progressive writer's association Archives | News 24 Tass Marathi

शिवाजी महाराज काळाच्या पुढचा विचार करणारे द्रष्टे राजे
शिवाजी कोण होता ? पुस्तकावर प्रा. दत्ता नाडगौडा यांचे व्याख्यान

बेळगाव : शिवाजी महाराजांनी नेहमी प्रजेच्या कल्याणाचा विचार केला. म्हणूनच सर्वसामान्य माणसाला म्हणजेच रयतेला ते आपले राज्य वाटत होते. शिवाजी महाराज हे काळाच्या पुढचा विचार करणारे द्रष्टे राजे होते, असे उद् गार  जी. एस. एस. काॅलेजचे निवृत्त प्राध्यापक दत्ता नाडगौडा यांनी काढले.

राज्य मराठी विकास संस्था मुंबईच्या प्रोत्साहनाने व प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात प्रा. नाडगौडा बोलत होते. कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी प्रगतिशील लेखक संघाचे उपाध्यक्ष व जागतिक घडामोडीचे अभ्यासक कॉम्रेड अनिल आजगावकर होते.

संघाचे अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यानंतर जोतिबा अगसीमनी यांच्या हस्ते वक्ते नाडगौडा व अध्यक्ष आजगावकर यांचा पुस्तक भेट देऊन  सत्कार करण्यात आला.

प्रा. नाडगौडा यांनी पुस्तकाचे अभ्यासपूर्ण असे विवेचन केले. ते म्हणाले , शिवाजीचे कार्य हे आपले कार्य आहे असे त्या काळातील रयतेला वाटत होते. याची अनेक उदाहरणे पुस्तकात आहेत. पन्हाळगडचा वेढा, मिर्झाराजे जयसिंह याच्याशी करावा लागलेला नामुष्कीचा तह, आग्र्याहून सुटका, अफझल खानाचा वध आदी प्रसंगात शिवा न्हावी, बाजीप्रभू देशपांडे, मदारी म्हेतर, हिरोजी फर्जंद हे आपला मृत्यू होणार हे माहीत असूनही त्यांनी शिवाजी महाराजांना साथ दिली. आपण मेलो तरी चालेल. पण शिवाजीराजा जगला पाहिजे. शिवाजी करतो ते आपले स्वतःचे कार्य आहे. रयतेसाठी तो करतो आहे ही त्यांची भावना होती. म्हणूननच त्यांनी मृत्युला कवटाळले.  आपल्याला जहागिरी मिळावी किंवा इनाम मिळावा म्हणून ते लढले नाहीत. शिवाजीचे कार्य हे आपले कार्य आहे असे त्यांनी मानले. केवळ सैनिकच नव्हे तर सर्वसामान्य रयतसुद्धा आपल्या परीने सहभागी झाले होते.

आज शिवाजीचे नाव घेऊन जे चालले आहे ते पहाता हा इतिहासाचा विपर्यास आहे. म्हणून शिवाजी समजून घेण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.  ते सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे, असे ते म्हणाले. अनिल आजगावकर यांनी अध्यक्षीय भाषणात शिवाजी महाराज हे इतर राजापेक्षा कसे वेगळे होते हे स्पष्ट केले.

सागर मरगाण्णाचे यांनी सूत्रसंचालन केले. गिरीश कॉंप्लेक्समधील शहीद भगतसिंग सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील बहुसंख्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

The post शिवाजी महाराज काळाच्या पुढचा विचार करणारे द्रष्टे राजे appeared first on News 24 Tass Marathi.

कामगार चळवळीत महात्मा फुलेंचे योगदान मोलाचे – प्रा. आनंद मेणसे
बेळगाव : महात्मा फुले यांचे कार्य दलित,विधवा, शाळा शेतकरी यांच्या इतपतच मर्यादित नव्हते तर, त्यांनी कामगार चळवळीत मोलाचे योगदान दिले होते, असे प्रतिपादन बेळगावचे ज्येष्ठ विचारवंत प्रा आनंद मेणसे यांनी प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या संयुक्त कार्यक्रमात बोलताना केले.

