railway Archives | News 24 Tass Marathi

रेल्वेकडून कॅन्टोन्मेंट बोर्डाचे १६ कोटी रुपये थकीत
ब्रिगेडियर गिरीष उपाध्याय यांच्या उपस्थितीत पहिली बैठक संपन्न

बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नूतन अध्यक्ष ब्रिगेडियर गिरीष उपाध्याय यांच्या उपस्थितीत सोमवारी कॅन्टोन्मेंट बोर्डाची पहिली बैठक पार पडली. बैठकीस सीईओ सुदाम मंचलवार, आमदार आसिफ सेठ तसेच सरकारनियुक्त सदस्य सुधीर तुपेकर उपस्थित होते. प्रारंभी ब्रिगेडियर उपाध्याय यांना शपथ देण्यात आली आणि विविध मान्यवरांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले.

बैठकीत बेळगाव रेल्वे स्थानक कॅन्टोन्मेंट हद्दीत येत असल्याने विविध कर आणि दंडापोटी रेल्वेकडून सुमारे १६ कोटी रुपये थकीत असल्याचा मुद्दा चर्चिला गेला. ही रक्कम वसूल करण्यासाठी नैऋत्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आले असून पुढील पाठपुरावा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी लाच स्वीकार प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या एका महिला अधिकाऱ्याबाबतही चर्चा झाली. संबंधित कर्मचाऱ्याचे ५० टक्के वेतन कपात करून उर्वरित वेतन देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

रामकृष्ण मिशन यांच्याकडून हॉस्पिटल उभारणीसाठी परवानगी मागण्यात आली असून आवश्यक नियमांची पूर्तता झाल्यानंतर बांधकाम परवाना देण्याबाबत विचार करण्यात येणार आहे. तसेच सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर उर्वरित वेतन फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना देण्याचाही निर्णय घेण्यात आला.

इंडिपेंडिंग रोड आणि हावलॉक रोड जंक्शनचे सुशोभीकरण करण्याबरोबरच एल अँड टी कंपनीने जलवाहिन्यांसाठी केलेल्या खोदाईनंतर रस्त्यांची दुरुस्ती न केल्याने नागरिकांमध्ये नाराजी असल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कॅन्टोन्मेंट परिसरातील कत्तलखान्यासह इतर कोणत्याही ठिकाणी गोहत्या होऊ नये यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी सूचना सरकारनियुक्त सदस्य सुधीर तुपेकर यांनी केली.

दरम्यान, एसएफसी निधीत यावर्षी केवळ पाच लाख रुपयांचे अनुदान मिळाल्याने विकासकामांवर मर्यादा येत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे राज्य सरकारकडे वाढीव निधीची मागणी केली जाणार आहे.

केंद्र सरकारकडून कॅन्टोन्मेंट बोर्डाला सुमारे १४ कोटी रुपयांचा निधी मिळणार असून, त्यातून कायमस्वरूपी महसूल निर्माण करणारे प्रकल्प राबविण्याची योजना आहे. बी. के. मॉडेलसमोरील मोकळ्या जागेत बेंगळुरू विमानतळाच्या धर्तीवर फूड स्टॉल उभारण्याचा प्रस्ताव सीईओ सुदाम मंचलवार यांनी मांडला. तसेच रेल्वे स्थानक परिसरात स्टॉल्स आणि इनडोअर स्टेडियम उभारणीबाबतही प्राथमिक चर्चा करण्यात आली.

The post रेल्वेकडून कॅन्टोन्मेंट बोर्डाचे १६ कोटी रुपये थकीत appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव – धारवाड रेल्वे प्रकल्पाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
सुपीक जमिनींच्या बचावासाठी नोंदवले आक्षेप

खानापूर : बेळगाव – धारवाड नवीन रेल्वे मार्गासाठी प्रस्तावित जमीन अधिग्रहण प्रक्रियेला स्थानिक शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा तीव्र विरोध दर्शवला आहे. गर्लगुंजी, नंदीहळ्ळी आणि केकेकोप्प या गावांतील २०० हून अधिक शेतकऱ्यांनी केआयडीबीच्या विशेष भूमी अधिग्रहण अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक देत प्रकल्पाविरोधात लेखी आक्षेप सादर केले.

