puc result Archives | News 24 Tass Marathi

कावळेवाडीत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात
कावळेवाडी : येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे दहावी आणि बारावी परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. संस्थेचा हा उपक्रम सलग सहाव्या वर्षी आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी. एस. मोरे होते. स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली असून अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केल्याने त्यांना भविष्यासाठी नवी प्रेरणा मिळते, असेही त्यांनी नमूद केले.

प्रमुख वक्ते आणि सह्याद्री सोसायटीचे संचालक हर्षवर्धन कोळसेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे सांगितले. जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर यश संपादन करता येते. त्याचबरोबर संस्कार, नम्रता आणि मोठ्यांप्रती आदर ही जीवनातील महत्त्वाची मूल्ये असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी विनायक पाटील आणि रविना बसरीमरद यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मेहनत आणि अभ्यासाच्या जोरावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले असल्याचे त्यांनी सांगितले. गौरवाबद्दल प्रतिक्षा तरवाल हिने विद्यार्थ्यांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमात विविध शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जागतिक स्तरावरील कृषी तंत्रज्ञानाशी संबंधित स्पर्धेत डेन्मार्क येथे भारताचे प्रतिनिधित्व करून प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या रविना बसरीमरद (नागपूर) हिचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

याशिवाय सह्याद्री सोसायटीचे नूतन संचालक हर्षवर्धन कोळसेकर यांचाही यल्लापा बेळगावकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास पांडुरंग मोरे, यल्लापा बेळगावकर, विनायक पाटील, सुरेश किणयेकर, मोणापा सुतार, अशोक कडोलकर, शिवाजी जाधव, एम. पी. मोरे, यशवंतराव मोरे, के. डी. यळ्ळूरकर, जोतिबा मोरे, रामचंद्र मोरे, यल्लापा बुरुड, वसंत हेब्बाळकर, शशिकांत गावडे, आशा बाचीकर, रेणुका मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

नयन जाधव हिने यशस्वी विद्यार्थ्यांच्या अभिनंदनपत्राचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण बाबुराव जाधव आणि किशोर पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन निवृत्त शिक्षक के. आर. भाष्कळ यांनी केले. या गौरव सोहळ्याला पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post कावळेवाडीत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात appeared first on News 24 Tass Marathi.

मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना आवाहन
बेळगाव : मराठा समाजातील यंदाच्या दहावी व बारावी परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे लवकरच एका खास समारंभात या विद्यार्थांचा सन्मान करण्यात येणार आहे.

तरी बेळगाव शहर व बेळगाव तालुक्यातील पात्र विद्यार्थ्यानी गुणपत्रिकेच्या झेरॉक्स व आयडेंटिटी आकाराचा फोटो, संपूर्ण पत्ता व व्हाटसअप नंबरसह मराठा समाज सुधारणा मंडळ कार्यालय, मेलगे गल्ली, शहापूर(वेळ सकाळी ११ ते दुपारी १.३० पर्यंत) मधू कणबर्गी, शंकर बेकरीच्या बाजूला, किर्लोस्कर रोड तसेच धनश्री सोसायटी, अनगोळ रोड, अनगोळ येथे दि. ३१ मे पर्यंत आणून द्यावी. अधिक माहितीसाठी मंडळाचे कार्याध्यक्ष शिवराज पाटील  (9845960531) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.

The post मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना आवाहन appeared first on News 24 Tass Marathi.

गोगटे कॉलेजची ध्वनी कुलकर्णी कॉमर्स शाखेत जिल्ह्यात प्रथम तर राज्यात द्वितीय
बेळगाव : येथील केएलएस गोगटे कॉमर्स आणि सायन्स पीयू कॉलेजची विद्यार्थिनी ध्वनी संतोष कुलकर्णी हिने पीयूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षेत ६०० पैकी ५९९ गुण मिळवत कॉमर्स विभागात बेळगाव जिल्ह्यात प्रथम, तर राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
ध्वनी कुलकर्णी हिने इंग्रजी विषयात १०० पैकी ९९ गुण मिळवले, तर संस्कृत, बिझनेस स्टडीज, अकाउंटन्सी, स्टॅटेस्टिक्स आणि बेसिक गणित या पाच विषयांत १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. गोगटे कॉलेजचे प्राचार्या ,प्राध्यापक तसेच तिच्या आई-वडिलांचे तिला मार्गदर्शन लाभले असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

The post गोगटे कॉलेजची ध्वनी कुलकर्णी कॉमर्स शाखेत जिल्ह्यात प्रथम तर राज्यात द्वितीय appeared first on News 24 Tass Marathi.

