poet's conference Archives | News 24 Tass Marathi

कवी सुधाकर गावडे यांच्या कवितांमधून उलगडले जीवनाचे गहिरे रंग
शब्दगंध कवी मंडळ संघातर्फे ‘कवी समजून घेताना’ उपक्रमाचे पाचवे पुष्प गुंफले

बेळगाव : कवी हा केवळ शब्दांचा कारागीर नसतो, तर तो आपल्या काळाचा साक्षीदार असतो. त्याच्या भोवती घडणाऱ्या घटना, समाजातील चढ-उतार, माणसांच्या भावना आणि जगण्यातील सूक्ष्म छटा यांचे प्रतिबिंब त्याच्या शब्दांत उमटत असते. कवीच्या नजरेत असलेली स्वप्ने, संवेदनशीलता आणि अनुभवांची शिदोरी यामुळे तो आयुष्याचे अनेक पैलू सहज, ओघवत्या आणि प्रभावी शैलीत मांडतो, असे हृदयस्पर्शी प्रतिपादन कवी सुधाकर गावडे यांनी केले.
शब्दगंध कवी मंडळ यांच्या वतीने शनिवार, दि. २१ रोजी मराठी विद्या निकेतन, बेळगाव येथे आयोजित “कवी समजून घेताना” या उपक्रमाच्या पहिल्या सत्रात ते बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत उबदार आणि स्नेहपूर्ण वातावरणात झाली. मंडळाचे अध्यक्ष प्रा. अशोक अलगोंडी यांनी प्रास्ताविकातून या उपक्रमामागील हेतू स्पष्ट करत, कवी आणि काव्य यांच्यातील नात्याची सुंदर उकल केली. त्यांनी कवी सुधाकर गावडे यांच्या साहित्य प्रवासाचा परिचय करून देत उपस्थितांचे मनःपूर्वक स्वागत केले.

यावेळी ज्येष्ठ कवी सुभाष सुंठणकर यांच्या हस्ते कवी गावडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. हा क्षण उपस्थितांसाठी भावनिक आणि प्रेरणादायी ठरला.

आपल्या मनोगतात कवी गावडे यांनी अत्यंत साध्या, पण भावगर्भ शब्दांत आपल्या काव्यप्रवासाची दारे उघडली. “जन्मली आईच्या जात्यात माझ्या, कविता म्हणून कदाचित आली असावी नात्यात माझ्या…” या ओळींमधून त्यांनी कविता ही आपल्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग असल्याचे सूचित करत कार्यक्रमाची सुरुवात केली.

कवी गावडे यांच्या कवितांमध्ये ग्रामीण जीवनाचा सुगंध, आईच्या ममतेची ऊब, निसर्गाचे कोमल आणि कठोर रूप, शेतीची कष्टमय वाटचाल, तसेच बदलत्या काळातील पिढ्यांमधील दुरावा आणि वेदना यांचे अत्यंत जिवंत चित्रण अनुभवायला मिळाले. त्यांच्या शब्दांतून उमटणारी संवेदना आणि वास्तवाचा स्पर्श श्रोत्यांच्या मनाला भिडत होता.

“कविता काय असते”, “चिंदबर महास्वामी”, “या वेड्यांना कसे कळावे”, “त्या पिढ्यांचे या पिढ्यांना दुःख”, “पाऊस”, “शेती”, “चर्चा” अशा विविध विषयांवरील त्यांच्या कवितांनी सामाजिक जाणिवा, तत्त्वचिंतन आणि जीवनाचे तत्त्वज्ञान यांचा सुंदर संगम घडवला. गझल, चारोळी, अभंग आणि विडंबन काव्य या विविध काव्यप्रकारांतून त्यांनी आपली अभिव्यक्ती बहुरंगी पद्धतीने साकारली आणि उपस्थित काव्यरसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात उपस्थित कवींनीही आपल्या भावविश्वाचे रंग उधळले. “मर्म”, “विचारांची गर्दी”, “सुसाईड नोट”, “आयुष्य”, “भावना”, “सावित्रीच्या लेकी”, “माझी सखी”, “भरपूर हसा”, “खुशीत घे गं आई”, “आई”, “कॉलेज लाईफ”, “आठवत नाही”, “पैसा बोलतो”, “जिंदगीत काय पाहिजे” अशा विविध विषयांवरील कवितांनी सामाजिक वास्तव, वैयक्तिक अनुभव आणि भावनांचे विविध पैलू प्रभावीपणे उभे केले.

