social Archives | News 24 Tass Marathi

श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे सर्वसामान्यांसाठी दुसऱ्या शववाहिकेचे लोकार्पण
रमाकांत आणि चंद्रकांत कोंडुसकर कुटुंबीयांचा सामाजिक उपक्रम

बेळगाव : नागरिकांना अडचणीच्या काळात तातडीची मदत मिळावी, या उद्देशाने श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने सर्वसामान्यांच्या सेवेसाठी दुसरी शववाहिका उपलब्ध करून देण्यात आली. शिवबसवनगर येथील कारंजीमठ-ज्योतिबा मंदिर परिसरात सोमवारी या शववाहिकेचा लोकार्पण सोहळा पार पडला.

श्रीराम सेना हिंदुस्थान आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सहकार्याने विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. त्याच सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून ही शववाहिका सेवा सुरू करण्यात आली आहे.

परमपूज्य गुरू चंद्रशेखर महाराज यांच्या उपस्थितीत आणि आशीर्वादाने लोकार्पण कार्यक्रम पार पडला. एखाद्या कुटुंबावर दुःखाचा प्रसंग ओढवल्यानंतर पार्थिव रुग्णालयातून इच्छित स्थळी नेण्यासाठी तसेच घरापासून स्मशानभूमीपर्यंत पार्थिव पोहोचविण्यासाठी या शववाहिकेचा उपयोग करता येणार आहे.

यावेळी गुरू चंद्रशेखर महाराज यांनी कोंडुसकर कुटुंबीयांकडून सुरू असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. समाजातील गरजू नागरिकांना अशा प्रकारची सेवा उपलब्ध करून देणे ही महत्त्वाची सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

लोकार्पण सोहळ्यास लक्ष्मीबाई जयवंत कोंडुसकर, चंद्रकांत कोंडुसकर, श्रीधर अळवणी, जोतीबा कळसेकर, विनायक कृष्णाचे, मारुती गुंडकल, नारायण कोंडुसकर, शिवराज कोंडुसकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

शववाहिका सेवेसाठी संपर्क : चंद्रकांत कोंडुसकर – ९४८०७३१०००

The post श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे सर्वसामान्यांसाठी दुसऱ्या शववाहिकेचे लोकार्पण appeared first on News 24 Tass Marathi.

ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून शेतकऱ्यांना फळझाडांची रोपे भेट
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगाव येथे शालेय प्राचार्य श्री. प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेश देत शेतकऱ्यांना फळझाडांची रोपे भेट दिली.

विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणप्रेम, वृक्षसंवर्धन, कृषीविषयक जाणीव आणि सामाजिक जबाबदारीची भावना रुजविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना फळझाडांची रोपे सुपूर्द करून त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी “आजचे रोप म्हणजे उद्याची सावली, फळे आणि समृद्धी” हा प्रेरणादायी संदेश दिला. वृक्षसंवर्धनासोबतच शेतकऱ्यांच्या भविष्यातील समृद्धीसाठी एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आले.

The post ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून शेतकऱ्यांना फळझाडांची रोपे भेट appeared first on News 24 Tass Marathi.

भाषेच्या भिंती ओलांडून कुगजी दाम्पत्याचा मदतीचा हात
कन्नड साहित्यिकांच्या पत्नीच्या हृदशस्त्रक्रियेसाठी २५ हजारांची मदत

येळ्ळूर : जात, धर्म आणि भाषेच्या भिंती बाजूला ठेवून गरजूंच्या मदतीला धावून जाणाऱ्या हणमंत कुगजी आणि त्यांच्या पत्नी उज्वला कुगजी यांनी जमखंडी येथील कन्नड साहित्यिक देशपांडे यांच्या पत्नीच्या हृदयशस्त्रक्रियेसाठी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत करून माणुसकीचा आदर्श निर्माण केला आहे.