विशेष भूमी अधिग्रहण अधिकारी मंजुनाथ डोंबर यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारून याबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले.

गेल्या सात वर्षांपासून प्रस्तावित रेल्वे मार्गाला विरोध सुरू असून हा मार्ग अत्यंत सुपीक शेती क्षेत्रातून जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. या जमिनीत वर्षातून तीन पिके घेतली जातात तसेच मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन होते, असे त्यांनी स्पष्ट केले. परिसरात कमी खोलीवर मुबलक पाणी उपलब्ध असल्याने ही जमीन त्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

प्रशासनाने सुपीक जमिनीऐवजी पर्यायी नापीक जमीन वापरण्याचा विचार करावा, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी “कोणत्याही परिस्थितीत सुपीक जमीन देणार नाही” असा ठाम इशारा दिला.

रेल्वे मार्गामुळे वीजवाहिन्या, जनावरांचे मार्ग, ट्रॅक्टर रस्ते तसेच पाणीपुरवठा पाईपलाईन यावर गंभीर परिणाम होईल, अशीही चिंता त्यांनी व्यक्त केली. यावेळी शेतकरी प्रसाद पाटील यांनी प्रशासनाला उद्देशून राजकीय दबावाखाली निर्णय घेऊन शेतकऱ्यांचे नुकसान करू नये, अशी मागणी केली.

या आंदोलनात प्रसाद पाटील, सुनील पाटील, संतोष पाटील, मारुती लोकूर, किरण लोंढे, राजेंद्र पाटील, पुंडलिक मेलगे, सुरेश जाधव, कृष्णा सिद्धानी, सुधाकर पाटील यांच्यासह गर्लगुंजी, नंदीहळ्ळी, केकेकोप्प, हलगीमर्डी आणि नागेनहट्टी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

The post बेळगाव – धारवाड रेल्वे प्रकल्पाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध appeared first on News 24 Tass Marathi.

सावंतवाडी – चंदगड – बेळगाव प्रलंबित रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरू करा
कोल्हापूर : देशातील वाढती इंधन आयात, परकीय चलनाची घसरण आणि वाहतुकीच्या समस्यांवर मात करण्यासाठी कोल्हापूर व कोकण विभागातील प्रलंबित रेल्वे मार्ग तातडीने विकसित करण्यात यावेत, अशी मागणी ‘कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघ’ यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे करण्यात आली आहे.​

प्रवासी संघाने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधताना म्हटले आहे की, सध्या मुंबई-पुणे-कोल्हापूर आणि इतर जिल्ह्यांदरम्यान रोज हजारो खाजगी वाहनांमुळे लाखो लीटर पेट्रोल व डिझेल वाया जात असून अब्जावधी रुपयांचे परकीय चलन देशाबाहेर जात आहे. ‘शक्तीपीठ महामार्ग’ सारख्या प्रकल्पांवर लाखो कोटी रुपये खर्च केले जात असले, तरी त्यामुळे भविष्यात परकीय इंधनावरील अवलंबित्व कमी होणार नाही. याला उत्तम पर्याय म्हणून १) कोल्हापूर – आजरा – गडहिंग्लज – चंदगड – बेळगाव, २) सावंतवाडी – चंदगड – बेळगाव आणि ३) कोल्हापूर – वैभववाडी या तीन महत्त्वाच्या रेल्वे मार्गांचे नियोजन मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या धर्तीवर जलद गतीने करून पुढील पाच वर्षांत ते प्रत्यक्ष पूर्ण करावेत, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.

The post सावंतवाडी – चंदगड – बेळगाव प्रलंबित रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरू करा appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव – सिकंदराबाद साप्ताहिक रेल्वेला प्रारंभ
खासदार जगदीश शेट्टर यांच्याहस्ते हिरवा झेंडा

बेळगाव : माजी मुख्यमंत्री आणि बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी आज बेळगाव रेल्वे स्थानकावर बेळगाव – सिकंदराबाद नवीन साप्ताहिक रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवून अधिकृत प्रारंभ केला.

