school Archives | News 24 Tass Marathi

कर्ले माध्यमिक विद्यालयाला वॉटर फिल्टरची भेट
कावळेवाडी : राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेच्या वतीने कर्ले येथील माध्यमिक विद्यालयाला वॉटर फिल्टर भेट देण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

कार्यक्रमात योग प्रशिक्षक गोपाळराव देशपांडे यांच्या हस्ते वॉटर फिल्टरचे पूजन करण्यात आले, तर एम. पी. मोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष वाय. पी. नाईक यांच्या हस्ते वॉटर फिल्टरचे उद्घाटन करण्यात आले.

प्रास्ताविकात मुख्याध्यापक पी. आर. सांबरेकर यांनी महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे ग्रामीण भागात विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवले जात असल्याचे सांगितले. विशेषतः विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे आणि विधायक विचारांना चालना देणारे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी वाय. पी. नाईक यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच महात्मा गांधी सामाजिक संस्थेच्या वतीने यल्लापा बुरुड, सौ. के. एम. सातेरी आणि मुख्याध्यापक पी. आर. सांबरेकर यांचाही शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा घेण्यात आली. योग्य उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘श्यामची आई’ हे पुस्तक भेट देऊन प्रोत्साहित करण्यात आले.

या कार्यक्रमाला वाय. पी. नाईक, गोपाळराव देशपांडे, यल्लापा बुरुड, पी. एस. मोरे, सौ. पी. पी. डेळेकर, पी. के. शेळके, लक्ष्मण जाधव, मुख्याध्यापक पी. आर. सांबरेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

महात्मा गांधी सामाजिक संस्थेने यापूर्वी कावळेवाडी प्राथमिक शाळा आणि बिजगर्णी हायस्कूल येथेही वॉटर फिल्टरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, मोफत पुस्तकांच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला चालना देणे तसेच विविध स्पर्धांच्या आयोजनातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला प्रोत्साहन देणे, असे समाजोपयोगी उपक्रम संस्था गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने राबवत आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. के. एम. सातेरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षक के. जी. मेणसे यांनी केले.

The post कर्ले माध्यमिक विद्यालयाला वॉटर फिल्टरची भेट appeared first on News 24 Tass Marathi.

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे कडोली शासकीय हायस्कूलमध्ये वृक्षारोपण
पर्यावरण संवर्धनाचा संदेश ; विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन

बेळगाव : पर्यावरण संवर्धनाची जाणीव समाजात अधिक दृढ व्हावी आणि भावी पिढ्यांसाठी हरित व शाश्वत भविष्य घडावे या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे कडोली येथील शासकीय हायस्कूलमध्ये वृक्षारोपण मोहीम उत्साहात राबविण्यात आली. या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाची भावना रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या मोहिमेचे नेतृत्व क्लबच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तिहोळी यांनी केले. क्लबच्या सचिव रोटेरियन ज्योती कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तर प्रकल्पाच्या अध्यक्षा म्हणून रोटेरियन सविता हेब्बार यांनी संपूर्ण उपक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमाचे समन्वयन क्लबच्या चार्टर अध्यक्षा रोटेरियन शीतल चिलमी यांनी प्रभावीपणे पार पाडले.

उपक्रमात रोटेरियन शिवलीला कांपळी, रोटेरियन रक्षा उपाध्ये आणि रोटेरियन सविता वेसणे यांनीही सक्रिय सहभाग घेत वृक्षारोपण केले. पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी वृक्षांचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. कांबळी आणि कार्यक्रम समन्वयक सौ. प्रवीणा यांचा रोटरी क्लबतर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना क्लबच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तिहोळी यांनी वृक्षारोपण ही केवळ एकदिवसीय मोहीम नसून पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने चालणारी चळवळ असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी लावलेल्या प्रत्येक रोपाची जपणूक करून त्याचे संगोपन करावे आणि निसर्गाचे जबाबदार रक्षक बनावे, असे त्यांनी आवाहन केले.

पर्यावरणीय शाश्वतता, सामाजिक बांधिलकी आणि भावी पिढ्यांसाठी निरोगी व सुरक्षित पर्यावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांचे सातत्याने आयोजन करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

The post रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे कडोली शासकीय हायस्कूलमध्ये वृक्षारोपण appeared first on News 24 Tass Marathi.

जोशीज स्कूलमध्ये किशोरवयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
बेळगाव / प्रतिनिधी

आधार एज्युकेशन सोसायटी संचालित जोशी सेंट्रल पब्लिक स्कूल मध्ये किशोरवयीन विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील मौलिक मार्गदर्शन कार्यक्रम नुकताच पार पडला.