जमखंडी येथील साहित्यिक देशपांडे यांच्या पत्नी वैभवी व्ही. देशपांडे यांच्यावर ओपन हार्ट सर्जरी करावी लागणार असून, त्यासाठी सुमारे साडेपाच लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या उपचाराची माहिती हणमंत कुगजी व त्यांच्या पत्नी उज्वला यांना मिळताच त्यांनी तातडीने देशपांडे कुटुंबीयांची भेट घेऊन २५ हजार रुपयांची मदत केली.

विशेष म्हणजे देशपांडे हे कन्नड भाषिक साहित्यिक आहेत. मात्र, भाषा, जात अथवा धर्माचा कोणताही भेद न करता कुगजी दाम्पत्याने मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हणमंत कुगजी यांनी यापूर्वीही अनेक गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत केली आहे. येळ्ळूर येथील किडनी विकाराने त्रस्त असलेल्या मुलीला उपचारासाठीही त्यांनी मोठी आर्थिक मदत केली होती. कोरोना काळात त्यांनी गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू, औषधे व इतर साहित्य उपलब्ध करून दिले होते.

मदतीच्या कार्यात पत्नीचीही खंबीर साथ :

हणमंत कुगजी यांच्या सामाजिक कार्यात त्यांच्या पत्नी उज्वला कुगजी यांची नेहमीच खंबीर साथ राहिली आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असलेल्या कुटुंबातून पुढे आलेल्या कुगजी यांनी गरजूंच्या अडचणी जवळून अनुभवल्या आहेत. त्यामुळेच शक्य असेल तेव्हा गरजूंच्या मदतीला धावून जाण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

सध्या अनेकदा भाषिक किंवा अन्य भेदांमुळे मदतीपासून काही जण वंचित राहतात. मात्र, माणुसकी हीच खरी ओळख मानून कुगजी दाम्पत्याने कन्नड साहित्यिकाच्या कुटुंबाला केलेली मदत सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश देणारी ठरली आहे.

The post भाषेच्या भिंती ओलांडून कुगजी दाम्पत्याचा मदतीचा हात appeared first on News 24 Tass Marathi.

विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा स्तुत्य उपक्रम
बेळगाव : शहरातील नामवंत बेळगाव रुरल इंडस्ट्रीज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, जिजामाता चौक, फोर्ट रोड यांच्या सौजन्याने चव्हाट गल्ली, बेळगाव येथील सरकारी मराठी मुला-मुलींची शाळा क्रमांक ५ येथे गुरुवारी सायंकाळी ठीक ४ वाजता शाळेच्या सभागृहात विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवीच्या पूजनाने झाली. सोसायटीचे चेअरमन मारुती सदावर यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर व्हाईस चेअरमन चेअरमन शिवाजी शहापूरकर सोसायटीचे संचालक किसन रेडेकर मिलिंद पावशे सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष दीपक किल्लेकर यांनी केले.

यावेळी सोसायटीचे चेअरमन श्री मारुतीराव सदावर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पालकांना आवाहन केले की, आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करू नका. प्रत्येक मूल हे विशेष असते. त्याच्यामध्ये दडलेले सुप्त गुण ओळखून त्याला आवडत्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन आणि पाठिंबा द्या.तसेच विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी मेहनत घेणाऱ्या शिक्षकांचे त्यांनी मनापासून आभार मानले.

संचालक कृष्णराव मोदगेकर यांनी एखाद्या विद्यार्थ्याला आर्थिक अडचण येत असेल तर त्यांनी कोणताही संकोच न करता सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांच्याशी संपर्क साधावा.आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, यासाठी शक्य ती मदत करण्यात येईल, अशी ग्वाही मोदगेकर यांनी यावेळी दिली.

सामाजिक कार्यकर्ते सुनिल जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिकेल तो टिकेल हा संदेश दिला. या शाळेतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत. शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या संधीचा योग्य उपयोग करून आयुष्यात मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करावेत, असे आवाहन त्यांनी केले.एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेत ३५ टक्के गुण मिळाले तरी त्याने निराश होऊ नये. अपयश आले म्हणून थांबायचे नाही. पुन्हा जिद्दीने अभ्यास करून मोठे यश मिळविण्याचे स्वप्न पाहिले पाहिजे असे सुनील जाधव यांनी सांगितले.

