road problem Archives | News 24 Tass Marathi

भातकांडे शाळेसमोरील रस्त्याच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात
बेळगाव : शहरातील भातकांडे शाळेसमोरील खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम बुधवारी सुरू करण्यात आले. अनेक महिन्यांपासून खड्डे, धूळ आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता अखेर या मार्गाच्या दुरुस्तीला प्रारंभ झाल्याने व्यापारी, वाहनचालक आणि स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. व्यावसायिक कारणांसाठी चारचाकी वाहनांची वर्दळ असतानाच अवजड वाहनांचाही वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. परिसरात शाळा असल्याने विद्यार्थी आणि पालकांचीही सतत गर्दी असते. त्यामुळे रस्त्याची खराब अवस्था नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत होती.

विशेषतः रस्त्यावरील खड्डे आणि उडणाऱ्या धुळीमुळे व्यापारी तसेच स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते. याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला गती मिळाली. नगरसेवक राजू भातकांडे आणि स्थानिक आमदार यांच्या प्रयत्नांमुळे हे काम सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, दुरुस्तीच्या कामामुळे काही प्रमाणात वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली आहे. दुचाकी आणि हलक्या वाहनांसाठी कपिलेश्वर कॉलनीमार्गे पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच अवजड वाहनांच्या प्रवेशावर तात्पुरती निर्बंध घालण्यात आले असून त्यांना गोवा वेस मार्गाचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे.

वाहतूक विभागाला याबाबत सूचना देण्यात आल्या असून आवश्यक ठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत. सध्या दुरुस्तीचे काम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित, सुरळीत आणि सुविधाजनक होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महत्त्वाच्या या रस्त्याच्या दुरुस्तीमुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्येवर तोडगा निघाल्याची भावना व्यक्त होत आहे.

The post भातकांडे शाळेसमोरील रस्त्याच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात appeared first on News 24 Tass Marathi.

वाहतूक पोलिसांनी बुजवले रस्त्यांवरील खड्डे
शनि मंदिर परिसरात केला रस्ता समतल

बेळगाव : शहरातील रखडलेल्या रस्ते विकास कामांमुळे नागरिक त्रस्त झाले असताना, वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम करून वाहनधारकांना दिलासा दिला. संबंधित विभागाकडून दखल घेतली जात नसल्याने पोलिसांनी स्वतःच रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने नागरिकांतून त्यांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.

मंगळवारी शनि मंदिर परिसरात रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे लक्षात येताच वाहतूक पोलिसांनी तातडीने कारवाई केली. संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा न करता पोलिसांनी स्वतः कुदळ-फावडी घेऊन माती टाकत रस्ता समतल केला. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक सुरळीत झाली आणि वाहनधारकांना दिलासा मिळाला.

शहरातील विविध भागांत रस्ते विकासाच्या नावाखाली खोदकाम करण्यात आले आहे. मात्र, अनेक ठिकाणी कामे अर्धवट अवस्थेत पडून असल्याने वाहनधारकांना धूळ, खड्डे आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पादचाऱ्यांनाही यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

दरम्यान, वाहतूक पोलिसांनी केलेल्या या कामाचे नागरिकांकडून स्वागत होत असले तरी, रस्ते विकास कामांतील दिरंगाईबद्दल प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरातील रखडलेली कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

The post वाहतूक पोलिसांनी बुजवले रस्त्यांवरील खड्डे appeared first on News 24 Tass Marathi.

खानापूर-जांबोटी मार्ग आजपासून बंद
कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

पर्यायी मार्गाचा वापर करण्याची सूचना

खानापूर : खानापूर-जांबोटी रस्त्यावरील सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी ३० एप्रिल ते ५ मे या कालावधीत सहा दिवस या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिला आहे.

या कालावधीत खानापूरहून येणारी वाहने पिरनवाडी, कुसमळी आणि जांबोटी या पर्यायी मार्गावर वळवण्यात येणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी या मार्गांचा वापर करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर रस्त्याचे रुंदीकरण आणि दुरुस्तीची कामे सुरू असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आवश्यक शोल्डर नसल्यामुळे वाहतूक सुरू असताना कामात अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी सहा दिवस वाहतूक बंद ठेवण्याची विनंती राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या साहाय्यक कार्यकारी अभियंत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

त्यावर निर्णय घेत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कालावधीत वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पोलीसप्रमुख आणि पोलीस आयुक्तांना चेकपोस्ट उभारण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

The post खानापूर-जांबोटी मार्ग आजपासून बंद appeared first on News 24 Tass Marathi.

