railway over bridge Archives | News 24 Tass Marathi

तिसऱ्या रेल्वे ओव्हरब्रिजवर बॅरिगेट्स कोसळले
अपघाताचा धोका वाढला

बेळगाव : शहरातील तिसऱ्या रेल्वे ओव्हरब्रिजवर लावण्यात आलेले बॅरिगेट्स अचानक कोसळल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे वाहतूक करणाऱ्यांसमोर मोठा अपघाताचा धोका निर्माण झाला असून नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

ओव्हरब्रिजवर पडलेली बॅरिगेट्स रस्त्याच्या मध्यभागी अडथळा निर्माण करत असल्यामुळे वाहनांची गती मंदावली आहे आणि वाहतुकीवर थेट परिणाम झाला आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक आहे, तसेच रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी करत, संबंधित विभाग आणि रहदारी पोलिसांना घटनास्थळी त्वरित दाखल होऊन बॅरिगेट्स हटवण्याचे आवाहन केले आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

The post तिसऱ्या रेल्वे ओव्हरब्रिजवर बॅरिगेट्स कोसळले appeared first on News 24 Tass Marathi.

गांधीनगर–धर्मवीर संभाजी चौक उड्डाणपुलासाठी २७५ कोटींची मंजुरी
बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गांधीनगर (राष्ट्रीय महामार्ग) ते धर्मवीर संभाजी महाराज चौक दरम्यान उड्डाणपूल बांधण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे २७५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

अशोक सर्कल, संगोळी रायण्णा सर्कल आणि राणी चन्नम्मा सर्कल मार्गे जाणारा हा उड्डाणपूल २.०३ किलोमीटर लांबीचा असेल. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून, तो शहरातील रहदारी समस्येवर महत्त्वाचा उपाय ठरणार आहे.

हुबळी येथील व्हीएलएस कन्सल्टंट्सने यापूर्वी तयार केलेल्या आराखड्यानुसार, संकम हॉटेल ते धर्मवीर संभाजी चौक दरम्यान सुमारे ३.६ कि.मी. लांबीचा पूल प्रस्तावित होता. जोडरस्त्यांसह संपूर्ण कॉरिडॉरची लांबी सुमारे ४.५ कि.मी. असून तो अशोक सर्कल व आरटीओ चौक मार्गे राणी चन्नम्मा चौकाला जोडतो.

मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या २.०३ कि.मी. लांबी आणि पूर्वीच्या डीपीआरमधील फरक आगामी अंमलबजावणी व निविदा प्रक्रियेदरम्यान स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

The post गांधीनगर–धर्मवीर संभाजी चौक उड्डाणपुलासाठी २७५ कोटींची मंजुरी appeared first on News 24 Tass Marathi.

तिसऱ्या गेटवरील रेल्वे उड्डाणपुलाची खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडून पाहणी
एका आठवड्यात रस्ता दुरुस्त करण्याचे निर्देश

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावातील नागरिकांनी वारंवार केलेल्या तक्रारींचा पाठपुरावा करत खासदार जगदीश शेट्टर यांनी मंगळवारी टिळकवाडीनजीक रेल्वे गेट क्रमांक ३ (एल.सी. ३८१) वरील उड्डाणपुलाची पाहणी केली. रस्त्यावरील खड्डे व खालावलेली स्थिती पाहून शेट्टर यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता श्री. कोळेकर यांना तातडीने दुरुस्ती सुरू करून एक आठवड्याच्या आत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

हा उड्डाणपूल नैऋत्य रेल्वे विभागाने बांधलेला असून, सध्या त्याची देखभाल जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. पाहणी दरम्यान रेल्वेचे सहाय्यक अभियंता श्री. मायनका यांनी पुलाच्या तांत्रिक बाबींबाबत माहिती दिली.

खासदारांच्या पाहणीनंतर स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत लवकरच रस्ता दुरुस्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

The post तिसऱ्या गेटवरील रेल्वे उड्डाणपुलाची खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडून पाहणी appeared first on News 24 Tass Marathi.

तिसऱ्या रेल्वे उड्डाणपुलाची दुरवस्था ; युवा समितीचे रेल्वेमंत्र्यांना पत्र
बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरातील तिसऱ्या रेल्वे फाटकावर उभारलेल्या उड्डाणपुलाची दुरवस्था झाली असून, दुसऱ्या बाजूचे काम अद्याप अपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विन वैष्णव यांना पत्र पाठवून तात्काळ कार्यवाहीची मागणी केली आहे.

शहराच्या दक्षिण भागाची वाहतूक सुलभ करण्यासाठी या उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात आले होते. पुलाचा एक भाग ऑक्टोबर २०२२ मध्ये पूर्ण करून नागरिकांसाठी खुला करण्यात आला; परंतु काहीच दिवसांत रस्त्याची झपाट्याने दुरावस्था झाली. त्यावेळी नैऋत्य रेल्वेने कंत्राटदारावर दंडात्मक कारवाईही केली होती.

सध्या पुलावरील रस्ता खड्ड्यांनी भरून गेला असून वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वाहने चालवताना अपघाताचा धोका वाढला आहे. त्यातच, पुलाच्या दुसऱ्या टोकाचे काम अनेक वर्षांपासून रखडले असल्याने वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय कायम आहे.

या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे युवा समितीने थेट रेल्वेमंत्र्यांना निवेदन देत या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्यासोबतच अपूर्ण भागाचे काम त्वरीत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागाला द्यावेत, अशी मागणी केली आहे. सोशल मीडियावर व स्थानिक जनप्रतिनिधींनीही या विषयावर आवाज उठवला असला, तरी प्रत्यक्ष कृती झालेली नाही, असा आरोप समितीने केला आहे.

The post तिसऱ्या रेल्वे उड्डाणपुलाची दुरवस्था ; युवा समितीचे रेल्वेमंत्र्यांना पत्र appeared first on News 24 Tass Marathi.