regional commissioner Archives | News 24 Tass Marathi

कपिलेश्वर तलावाचे महापालिकेकडे हस्तांतरण करण्याची मागणी
गोडेसे कुटुंब व युवा समिती सीमाभागचे प्रादेशिक आयुक्तांना निवेदन

दुर्घटनेनंतर वेधले प्रशासनाचे लक्ष

बेळगाव : कपिलेश्वर तलाव परिसरात भिंत कोसळून दोन मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर तलावाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर तलावाचा ताबा तात्काळ महापालिकेकडे देऊन त्याचा विकास करण्यात यावा, अशी मागणी पुढे येत आहे.

या संदर्भात जमीनमालक गोडेसे कुटुंब, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग व स्थानिक नागरिकांनी मंगळवारी प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी यांची भेट घेत निवेदन सादर केले. तलावाच्या मालकी हस्तांतरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून भविष्यातील दुर्घटना टाळाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

युवा समितीचे नेते शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तलाव दुर्घटनेमागील कारणे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. गोडेसे कुटुंब आणि महापालिका यांच्यातील हस्तांतरण प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळेच ही दुर्घटना घडल्याची नाराजीही व्यक्त करण्यात आली.

निवेदन स्वीकारून प्रादेशिक आयुक्तांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी विकास कलघटगी, कपिल भोसले आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

The post कपिलेश्वर तलावाचे महापालिकेकडे हस्तांतरण करण्याची मागणी appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव प्रादेशिक आयुक्त कार्यालयात व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न
बीम्समध्ये उपचार सुरू

बेळगाव : जमिनीच्या बिगरशेती रूपांतरण (एनए) प्रकरणातून त्रस्त झालेल्या एका व्यक्तीने गुरुवारी प्रादेशिक आयुक्त कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली.

हावेरी जिल्ह्यातील राणेबेन्नूर येथील रुद्रय अमीनाभविमठ (वय ५०) यांनी दोन एकर जमिनीच्या नोंदणीसाठी अर्ज केला होता. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना विविध कार्यालयांमध्ये पाठपुरावा करावा लागत होता. हावेरी डीसी कार्यालयातून ‘जमिनीची अदलाबदल झाल्याशिवाय नोंदणी होऊ शकत नाही’ असे सांगण्यात आले होते. याच संदर्भात ते वारंवार बेळगाव प्रादेशिक आयुक्त कार्यालयात येत होते.

गुरुवारी ते पुन्हा प्रादेशिक आयुक्त जानकी यांची भेट घेण्यासाठी आले होते. मात्र संबंधित माहिती उपलब्ध नसल्याचे कळताच त्यांनी संतापाच्या भरात कार्यालयातच विष प्राशन केले. घटनेनंतर त्यांना तात्काळ बेळगाव येथील बीम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पुढील तपास सुरू आहे.

The post बेळगाव प्रादेशिक आयुक्त कार्यालयात व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न appeared first on News 24 Tass Marathi.

सिटीज – २ संदर्भात सिटीझन्स कौन्सिलचे प्रादेशिक आयुक्तांना निवेदन
प्रकल्प बेळगावसाठी सुरक्षित ठेवण्याकरिता हस्तक्षेप करण्याची मागणी

बेळगाव / प्रतिनिधी

शहरासाठी मंजूर झालेल्या सिटीज २.० प्रकल्पाबाबत निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प बेळगावसाठी सुरक्षित ठेवण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी सिटीझन्स कौन्सिल बेळगाव या संघटनेने प्रादेशिक आयुक्त जानकी के. एम. यांच्याकडे केली आहे.

संघटनेचे सदस्य सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी सकाळी प्रादेशिक आयुक्तांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी सिटीज २.० प्रकल्पाची सविस्तर माहिती देत निवेदन सादर करण्यात आले.

प्रादेशिक आयुक्तांनी निवेदन स्वीकारून हा प्रकल्प बेळगावसाठीच कायम राहील याची दक्षता घेतली जाईल, असे आश्वासन दिले. सुमारे १३५ कोटी रुपयांच्या या योजनेचा उद्देश शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करणे, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत आणि लवचिक शहरी पायाभूत सुविधा विकसित करणे हा आहे.

मात्र निधीतील प्रलंबित हिस्सा, निविदा प्रक्रिया आणि प्रशासकीय अडचणी यांमुळे कामात विलंब होत असल्याच्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दीर्घकाळ चालणाऱ्या या विलंबाचा प्रकल्पाच्या वेळेवर अंमलबजावणीवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास मंजूर निधी मागे घेतला जाण्याची किंवा तो अन्य शहराकडे वळविण्यात येण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यासंदर्भात प्रादेशिक आयुक्तांनी प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घ्यावा, संबंधित अधिकाऱ्यांकडून आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, प्रलंबित निविदा व प्रशासकीय प्रक्रिया त्वरीत पूर्ण कराव्यात आणि बेळगावसाठी प्रकल्पाचे वाटप अबाधित राखण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. निवेदन सादर करताना बसवराज जवळी, विकास कलघटगी, मुकेश खोडा, नितीश जैन, कमलेश खोडा आदी सदस्य उपस्थित होते.

The post सिटीज – २ संदर्भात सिटीझन्स कौन्सिलचे प्रादेशिक आयुक्तांना निवेदन appeared first on News 24 Tass Marathi.