shabdagandha kavi mandal Archives | News 24 Tass Marathi

शब्दगंध कवी मंडळ संघाचा ३६ वा वर्धापन दिन शनिवारी
कवयित्री उर्मिला शहा यांच्या ‘बाई म्हणून जगताना’ कवितासंग्रहाचे प्रकाशन

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अनिल सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सोहळा

कवी-समीक्षक चंद्रकांत बाबर यांची प्रमुख उपस्थिती

बेळगाव : बेळगावच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेली ३६ वर्षे सातत्याने कार्यरत असलेल्या शब्दगंध कवी मंडळ संघाचा ३६ वा वर्धापन दिन आणि ज्येष्ठ कवयित्री उर्मिला शहा यांच्या ‘बाई म्हणून जगताना’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता मराठी विद्यानिकेतन शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने या विशेष साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अनिल सामंत उपस्थित राहणार आहेत. सांगली येथील प्रसिद्ध कवी आणि समीक्षक चंद्रकांत बाबर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच कवितासंग्रहाच्या लेखिका ज्येष्ठ कवयित्री उर्मिला शहा यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

प्रा. अनिल सामंत :

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत हे मराठी भाषा, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष म्हणून ते मराठी भाषा आणि साहित्याच्या संवर्धनासाठी कार्यरत आहेत. त्यांनी गोवा मराठी अकादमीचे अध्यक्षपद तसेच विद्या भारती, गोवा या संस्थेचे अध्यक्षपद भूषविले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या शालेय शिक्षणातील अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना गोवा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मराठी भाषा, साहित्य, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याची विविध स्तरांवर दखल घेण्यात आली आहे. संगीत क्षेत्रातही त्यांना विशेष रस असून मराठी भावगीतांच्या सीडीची निर्मिती आणि संगीतविषयक व्याख्यानांच्या माध्यमातून त्यांनी योगदान दिले आहे.

चंद्रकांत बाबर :

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चंद्रकांत बाबर हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील एक महत्त्वाचे कवी, समीक्षक आणि साहित्यिक विचारवंत म्हणून ओळखले जातात. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आरग येथील रहिवासी असलेल्या बाबर यांनी कविता, समीक्षा आणि वैचारिक लेखन या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांचे ‘यास्मिन : एक आठवण’, ‘यास्मिन आणि इतर दीर्घकविता’ आणि ‘माझ्यातल्या कवितेची हळूहळू होत लागली आहे वाफ’ हे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. तसेच ‘पर्यायी मांडणीच्या हस्तक्षेपांचे अधोरेखन’ आणि ‘गोलपिठा : पर्यायी साहित्यशास्त्राचा केंद्रबिंदू’ हे त्यांचे समीक्षाग्रंथ प्रसिद्ध आहेत. विविध नियतकालिकांतून त्यांचे कविता, लेख आणि समीक्षात्मक लेखन प्रकाशित झाले आहे. त्यांच्या कवितेत सामाजिक वास्तव, मानवी संवेदना, परिवर्तनवादी विचार आणि प्रस्थापित व्यवस्थेविषयीची चिकित्सक भूमिका प्रकर्षाने दिसून येते. साहित्याच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक परिवर्तन घडविण्याचा त्यांचा प्रयत्न विशेष उल्लेखनीय आहे.

उर्मिला शहा :

या कार्यक्रमात ज्यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन होणार आहे, त्या कवयित्री उर्मिला शहा या बेळगावातील मराठी साहित्यविश्वातील एक संवेदनशील कवयित्री म्हणून परिचित आहेत. या आधी त्यांचे ‘प्राजक्तधारा’, ‘घायाळ आभाळ’, ‘मनाची डायरी’ आदी संग्रह प्रकाशित आहेत. त्यांच्या कवितेत स्त्रीजीवनाचे विविध पैलू, स्त्रीच्या मनातील भावभावना, तिचे दुःख, संघर्ष, कौटुंबिक नातेसंबंध आणि सामाजिक वास्तव यांचे प्रभावी चित्रण आढळते. ‘बाई म्हणून जगताना’ या कवितासंग्रहाच्या माध्यमातून स्त्रीजीवनातील विविध अनुभव आणि भावविश्व वाचकांसमोर येणार आहे. त्यामुळे या कवितासंग्रहाचे प्रकाशन ही सीमाभागातील मराठी साहित्यविश्वासाठी एक महत्त्वाची घटना ठरणार आहे.

शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव या संस्थेची स्थापना १३ सप्टेंबर १९९० रोजी झाली. गेल्या ३६ वर्षांत या संस्थेने मराठी कविता, साहित्य आणि सांस्कृतिक चळवळ समृद्ध करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. नवोदित आणि प्रस्थापित कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, कवी संमेलने, साहित्यिक व्याख्याने, कवितावाचन, साहित्यचर्चा आणि काव्यलेखन कार्यशाळांचे आयोजन करणे अशा विविध उपक्रमांतून संस्थेने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विशेषतः महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी ही संस्था सक्रियपणे कार्यरत आहे.

या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते कवितासंग्रहाचे प्रकाशन होणार असून मराठी कविता, समकालीन साहित्य आणि स्त्रीजीवनाचे साहित्यिक चित्रण या विषयांवर मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी साहित्यप्रेमींना मिळणार आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शब्दगंध कवी मंडळ संघाचे पदाधिकारी आणि सदस्य परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमास बेळगाव शहर आणि परिसरातील कवी, लेखक, साहित्यिक, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, मराठी भाषाप्रेमी आणि साहित्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शब्दगंध कवी मंडळ संघाचे सचिव सुधाकर गावडे यांनी केले आहे.

The post शब्दगंध कवी मंडळ संघाचा ३६ वा वर्धापन दिन शनिवारी appeared first on News 24 Tass Marathi.