Republic Day Archives | News 24 Tass Marathi

बेळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांच्याहस्ते ध्वजारोहण

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांच्याहस्ते राष्ट्रध्वज फडकावून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

सोमवार दि. २६ जानेवारी रोजी सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात राष्ट्रगीताच्या तालावर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. संविधान आणि कायद्याचे संरक्षण करणे ही पोलिसांची जबाबदारी असून, ती पार पाडताना प्रामाणिकपणा, शिस्त आणि नागरिकांविषयी संवेदनशीलता आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी के. रामराजन यांनी जिल्ह्यातील नागरिकांना तसेच पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यास जिल्ह्यातील विविध विभागांतील वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post बेळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगावात एकाच वेळी १५ हून अधिक मोठ्या प्रकल्पांचा शुभारंभ होणार
जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव जिल्हा आणि तालुक्याच्या विकासाला गती देण्यासाठी एकाच वेळी पंधराहून अधिक मोठ्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात येणार असून, यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना बेळगावात निमंत्रित करण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.

७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील जिल्हा क्रीडांगणावर ध्वजारोहण केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विकास प्रकल्प जाहीर होऊनही प्रत्यक्ष काम सुरू होण्यास विलंब का होतो, या माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री जारकीहोळी म्हणाले की, एखादा प्रकल्प अर्थसंकल्पात जाहीर झाला की त्यासाठी पुढील अर्थसंकल्पात निधी उपलब्ध होतो. सध्याची आर्थिक आणि प्रशासकीय व्यवस्था अशी असून, त्यानुसारच कामकाज करावे लागते, असे त्यांनी स्पष्ट केले.

बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी ७५ कोटी रुपये, माहिती व जनसंपर्क विभागाच्या पत्रिका भवनासाठी १० कोटी रुपये, सौंदत्ती यल्लम्मा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी २१५ कोटी रुपये, हुदली रेल्वे उड्डाणपुलासाठी ३५ कोटी रुपये तसेच गोकाक येथील लोळसूर पुलासाठी ४० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या सर्व प्रकल्पांची कामे मार्च महिन्यापर्यंत प्रत्यक्ष सुरू होतील, असे त्यांनी सांगितले.

मंत्री जारकीहोळी पुढे म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या दहा वर्षांत जिल्ह्यात एकही नवीन पूल बांधलेला नाही. त्यामुळे गरज लक्षात घेऊन खानापूर तालुक्यात तीन, कागवाड तालुक्यात एक आणि निप्पाणी तालुक्यात दोन मोठ्या पुलांच्या बांधकामाची योजना आखण्यात आली आहे. आपण पदभार स्वीकारला तेव्हा राज्य व राष्ट्रीय महामार्गांशी संबंधित तब्बल ४८ कामे विविध कारणांमुळे रखडलेली होती. त्यापैकी ३९ रस्ते विकास प्रकल्पांमधील अडचणी दूर करण्यात आल्या असून, उर्वरित तीन प्रकरणे सध्या न्यायालयात प्रलंबित आहेत.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी सविस्तर चर्चा करून बेळगाव जिल्ह्यासाठी अधिक प्रकल्प व निधी मंजूर करण्याची विनंती करण्यात आली आहे. यावर केंद्रीय मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

यावेळी बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

The post बेळगावात एकाच वेळी १५ हून अधिक मोठ्या प्रकल्पांचा शुभारंभ होणार appeared first on News 24 Tass Marathi.