गतिरोधकांअभावी बेळगाव – वेंगुर्ले मार्ग ठरतोय धोकादायक
डांबरीकरणानंतर वाहने सुसाट ; वेगाने मर्यादा ओलांडल्या

अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजनांची मागणी

हिंडलगा – तुरमुरी पट्ट्यात तातडीने सुरक्षात्मक उपाययोजनांची गरज

सुळगा (हिं.) / वार्ताहर

बेळगाव–वेंगुर्ले मार्गावरील हिंडलगा ते तुरमुरी या पट्ट्यात डांबरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचल्याने रस्ता पूर्णपणे गुळगुळीत झाला आहे. मात्र गतिरोधकांचा अभाव आणि वाढलेला वाहनांचा वेग यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे या मार्गावर तातडीने गतिरोधक बसविण्याची मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

हिंडलगा कारागृहापासून सुळगा पेट्रोल पंपापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले असून तुरमुरीपर्यंत डांबरीकरण पूर्ण झाले आहे. काम अंतिम टप्प्यात असले तरी अनेक ठिकाणी किरकोळ कामे प्रलंबित आहेत. विशेषतः सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना अद्याप झालेल्या नसल्याने वाहनचालक सुसाट वेगाने धावत आहेत.

तुरमुरी ते हिंडलगा वनखात्याच्या तपासणी नाक्यापर्यंत एकही गतिरोधक नसल्याने धोक्याची स्थिती निर्माण झाली आहे. आंबेवाडी फाटा, सुळगा बसस्थानक, सुळगा हनुमान मंदिर परिसर, बेळगुंदी कल्लेहोळ फाटा, उचगाव फाटा आणि तुरमुरी बसस्थानक या ठिकाणी गतिरोधकांची अत्यंत गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पूर्वी असलेले काही गतिरोधक नव्या डांबरीकरणावेळी हटविण्यात आले; मात्र त्यांची पुनर्बांधणी अद्याप झालेली नाही. परिणामी वळणांवर आणि फाट्यांवर अपघाताचा धोका वाढला आहे.

तुरमुरी ते राज्य सीमेपर्यंत काम रखडले :

हिंडलगा ते तुरमुरी बसस्थानकापर्यंत रस्ता सुस्थितीत असला तरी तुरमुरी ते बाची येथील कर्नाटक–महाराष्ट्र हद्दीपर्यंतचा मार्ग अद्याप दुरवस्थेत आहे. पावसाळ्यात मोठे खड्डे आणि साचलेले पाणी यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते.

सदर पट्ट्यातील डांबरीकरण व रुंदीकरण लवकरच पूर्ण होईल, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात काम रखडल्याने कर्नाटक–महाराष्ट्र दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळ्यापूर्वी तुरमुरी ते राज्य सीमेपर्यंतचे काम पूर्ण करून संपूर्ण मार्ग सुरक्षित व सुकर करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

The post गतिरोधकांअभावी बेळगाव – वेंगुर्ले मार्ग ठरतोय धोकादायक appeared first on News 24 Tass Marathi.

खादरवाडी रस्त्याच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन पोलिसांनी दडपले
ग्रामस्थांचा आरोप : प्रशासनाच्या उदासीनते विरोधात तीव्र संताप

बेळगाव / प्रतिनिधी

खादरवाडी रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेले रात्रभराचे आंदोलन शनिवारी उशिरा रात्री पोलिसांनी बंद पाडले. बेळगाव शहरातील क्लब रोडवरील ग्रामीण विकास व पंचायत राज विभागाच्या कार्यालयासमोर राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू होते.

सलग तीन दिवस उपोषण सुरू असल्याने आंदोलकांची प्रकृती धोक्यात येऊ शकते, या कारणास्तव ही कारवाई केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र आंदोलकांना कोणतीही पूर्वसूचना न देता जबरदस्तीने ताब्यात घेऊन रुग्णालयात हलविण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

रस्त्याचे प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत किंवा प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी ठाम भूमिका राजेश पाटील यांनी घेतली होती. तरीही संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन समस्यांवर चर्चा न केल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात संताप व्यक्त केला.

दरम्यान, मध्यरात्री कारवाई करणाऱ्या कॅम्प पोलिसांनी आंदोलकांना धमकावत संघर्ष दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच स्थानिक आमदाराच्या भावाच्या दबावाखाली पोलिसांनी ही कारवाई केल्याचा गंभीर दावा देखील करण्यात आला आहे.