बेळगाव रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमात खासदार जगदीश शेट्टर यांच्याहस्ते रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, हैदराबाद आणि सिकंदराबादसह एकूण तीन नवीन रेल्वे सेवा बेळगावहून सुरू करण्यात येत असून, या गाड्या आठवड्यातून तीन वेळा धावणार आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून या रेल्वे सेवांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांनी बेळगावच्या जनतेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे आभार मानत असल्याचे शेट्टर यांनी सांगितले.

जिल्ह्यातील रेल्वे विकासाचा उल्लेख करताना त्यांनी बेळगाव – बेंगळूरू वंदे भारत रेल्वे सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचे सांगितले. तसेच बेंगळूरू – मुंबई हाय-स्पीड रेल्वे सेवेमुळे प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात बेळगाव – चेन्नई आणि बेळगाव – तिरुपती रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

या कार्यक्रमाला स्थानिक आमदार, भाजप जिल्हाध्यक्ष, माजी आमदार, पक्षाचे पदाधिकारी, रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी, नागरिक आणि माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post बेळगाव – सिकंदराबाद साप्ताहिक रेल्वेला प्रारंभ appeared first on News 24 Tass Marathi.

कर्नाटकात सुमारे १,७५० किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वेमार्गांची उभारणी
बेंगळुरू : बहुचर्चित बेंगळुरू – मुंबई एक्स्प्रेसला अखेर प्रारंभ झाला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी (दि. १७) एक्स्प्रेसचे आभासी पद्धतीने उद्‌घाटन केले.उद्‌घाटनानंतर मंत्री वैष्णव म्हणाले, २०१४ पासून कर्नाटकात सुमारे १,७५० किलोमीटर लांबीच्या नवीन लोहमार्गांची उभारणी करण्यात आली आहे.
हासन-मंगळुरू लोहमार्गावर विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून सध्या तिथे चाचण्या सुरू आहेत. बंगळूर आणि मुंबई दरम्यान ‘वंदे भारत स्लीपर’ सेवेची सुरुवात लवकरच होईल. सध्या कर्नाटकात १२ ‘वंदे भारत’ धावत आहेत. बेंगळुरू -मंगळुरू मार्गावर सध्या चाचण्या सुरू असून लवकरच मडगावपर्यंतच्या किनारपट्टी भागातील संपर्क व्यवस्था सुलभ होईल. मुंबई, बेंगळुरू आणि इतर प्रमुख शहरांना एकमेकांशी जोडण्याच्या दीर्घकालीन दृष्टिकोनातून या रेल्वे जाळ्याचा विस्तार होऊन ते ७,००० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले.

The post कर्नाटकात सुमारे १,७५० किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वेमार्गांची उभारणी appeared first on News 24 Tass Marathi.

बेंगळुरू- बेळगाव- मुंबई नव्या रेल्वेसेवेचा शुभारंभ
रेल्वेमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

बेळगाव : बेंगळुरू ते मुंबईदरम्यान सुरू करण्यात आलेल्या नव्या रेल्वेसेवेचे उद्घाटन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी व्हर्च्युअल माध्यमातून हिरवा झेंडा दाखवून केले. बेळगावमार्गे धावणारी ही रेल्वेसेवा कर्नाटक आणि महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी महत्त्वाची ठरणार असून, दोन्ही राज्यांतील संपर्क अधिक मजबूत होणार आहे.

