sambra Archives | News 24 Tass Marathi

बेळगाव विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या कामाला गती
प्रवासी बोर्डिंग ब्रिजच्या उभारणी आणि चाचणीला सुरुवात

₹२२३ कोटींचा प्रकल्प अंतिम टप्प्यात

आधुनिक सुविधांमुळे प्रवाशांचा प्रवास होणार अधिक सुलभ

बेळगाव : बेळगाव विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या प्रवासी बोर्डिंग ब्रिज उभारणी आणि चाचणी प्रक्रियेला औपचारिक सुरुवात झाली आहे. ही प्रक्रिया इंटिग्रेटेड टेस्टिंग अँड कमिशनिंग अंतर्गत सुरू करण्यात आली असून, लवकरच नवीन टर्मिनल कार्यान्वित होण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे.

नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर प्रवाशांना विमानात चढणे आणि उतरणे अधिक सुरक्षित, आरामदायी आणि जलद होणार आहे. याशिवाय विमानतळावरील प्रवासी हाताळणी क्षमता, सुविधा आणि एकूणच सेवा व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होणार असल्याने प्रवाशांना आधुनिक विमानतळाचा अनुभव मिळणार आहे.

सुमारे २२३ कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात चार अत्याधुनिक प्रवासी बोर्डिंग ब्रिज, १४ आधुनिक चेक-इन काउंटर, दोन बॅगेज कन्व्हेयर बेल्ट आणि विमान पार्किंगची क्षमता विद्यमान ३ वरून १२ विमानांपर्यंत वाढविण्याची सुविधा विकसित केली जात आहे. तसेच नवीन टर्मिनलमध्ये एकाच वेळी सुमारे २,४०० प्रवाशांची हाताळणी करण्याची क्षमता निर्माण केली जात आहे.

या प्रकल्पामुळे बेळगाव विमानतळाच्या आधुनिकीकरणाला मोठी गती मिळणार असून, भविष्यात वाढणारी प्रवासी संख्या, नव्या विमानसेवा आणि मोठ्या विमानांच्या वाहतुकीसाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहे. परिणामी, उत्तर कर्नाटकातील हवाई वाहतुकीच्या विकासात बेळगाव विमानतळ अधिक महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

The post बेळगाव विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या कामाला गती appeared first on News 24 Tass Marathi.

सांबरा येथे अग्निवीरांच्या सातव्या तुकडीचा दीक्षांत सोहळा
कठोर प्रशिक्षण पूर्ण करून १,२५० अग्निवीर वायुसेनेत दाखल

‘सारंग’च्या थरारक हवाई कसरती सोहळ्याचे प्रमुख आकर्षण

बेळगाव : सांबरा येथील वायुसेना प्रशिक्षण केंद्रात अग्निवीरांच्या सातव्या तुकडीचा भव्य दीक्षांत सोहळा उत्साहात पार पडला. तब्बल २२ आठवड्यांचे कठोर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेले १,२५० अग्निवीर भारतीय वायुसेनेत दाखल झाले. यावेळी भारतीय वायुसेनेच्या ‘सारंग’ हेलिकॉप्टर पथकाने सादर केलेल्या थरारक हवाई कसरती सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरल्या.

सांबरा येथील वायुसेना प्रशिक्षण केंद्र परिसर देशभक्तीच्या घोषणांनी आणि उत्साहाने भारावून गेला होता. सातव्या तुकडीतील प्रशिक्षणार्थींनी शिस्तबद्ध आणि दिमाखदार संचलन सादर करत प्रशिक्षणाचा यशस्वी समारोप केला. कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन अभिजित कुमार यांनी संचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली. तसेच प्रशिक्षण काळात उत्कृष्ट कामगिरी, नेतृत्वगुण आणि शिस्त दाखवणाऱ्या प्रशिक्षणार्थींना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

दीक्षांत संचलनानंतर भारतीय वायुसेनेच्या जागतिक कीर्तीच्या ‘सारंग’ हेलिकॉप्टर प्रदर्शन पथकाने आकाशात रोमांचक कसरती सादर केल्या. जगातील पाच हेलिकॉप्टरचे एकमेव प्रदर्शन पथक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘सारंग’ने स्वदेशी बनावटीच्या एएलएच ध्रुव हेलिकॉप्टरच्या साहाय्याने विविध आकर्षक रचना आणि साहसी हवाई प्रयोग सादर करत उपस्थितांची मने जिंकली. आकाशात साकारलेल्या या नेत्रदीपक कसरतींमधून भारतीय वायुसेनेची क्षमता आणि कौशल्य अधोरेखित झाले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना एअर कमांडर सूरज शंकर यांनी बदलत्या जागतिक परिस्थितीत आणि आधुनिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर वायुसेना सातत्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत असल्याचे सांगितले. अग्निवीरांनीही आपली कौशल्ये सातत्याने विकसित करून देशसेवेसाठी स्वतःला सज्ज ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.

कठोर प्रशिक्षणातून तावून-सुलाखून निघालेल्या १,२५० अग्निवीरांनी भारतीय वायुसेनेत प्रवेश करत देशरक्षणाची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या डोळ्यांतील देशप्रेम, संचलनातील शिस्त आणि ‘सारंग’च्या आकाशभेदी कसरतींनी सांबरा येथील हा सोहळा संस्मरणीय ठरला.

The post सांबरा येथे अग्निवीरांच्या सातव्या तुकडीचा दीक्षांत सोहळा appeared first on News 24 Tass Marathi.