उचगाव येथे गेल्या ४५ वर्षांपासून ध्वजारोहण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
श्री.  एन. ओ. चौगुले यांचा सत्कार

उचगाव / वार्ताहर

उचगाव येथील मध्यवर्ती गांधी चौकात दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन सोहळ्यांचे गेल्या ४५ वर्षांपासून सूत्रसंचालन करत असलेल्या श्री. एन. ओ. चौगुले सर यांनी यंदा २६ जानेवारी रोजी आपल्या कारकिर्दीतील ५० वा प्रजासत्ताक दिन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी वर्षातून दोन वेळा गावातील मुख्य ध्वजारोहण सोहळ्यांचे सूत्रसंचालन करत चौगुले सरांनी अखंड राष्ट्रभक्तीचा संदेश प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचवला आहे. त्यांच्या प्रभावी आणि निवेदनामुळे राष्ट्रीय सणांचे औचित्य आणि गौरव अधिकच वाढत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे.

या दीर्घकालीन सेवाभावी योगदानाबद्दल उचगाव ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांच्या वतीने चौगुले सरांचा जाहीर सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळ्यास ग्रामपंचायत पदाधिकारी, मान्यवर नागरिक आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post उचगाव येथे गेल्या ४५ वर्षांपासून ध्वजारोहण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन appeared first on News 24 Tass Marathi.

सामाजिक न्याय आणि सर्वांसाठी समानता ही संविधानाची देणगी ; मंत्री सतीश जारकीहोळी
बेळगाव जिल्हा प्रशासनातर्फे ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा

बेळगाव / प्रतिनिधी

महात्मा गांधी आणि संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला बेळगाव जिल्हा सामाजिक परिवर्तनाची साक्ष देणारी भूमी आहे. सामाजिक न्याय, सर्वांसाठी समानता, व्यक्तीस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही मूल्ये भारतीय संविधानाने देशवासियांना दिलेली मोठी देणगी आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम व जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले.

शहरातील जिल्हा स्टेडियमवर आयोजित ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. प्रजासत्ताक व्यवस्थेमुळे भारतीय नागरिकांना सार्वभौमत्व प्राप्त झाले असून, देशाच्या सर्वांगीण विकासाचा रात्रंदिवस विचार करणाऱ्या डॉ. बी.आर. आंबेडकरांनी लिहिलेले संविधान हे महान भारताच्या उभारणीसाठी दीपस्तंभ ठरले आहे, असे त्यांनी सांगितले.

मंत्री जारकीहोळी यांनी राज्य सरकारच्या अन्नभाग्य, गृहज्योती, शक्ती, गृहलक्ष्मी आणि युवनिधी या पाच हमी योजना अत्यंत कमी कालावधीत वचनानुसार अंमलात आणण्यात आल्याचे सांगितले. या योजनांमुळे समाजातील सर्वसामान्य घटकांना थेट लाभ मिळत असून लोकांचे जीवनमान उंचावत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

कृषी क्षेत्राबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, बेळगाव जिल्ह्यात पावसाळी हंगामासाठी ४.२४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात ४.२५ लाख हेक्टर म्हणजेच शंभर टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. पेरणीसाठी आवश्यक असलेले सुमारे २४ हजार क्विंटल दर्जेदार बियाणे ६० हजार शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वेळेवर पुरवण्यात आले आहे. तसेच पीक विमा योजना आणि हवामान आधारित पुनर्रचना पीक विमा योजनेअंतर्गत ९,२९५ शेतकऱ्यांना एकूण ९६.३६ कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली आहे.

२०२५–२६ या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ३,३२० हेक्टर क्षेत्रातील ३,८७० शेतकऱ्यांच्या बागायती पिकांचे नुकसान झाले असून, त्यासाठी ५२३.१५ लाख रुपयांची नुकसानभरपाई वितरित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. साखर कारखान्यांच्या सहकार्याने ऊस क्षेत्रात एकात्मिक माती व पाणी व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक प्रकल्प राबवले जात असल्याचे ते म्हणाले.

आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली असून, जिल्ह्यात २११ कोटी रुपयांच्या अनुदानातून विविध रुग्णालयांची कामे सुरू आहेत. अथणी येथील माता व बाल रुग्णालयाचे अद्ययावतीकरण, रामदुर्गा व सवदत्ती तालुका रुग्णालयांची उभारणी तसेच बीआयएमएस परिसरात प्रादेशिक कर्करोग केंद्राच्या बांधकामाची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १५ बस युनिटमधून दररोज १,५९० बसेस धावत असून, योजनेनंतर प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. युवनिधी योजनेअंतर्गत हजारो तरुणांना थेट आर्थिक सहाय्य देण्यात आले असून उर्वरित अर्जांची पडताळणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय रस्ते विकास, रेल्वे उड्डाणपूल, जिल्हाधिकारी कार्यालयाची नवी इमारत, पत्रिका भवन, महापालिकेच्या वॉर्डनिहाय मूलभूत सुविधा तसेच तलाव व उद्यानांच्या पुनरुज्जीवनाची कामे प्रगतीपथावर असल्याची माहितीही त्यांनी दिली.

या सोहळ्यात केएसआरपी दुसरी बटालियन, शहर व जिल्हा सशस्त्र राखीव दल, भारत सेवा दल तसेच विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी आकर्षक संचलन सादर केले. कार्यक्रमास आमदार आसिफ (राजू) सेठ, महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, पोलिस अधीक्षक के.रामराजन, जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

The post सामाजिक न्याय आणि सर्वांसाठी समानता ही संविधानाची देणगी ; मंत्री सतीश जारकीहोळी appeared first on News 24 Tass Marathi.

ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
बेळगाव : येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्या म्हणाल्या की, “भारतीय संविधान हा आपल्या लोकशाहीचा पाया आहे. देशाची प्रगती आणि एकता टिकवण्यासाठी संविधानातील मूल्यांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.” या सोहळ्यानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यामध्ये देशभक्तीपर गीते आणि नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली. शिस्तबद्ध ‘पथसंचलन’ हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांतून स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची आठवण करून दिली. ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी संपूर्ण शाळा परिसर दुमदुमून गेला होता.  कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

The post ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा appeared first on News 24 Tass Marathi.

प्रजासत्ताक दिन भव्य – शिस्तबद्ध साजरा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या तयारीसाठी आढावा बैठक

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी मोहम्मद रोशन यांनी २६ जानेवारी रोजी होणारा प्रजासत्ताक दिन कोणतीही त्रुटी न ठेवता मोठ्या उत्साहात आणि भव्य स्वरूपात साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. प्रत्येकाने आपापली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रजासत्ताक दिनाच्या तयारीसाठी आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस स्वातंत्र्यसैनिक, विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकी दरम्यान प्लास्टिकच्या ध्वजांच्या वापरावर बंदी घालावी, तसेच जिल्हा स्टेडियमकडे जाणाऱ्या बससेवा वाढवाव्यात, अशा सूचना उपस्थितांनी मांडल्या. यावर बोलताना जिल्हाधिकारी रोशन यांनी पर्यावरणपूरक, कापडी ध्वजांचा वापर करण्याचे आवाहन केले आणि प्लास्टिकचे ध्वज टाळण्याच्या सूचना दिल्या. तसेच शहरातील सर्व शासकीय व खासगी शाळा, महाविद्यालये आणि कार्यालये विद्युत रोषणाईने सजवावीत, असे निर्देश त्यांनी दिले. समारंभ यशस्वीपणे पार पडावा यासाठी सर्व विभागांना ठोस जबाबदाऱ्या देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

नूतन पोलीस अधीक्षक रामराजन के. यांनीही नागरिकांना लोकाभिमुख सेवा देण्याचे आश्वासन देत, यासाठी जनतेच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले.

या बैठकीस स्वातंत्र्यसैनिक कलघटगी, दलित नेते मल्लेश चौगुले, विकास कलघटगी, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, महापालिका आयुक्त कार्तिक एम., अतिरिक्त पोलीस अधीक्षक बसरगी यांच्यासह अन्य अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

The post प्रजासत्ताक दिन भव्य – शिस्तबद्ध साजरा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन appeared first on News 24 Tass Marathi.