Sports Archives | News 24 Tass Marathi

राज्य कनिष्ठ जलतरण स्पर्धेत एनके एज्युकेशन फाउंडेशनच्या अनिश कोरेचे घवघवीत यश
६ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य पदकांची ऐतिहासिक कमाई

बेळगाव : एनके एज्युकेशन फाउंडेशनचा विद्यार्थी अनिश अनिरुद्ध कोरे याने बेंगळुरू येथे झालेल्या NRJ स्टेट ज्युनियर स्विमिंग चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी करत तब्बल ८ पदके जिंकून संस्थेचे आणि बेळगावचे नाव उज्ज्वल केले. १३ ते १६ जुलैदरम्यान पार पडलेल्या चार दिवसीय राज्यस्तरीय स्पर्धेत अनिशने ६ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य पदकांची कमाई करत जलतरण तलावात आपले वर्चस्व सिद्ध केले.

बटरफ्लाय आणि फ्रीस्टाईल प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत अनिशने वैयक्तिक तसेच सांघिक गटात उल्लेखनीय यश मिळवले. २०० मीटर आणि १०० मीटर बटरफ्लाय स्पर्धेत सुवर्णपदके जिंकत त्याने या प्रकारातील आपली गुणवत्ता अधोरेखित केली. तसेच १०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये रौप्य, तर ५० मीटर बटरफ्लायमध्ये कांस्य पदक पटकावले.

सांघिक स्पर्धांमध्येही अनिशने मोलाची भूमिका बजावत ४×१०० मीटर मेडले रिले, ४×१०० मीटर फ्रीस्टाईल रिले, ४×१०० मीटर मिक्स्ड फ्रीस्टाईल रिले आणि ४×२०० मीटर फ्रीस्टाईल रिले या चारही प्रकारांत आपल्या संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले.

एकूण आठ पदकांच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे राज्यस्तरावर अनिशची ओळख अधिक भक्कम झाली असून, तो कर्नाटकमधील आश्वासक युवा जलतरणपटूंमध्ये अग्रस्थानी पोहोचला आहे.

अनिशच्या या यशाबद्दल एनके एज्युकेशन फाउंडेशनच्या व्यवस्थापन, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि जिद्दीच्या बळावर मिळवलेले हे यश संस्थेतील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

The post राज्य कनिष्ठ जलतरण स्पर्धेत एनके एज्युकेशन फाउंडेशनच्या अनिश कोरेचे घवघवीत यश appeared first on News 24 Tass Marathi.

बेंगळुरू राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या तनुज सिंगची दमदार कामगिरी
दोन रौप्य, एक कांस्य पदकाची कमाई

राष्ट्रीय कनिष्ठ जलतरण स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड

बेळगाव : कर्नाटक राज्य जलतरण संघटनेच्या वतीने बेंगळुरू येथील बसवनगुडी जलतरण तलावात आयोजित कनिष्ठ गटाच्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आबा अँड हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटू तनुज सिंग याने उल्लेखनीय कामगिरी करत दोन रौप्य आणि एक कांस्य पदकाची कमाई केली आहे. या उत्कृष्ट यशाच्या बळावर त्याची पुढील महिन्यात ओडिशामध्ये होणाऱ्या राष्ट्रीय कनिष्ठ जलतरण स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य संघात निवड झाली आहे.

स्पर्धेतील ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात तनुजने ३०.६४ सेकंदांची वेळ नोंदवत रौप्य पदक पटकावले. त्यानंतर २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक शर्यत २ मिनिटे ३२.०९ सेकंदांत पूर्ण करून आणखी एक रौप्य पदक आपल्या नावावर केले.

याशिवाय १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक स्पर्धेत १ मिनिट ०९.४८ सेकंदांची वेळ नोंदवत त्याने कांस्य पदकही जिंकले. सलग तीन प्रकारांमध्ये पदकांची कमाई करत तनुजने राज्यस्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली.