या सत्रात बसवंत शहापूरकर, चंद्रशेखर गायकवाड, गुरुनाथ किरमटे, प्रा. संजय बंड, अॅड. नितीन आनंदाचे, अशोक सुतार, डॉ. प्रेमा मेणशी, स्मिता किल्लेकर, प्रा. शुभदा खानोलकर, मधू पाटील, निळूभाऊ नार्वेकर, दामोदर मुळीक, सतीश जुटेकर, जोतिबा नागवेकर, आनंद मेणशी, जितेंद्र रेडेकर, सीमा कणबरकर, परशराम खेमणे यांच्यासह अनेक कवी आणि काव्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकूणच, या कार्यक्रमाने काव्य, विचार, संवेदना आणि समाजभान यांचा सुरेख संगम घडवून आणत उपस्थितांना एक समृद्ध, प्रेरणादायी आणि मनःस्पर्शी अनुभव दिला. कवीला समजून घेण्याचा हा प्रयत्न काव्यप्रेमींच्या मनात दीर्घकाळ घर करून राहील, यात शंका नाही.

The post कवी सुधाकर गावडे यांच्या कवितांमधून उलगडले जीवनाचे गहिरे रंग appeared first on News 24 Tass Marathi.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बाग परिवाराची सुरेल काव्यमैफल
काव्यरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बेळगाव / प्रतिनिधी

मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत बाग परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेला मार्च महिन्याचा काव्यवाचन कार्यक्रम जत्ती मठ येथे नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. ज्येष्ठ साहित्यिक निळूभाऊ नार्वेकर आणि दत्ता घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला काव्यरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रारंभी कवीवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर स्मिता किल्लेकर यांनी सादर केलेल्या मराठी गौरव गीताने वातावरण भारावून गेले.

या काव्यवाचन सोहळ्यात २० हून अधिक कवी-कवयित्रींनी सहभाग नोंदवत विविध विषयांवर आपल्या कविता सादर केल्या. मराठी भाषा, महिला सक्षमीकरण तसेच सामाजिक विषयांवर आधारित रचनांना विशेष दाद मिळाली. किरण पाटील, निलेश शिंदे, स्मिता किल्लेकर, रोशनी हुंद्रे, स्वप्नील जोगानी, प्रतिभा सडेकर, डॉ. संजीवनी खंडागळे, स्नेहल बर्डे, अक्षता येळूरकर, अशोक सुतार, अपर्णा पाटील, गुरुनाथ किरमीटे, प्रा. शुभदा खानोलकर, माया पाटील, निळूभाऊ नार्वेकर, प्रा. ज्योतिबा नागवडेकर, डॉ. मनीषा नाडगौडा, चंद्रशेखर गायकवाड आणि दत्ता घोडके आदींनी आपल्या कवितांमधून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रा. मनीषा नाडगौडा यांनी केले. सूत्रसंचालन माया पाटील यांनी आपल्या खास शैलीत रंगतदार पद्धतीने केले, तर स्वप्नील जोगानी यांनी आभार मानले. एकूणच मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला हा काव्यवाचन सोहळा काव्यरसिकांसाठी साहित्यिक पर्वणी ठरला.

The post मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बाग परिवाराची सुरेल काव्यमैफल appeared first on News 24 Tass Marathi.

खुल्या कवी संमेलनात मराठी भाषा आणि स्त्रीमनाचा भावस्पर्शी जागर
मराठी भाषा गौरव दिन व जागतिक महिला दिनानिमित्त शब्दगंध कवी मंडळ संघाचा उपक्रम

बेळगाव : मराठी भाषा गौरव दिन आणि जागतिक महिला दिनाच्या दुहेरी औचित्य साधत शब्दगंध कवी मंडळ संघातर्फे आयोजित खुले कवी संमेलन उत्स्फूर्त प्रतिसादात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडले. येथील मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहात भरलेल्या या काव्यमहोत्सवात मराठी भाषेचा गौरव आणि स्त्रीमनातील विविध भावछटा कवींनी आपल्या आशयघन कवितांमधून प्रभावीपणे व्यक्त केल्या. त्यामुळे सभागृहात मराठीच्या गोडीचा आणि स्त्रीसंवेदनांच्या सामर्थ्याचा एक अनोखा जागर अनुभवायला मिळाला.

