railway station Archives | News 24 Tass Marathi

प्रधानमंत्री अमृत भारत स्टेशन प्रकल्पाची कामे वेळेत पूर्ण करा
खासदार जगदीश शेट्टर यांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश

बेळगाव रेल्वे स्थानकाच्या विकासकामांची पाहणी

बेळगाव : रेल्वे स्थानकातील विकासकामांना होत असलेल्या विलंबाबाबत प्रवाशांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर खासदार जगदीश शेट्टर यांनी मंगळवारी रेल्वे स्थानकाला भेट देऊन कामांची पाहणी केली. विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या.

प्रधानमंत्री अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत बेळगाव रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी सुमारे १९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून पादचारी पूल, एस्केलेटर आणि लिफ्ट उभारण्याची कामे सुरू आहेत. मात्र, कामांना होत असलेल्या विलंबामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी खासदारांकडे करण्यात आल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर शेट्टर यांनी प्रत्यक्ष रेल्वे स्थानकावर जाऊन कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी कामातील विलंबाबाबत त्यांनी रेल्वे अभियंते ललन कुमार आणि सेंथिल यांच्याकडे विचारणा केली. पादचारी पुलाचे काम ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत, तर एस्केलेटर आणि लिफ्ट बसवण्याचे काम ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

राणी चन्नम्मा एक्स्प्रेसमधील अस्वच्छतेबाबतही प्रवाशांकडून आलेल्या तक्रारींची खासदारांनी दखल घेतली. रेल्वे प्रवाशांना आवश्यक सुविधा मिळणे गरजेचे असून, भविष्यात अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास स्थानक अधिकाऱ्यांना थेट जबाबदार धरले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, बेळगाव रेल्वे स्थानकाला पर्याय म्हणून देसूर रेल्वे स्थानकाच्या सर्वांगीण विकासाच्या शक्यतांचाही अभ्यास करण्यात येणार असल्याची माहिती शेट्टर यांनी दिली. नैऋत्य रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत याबाबत पाहणी व अभ्यास केला जाणार आहे.

यावेळी बेळगाव उत्तरचे माजी आमदार अनिल बेनके, महानगरपालिका सदस्य जयतीर्थ सवदत्ती यांच्यासह भाजपचे शहर पदाधिकारी आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

The post प्रधानमंत्री अमृत भारत स्टेशन प्रकल्पाची कामे वेळेत पूर्ण करा appeared first on News 24 Tass Marathi.