यामध्ये किशोरवयीन अवस्था, वैयक्तिक सुरक्षा आणि पॉक्सो कायद्यावर जागरूकता कार्यक्रम यावेळी घेण्यात आला. पौगंडावस्थेतील मानसिकता, चांगला स्पर्श,वाईट स्पर्श आणि . वैयक्तिक सुरक्षा यांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. किशोरवयीन अवस्थेतील भावनिक आणि शारीरिक बदल, तसेच बाल संरक्षणाचे महत्त्व याबद्दल विद्यार्थ्यांना स्क्रीन वरील सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.

शिवबसवज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मधील तज्ज्ञ, डॉ. नूतन गुणदाळ आणि डॉ. अस्मिता पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. अरुण जाधव यांनी अध्यक्षीय विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश्वरी तरबर यांनी केले. गीता इटगी आणि सहना प्रभू यांनी व्याख्यात्यांची ओळख करून दिली. कार्यक्रम संयोजनासाठी शिक्षक वर्गाने परिश्रम घेतले.

The post जोशीज स्कूलमध्ये किशोरवयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन appeared first on News 24 Tass Marathi.

मराठी शाळांमधील कन्नड सक्ती – मराठी पाठ्यपुस्तकांची अनुपलब्धता याची केंद्रीय स्तरावर दखल
केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाचे कर्नाटक सरकारला निर्देश

बेळगाव : जिल्ह्यातील मराठी भाषिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि भाषिक हक्कांवर गदा आणली जात असल्याच्या तक्रारीची भाषिक अल्पसंख्यांक आयोगाच्या वतीने गंभीर दखल घेण्यात आली आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने मागील महिन्यात बेळगावच्या जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना मराठी शाळांमधील कन्नड सक्ती थांबवणे आणि मराठी पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. या तक्रारीची दखल घेत ‘केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयुक्त’ नवी दिल्ली येथील कार्यालयाने कर्नाटक सरकारच्या शिक्षण खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र पाठवून आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहे पत्रात?

केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयुक्तालयाचे उपसचिव आणि प्रभारी उपाआयुक्त मुन्ना प्रसाद यांनी कर्नाटक सरकारच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना ६ जुलै २०२६ रोजी हे अधिकृत पत्र धाडले आहे. या पत्रामध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी ९ जून २०२६ आणि १५ जून २०२६ रोजी पाठवलेल्या निवेदानाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.

पत्रात म्हटले आहे की, “बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि भाषिक हक्कांचे उल्लंघन होत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली आहे. भारतीय संविधानाच्या कलम ३५० ‘अ’ (Article 350A) अंतर्गत भाषिक अल्पसंख्याक समुदायाला मिळालेल्या घटनात्मक संरक्षणाचा विचार करून, या प्रकरणात तातडीने लक्ष घालून योग्य ती आवश्यक कारवाई करण्यात यावी”.

या प्रकरणी कर्नाटक सरकारने काय कारवाई केली, याची माहिती लवकरात लवकर तक्रारदार (महाराष्ट्र एकीकरण युवा समिती) कळवावी आणि त्याची एक प्रत आयुक्तांच्या माहितीसाठी या कार्यालयालाही सादर करावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

मराठी शाळांमध्ये कन्नड भाषेची सक्ती करणे आणि मराठी माध्यमाची पुस्तके वेळेवर उपलब्ध न करून देणे, हा सीमाभागातील मराठी विद्यार्थ्यांवर होणारा मोठा अन्याय आहे. याविरोधात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने स्थानिक पातळीवर प्रशासनाला धारेवर धरले होते आणि या संदर्भात केंद्र आणि संबंधित खात्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आता केंद्र सरकारने कर्नाटकच्या शिक्षण विभागाला संविधानाचा दाखला देत जाब विचारल्यामुळे, सीमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या बाबतीत आता कर्नाटक सरकार काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आश्वासन देऊन सुद्धा अजून के. पी. एस. शाळांमध्ये मराठी पुस्तके नाहीत

बेळगावमधील, खानापूर, आणि निपाणी मधील प्रत्येकी एक शाळेला केपीएस शाळेचा दर्जा देत या शाळा द्विभाषिक माध्यम म्हणून सुरू करण्यात आल्या. त्या संदर्भात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने निवेदन दिल्या नंतर लवकरात लवकर मराठी पुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते, पण शाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी अजून संबंधित शाळांना मराठी पुस्तके मिळाली नाहीत. आता केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या पत्राची दखल घेऊन लवकर पुस्तके उपलब्ध करून द्यावी नाहीतर त्यांचा अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणे सुरू ठेवावा अशी मागणी युवा समितीने केली आहे.