खादरवाडी रस्त्याची दुरवस्था दीर्घकाळापासून कायम असून याचा नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागत आहे. शांततापूर्ण व न्याय्य मागणी दडपण्याच्या प्रयत्नांना ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या प्रकारामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, तातडीने रस्त्याच्या कामास सुरुवात न झाल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

The post खादरवाडी रस्त्याच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन पोलिसांनी दडपले appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव – पणजी महामार्गावर अवजड वाहनांची वर्दळ
काम अपूर्ण असतानाच वाहतूक सुरू झाल्याने ग्रामस्थांची नाराजी

खानापूर / प्रतिनिधी

बेळगाव – पणजी राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसतानाच या मार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषतः लोंढा फाटा परिसरात रस्त्याचे काम सुरू असतानाच ट्रक व जड वाहनांची ये-जा वाढल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

गेल्या पाच वर्षांपासून लोंढा फाटा ते रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता महामार्गाच्या कामामुळे अतिशय खराब व धोकादायक झाला होता. या मार्गालगत लोंढा हायस्कूल व इंदिरा विद्यालय असल्याने शालेय विद्यार्थ्यांना याच रस्त्याने दररोज ये-जा करावी लागते. महामार्गाच्या कामानंतर वाहनांचा वेग प्रचंड वाढल्याने पालकांमध्येही भीतीचे वातावरण होते. ही बाब लक्षात घेऊन सोमवारी सकाळी लोंढा फाटा येथे रस्त्याच्या डांबरीकरण कामाला सुरुवात करण्यात आली.

लोंढा ग्रामपंचायतीचे अध्यक्ष नीळकंठ उसपकर यांच्याहस्ते पूजन करून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने सुरू असलेले हे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने प्रवासी व वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे. यापूर्वी खराब रस्त्यामुळे बस सेवा थेट बसस्थानकापर्यंत जात नव्हती, प्रवाशांना लोंढा फाट्यावरच उतरावे लागत होते. आता रस्ता दुरुस्त होत असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मात्र, डांबरीकरण पूर्ण होण्यापूर्वीच या मार्गावरून जड वाहनांची वाहतूक सुरू झाल्याने रस्ता पुन्हा खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. तसेच रस्ता गुळगुळीत झाल्याने वाहनांचा वेग वाढणार असून शाळा व फाट्याजवळ अपघाताचा धोका लक्षात घेता तातडीने गतिरोधक बसवावेत व सूचना फलक लावावेत, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

The post बेळगाव – पणजी महामार्गावर अवजड वाहनांची वर्दळ appeared first on News 24 Tass Marathi.

जुन्या पी. बी. रोडची जलदगतीने दुरुस्ती
ग्रामस्थांकडून जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन

बेळगाव / प्रतिनिधी

पश्चिम घाटातील मुसळधार पावसामुळे खराब झालेला जुना पी. बी. मार्ग जलदगतीने दुरुस्त करून वाहतुकीसाठी खुला केल्याबद्दल स्थानिक ग्रामस्थ व वकिलांनी जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांचे विशेष कौतुक केले.

रस्त्याच्या खड्डेमय अवस्थेमुळे हलगा, बस्तवाड आणि अलारवाड परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतकऱ्यांची वाहतूक आणि आपत्कालीन सेवा यांमध्ये अडथळे निर्माण झाले होते.

ग्रामस्थांच्या तातडीच्या मागणीनंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने सतत प्रयत्न करून रस्ता पुन्हा सुरळीत केला.

रस्त्याची वेळेवर दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत केल्याबद्दल ग्रामस्थांनी आणि वकिलांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले आणि त्यांचे अभिनंदन केले.

The post जुन्या पी. बी. रोडची जलदगतीने दुरुस्ती appeared first on News 24 Tass Marathi.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हलगा – मच्छे बायपासच्या कामाला पुन्हा सुरूवात
जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन केली पाहणी

बेळगाव / प्रतिनिधी

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी झाल्यानंतर हलगा – मच्छे बायपासचे काम पुन्हा सुरू झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. शेतकरी प्रतिनिधींनी सांगितले की, आम्ही विकासाच्या विरोधात नसून काम सुरू करण्यापूर्वी त्यांना विश्वासात घेणे आवश्यक होते.

काम पुन्हा सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत हे काम थांबवण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी सांगितले की, बायपासचे काम योग्य समन्वयाशिवाय सुरू झाल्यामुळे ते बेकायदेशीर वाटते.

शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले की, १९३० मध्ये कॅम्प फिश मार्केट परिसरात निश्चित केलेला झिरो पॉईंट नंतर अलारवाड येथे हलवला गेला आहे. या विषयावर न्यायालयात खटला प्रलंबित असताना काम पुढे नेऊ नये असे आमचे म्हणणे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र काम उच्च न्यायालयाच्या आदेशावर आधारित असल्याचे स्पष्ट केले. यासंदर्भात एक बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले.

शेतकरी नेते राजू मरवे यांनी सांगितले की, योग्य चर्चा न करता काम सुरू केले गेले असून न्यायालयाच्या अंतिम निकालानंतरच पुढील प्रक्रिया व्हावी.