यानंतर चव्हाट गल्लीतील सामाजिक कार्यकर्ते व सोसायटीचे संचालक किसन रेडेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी केवळ शालेय अभ्यासावर लक्ष न देता विविध कलाक्षेत्रांसह क्रीडा क्षेत्रातही उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा आणि आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल करावे. कोणताही विद्यार्थी मागे राहता कामा नये. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःला विकसित करून बदलत्या काळाशी जुळवून घेतले पाहिजे.असे रेडेकर यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे शाळेचे मुख्याध्यापक पुंडलिक मुचंडीकर यांनी उपस्थितांनी कौतुक केले.

कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव सोसायटीचे संचालक,चेअरमन श्री मारुतीराव सदावर व्हाईस चेअरमन शिवाजी शहापूरकर विद्यमान संचालक कृष्णराव मोदगेकर किसन रेडेकर मिलिंद पावशे रमेश मोदगेकर मल्लाप्पा चौगुले रघुनाथ पाटील जनरल सेक्रेटरी विनायक गोदे शाळेतील शिक्षकवर्ग पालकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पी एस माळी सर यांनी आभार प्रदर्शन केले.

The post विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा स्तुत्य उपक्रम appeared first on News 24 Tass Marathi.

ॲनिमिया मुक्त बेळगाव अभियानाला यश
चार दिवसीय तपासणी टप्पा पूर्ण

हॅपीहार्ट फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण यांचा संयुक्त उपक्रम

बेळगाव : मुलांच्या आरोग्य व कल्याणासाठी हॅपीहार्ट फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘ॲनिमिया मुक्त बेळगाव’ या आरोग्य अभियानाचा चार दिवसीय तपासणी टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला. पर्याय फाउंडेशननेही या उपक्रमाला सहकार्य केले.

कॅन्टोन्मेंट बोर्ड, बेळगाव येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अभियानाची सांगता झाली. यावेळी ३१५ विद्यार्थ्यांची ॲनिमियासाठी तपासणी करण्यात आली. चार दिवसांत एकूण १,४७५ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.

मुलांमध्ये ॲनिमियाबाबत जनजागृती करणे, त्याचे लवकर निदान करणे आणि वेळेवर पोषणात्मक उपाययोजना उपलब्ध करून देणे हा अभियानाचा मुख्य उद्देश होता.

अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी रोटरी क्लबने हॅपीहार्ट फाउंडेशन, पर्याय फाउंडेशन, स्वयंसेवक आणि क्लबच्या सर्व सदस्यांचे आभार मानले. यावेळी अध्यक्ष रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तीहोळी यांनी ॲनिमियाचे लवकर निदान व वेळेवर उपचार आणि पोषणात्मक हस्तक्षेपाचे महत्त्व अधोरेखित केले. सचिव रोटेरियन ज्योती कुलकर्णी यांनी उपक्रमात सहभागी सर्व संस्था, स्वयंसेवक आणि सदस्यांच्या योगदानाचे कौतुक केले.

The post ॲनिमिया मुक्त बेळगाव अभियानाला यश appeared first on News 24 Tass Marathi.

‘पाही वाईब्स फाउंडेशन’तर्फे गणाचारी रुद्रभूमीत वृक्षारोपण मोहीम
‘ग्रो-ग्रीन’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

बेळगाव : शहरातील हरित आच्छादन वाढविण्याच्या उद्देशाने ‘पाही वाईब्स फाउंडेशन’च्या वतीने ‘वीरशैव समाज सेवा समिती’च्या सहकार्याने सदाशिवनगर येथील गणाचारी रुद्रभूमी परिसरात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.

यावेळी श्री. शिवाजी कागणीकर यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी मार्गदर्शन करत उपक्रमाचे कौतुक केले आणि आयोजकांना शुभेच्छा दिल्या.