या यशामुळे पुढील महिन्यात ओडिशा येथे होणाऱ्या राष्ट्रीय कनिष्ठ गट जलतरण स्पर्धेत कर्नाटकचे प्रतिनिधित्व करण्याची संधी तनुजला मिळाली आहे.

तनुजच्या यशामागे एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार यांचे मार्गदर्शन लाभले असून, आबा अँड हिंद स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष शीतल हुळभत्ते, अरविंद संगोळी, शुभांगी मंगळूरकर तसेच नगरसेवक नितीन जाधव यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

The post बेंगळुरू राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या तनुज सिंगची दमदार कामगिरी appeared first on News 24 Tass Marathi.

इंडियन कराटे क्लब बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेच्या चार कराटेपटूंना ब्लॅक बेल्ट प्रदान
प्रेम सुतार, पृथ्वी सुतार, प्रथमेश पाटील आणि अपेक्षा पुजारी यांचा गौरव

१४५ कराटेपटूंचा बेल्ट परीक्षेत सहभाग

बेळगाव : इंडियन कराटे क्लब आणि बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेच्या वतीने मच्छे येथील सप्तपदी मंगल कार्यालयात आयोजित कराटे कलर बेल्ट परीक्षा आणि ब्लॅक बेल्ट प्रदान समारंभ उत्साहात पार पडला. या परीक्षेत १४५ कराटेपटूंनी सहभाग नोंदविला.

यावेळी प्रेम सुतार, पृथ्वी सुतार, प्रथमेश पाटील आणि अपेक्षा पुजारी या चार विद्यार्थ्यांना त्यांच्या सातत्यपूर्ण सराव, कठोर मेहनत आणि उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर ब्लॅक बेल्ट प्रदान करून गौरविण्यात आले.

हे चारही विद्यार्थी गेल्या नऊ वर्षांपासून इंडियन कराटे क्लबच्या मच्छे शाखेत नियमित प्रशिक्षण घेत असून राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये पदके पटकावत त्यांनी संस्थेसह बेळगावचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या यशामागे कराटे प्रशिक्षक निलेश गुरखा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

समारंभाला आदिवीर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पद्मराज पाटील, काँग्रेस साऊथच्या नेत्या माधुरी जाधव तसेच इंडियन कराटे क्लब आणि बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेचे अध्यक्ष कराटे मास्टर गजेंद्र काकतीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांचाही शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत कराटेमुळे शिस्त, आत्मविश्वास, स्वसंरक्षणाची क्षमता आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इंडियन कराटे क्लबच्या लेडी चीफ इन्स्ट्रक्टर हेमलता ग. काकतीकर तसेच प्रशिक्षक प्रभाकर किल्लेकर, परशुराम काकती, विजय सुतार, हरीष सोनार, रतिक लाड आणि किरण गडकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्षिता जांगिड यांनी केले.

The post इंडियन कराटे क्लब बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेच्या चार कराटेपटूंना ब्लॅक बेल्ट प्रदान appeared first on News 24 Tass Marathi.

भूतानमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या प्रशांत खन्नूकर यांचा श्रीराम सेना हिंदुस्थानकडून सत्कार
बेळगाव : भूतान येथे झालेल्या १६व्या दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव (बॉडी बिल्डिंग) अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकून देशाचे आणि बेळगावचे नाव उज्ज्वल करणारे आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू प्रशांत खन्नूकर यांचा श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.

श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते प्रशांत खन्नूकर यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. भूतानमध्ये झालेल्या या स्पर्धेत रौप्यपदक मिळवत प्रशांत खन्नूकर यांनी भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला असून त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

यावेळी रमाकांत कोंडुसकर म्हणाले, बेळगावच्या मातीने देशाला अनेक कर्तृत्ववान खेळाडू दिले आहेत. प्रशांत खन्नूकर यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि खेळाप्रती असलेले समर्पण यांच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे. त्यांचा हा सन्मान म्हणजे त्यांच्या संघर्षाची आणि मेहनतीची योग्य दखल असून त्यांच्या यशामुळे जिल्ह्यातील अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल.