पीयूसी परीक्षेत उचगावच्या साहिबा सनदीचे उज्ज्वल यश
कॉमर्स शाखेत ९९.१६ टक्के गुणांसह दमदार कामगिरी

बेळगाव : पीयूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी दुपारी जाहीर झाला असून, यंदाही बेळगावमधील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यशाची परंपरा कायम ठेवली आहे. यामध्ये बेळगाव तालुक्यातील उचगाव येथील कुमारी साहिबा खाजामिया सनदी हिने कॉमर्स शाखेत ९९.१६ टक्के गुण मिळवत विशेष लक्ष वेधून घेतले आहे.

अंगडी कॉलेजची विद्यार्थिनी असलेल्या साहिबाने ६०० पैकी ५९५ गुण मिळवत आपल्या सातत्यपूर्ण मेहनतीचे फळ मिळवले आहे. ग्रामीण भागातून येत असूनही तिने यापूर्वीच्या शैक्षणिक टप्प्यांमध्येही उत्तम कामगिरी केली होती आणि बारावीच्या या महत्त्वाच्या परीक्षेतही तीच चमक कायम राखली.

साहिबाच्या या उल्लेखनीय यशामुळे उचगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत आहे.

The post पीयूसी परीक्षेत उचगावच्या साहिबा सनदीचे उज्ज्वल यश appeared first on News 24 Tass Marathi.

बारावी परीक्षेचा निकाल आज दुपारनंतर
बेंगळूर : बारावी (पीयूसी द्वितीय वर्ष) परीक्षेचा निकाल आज गुरुवार दि. ९ रोजी दुपारी ३ वाजता जाहीर केला जाणार आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वी सकाळी पदवीपूर्व शिक्षण विभाग आणि मंत्री मधु बंगारप्पा यांची पत्रकार परिषद होणार असून, त्यानंतर अधिकृतपणे निकाल प्रसिद्ध केला जाईल.

विद्यार्थ्यांना आपला निकाल www.karresults.nic.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून निकालाच्या तारखेची उत्सुकता होती. ७ किंवा ८ एप्रिल रोजी निकाल लागेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र कर्नाटकात सुरू असलेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकांमुळे निकाल जाहीर करण्यात विलंब झाला.

तसेच आगामी पुरवणी परीक्षांचे नियोजन लक्षात घेऊन गुरुवार दि. ९ रोजी निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाकडून देण्यात आली आहे.

The post बारावी परीक्षेचा निकाल आज दुपारनंतर appeared first on News 24 Tass Marathi.

गोगटे कॉलेजच्या तन्वी पाटीलचे पीयूसी परीक्षेत सुयश
वाणिज्य विभागात राज्यात तृतीय क्रमांक

सी.ए. होण्याची व्यक्त केली इच्छा

बेळगाव / प्रतिनिधी

कर्नाटक राज्यातील पीयूसी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून बेळगावच्या एका विद्यार्थिनीने वाणिज्य शाखेत राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.

कर्नाटक पदवीपूर्व परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने मंगळवारी दुपारी चालू शैक्षणिक वर्षाच्या पीयूसी द्वितीय म्हणजेच बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला. या परीक्षेत बेळगाव येथील गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या तन्वी हेमंत पाटील या विद्यार्थिनीने ६०० पैकी ५९७ गुण मिळवून वाणिज्य शाखेत राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. तन्वीने सहा पैकी पाच विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवले आहेत.

तन्वीच्या या यशाबद्दल कुटुंबीय व महाविद्यालयातील शिक्षकांनी आनंद व्यक्त करत पेढे भरवून तिचे अभिनंदन केले. या यशाचे श्रेय आई – वडील आणि कॉलेजला देत तन्वीने चार्टर्ड अकाउंटंट होण्याची इच्छा व्यक्त केली. नियमानुसार दररोज एकाग्रतेने सराव केल्यास कोणतीही अडचण येत नाही. प्राध्यापकांचे मार्गदर्शन घेऊन ध्येय गाठायचे होते, असे तिने सांगितले.

तन्वीच्या आई – वडिलांनी आपल्या मुलीच्या मेहनतीबद्दल माहिती देऊन तिच्या यशाबद्दल कौतुक व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक – शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

The post गोगटे कॉलेजच्या तन्वी पाटीलचे पीयूसी परीक्षेत सुयश appeared first on News 24 Tass Marathi.