महापालिकेकडे तातडीने कारवाईची करण्याची मागणी

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरातील रयत गल्ली परिसरात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला असून, रविवारी दुपारी एका १० वर्षांच्या चिमुरडीवर कुत्र्यांनी हल्ला करून तिला जखमी केले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रयत गल्लीतील रहिवासी निविका जितेंद्रसिंह राठोड हिला भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली. घटनेनंतर तिला तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर सोमवारी तिला घरी सोडण्यात आले आहे.

या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून भटक्या कुत्र्यांचा उपद्रव सुरू असून, वाहनांचे तसेच इतर साहित्याचे नुकसान होत असल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार करण्यात येत होती. मात्र, आता थेट लहान मुलांवर हल्ले सुरू झाल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे.

महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी रहिवाशांनी केली आहे. योग्य व तत्काळ कारवाई न झाल्यास महापालिकेसमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

The post रयत गल्लीत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात १० वर्षांची चिमुरडी जखमी appeared first on News 24 Tass Marathi.