यावेळी बोलताना अश्विनी वैष्णव यांनी दक्षिण आणि उत्तर कर्नाटकातील रेल्वेसंबंधित अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच बेंगळुरू-मुंबई मार्गावर लवकरच वंदे भारत स्लीपर सेवा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

कर्नाटकमधील रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरू असल्याचे सांगताना त्यांनी ‘अमृत भारत स्टेशन योजना’ अंतर्गत राज्यातील ६१ रेल्वे स्थानकांचा सुमारे २,१६० कोटी रुपयांच्या खर्चातून पुनर्विकास सुरू असल्याची माहिती दिली. त्यापैकी नऊ स्थानकांचे काम पूर्ण झाले असून, बेंगळुरू कॅन्टोन्मेंट स्थानकाचा ४८५ कोटी रुपये आणि यशवंतपूर स्थानकाचा ३६७ कोटी रुपयांत विकास सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

२०१४ नंतर कर्नाटकमध्ये सुमारे १,७५० किलोमीटर नवीन रेल्वेमार्ग उभारण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. हासन-मंगळुरू विभागातील विद्युतीकरण पूर्णत्वाच्या टप्प्यात असून त्याची चाचणी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

बेंगळुरू उपनगरी रेल्वे प्रकल्पातील चारही कॉरिडॉरचे काम वेगाने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बैयप्पनहळ्ळी-चिक्कबनवारा आणि हिलालिगे-राजानुकुंटे मार्गांसाठी जमीन संपादन प्रक्रिया पूर्ण झाली असून, केएसआर बेंगळुरू-देवनहळ्ळी आणि केंगेरी-व्हाईटफिल्ड मार्गांनाही मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे विमानतळ, इलेक्ट्रॉनिक सिटी, मराठहळ्ळी आणि हेब्बळ यांसारख्या प्रमुख भागांना रेल्वे जोडणी मिळणार आहे.

कर्नाटकमध्ये सध्या १२ जोड्या वंदे भारत गाड्या कार्यरत असून, बेंगळुरू-मंगळुरू मार्गावरील चाचण्या सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच बेंगळुरू-हैदराबाद आणि बेंगळुरू-चेन्नई बुलेट ट्रेन कॉरिडॉरलाही मंजुरी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री व्ही. सोमण्णा यांनीही उपस्थितांना संबोधित केले. एसएमव्हीटी बेंगळुरू-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (गाडी क्रमांक १६५५३/५४) सुरू केल्याबद्दल त्यांनी रेल्वेमंत्र्यांचे आभार मानले. देशातील व्यस्त रेल्वेमार्गांपैकी एका मार्गावरील प्रवाशांसाठी ही सेवा दिलासादायक ठरेल, असे ते म्हणाले.

थानिसंद्रा येथे सुमारे २७० कोटी रुपयांचा वंदे भारत स्लीपर देखभाल डेपो उभारण्यात येणार असून, एसएमव्हीटी बेंगळुरू येथे ५२.७३ कोटी रुपयांचा चेअर कार देखभाल प्रकल्प उभारला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

कार्यक्रमाला खासदार पी. सी. मोहन, लहर सिंग सिरोया आणि तेजस्वी सूर्या हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. तसेच बेंगळुरू विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक आशुतोष कुमार सिंह आणि दक्षिण पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

The post बेंगळुरू- बेळगाव- मुंबई नव्या रेल्वेसेवेचा शुभारंभ appeared first on News 24 Tass Marathi.

बेळगाव – गोवा आणि बेंगळूरू – मुंबई नवीन रेल्वे सेवांच्या मागणीला गती द्या
खासदार जगदीश शेट्टर यांची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक

बेळगाव : लोकसभा मतदारसंघातील विविध रखडलेल्या रेल्वे प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी सोमवारी हुबळी येथे नैऋत्य रेल्वेचे महाव्यवस्थापक के. अनंत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.

बैठकीत बेळगाव – कित्तूर – धारवाड या प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन अद्याप रेल्वेकडे हस्तांतरित न झाल्यामुळे काम रखडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सुमारे १,४३० एकर जमिनीचे भूसंपादन निश्चित झाले असले, तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वाटप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे जमीन रेल्वे प्रशासनाच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया थांबली आहे.

या संदर्भात जिल्हास्तरावर यापूर्वी चर्चा झाल्याचे सांगून, राज्य सरकारकडे पाठपुरावा करून प्रक्रिया वेगवान करण्याचा प्रयत्न करू, असे शेट्टर यांनी स्पष्ट केले.