सत्काराला उपस्थित मान्यवरांनी प्रशांत खन्नूकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून आगामी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

The post भूतानमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या प्रशांत खन्नूकर यांचा श्रीराम सेना हिंदुस्थानकडून सत्कार appeared first on News 24 Tass Marathi.

धारवाड विभागीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी ‘श्रेया पोटे’
१९ वर्षांखालील महिला आंतर-ग्रामीण क्रिकेट स्पर्धेसाठी संघ जाहीर

झोया इम्तियाज काझी उपकर्णधार

हुबळी : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना (केएससीए)तर्फे प्रथमच आयोजित करण्यात येणाऱ्या १९ वर्षांखालील महिला आंतर-ग्रामीण विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी धारवाड विभागीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघाच्या कर्णधारपदी सलामीवीर फलंदाज श्रेया पोटे तर उपकर्णधारपदी झोया इम्तियाज काझी हिची निवड करण्यात आली आहे.

केएससीएचे अध्यक्ष व्यंकटेश प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच ही स्पर्धा आयोजित करण्यात येत असून, ती २३ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत बंगळुरूत रंगणार आहे. २२ जुलै रोजी महाराणी ट्रॉफी स्पर्धेच्या उद्घाटन सामन्याने या स्पर्धेची सुरुवात होणार असून, ग्रामीण भागातील महिला क्रिकेटपटूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा उपक्रम मानला जात आहे.

धारवाड विभागाचे निमंत्रित वीरण्णा सवदी यांनी सोमवारी ४१ सदस्यीय संघाची घोषणा केली. अंतिम संघात श्रेया पोटे (कर्णधार), झोया इम्तियाज काझी (उपकर्णधार), आराधना हेब्बीकर, प्रार्थना बी. गौडा (यष्टीरक्षक), अपूर्वा अशोक होसवक्की, सिमरा लोंदेवाले, रिमझिम शुक्ला, अनुषा एस. मेनासिनाके, हर्षिता विक्रम नायक, अन्वी समीर यळ्ळूरकर, वैष्णवी श्रीकांत कांबळे, साक्षी कुबेर मुनवळ्ळी आणि मनुश्री राजेश कुर्थाकोटी यांचा समावेश आहे.

राखीव खेळाडू म्हणून निधी पाटील, त्रिवेणी गर्लगुंजी आणि दिशा पाटील यांची निवड करण्यात आली आहे. संघाचे प्रशिक्षक मल्लिकार्जुन बी., तर व्यवस्थापक म्हणून प्रद्या खिलारे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

श्रेया पोटे हिला कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे सदस्य व धारवाड विभागीय क्रिकेट समितीचे माजी सन्मान्वयक अविनाश पोतदार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच क्रिकेट प्रशिक्षक फिरोज शेख , फिटनेस प्रशिक्षक ओंकार मोटर आणि सतीश मोरे यांचे सहकार्य लाभले आहे.

The post धारवाड विभागीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी ‘श्रेया पोटे’ appeared first on News 24 Tass Marathi.

श्रेया पोटे हिची हुबळी टायगर संघात निवड
बेळगाव : बेळगाव नगरीचीअष्टपैलु महिला क्रिकेटपटू श्रेया पोटे हिची कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या वतीने २२ जुलै ते एक ऑगस्ट या दरम्यान होणाऱ्या कर्नाटक राज्यस्तरीय टी-२० महाराणी चषक या क्रिकेट स्पर्धेसाठी हुबळी टायगर्स या संघात निवड झाली आहे. श्रेया पोटे हिला कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे सदस्य व धारवाड विभागीय क्रिकेट समितीचे माजी सन्मान्वयक अविनाश पोतदार यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

The post श्रेया पोटे हिची हुबळी टायगर संघात निवड appeared first on News 24 Tass Marathi.