The post मराठी शाळांमधील कन्नड सक्ती – मराठी पाठ्यपुस्तकांची अनुपलब्धता याची केंद्रीय स्तरावर दखल appeared first on News 24 Tass Marathi.

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
१७० विद्यार्थ्यांची दंत, हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी ; आरोग्य जनजागृतीला चालना

बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या वतीने शिवबसवनगर येथील श्री सिद्धरामेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मोफत दंत तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी आणि रक्तगट निश्चिती शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात १७० विद्यार्थ्यांची विविध आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी क्लबच्या अध्यक्षा रोटे. डॉ. स्फूर्ती मस्तीहोळी यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षा रोटे. उर्मिला गणी यांच्या नियोजन व समन्वयाचे कौतुक केले. तसेच सचिव रोटे. ज्योती कुलकर्णी यांनी केलेल्या प्रभावी व्यवस्थापनाबद्दलही त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

या उपक्रमात रोटे. डॉ. स्मिता गुडगणट्टी, रोटे. राजनंदा गार्गी, रोटे. सुरेखा मुम्मिगट्टी आणि रोटे. लक्ष्मी चव्हाण यांनी सक्रिय सहभाग घेत शिबिराच्या यशस्वी आयोजनात मोलाचे योगदान दिले.

शिबिरासाठी कमाख्या डायग्नॉस्टिक्सच्या रोटे. आशा पाटील यांनी तपासणी सेवांचे प्रायोजकत्व स्वीकारले, तर मराठा मंडळ दंत महाविद्यालयाच्या डॉ. रम्या यांनी विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी करून आरोग्य सेवेत महत्त्वपूर्ण योगदान दिले.

विद्यार्थ्यांच्या आरोग्य सेवेसाठी दिलेल्या सहकार्याबद्दल कमाख्या डायग्नॉस्टिक्सचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील आणि डॉ. रम्या यांचा रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. “स्वतःपेक्षा सेवा श्रेष्ठ” या रोटरीच्या ब्रीदवाक्यानुसार आरोग्य, शिक्षण आणि समाजकल्याणासाठी अशा लोकहितकारी उपक्रमांचे आयोजन भविष्यातही सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

The post रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर appeared first on News 24 Tass Marathi.

बेनकनहळ्ळी सरकारी उच्च प्राथमिक शाळेत ‘पाही वाईब्स फाउंडेशन’तर्फे रोपे पुनर्लावणी उपक्रम
गेल्या वर्षी लावलेली ५६० रोपांची जोमदार वाढ

पर्यावरण संवर्धनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न

बेळगाव : पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने सातत्याने कार्यरत असलेल्या ‘पाही वाईब्स फाउंडेशन’ तर्फे रविवारी बेनकनहळ्ळी येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या परिसरात रोपे पुनर्लावणी मोहीम राबविण्यात आली. मागील वर्षीच्या वृक्षारोपण मोहिमेनंतर जी रोपे जगू शकली नाहीत किंवा नष्ट झाली होती, त्या ठिकाणी नवीन रोपे लावून हरित उपक्रमाला नवी उभारी देण्यात आली.

या मोहिमेसाठी ‘युनिव्हर्सल नॉलेज ट्रस्ट’ ने रोपे उपलब्ध करून दिली. फाउंडेशनच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रोपे पुनर्लावणीचे काम पूर्ण केले.

गेल्या वर्षी शाळेच्या परिसरात लावण्यात आलेली ५६० रोपे आजही जोमाने वाढत असल्याने या उपक्रमाच्या यशाची प्रचिती येत आहे. रोपांच्या संगोपनासाठी शाळा प्रशासनाने घेतलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच हा उपक्रम यशस्वी ठरल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

यावेळी ‘पाही वाईब्स फाउंडेशन’च्या संस्थापक-संचालिका रक्षा यू. यांनी, “निसर्गासाठी काम करताना त्या कार्याचा आनंद घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. आजची मोहीम हे सिद्ध करते की, छोटे पण सातत्यपूर्ण प्रयत्न पर्यावरणावर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम घडवू शकतात. ‘युनिव्हर्सल नॉलेज ट्रस्ट’ आणि मुख्याध्यापक ईश्वर पाटील यांचे सहकार्य या उपक्रमाच्या यशामागील महत्त्वाचा आधार आहे,” असे सांगितले.