वृक्षारोपणासाठी मोफत रोपे उपलब्ध करून देत मोहिमेत सहकार्य केल्याबद्दल ‘पाही वाईब्स फाउंडेशन’च्या वतीने आरएफओ प्रशांत गौराणी यांचे आभार मानण्यात आले. तसेच योग्य वेळी निर्णय घेऊन मोहीम यशस्वी करण्यासाठी सातत्याने सहकार्य केल्याबद्दल रमेश कळसन्नावर यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

या उपक्रमात सहभागी झालेल्या ‘पाही वाईब्स फाउंडेशन’च्या सदस्य आणि स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदविला. शहरातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी अशा उपक्रमांमध्ये सातत्य ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

The post ‘पाही वाईब्स फाउंडेशन’तर्फे गणाचारी रुद्रभूमीत वृक्षारोपण मोहीम appeared first on News 24 Tass Marathi.

बनशंकरी महिला मंडळाच्या आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
शंभर नागरिकांनी घेतला लाभ

पिरणवाडी : बनशंकरी महिला मंडळ, पिरणवाडी यांच्या वतीने शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट रोजी विनायक नगर येथील विनायक मंदिरात सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचा सुमारे शंभर नागरिकांनी लाभ घेतला..

शिबिरात सामान्य तपासणी, रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कावीळ, अर्धांगवायू, दमा, लिव्हरचे आजार, मूत्रपिंडाचे विकार, हाडांच्या सांध्यांचे विकार, थायरॉईड, त्वचारोग, मूळव्याध तसेच बालरोग, स्त्रीरोग व क्षयरोगासंबंधी तपासण्या करण्यात आल्या. तसेच नेत्र तपासणी करून आवश्यक त्या नेत्र उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

‘डॉ. अग्रवाल नेत्रदर्शन’चे श्री. उदयकुमार, श्रीमती श्रीदेवी (ऑप्टोमेट्रिस्ट) व श्री. नरेंद्र बिर्जे (तंत्रज्ञ) तसेच ‘आदिवीर’ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मच्छेचे डॉ. पद्मराज पाटील, डॉ. विद्या पी. पाटील, डॉ. नवाज मुल्ला व त्यांच्या कर्मचारीवर्गाने तपासणी व उपचार सेवा दिली.

शिबिर यशस्वी होण्यासाठीमहिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. जयश्री यल्लप्पा मिरजी, सचिव वैशाली लक्ष्मण हुल्लोळी, सदस्य यल्लव्वा कलसप्पान्नावर, साधना शिवाजी साकळकर आणि मेघा संतोष नौकुडकर यांच्यासह मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी समाजसेविका माधुरी जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले.

The post बनशंकरी महिला मंडळाच्या आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद appeared first on News 24 Tass Marathi.

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे ‘ॲनिमिया मुक्त बेळगाव’ शिबिर यशस्वी
कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी शाळेत २७२ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी

बेळगाव : शालेय विद्यार्थ्यांमधील ॲनिमियाचे लवकर निदान आणि आरोग्य जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणने हॅपीहार्ट फाउंडेशनच्या सहकार्याने कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी शाळा येथे ‘ॲनिमिया मुक्त बेळगाव’ अभियानांतर्गत आणखी एक तपासणी शिबिर यशस्वीरित्या आयोजित केले.

या शिबिरामध्ये एकूण २७२ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन (Hb) तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ॲनिमियाचे निदान झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आरोग्य आणि पोषणस्थितीत सुधारणा व्हावी यासाठी आवश्यक मार्गदर्शन व तातडीची मदत उपलब्ध करून देण्यात आली.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल पर्याय फाउंडेशनचे रोटरी क्लबतर्फे विशेष आभार मानण्यात आले. तसेच या समाजोपयोगी उपक्रमात योगदान देणाऱ्या क्लबच्या सर्व सदस्यांचे आणि स्वयंसेवकांचेही कौतुक करण्यात आले.

हा उपक्रम रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तीहोळी यांच्या नेतृत्वाखाली आणि सचिव रोटेरियन ज्योती कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला. शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आणि समाजात दीर्घकालीन सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी क्लब अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने करत राहणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

The post रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे ‘ॲनिमिया मुक्त बेळगाव’ शिबिर यशस्वी appeared first on News 24 Tass Marathi.