विद्या भारती जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत देवेंद्र जिनगौडा शाळेची दमदार कामगिरी
चारही गटांमध्ये भव्य पारितोषिके पटकावली

बेळगाव : विद्या भारतीच्या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत शिंदोळी येथील देवेंद्र जिनगौडा शाळेने दैदिप्यमान कामगिरी करत सहभागी झालेल्या चारही गटांमध्ये विजेतेपद पटकावले. प्राथमिक व माध्यमिक मुलगे आणि मुली अशा सर्व गटांमध्ये प्रतिस्पर्ध्यांवर मात करत शाळेने जिल्हास्तरावर आपले वर्चस्व सिद्ध केले.

गणेशपूर-हिंडलगा येथील संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने या प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील प्राथमिक मुलांच्या अंतिम सामन्यात देवेंद्र जिनगौडा शाळेने संत मीरा गणेशपूर संघाचा ७ गुणांनी पराभव करून विजेतेपद मिळविले. तर प्राथमिक मुलींच्या अंतिम सामन्यात शांतीनिकेतन स्कूल, खानापूरचा ११ गुणांनी पराभव करत अजिंक्यपदावर नाव कोरले.

माध्यमिक मुलांच्या उपांत्य फेरीत संत मीरा गणेशपूरने संत मीरा अनगोळचा ७ गुणांनी पराभव केला, तर देवेंद्र जिनगौडा शाळेने शांतीनिकेतन पब्लिक स्कूलवर ७ गुणांनी मात करून अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात संत मीरा गणेशपूरचा पुन्हा ७ गुणांनी पराभव करत देवेंद्र जिनगौडा शाळेने विजेतेपद पटकावले.

माध्यमिक मुलींच्या अंतिम सामन्यातही देवेंद्र जिनगौडा शाळेने शांतीनिकेतन पब्लिक स्कूल, खानापूरवर ११ गुणांनी विजय मिळवत चौथ्या गटातही अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले.

समारोप समारंभात मुख्याध्यापिका आरती पाटील, चंद्रकांत पाटील, अनुराधा पुरी, क्रीडा शिक्षक श्रीकांत कांबळे, शुभांगी काकतकर, शिवकुमार सुतार, गंगा गनिकोप्पा आणि सागर कोळेकर यांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक व पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी स्वाती सावंत, शिवकुमार, पूर्णिमा बढेकाई, सुजित नेरुळकर आणि सूरज देसुरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील यांनी केले, तर श्रीकांत कांबळे यांनी आभार मानले.

The post विद्या भारती जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत देवेंद्र जिनगौडा शाळेची दमदार कामगिरी appeared first on News 24 Tass Marathi.

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ज्योती सेंट्रल स्कूलच्या मास्टर वेदांतची रौप्यपदकाला गवसणी
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प-बेळगाव येथील राष्ट्रीय जलतरणपटू मास्टर वेदांत आनंद मिसाळे याने कर्नाटक स्विमिंग असोसिएशन आयोजित NRJ State Sub-Junior Swimming Championship 2026–27 या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत 14 वर्षांखालील मुलांच्या 200 मीटर बटरफ्लाय (Butterfly) प्रकारात द्वितीय क्रमांक (रौप्यपदक) पटकावून शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.