बैठकीत बेळगाव–पारकनट्टी–गोकाक–यादवाड या प्रस्तावित रेल्वेमार्गावरही चर्चा झाली. या परिसरात सिमेंट उद्योग आणि साखर कारखान्यांची मोठी संख्या असल्याने या मार्गाला औद्योगिकदृष्ट्या महत्त्व असल्याचे शेट्टर यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक गरज आणि औद्योगिक मागणी लक्षात घेऊन हा प्रस्ताव पुन्हा रेल्वे मंडळाकडे सादर करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशीही या विषयावर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकपूर–रामदुर्ग–सौंदत्ती –धारवाड या नव्या रेल्वेमार्गाचाही बैठकीत उल्लेख झाला. सौंदत्ती येथील श्री रेणुकादेवी मंदिराला दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक भेट देत असल्याने या मार्गाची आवश्यकता असल्याचे शेट्टर यांनी सांगितले. प्रारंभी या मार्गाचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली. या सर्वेक्षणासाठी सुमारे ७० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, रेल्वे मंडळाच्या मंजुरीची आवश्यकता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हा प्रस्ताव सध्या रेल्वे मंडळाच्या विचाराधीन असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.

‘पंतप्रधान अमृत भारत स्थानक योजना’ अंतर्गत सुरू असलेल्या बेळगाव आणि घटप्रभा रेल्वे स्थानकांच्या विकासकामांचा वेग कमी असल्याबद्दल खासदारांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर महाव्यवस्थापकांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच बेळगाव रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी सांब्रा आणि देसूर स्थानकांचा पर्यायी टर्मिनल म्हणून विकास करण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाली.

बैठकीत बेळगाव – मनुगुरू रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याच्या प्रस्तावावरही विचारविनिमय झाला. सिकंदराबाद, हैदराबाद आणि चार्लापल्ली या शहरांशी जोडल्या जाणाऱ्या सेवा बेळगावीहून सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

याशिवाय, बेळगाव मार्गे प्रस्तावित बेंगळूरू – मुंबई रेल्वे सेवेचाही आढावा घेण्यात आला. हा प्रस्ताव सध्या केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या मंजुरीसाठी प्रलंबित असून, लवकरच त्यास हिरवा कंदील मिळण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही सेवा सुरू झाल्यानंतर बेंगळूरू आणि मुंबई दरम्यानचा प्रवास बेळगावमार्गे सुमारे २३ तासांत पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.

बेळगाव – लोंढा – गोवा या नव्या रेल्वे सेवेची मागणीही शेट्टर यांनी बैठकीत लावून धरली. प्रादेशिक संपर्क सुधारण्यासाठी आणि प्रवाशांची दीर्घकालीन गरज लक्षात घेऊन ही सेवा सुरू करावी, अशी मागणी त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली.

The post बेळगाव – गोवा आणि बेंगळूरू – मुंबई नवीन रेल्वे सेवांच्या मागणीला गती द्या appeared first on News 24 Tass Marathi.

हैदराबाद – बेळगाव विशेष रेल्वे सेवेला मुदतवाढ
अतिरिक्त फेरीची घोषणा

हुबळी : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने हैदराबाद–बेळगाव–हैदराबाद साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांच्या सेवेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार प्रत्येक दिशेने एक अतिरिक्त फेरी चालवण्यात येणार आहे.

गाडी क्रमांक ०७०४३ हैदराबाद–बेळगाव विशेष, जी पूर्वी ३० एप्रिल २०२६ पर्यंत धावणार होती, ती आता ७ मे २०२६ रोजी अतिरिक्त फेरी धावेल. त्याचप्रमाणे, गाडी क्रमांक ०७०४४ बेळगाव–हैदराबाद विशेष, जी १ मे २०२६ पर्यंत नियोजित होती, ती ८ मे २०२६ रोजी अतिरिक्त फेरी चालवली जाणार आहे.

या निर्णयामुळे दोन्ही शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार असून, वाढत्या गर्दीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

The post हैदराबाद – बेळगाव विशेष रेल्वे सेवेला मुदतवाढ appeared first on News 24 Tass Marathi.