शेतकरी नेते प्रकाश नाईक यांनीही सरकारवर टीका करत सांगितले की, या भागातील सुपीक जमीन घेतल्याने अनेक शेतकरी अडचणीत येत आहेत. ते म्हणाले की, हे काम विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहे. अधिवेशनादरम्यान विरोध कमी करण्यासाठी प्रशासन दबाव टाकत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांनी घटप्रभा बंधाऱ्याच्या कामाचा उल्लेख करत सांगितले की, तिथे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याप्रमाणे येथेही त्यांना विश्वासात घेऊन काम करावे.

२०११ मधील अपूर्ण सर्वेक्षण पुन्हा करण्याची गरज असल्याचे जिल्हादंडाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले. येळ्ळूर-वडगाव-शहापूर रस्त्याच्या कामामुळे शेतीत पाणी शिरणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली. त्यांनी शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी येळ्ळूर – वडगाव पुलासही भेट देऊन बळ्ळारी नाल्याची स्थिती पाहिली.

रमाकांत कोंडुसकर यांनी बळ्ळारी नाल्यातील वाढलेल्या गाळ व झुडुपांमुळे त्याची क्षमता कमी झाल्याचे सांगितले. नाळेची खोली वाढवून स्वच्छता करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. तसेच या कामासाठी विशेष निधीची मागणीही त्यांनी केली.

या पाहणी दरम्यान अनेक शेतकरी नेते आणि प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

The post उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हलगा – मच्छे बायपासच्या कामाला पुन्हा सुरूवात appeared first on News 24 Tass Marathi.

चोर्ला – बेळगाव – गोवा मार्गाच्या नूतनीकरणाला प्रारंभ
बेळगाव / प्रतिनिधी

कर्नाटक – गोवा प्रवासासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या चोर्ला – बेळगाव – गोवा मार्गावर अखेर दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) या रस्त्याच्या नूतनीकरणाची प्राथमिक कामे सुरू केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

मलप्रभा नदीवरील कुसमळी येथे काही वर्षांपासून अर्धवट राहिलेल्या पुलाच्या उभारणीलाही आता वेग देण्यात आला आहे. पुलाजवळ वाहतूक अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पर्यायी मार्गाची आखणी करून त्यावर वाहतूक वळवण्याचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बेळगाव – चोर्ला – गोवा मार्गावरील अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणे धोकादायक होत होते. या पार्श्वभूमीवर लवकरच संपूर्ण रस्त्याच्या पुनर्बांधणीला गती दिली जाईल, असे पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

कार्यकारी अभियंता राजेंद्र यांनी सांगितले की, पुलाचे बांधकाम तसेच रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे एकाच वेळी वेगाने पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहेत. कामांची सतत पाहणी करण्यात येत असून ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.

दरम्यान, अनेक वर्षांपासून खराब रस्त्यांमुळे त्रस्त असलेल्या वाहनचालकांनी सुरू झालेल्या नूतनीकरणाच्या कामांचे स्वागत केले आहे. दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना आता काही प्रमाणात दिलासा मिळेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

The post चोर्ला – बेळगाव – गोवा मार्गाच्या नूतनीकरणाला प्रारंभ appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव – वेंगुर्ला रोडवरील दुरुस्तीची खडी धोकादायक
सुळगा (हिं.) परिसरात चार दुचाकीस्वार जखमी

सार्वजनिक बांधकाम खात्याने समस्येकडे लक्ष द्यावे नागरिकांतून मागणी

सुळगा (हिं.) / वार्ताहर

बेळगाव–वेंगुर्ला मुख्य रस्त्यावरील सुळगा परिसरात सुरू असलेल्या रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे रस्त्यावर टाकलेली खडी वाहनधारकांसाठी त्रासदायक ठरत आहे. रविवारी या खडीवरून घसरून चार दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

उचगाव क्रॉस ते बाची या दरम्यान रस्ता दुरुस्तीची कामे सुरू आहेत. मात्र कामाचा वेग अत्यंत मंद असून, रस्त्यावर टाकलेल्या खडीचा थर अनेक दिवसांपासून तसाच पडून आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना तोल संभाळणे कठीण जात आहे. धुळीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

खडीमुळे उडणाऱ्या धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून प्रवाशांना व वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीने खडी नीट दाबून रस्ता समतल करण्याची तसेच पर्यायी मार्गाची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिक अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. अखेर दुरुस्तीला सुरुवात झाली असली तरी काम कधी पूर्णत्वास जाणार? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

The post बेळगाव – वेंगुर्ला रोडवरील दुरुस्तीची खडी धोकादायक appeared first on News 24 Tass Marathi.