रोपे पुनर्लावणी मोहिमेत विजय कनेरी, शिवानंद हिरेमठ, एच. ओ. कुमारस्वामी, किरण नरगुंदकर आणि महांतेश हिरेमठ यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत नेतृत्व केले.

शाळेच्या परिसरातील रोपांची अत्यंत काळजीपूर्वक देखभाल करून ती जोपासल्याबद्दल सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर पाटील यांचा फाउंडेशनतर्फे विशेष गौरव करण्यात आला. ५६० रोपांच्या निरोगी वाढीत त्यांच्या प्रयत्नांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक बळकट करण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यातही सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती फाउंडेशनने दिली.

The post बेनकनहळ्ळी सरकारी उच्च प्राथमिक शाळेत ‘पाही वाईब्स फाउंडेशन’तर्फे रोपे पुनर्लावणी उपक्रम appeared first on News 24 Tass Marathi.

विद्या भारती जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत देवेंद्र जिनगौडा शाळेची दमदार कामगिरी
चारही गटांमध्ये भव्य पारितोषिके पटकावली

बेळगाव : विद्या भारतीच्या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत शिंदोळी येथील देवेंद्र जिनगौडा शाळेने दैदिप्यमान कामगिरी करत सहभागी झालेल्या चारही गटांमध्ये विजेतेपद पटकावले. प्राथमिक व माध्यमिक मुलगे आणि मुली अशा सर्व गटांमध्ये प्रतिस्पर्ध्यांवर मात करत शाळेने जिल्हास्तरावर आपले वर्चस्व सिद्ध केले.

गणेशपूर-हिंडलगा येथील संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने या प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील प्राथमिक मुलांच्या अंतिम सामन्यात देवेंद्र जिनगौडा शाळेने संत मीरा गणेशपूर संघाचा ७ गुणांनी पराभव करून विजेतेपद मिळविले. तर प्राथमिक मुलींच्या अंतिम सामन्यात शांतीनिकेतन स्कूल, खानापूरचा ११ गुणांनी पराभव करत अजिंक्यपदावर नाव कोरले.

माध्यमिक मुलांच्या उपांत्य फेरीत संत मीरा गणेशपूरने संत मीरा अनगोळचा ७ गुणांनी पराभव केला, तर देवेंद्र जिनगौडा शाळेने शांतीनिकेतन पब्लिक स्कूलवर ७ गुणांनी मात करून अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात संत मीरा गणेशपूरचा पुन्हा ७ गुणांनी पराभव करत देवेंद्र जिनगौडा शाळेने विजेतेपद पटकावले.

माध्यमिक मुलींच्या अंतिम सामन्यातही देवेंद्र जिनगौडा शाळेने शांतीनिकेतन पब्लिक स्कूल, खानापूरवर ११ गुणांनी विजय मिळवत चौथ्या गटातही अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले.

समारोप समारंभात मुख्याध्यापिका आरती पाटील, चंद्रकांत पाटील, अनुराधा पुरी, क्रीडा शिक्षक श्रीकांत कांबळे, शुभांगी काकतकर, शिवकुमार सुतार, गंगा गनिकोप्पा आणि सागर कोळेकर यांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक व पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी स्वाती सावंत, शिवकुमार, पूर्णिमा बढेकाई, सुजित नेरुळकर आणि सूरज देसुरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील यांनी केले, तर श्रीकांत कांबळे यांनी आभार मानले.

The post विद्या भारती जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत देवेंद्र जिनगौडा शाळेची दमदार कामगिरी appeared first on News 24 Tass Marathi.

खा. इराण्णा कडाडी यांच्या निधीतून बी. के. मॉडेल हायस्कूलला स्मार्ट बोर्डची भेट
बेळगाव : येथील बेळगाव एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी वर्ष साजरे करत असलेल्या बी. के. मॉडेल हायस्कूलला माजी खासदार इराण्णा कडाडी यांच्या निधीतून अत्याधुनिक स्मार्ट बोर्ड भेट देण्यात आला.