कुसुमाग्रज आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना बी. जी. पाटील, प्रा. अशोक आलगोंडी, सुधाकर गावडे, बसवंत शहापूरकर, उर्मिला शहा, रेखा गद्रे, श्री हसबे

कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी विद्यानिकेतनचे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी सुधाकर गावडे यांनी कुसुमाग्रजांची प्रेरणादायी “प्रेम कर” ही कविता सादर केली, तर रेखा गद्रे यांनी सावित्रीबाईंची समाजजागृतीची जाज्वल्य कविता “याला मानव म्हणावे का?” प्रभावी स्वरात सादर करून उपस्थितांना विचारप्रवृत्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शब्दगंध कवी मंडळ संघाचे उपाध्यक्ष बसवंत शहापूरकर यांनी केले. त्यांनी मराठी भाषेची समृद्ध परंपरा आणि स्त्रीशक्तीच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करत या कवी संमेलनाच्या उद्देशाची मांडणी केली.

या कवी संमेलनात अनेक कवींनी आपल्या हृदयस्पर्शी कविता सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. मराठी भाषेप्रती असलेले प्रेम व्यक्त करत गुरुनाथ किरमटे यांच्या “अनन्य तुझ्या उपकारांचे फेडू कसे मी पांग, गे मातृभाषे मराठी फक्त एवढे सांग…” या ओळींनी सभागृह भारावून गेले.

स्त्रीस्वातंत्र्याचा विचार मांडताना तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देत सुधाकर गावडे यांनी “तीला हवे ते तीने करावे त्याला हवे ते त्याने, मनाप्रमाणे स्वैर आपल्या वागावे ज्याने त्याने…” अशा अर्थबोध ओळी सादर केल्या.

प्रा. महादेव खोत यांनी “बेळगावात मराठीला मान कुठे आहे हो? अन् सांगा मराठी मर्द मावळा बाणा कुठे आहे हो?” असे म्हणत बेळगावच्या सांस्कृतिक वास्तवावर भाष्य करत त्यांनी मराठी अस्मितेचा सवाल उपस्थित केला. त्यांच्या प्रभावी सादरीकरणाने सभागृहात चिंतनशील वातावरण निर्माण झाले. कवितेतील ओळींनी उपस्थितांच्या मनाला चटका लावला.

स्त्रीच्या वेदना आणि सामाजिक वास्तवाचे चित्रण करत रोशनी हुंद्रे यांच्या “गोंदण” कवितेतील “बाईनेच गोंदवून घ्याव का गोंदन, गोंदन तरी असत कुठं तिच्या मालकीचे…तेही देत असत असह्य वेदना.” ओळींनी श्रोत्यांच्या मनाला स्पर्श केला.

तर उर्मिला शहा यांनी “बाई, तुझं जगणंच मुळी कठपुतळीचं. दोरी तीच रहाते, फक्त नाचवण्याचे प्रकार वेगळे असतात.” असे म्हणत स्त्रीजीवनाचे मार्मिक चित्रण केले.

“धन्य त्यांची साधना,धन्य ते सारे साधक, धन्य माझी माय मराठीआणि धन्य तिचे उपासक.” मराठी भाषेचा गौरव व्यक्त करत आनंद मेणशी यांनी सादर केलेल्या या ओळींनी उपस्थितांना अभिमानाची जाणीव करून दिली.

समाजातील बदलत्या भाषिक प्रवाहांवर भाष्य करत जोतिबा नागवडेकर यांनी हलक्या-फुलक्या शैलीत म्हणाले – “इकडे तिकडे हॅलो हाय, जाताना म्हणतात बाय बाय,हे ऐकून पाहून तंग झालो, बिन तालाचा मृदंग झालो.”

