public problems Archives | News 24 Tass Marathi

गायरान जमिनी सार्वजनिक उपयोगासाठी राखून ठेवण्याची मागणी
सावगाव ग्रामस्थांचे खासदार जगदीश शेट्टर यांना निवेदन

बेळगाव : बेळगाव शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या सावगाव येथील गायरान महसूल जमिनींचे संरक्षण करून त्या भविष्यात सार्वजनिक उपयोगासाठी राखून ठेवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या वतीने हे निवेदन सादर करण्यात आले.

गावातील गायरान जमिनींचे भविष्यात व्यावसायिक कारणांसाठी वाटप किंवा हस्तांतरण होण्याची शक्यता लक्षात घेऊन या जमिनी कायमस्वरूपी संरक्षित कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सर्व्हे क्रमांक १५३ मधील २ एकर २५ गुंठे जमीन गो-स्मशानासाठी राखून ठेवावी तसेच संबंधित आरटीसी नोंदवहीत तिची ‘गो-स्मशान’ म्हणून नोंद करावी, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात १७ ऑगस्ट २०२१ रोजी बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीमध्ये ठराव झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सर्व्हे क्रमांक १४९ मधील ६ एकर २७ गुंठे जमिनीपैकी २० गुंठे जमीन अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी आणि २ एकर जमीन हिंदू समाजाच्या स्मशानभूमीसाठी देण्यात आली आहे. उर्वरित सुमारे ४ एकर ७ गुंठे जमीन जनावरांच्या चाऱ्यासाठी राखून ठेवावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली.

तसेच सर्व्हे क्रमांक १३२ मधील ५ एकर ९ गुंठे, २३८ मधील २ एकर २४ गुंठे, १३५ मधील ५ एकर ३ गुंठे आणि १२९ मधील २ एकर जमीन सार्वजनिक उपयोगासाठी नियोजनबद्ध पद्धतीने वापरण्याचा प्रस्ताव ग्रामस्थांनी मांडला आहे. या जमिनींपैकी काही भागात पशुपालन रुग्णालय, हायस्कूलसाठी बाग, कुस्ती व मल्लखांबासाठी जागा, विद्यार्थ्यांसह महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी चालण्याचा मार्ग, क्रीडांगण, पार्किंग तसेच व्हॉलीबॉल, क्रिकेट आणि कबड्डीसाठी सुविधा उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.

सरकारी प्राथमिक शाळा तसेच कन्नड आणि मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे आणि अन्य शैक्षणिक सुविधा उभारण्यासाठीही आवश्यक जमीन राखून ठेवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, सावगावमधील सार्वजनिक वापरातील चार स्मशानभूमींना शेड आणि संरक्षक भिंती उभारण्यासाठी खासदारांच्या स्थानिक क्षेत्र विकास निधीतून (MPLADS) निधी मंजूर करावा, अशी स्वतंत्र मागणी करण्यात आली आहे. पावसाळा आणि उन्हाळ्यात अंत्यसंस्कार करताना ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने स्मशानभूमींमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.

सावगाव येथील अंगणवाडी क्रमांक २१९ साठी सुसज्ज इमारत उभारण्याकरिता खासदार निधीतून आवश्यक अनुदान मंजूर करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. लहान मुलांना चांगले शैक्षणिक आणि पोषणात्मक वातावरण मिळण्यासाठी ही सुविधा आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले.

गायरान जमिनी या सार्वजनिक हितासाठी महत्त्वाच्या असून त्यांचा व्यावसायिक वापर किंवा अन्य प्रकारचे हस्तांतरण टाळून त्या भावी पिढ्यांसाठी संरक्षित ठेवाव्यात. यासाठी संबंधित कर्नाटक शासनाच्या प्राधिकरणांकडे शिफारस करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंती ग्रामस्थांनी खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे केली.

या मागण्यांसाठी यल्लाप्पा एम. पाटील, कल्लाप्पा मल्लाप्पा पाटील कुपट यांच्यासह सावगावमधील ग्रामस्थांनी निवेदन सादर केले.

The post गायरान जमिनी सार्वजनिक उपयोगासाठी राखून ठेवण्याची मागणी appeared first on News 24 Tass Marathi.