स्मार्ट बोर्ड उद्घाटनाचा कार्यक्रम गुरुवारी उत्साहात पार पडला. पाहुण्यांची ओळख बेळगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. अविनाश पोतदार यांनी करून दिली. मराठा लाईट इन्फंट्रीचे डेप्युटी कमांडंट कर्नल विनोद पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या हस्ते स्मार्ट बोर्डचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बेळगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. एस. एन. शिवणगी, संयुक्त सचिव श्री. अरविंद हुनगुंद, बी. के. मॉडेलचे मुख्याध्यापक श्री. एस. एन. जोशी, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका डॉ. सुचेता कुलकर्णी, उषाताई गोगटे शाळेचे मुख्याध्यापक श्री. एम. के. मादर, श्री. रवी घाटगे, शिक्षकवृंद तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्याध्यापिका डॉ. सुचेता कुलकर्णी यांनी इंग्रजी माध्यम शाळेची प्रगती, दूरदृष्टी आणि शैक्षणिक गुणवत्तेबाबत सविस्तर माहिती दिली. उपस्थितांनी स्मार्ट बोर्डमुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापन प्रक्रियेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळून शिक्षण अधिक प्रभावी आणि गुणवत्तापूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला.

The post खा. इराण्णा कडाडी यांच्या निधीतून बी. के. मॉडेल हायस्कूलला स्मार्ट बोर्डची भेट appeared first on News 24 Tass Marathi.

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ज्योती सेंट्रल स्कूलच्या मास्टर वेदांतची रौप्यपदकाला गवसणी
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प-बेळगाव येथील राष्ट्रीय जलतरणपटू मास्टर वेदांत आनंद मिसाळे याने कर्नाटक स्विमिंग असोसिएशन आयोजित NRJ State Sub-Junior Swimming Championship 2026–27 या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत 14 वर्षांखालील मुलांच्या 200 मीटर बटरफ्लाय (Butterfly) प्रकारात द्वितीय क्रमांक (रौप्यपदक) पटकावून शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.

दि.3 ते 5 जुलै 2026 या कालावधीत येम्मेकेरे स्विमिंग पूल, मंगळुरू येथे झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातील उत्कृष्ट जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत वेदांतने 2 मिनिटे 21.70 सेकंदांची उत्कृष्ट वेळ नोंदवत द्वितीय क्रमांक मिळवला. त्याच्या या यशामुळे शाळा, शिक्षक, विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय कामगिरीनंतर राज्यस्तरावरही वेदांतने सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. या दैदिप्यमान यशाबद्दल शाळेचे एस.एम.सी. चेअरमन प्रा. श्री. आर. के. पाटील, व्हाईस चेअरमन प्रो. श्री. आर. एस. पाटील, सेक्रेटरी प्रो. श्री. नितीन घोरपडे यांनी वेदांतचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

तसेच शाळेचे प्राचार्य श्री. प्रदीप पाटील यांनी वेदांतच्या या अभिमानास्पद यशाबद्दल त्याचे विशेष अभिनंदन करून भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही अशीच उज्ज्वल कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

The post राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ज्योती सेंट्रल स्कूलच्या मास्टर वेदांतची रौप्यपदकाला गवसणी appeared first on News 24 Tass Marathi.

एम. एस. धोनीला बेळगावला बोलवा
विद्यार्थ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे आगळीवेगळी मागणी

मोकाट कुत्र्यांच्या समस्येकडे वेधले लक्ष

बेळगाव : शहरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन क्रिकेटपटू एम. एस. धोनी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त बेळगावला आमंत्रित करण्याची आगळीवेगळी मागणी केली. याचवेळी विद्यार्थ्यांनी शहरातील वाढत्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येकडेही जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन धोनीला बेळगावला आमंत्रित करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी विनंती केली. तसेच गेल्या काही दिवसांपासून संभाव्य पूरस्थिती आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामाचे कौतुक करत जिल्हाधिकाऱ्यांचा आंब्याचे रोपटे देऊन सत्कार केला.

यावेळी विद्यार्थ्यांनी शहरात वाढत चाललेल्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येमुळे नागरिकांना, विशेषतः विद्यार्थ्यांना होत असलेल्या त्रासाची माहिती देत या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी प्रशासनाकडून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच या विषयावरील पुढील अधिकृत बैठकीस विद्यार्थ्यांनाही सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. एम. एस. धोनी यांना बेळगावला आणण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी विद्यार्थ्यांना दिले.

या शिष्टमंडळाचे नेतृत्व देविका खानमुखर यांनी केले. यावेळी शिवतेज खन्नुकर, अहिल्या होसुरकर, अर्जुन होसुरकर, सार्थक सैनेकर, वैभवी सैनेकर, शांतनु खन्नुकर, शर्वरी खन्नुकर, अथर्व संतोष पवार, अदिती साळुंके, अनन्या साळुंके, स्वराज खन्नुकर, रुदिता पवार, स्वयंम पवार यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणीवा आणि प्रशासनाशी थेट संवाद साधण्याच्या पुढाकाराचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले.

The post एम. एस. धोनीला बेळगावला बोलवा appeared first on News 24 Tass Marathi.