कॅन्टोनमेंट बोर्ड उर्दू शाळेत ‘ॲनिमिया मुक्त बेळगाव’ शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण व हॅपीहार्ट फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम

५१६ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी

बेळगाव : समाजातील बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी राबविण्यात येत असलेल्या “ॲनिमिया मुक्त बेळगाव” या उपक्रमांतर्गत रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण आणि हॅपीहार्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्टोनमेंट बोर्ड उर्दू शाळेत ॲनिमिया तपासणी व जनजागृती शिबिर यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आले.

या शिबिरात एकूण ५१६ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन (Hb) तपासणी करण्यात आली. तपासणीत ॲनिमियाचे निदान झालेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ लोहयुक्त (आयर्न) गोळ्यांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांमधील ॲनिमियाचे लवकर निदान करून योग्य वेळी उपचार सुरू करणे, तसेच त्यांच्या उत्तम आरोग्य आणि शैक्षणिक प्रगतीला चालना देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

शिबिराचे नियोजन आणि आयोजन कार्यक्रम अध्यक्षा रोटेरियन शीला पाटील यांनी प्रभावीपणे केले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक तसेच रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांचे आयोजकांनी आभार मानले.

हा उपक्रम रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तिहोळी यांच्या अध्यक्षतेखाली आणि रोटेरियन ज्योती कुलकर्णी यांच्या सचिवपदाच्या नेतृत्वात पार पडला. बेळगावातील विद्यार्थ्यांचे आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी आणि ॲनिमियामुक्त समाज घडविण्याच्या उद्देशाने अशा समाजोपयोगी उपक्रमांची मालिका भविष्यातही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे सांगण्यात आले.

The post कॅन्टोनमेंट बोर्ड उर्दू शाळेत ‘ॲनिमिया मुक्त बेळगाव’ शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद appeared first on News 24 Tass Marathi.

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे सहावे ॲनिमिया तपासणी शिबिर यशस्वी
“ॲनिमिया मुक्त बेळगाव” अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

३६७ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

हिमोग्लोबिन तपासणीसह तज्ज्ञांकडून वैद्यकीय मार्गदर्शन

बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे राबविण्यात येत असलेल्या “ॲनिमिया मुक्त बेळगाव” अभियानांतर्गत एम.एन.आर.एस. कन्नड माध्यम शाळा, महांतेश नगर येथे सहावे ॲनिमिया तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. हॅपी हार्ट फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात ३६७ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये रक्ताल्पतेचे लवकर निदान करून त्यावर योग्य वेळी उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. शिबिरादरम्यान भारतेश होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापक आणि वैद्यकीय पथकाने विद्यार्थ्यांची सर्वसाधारण आरोग्य तपासणीही केली. तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन देण्यात आले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे एम.एन.आर.एस. कन्नड माध्यम शाळेचे व्यवस्थापन, शिक्षकवृंद, हॅपी हार्ट फाउंडेशन तसेच भारतेश होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापक आणि वैद्यकीय पथकाचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेणाऱ्या क्लबच्या सदस्य आणि स्वयंसेवकांचेही विशेष कौतुक करण्यात आले. “ॲनिमिया मुक्त बेळगाव” अभियानाच्या माध्यमातून निरोगी आणि ॲनिमियामुक्त समाज घडविण्याच्या उद्दिष्टासाठी रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण सातत्याने कार्यरत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

या प्रकल्पाचे नेतृत्व क्लब अध्यक्षा रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तीहोळी, क्लब सचिव रोटेरियन ज्योती कुलकर्णी आणि प्रकल्प अध्यक्षा रोटेरियन ॲड. नैना यांनी केले. त्यांच्या प्रभावी नेतृत्व आणि उत्कृष्ट समन्वयामुळे हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

The post रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे सहावे ॲनिमिया तपासणी शिबिर यशस्वी appeared first on News 24 Tass Marathi.