दि.3 ते 5 जुलै 2026 या कालावधीत येम्मेकेरे स्विमिंग पूल, मंगळुरू येथे झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातील उत्कृष्ट जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत वेदांतने 2 मिनिटे 21.70 सेकंदांची उत्कृष्ट वेळ नोंदवत द्वितीय क्रमांक मिळवला. त्याच्या या यशामुळे शाळा, शिक्षक, विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय कामगिरीनंतर राज्यस्तरावरही वेदांतने सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. या दैदिप्यमान यशाबद्दल शाळेचे एस.एम.सी. चेअरमन प्रा. श्री. आर. के. पाटील, व्हाईस चेअरमन प्रो. श्री. आर. एस. पाटील, सेक्रेटरी प्रो. श्री. नितीन घोरपडे यांनी वेदांतचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

तसेच शाळेचे प्राचार्य श्री. प्रदीप पाटील यांनी वेदांतच्या या अभिमानास्पद यशाबद्दल त्याचे विशेष अभिनंदन करून भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही अशीच उज्ज्वल कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

The post राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ज्योती सेंट्रल स्कूलच्या मास्टर वेदांतची रौप्यपदकाला गवसणी appeared first on News 24 Tass Marathi.

विद्याभारती फुटबॉल स्पर्धेत सेंट मीरा हायस्कूलला चारही गटांत विजेतेपद
ऐतिहासिक कामगिरीसह राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता

बेळगाव : विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत अणगोळ येथील सेंट मीरा इंग्लिश स्कूलने चारही गटांत विजेतेपद पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या दैदिप्यमान यशामुळे शाळेच्या सर्व संघांनी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.

टिळकवाडी येथील लेले मैदानावर सेंट मीरा शाळेच्या वतीने आयोजित या स्पर्धेत प्राथमिक आणि हायस्कूल अशा मुला-मुलींच्या चारही गटांमध्ये सेंट मीरा संघांनी वर्चस्व गाजवले.

प्राथमिक मुलींच्या अंतिम सामन्यात सेंट मीरा संघाने भातकांडे शाळेचा पेनल्टी शूटआऊटमध्ये २-१ असा पराभव केला. प्राथमिक मुलांच्या गटातही सेंट मीरा संघाने विजेतेपदावर नाव कोरले.

हायस्कूल मुलांच्या अंतिम सामन्यात खानापूरच्या शांतिनिकेतन संघाचा २-० असा पराभव करत सेंट मीराने अजिंक्यपद पटकावले. तर हायस्कूल मुलींच्या गटात भातकांडे शाळेवर २-० अशी मात करत चौथे विजेतेपदही आपल्या नावावर केले.

The post विद्याभारती फुटबॉल स्पर्धेत सेंट मीरा हायस्कूलला चारही गटांत विजेतेपद appeared first on News 24 Tass Marathi.

फुटबॉल स्पर्धेत संत मीरा, भातकांडे, शांतिनिकेतनचा अंतिम फेरीत प्रवेश
बेळगाव : टिळकवाडी येथील नेताजी सुभाष चंद्रबोस लेले मैदानावर विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत संत मीरा इंग्रजी शाळा अनगोळ आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत उदघाटनच्या दिवशी संत मीरा अनगोळ, गजाननराव भातकांडे स्कूल, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.

सकाळी स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमहापौर आनंद चव्हाण, विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, संत मीरा शाळेच्या उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, विद्याभारती शारीरिक शिक्षण प्रमुख चंद्रकांत पाटील, बापूसाहेब देसाई,जयसिंग धनाजी,हर्ष रेडेकर,ओमकार गावडे, मंजुळा,शिवकुमार सुतार, बसवंत पाटील या मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मैदानाचे पूजन खेळाडूंची ओळख व फुटबॉल चेंडूला ठीक मारून विद्याभारती जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी पाहुण्यांनी खेळाडूंना जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम व क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन आत्मसात केल्यास यश नक्की संपादन करता येते असे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर भाषण केले, याप्रसंगी पंच मानस नायक, आदित्य सानी स्वयम काकतकर प्रणव देसाई श्रीकांत कांबळे स्वरूप हलगेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

The post फुटबॉल स्पर्धेत संत मीरा, भातकांडे, शांतिनिकेतनचा अंतिम फेरीत प्रवेश appeared first on News 24 Tass Marathi.