काल शुक्रवारी सायंकाळी रामदेव गल्ली येथील शहिद भगतसिंग सभागृह आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कॉम्रेड नागेश सातेरी यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे उपस्थित होते.यावेळी महात्मा फुले यांचे कामगार चळवळीतील योगदान या विषयावर पुढे बोलताना प्रा.मेणसे म्हणाले, जेम्स व्हेटने लावलेल्या वाफेच्या शोधा नंतर जगात अमुलाग्र बदल घडले. वाफेच्या शोधा नंतर जगात यंत्र युगाचा प्रारंभ झाला. व्यापारी उद्योजक बनले. स्वतःच्या हितासाठी उद्योजक संघटित झाले. उद्योगासाठी कामगारांची गरज भासू लागली. कामगारांच्या श्रमावर उद्योजकांनी गडगंज संपत्ती कमावली. मात्र दुसऱ्या बाजूला कामगार साध्या साध्या सुखसुविधानापासूनही वंचित राहू लागले.

1860 ते 1890 दरम्यान दुष्काळ काळात ग्रामीण भागातील लोक कामासाठी मुंबईत आले. 1854 मध्ये मुंबईत पहिली कापड गिरणी सुरुवात झाली 875 मध्ये गिरणी कामगारांनी स्वतःच्या हितासाठी मिल कॉर्नर असोसिएशनची स्थापना केली. या काळात रात्रंदिवस काम करणाऱ्या कामगारांसाठी कोणतेच कायदे नव्हते कोणत्याच सोयी सुविधा अथवा आठवड्याची सुट्टी ही नव्हती. हा कालखंड महात्मा फुलेंच्या कार्याचा टप्पा होता. महात्मा फुले यांचे अनुयायी नारायण लोखंडे यांना गिरणी कामगारांच्या व्यथा वेदनांची पुरेपूर जाणीव होती.

महात्मा फुले आणि नारायण लोखंडे यांनी महाराष्ट्र नाभिकांची पहिली संघटना बांधली. महात्मा फुलेंच्या मार्गदर्शनानुसार लोखंडे यांनी कामगार चळवळीला बळ देण्याचे काम हाती घेतले त्यांच्या कार्याला पत्रकार भालेकरांची साथ लाभली भालेकर यांनी दीनबंधू या वर्तमानपत्रातून कामगारांच्या दयनीय परिस्थितीची बाजू सातत्याने मांडली. इतिहासकार कृष्णराव केळुस्कर ही कामगार चळवळीत सहभागी झाले. कामगारांच्या व्यथा वेदनांची जाणीव ठेवून कामगारांच्या हिताच्या दृष्टीने गिरणी कामगारांसमोर पगार वेळेवर मिळावा महिलांसाठी प्रसाधनगृह उपलब्ध व्हावे जीवनाची सुट्टी मिळावी जखमी कामगारांना त्याचबरोबर काम करताना दूध पावलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी पेन्शन मिळावी आठवडायची एक दिवस सुट्टी मिळावी अशा मागण्या करण्यात आल्या या मागण्यांसाठी कामगार आणि मालकात सुरू झालेल्या वाटाघाटींना जातीय स्वरूप देण्याचाही प्रयत्न झाला. जातीय दंगलीत कामगारांचे बळी गेले. कामगारात फूट पडण्याचे प्रयत्न झाले.

कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी तब्बल दहा वर्ष संघर्ष केला. मुंबईतील ७३ गिरण्यांमध्ये कामगारांमध्ये जनजागृती करण्यात आली‌. हिंदू मुस्लिम ऐक्याचे मेळावे घेण्यात आले.सभा घेण्यात आल्या. सामाजिक सलोख्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यातून जातीय दंगलीत बिथरलेले कामगार पुन्हा संघटित झाले. संघटित झालेल्या कामगार चळवळीने गिरणी मालकांना संपाचा इशारा दिला.संपाचा इशारा गिरणी कामगारांना परवडणारा नव्हता. त्यामुळेच गिरणी मालकांना कामगारांची आठवड्याची सुट्टी मान्य करावी लागली. संघटित चळवळीच्या जोरावर कामगारांच्या मागण्या मान्य होऊ लागल्या.कामगार चळवळीची स्थापना झाल्यापासून कधीही वैयक्तिक स्वार्थाचा विचार झाला नाही. कामगार चळवळीने कामगारांच्या हिताबरोबरच समाज हिताचा विचार केला. असेही प्रा. मेणसे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

या कार्यक्रमाच्या प्रारंभी म.ए. समितीचे दिवंगत नेते टी. के. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थित त्यांच्या स्वागत आणि प्रास्ताविक कृष्णा शहापूरकर यांनी केले, तर सूत्रसंचालन अनिल आजगावकर यांनी केले.

The post कामगार चळवळीत महात्मा फुलेंचे योगदान मोलाचे – प्रा. आनंद मेणसे appeared first on News 24 Tass Marathi.

कपिलेश्वरकर – माळी यांचा प्रगतिशील लेखक संघातर्फे सत्कार
बेळगाव : बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या राष्ट्रीय सहकोषाध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल नितीन कपिलेश्वरकर व मंडळाच्या विभागीय कार्यवाहपदी निवड झाल्याबद्दल परशराम माळी यांचा येथील प्रगतिशील लेखक संघातर्फे शुक्रवारी सत्कार करण्यात आला. अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे अध्यक्षस्थानी होते.

प्रगतिशीलच्या साप्ताहिक बैठकीत हा सत्कार झाला. यावेळी प्रा. दत्ता नाडगौडा यांनी मदन पाटील यांच्या अकथित सावरकर या पुस्तकावर आपले विचार मांडले. प्रा. आनंद मेणसे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी त्यांनी संघाच्या उपक्रमांची माहिती दिली.

प्रा. नाडगौडा यांनी अकथित सावरकर या पुस्तकावर बोलताना सांगितले की, स्वातंत्र्यापूर्वीचे सावरकर व स्वातंत्र्यानंतरचे सावरकर अशा दोन विभागात हे पुस्तक विभागले आहे. स्वातंत्र्यापूर्वी सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. पण स्वातंत्र्यानंतर ते अहंमन्य बनले. आपला मोठेपणा दाखवण्यासाठी ते अनेकदा खोटेपणाने वागले. हे या पुस्तकात काही प्रसंगातून लेखकाने स्पष्ट केले आहे. सावरकर यांना स्वातंत्र्यवीर ही उपाधी कुणी दिली नसून त्यांनी ती स्वतःच लावून घेतली आहे. महात्मा गांधी एका कार्यक्रमासाठी रत्नागिरीत आले असताना आपण आजारी आहोत. त्यामुळे कार्यक्रमाला येऊ शकलो नाही असे सावरकर यांनी खोटेच सांगितले. ते आजारी असल्याने महात्मा गांधी त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेले. त्यांच्यासमवेत आप्पासाहेब पटवर्धन होते. दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात गांधीजींनी सावरकर यांच्या भेटीत त्यांच्या पत्नीच्या पायावर डोके ठेवले व तुम्ही पदरात धगधगता अंगार ठेवून घेतला आहात. धन्य आहात तुम्ही असे म्हटले, अशी बातमी आली. ही बातमी सावरकर यांनी स्वतःच लिहून वृत्तपत्रांना पाठविली होती. त्यांच्या खोटेपणाचे इतरही काही प्रसंग या पुस्तकात आहेत. लेखकाने निःपक्षपातीपणे लिखाण केले असून हे पुस्तक वाचनीय आहे असे त्यांनी सांगितले.