बेंगळुरू – मुंबई व्हाया बेळगाव स्लीपर वंदे भारतला मंजुरी
१७ तासांत प्रवास पूर्ण ; अत्याधुनिक सुविधांसह सेवा लवकरच सुरू

बेळगाव : बेंगळुरू ते मुंबई या महत्त्वाच्या मार्गावर धावणाऱ्या स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ग्रीन सिग्नल दिला असून, लवकरच ही अत्याधुनिक रेल्वे सेवेत दाखल होणार आहे. विशेष म्हणजे ही गाडी अवघ्या १७ तासांत बेंगळुरूहून मुंबईला पोहोचणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

ही देशातील दुसरी वंदे भारत शयनयान एक्स्प्रेस ठरणार असून, केएसआर बेंगळुरू सिटी रेल्वे स्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) दरम्यान धावणार आहे. अद्याप अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले नसले तरी हा प्रवास १६ तासांपेक्षा कमी वेळेत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या मार्गासाठी दोन वंदे भारत शयनयान रेक तैनात करण्यात येणार असून, एक मुंबईहून तर दुसरा बेंगळुरूहून सुरू होईल. त्यामुळे दोन्ही महानगरांदरम्यान दररोज रात्रीची नियमित सेवा उपलब्ध होणार आहे.

रेल्वेमंत्र्यांनी खासदार पी. सी. मोहन यांना पाठवलेल्या पत्रातून या नव्या सेवेला मंजुरी दिल्याचे स्पष्ट केले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात येणाऱ्या या गाडीत अत्याधुनिक डबे, सुधारित सुरक्षा व्यवस्था, उच्च दर्जाची स्वच्छता आणि आरामदायी शयनयान सुविधा उपलब्ध असणार आहेत.

बेळगावमार्गे धावणारी ही सेवा सुरू झाल्यास उत्तर कर्नाटक व पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी मोठी सोय होणार आहे.

The post बेंगळुरू – मुंबई व्हाया बेळगाव स्लीपर वंदे भारतला मंजुरी appeared first on News 24 Tass Marathi.

उन्हाळी सुट्टीसाठी मुंबई – बेंगळूर दरम्यान दोन साप्ताहिक विशेष गाड्या सुरू करण्याची घोषणा
बेळगाव : उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते बेंगळूरमधील सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनस या मार्गावर दोन साप्ताहिक विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. एप्रिल ते जुलै या कालावधीत या गाड्या एकूण १३ फेऱ्या पार करतील, ज्यामुळे बेळगावसह मार्गावरील प्रवाशांना मोठी सोय होणार आहे.

साप्ताहिक विशेष एक्सप्रेस (क्र. ०१०१३) १९ एप्रिल ते १२ जुलै २०२६ या कालावधीत दर रविवारी ११.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटेल आणि सोमवारी ११.४५ वाजता सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनसवर पोहचेल. परतीच्या प्रवासासाठी (क्र. ०१०१४) २० एप्रिल ते १३ जुलै दर सोमवारी १३.५० वाजता बंगळूरमधून सुटेल आणि मंगळवारी १३.३० वाजता मुंबईला पोचेल.

या विशेष रेल्वेत प्रवास करताना गाडी ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, सातारा, कराड, सांगली, मिरज, रायबाग, घटप्रभा, बेळगाव, लोंढा, धारवाड, हुबळी, हावेरी, हरिहर, दावणगेरी, चिकजाजूर, बिरुर, अर्सिकेरे आणि तुमकूर या प्रमुख स्थानकांवर थांबेल.

गाडीत एकूण २२ बोगी असतील, ज्यात वातानुकूलित, स्लीपर आणि सामान्य बोगींचा समावेश असेल, त्यामुळे प्रवाशांना आरामदायी आणि सोयीस्कर प्रवासाची हमी मिळणार आहे.

The post उन्हाळी सुट्टीसाठी मुंबई – बेंगळूर दरम्यान दोन साप्ताहिक विशेष गाड्या सुरू करण्याची घोषणा appeared first on News 24 Tass Marathi.