solid garbage management Archives | News 24 Tass Marathi

कंग्राळी खुर्द गावाकडे जाणारा रस्ता की कचरा डेपो?
महिनाभरापासून रस्त्यालगत कचऱ्याचे ढीग

ग्रामस्थ आणि ऑटोचालकांचे तीव्र आंदोलन

बेळगाव : तालुक्यातील कंग्राळी खुर्द गावात कचरा विल्हेवाटीचा प्रश्न गंभीर बनला असून, रस्त्याच्या कडेला साचलेल्या कचऱ्यामुळे ग्रामस्थांचा संताप शिगेला पोहोचला आहे. गेल्या महिनाभरापासून मुख्य रस्त्यालगत कचरा सडत पडला असतानाही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत ग्रामस्थ आणि ऑटोचालकांनी आज रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले.

कंग्राळी खुर्द गावातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून, परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असून, आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. गेल्या २० दिवसांहून अधिक काळापासून ग्रामस्थांनी हा प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला असला तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

यावेळी संतप्त ग्रामस्थांनी महापालिका आणि ग्रामपंचायत प्रशासनावर गंभीर आरोप करत, दोन्ही यंत्रणा जबाबदारी एकमेकांवर ढकलत असल्याचे सांगितले. महापालिका अधिकारी हा भाग ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असल्याचे सांगत आहेत, तर ग्रामपंचायत प्रशासन पालिकेकडे बोट दाखवत आहे. या सीमावादाचा फटका मात्र सामान्य नागरिकांना बसत असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली.

ग्रामस्थांनी सांगितले की, रस्त्यावरील कचऱ्यामुळे काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला होता. तरीही प्रशासनाने यापासून कोणताही धडा घेतलेला नाही. कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अन्यथा येत्या काही दिवसांत आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ग्रामस्थ आणि ऑटोचालकांनी दिला आहे.

आंदोलनादरम्यान प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली असून, कंग्राळी खुर्द गावातील कचरा समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

The post कंग्राळी खुर्द गावाकडे जाणारा रस्ता की कचरा डेपो? appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावात आजपासून कचरा व्यवस्थापनाचे नवे कडक नियम लागू
चार प्रकारांत कचरा वर्गीकरण बंधनकारक

बेळगाव : शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी महापालिकेने आजपासून कचरा विल्हेवाटीबाबत नवे आणि कडक नियम लागू केले आहेत. यापुढे नागरिकांना घरातील कचरा चार वेगवेगळ्या प्रकारांत वर्गीकृत करूनच घंटागाडीकडे द्यावा लागणार असून नियमांचे पालन करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक नागरिकाने घरातील कचरा ओला, सुका, सॅनिटरी आणि ‘स्पेशल केअर वेस्ट’ अशा चार प्रकारांमध्ये वेगळा करणे आवश्यक राहील. हा कचरा स्वतंत्र पिशव्यांमध्ये भरून महापालिकेच्या कचरा संकलन वाहनांकडे सुपूर्द करावा लागणार आहे.

विशेषतः ‘स्पेशल केअर वेस्ट’मध्ये येणारे विजेचे बल्ब, इंजेक्शनच्या सिरिंज आणि इतर घातक वस्तू सामान्य कचऱ्यापासून पूर्णपणे वेगळ्या ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशा कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावल्यास पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण होण्यास मदत होईल, असे आयुक्तांनी सांगितले.

शहर स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे तसेच नव्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आयुक्त कार्तिक एम. यांनी केले.

The post बेळगावात आजपासून कचरा व्यवस्थापनाचे नवे कडक नियम लागू appeared first on News 24 Tass Marathi.

जि. पं. सीईओंकडून हालभावी परिसरात घनकचरा व्यवस्थापन राबवण्याचे निर्देश
बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव तालुक्यातील हालभावी येथील आयटीबीपी (इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस) प्रशिक्षण केंद्राला भेडसावणाऱ्या नागरी समस्यांच्या निराकरणासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. वंटमुरी ग्रामपंचायत तसेच संबंधित शासकीय विभागांनी केंद्राला आवश्यक ते सर्व सहकार्य तातडीने द्यावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिले.

आयटीबीपी प्रशिक्षण केंद्राच्या कार्यालयात गुरुवारी पार पडलेल्या विविध विभागांच्या समन्वय बैठकीत ते बोलत होते. हालभावी परिसरात सुरू असलेली पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याची कामे गतीने पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला. कोणत्याही परिस्थितीत प्रशिक्षण केंद्राला पाणीटंचाई भासू नये, याची दक्षता घेण्याचे आदेश संबंधित कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले.

बैठकीत आयटीबीपीचे डेप्युटी जनरल ब्रिगेडियर संदीप झुंझा यांनी पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला. दरवर्षी फेब्रुवारी ते जून या कालावधीत केंद्रात तीव्र पाणीटंचाई निर्माण होत असल्याने या काळात नियमित पाणीपुरवठा होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याची गंभीर दखल घेत राहुल शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विशेष कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले.

आयटीबीपी केंद्र हे राष्ट्रीय महत्त्वाचे असल्याने परिसर स्वच्छ व सुरक्षित राखणे ही वंटमुरी ग्रामपंचायतीची जबाबदारी असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. दररोज कचरा संकलन करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी हालभावी परिसरात घनकचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबवावे, असे आदेश त्यांनी दिले.

याच बैठकीत केंद्र परिसरात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवरही चर्चा झाली. प्रशिक्षणार्थींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पशुसंवर्धन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देण्यात आले. बैठकीस आयटीबीपीचे कमांडंट सिद्धिक पी. पी., प्रकल्प संचालक रवी बंगारेप्पनवर, उपसचिव बसवराज अडविमठ यांच्यासह विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

The post जि. पं. सीईओंकडून हालभावी परिसरात घनकचरा व्यवस्थापन राबवण्याचे निर्देश appeared first on News 24 Tass Marathi.