यानंतर नितीन कपिलेश्वरकर यांचा लेखक संघाचे कार्यवाह कृष्णा शहापूरकर व परशराम माळी यांचा उपाध्यक्ष अनिल आजगावकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

नितीन कपिलेश्वरकर यांनी बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या कार्याची माहिती दिली. महाराष्ट्राबाहेर देशात व परदेशातही मराठी भाषा व मराठी संस्कृतीचे संवर्धन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बृहन्महाराष्ट्र मंडळ करीत आहे, असे त्यांनी सांगितले. अनिल आजगावकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

The post कपिलेश्वरकर – माळी यांचा प्रगतिशील लेखक संघातर्फे सत्कार appeared first on News 24 Tass Marathi.

प्रगतिशील लेखक संघाचे पाचवे मराठी साहित्य संमेलन ८ फेब्रुवारी रोजी
प्रा. डॉ. बी. एम. हिर्डेकर अध्यक्ष

बेळगांव : प्रगतिशील लेखक संघाचे पाचवे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. ८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक आणि शिवाजी विद्यापीठातील निवृत्त परीक्षा नियंत्रक डॉ. बी. एम. हिर्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे.

प्रगतिशील लेखक संघाच्या शुक्रवारी झालेल्या साप्ताहिक बैठकीत ही माहिती देण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रा. आनंद मेणसे होते.

कवीवर्य नारायण सुर्वे यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्त त्यांचे काव्यलेखन व कार्य तसेच गेल्या अकरा वर्षांपासून राज्यघटना, धर्मनिरपेक्षता, शिक्षण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर अनेक अंगांनी हल्ले होत असून राज्यघटनेला धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत राज्यघटनेचे रक्षण करण्याची जबाबदारी लेखकांचीही आहे. म्हणून लोकशाहीवर होणारे हल्ले व लेखकांची जबाबदारी ही या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. संमेलनाचे उद् घाटन प्रगतिशील लेखक संघाचे राष्ट्रीय महासचिव व लेखक डॉ. सुखदेवसिंग सिरसा, चंदिगड यांच्या हस्ते होणार आहे.

चार सत्रात हे संमेलन होणार आहे. सकाळी दहा वाजता पहिल्या सत्रात उद् घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये उद् घाटक व अध्यक्ष यांची भाषणे होतील. साडेबारा वाजता दुसरे सत्र होईल. त्यामध्ये अन्नपूर्णा महिला मंडळातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या स्वातंत्र्य सेनानी भारतरत्न कॉम्रेड अरुणा असफ आली पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यंदाचा पुरस्कार मुंबईतील सफाई कामगारांचे नेते कॉ. दीपक भालेराव यांना अध्यक्षांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

दुपारी २.३० ते ३.३० या वेळेत भोजन होईल. त्यानंतरच्या तिसऱ्या सत्रात विशेष व्याख्यान होईल. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ. नंदकुमार मोरे यांचे नारायण सुर्वे यांचे काव्यविश्व या विषयावर व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे राहाणार आहेत.

चौथ्या सत्रात सायंकाळी पाच वाजता प्रगतिशील लेखक संघाच्या सदस्यांकडून नारायण सुर्वे यांच्या कवितांचे अभिवाचन होणार आहे. संकल्पना व संहिता लेखन कॉ. अनिल आजगावकर यांचे आहे. या कार्यक्रमात प्रा. अशोक अलगोंडी, निला आपटे, मधु पाटील व रोशनी हुंद्रे यांचा सहभाग राहाणार आहे.

अध्यक्षीय समारोपानंतर संमेलनाची सांगता होणार आहे. कवीवर्य पद्मश्री कॉ. नारायण सुर्वे साहित्यनगरी, श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन (ओरिएंटल हायस्कूल प्रांगण) रेल्वे ओव्हर ब्रीजजवळ, खानापूर रोड, बेळगांव येथे हे संमेलन होणार आहे. बैठकीस पदाधिकारी व बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.

The post प्रगतिशील लेखक संघाचे पाचवे मराठी साहित्य संमेलन ८ फेब्रुवारी रोजी appeared first on News 24 Tass Marathi.