यांच्यासह या कवी संमेलनात किरण पाटील यांनी “स्त्री जन्मा तुझी कहाणी” या कवितेतून स्त्रीजीवनातील संघर्ष आणि जिद्दीचे चित्रण केले. सौ. स्नेहल बर्डे यांनी “स्त्री तुझी रूपे” या कवितेतून स्त्रीच्या विविध रूपांचा गौरव केला. प्रा संजय बंड यांनी “लळा माय मराठीचा” या कवितेतून मायमराठीप्रती असलेले प्रेम व्यक्त केले. प्रा. शुभदा प्रभू खानोलकर यांनी “सावित्रींच्या लेकी” हा पोवाडा सादर करून क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या विचारांची परंपरा पुढे नेणाऱ्या स्त्रीशक्तीचा गौरव केला. प्रा. मनीषा नाडगौडा यांनी “रंग स्त्रीत्वाचा” या कवितेतून स्त्रीत्वाच्या विविध छटा उलगडल्या.

अक्षता यळ्ळूरकर यांनी “दुरावलेली छकुली” या कवितेतून सामाजिक वास्तव अधोरेखित केले. डॉ. प्रेमा मेणशी यांनी “प्रिय मराठी” या कवितेतून मराठी भाषेप्रती असलेले प्रेम व्यक्त केले, तर सौ. नेहा जोशी यांनी “महिला दिन” या कवितेतून स्त्रीशक्तीचा गौरव केला. श्री. निलेश शिंदे यांनी “तीच ती स्त्री संघर्षाची रागिणी” या कवितेतून स्त्रीच्या संघर्षमय प्रवासाचे प्रभावी चित्रण केले. सीमा कणबरकर यांनी “शेतकऱ्यांची बायको” या कवितेतून ग्रामीण स्त्रीचे कष्टमय जीवन उलगडले. सौ. रेखा गद्रे यांनी “महिला दिन” या कवितेतून स्त्रीच्या स्वाभिमानाचा संदेश दिला.

परशुराम खेमणे यांनी “शब्दांनो तुम्ही माणसांना जिवंत ठेवा” या कवितेतून शब्दांच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली. व्ही. एस. वाळवेकर यांनी “द्रौपदीचे वस्त्र” या कवितेतून स्त्रीअवमानाच्या प्रश्नावर तीव्र भाष्य केले. बसवंत शहापूरकर यांनी “झोप आता बाई” या कवितेतून स्त्रीजीवनातील वेदना व्यक्त केल्या. कु. अनुजा लोहार यांनी “जगात भारी माझी मराठी” या कवितेतून मराठी भाषेचा अभिमान व्यक्त केला.

अस्मिता देशपांडे यांनी “मलाही अभिमान आहे मराठी असल्याचा” या कवितेतून मराठी अस्मितेचा अभिमान व्यक्त केला. श्री. मधु पाटील यांनी “मायबोली” या कवितेतून मातृभाषेचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. मयुरी जाधव यांनी “स्त्री सामर्थाची कहाणी” या कवितेतून स्त्रीच्या जिद्दीचा आणि सामर्थ्याचा गौरव केला. कार्यक्रमाच्या अखेरीस प्रा. अशोक आलगोंडी यांनी सादर केलेल्या “बेळगाव अभिमान गीत” या कवितेने कार्यक्रमाचा समारोप अभिमानाच्या सुरावटीत झाला.

कवींच्या ओजस्वी सादरीकरणाला उपस्थित रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अस्मिता देशपांडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन परशुराम खेमणे यांनी केले.

मराठी भाषेच्या गौरवाची आणि स्त्रीशक्तीच्या संवेदनशील जाणिवांची सुंदर सांगड घालणारे हे खुले कवी संमेलन साहित्यरसिकांसाठी अविस्मरणीय ठरले.

The post खुल्या कवी संमेलनात मराठी भाषा आणि स्त्रीमनाचा भावस्पर्शी जागर appeared first on News 24 Tass Marathi.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बेळगावात उद्या कवी संमेलन
बेळगाव : शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने मराठी भाषा गौरव दिवस आणि जागतिक महिला दिनानिमित्त कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार दिनांक ७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता मराठी विद्यानिकेतन, बेळगाव येथे होणार आहे.

या कवी संमेलनात मराठी भाषा तसेच महिला विषयावर आधारित कविता सादर केल्या जाणार आहेत. परिसरातील कवींनी या संमेलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन शब्दगंध कवी मंडळ संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून सचिव श्री. सुधाकर गावडे यांनी सर्व कवींना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

The post मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बेळगावात उद्या कवी संमेलन appeared first on News 24 Tass Marathi.