poetry program Archives | News 24 Tass Marathi

‘कळा या लागल्या जीवा’ काव्यवाचनाने रसिकांना अंतर्मुख केले
चंद्रशेखर गायकवाड यांच्या सामाजिक, उपरोधिक आणि भावस्पर्शी कवितांना उत्स्फूर्त दाद

बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने आयोजित ज्येष्ठ कवी चंद्रशेखर गायकवाड यांच्या ‘कळा या लागल्या जीवा’ या काव्यवाचनाचा कार्यक्रम आणि उपस्थितांचे खुले कवी संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. सरस्वती वाचनालयाच्या माई ठाकूर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास साहित्यप्रेमी, कवी-कवयित्री आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शब्दगंध कवी मंडळ संघाचे सचिव सुधाकर गावडे होते. प्रारंभी त्यांनी प्रास्ताविक करून कवी चंद्रशेखर गायकवाड यांचा सन्मान केला. व्यासपीठावर कवी गुरुनाथ किरमटे उपस्थित होते.

त्यानंतर ज्येष्ठ कवी चंद्रशेखर गायकवाड यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत ‘सार्थक’, ‘अशोकचक’, ‘काळची गरज’, ‘अळीचा अभद्र अजगर’, ‘फिरुनी नवी जन्मेन मी’, ‘ही रात्र मंतरलेली’, ‘नाते तुझे माझे’ आणि ‘भैरवी’ या कविता सादर केल्या.

चंद्रशेखर गायकवाड यांचा सन्मान करताना शब्दगंधचे उपाध्यक्ष बसवंत शहापूरकर, सुधाकर गावडे, गुरुनाथ किरमटे

‘सार्थक’ या कवितेतून जन्म, जगणे आणि मृत्यूकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन त्यांनी मांडला. “लागला म्हणून घ्यावा / घेऊन जन्म गेलो…” या ओळींतून मानवी जीवनाच्या सार्थकतेचा शोध घेताना जीवनातील नश्वरतेचे भान व्यक्त केले. ‘अशोकचक’ या कवितेतून समकालीन राजकीय-सामाजिक परिस्थितीवर उपरोधिक आणि बोचऱ्या शैलीत भाष्य केले. “सिंहासन पोखरलेल्या / झुरळावरती झाडल्या गोळ्या…” या ओळींतून सत्तेतील विसंगती आणि सामाजिक वास्तवावर त्यांनी प्रहार केला.

शिक्षणव्यवस्थेतील बदल आणि मातृभाषेपासून दुरावणाऱ्या नव्या पिढीची चिंता ‘काळची गरज’ या कवितेतून व्यक्त झाली. “इंग्लिश मीडियमच्या मागे / मराठीला सोडून गेलो…” या आशयातून मराठी भाषा, खेळ आणि बालपणापासून दूर जाणाऱ्या मुलांचे वास्तव त्यांनी मांडले.

‘अळीचा अभद्र अजगर’ या कवितेतून मनातील पूर्वग्रह, द्वेष आणि संशयाच्या वृत्तीवर भाष्य करताना “शबरीच्या बोरात देखील / तक्षक तुला दिसला आहे” या प्रभावी प्रतिमेतून विकृत दृष्टिकोनाचे चित्रण केले. ‘फिरुनी नवी जन्मेन मी’ मधून संघर्षानंतर पुन्हा उभे राहण्याची आशावादी भावना, तर ‘ही रात्र मंतरलेली’ मधून प्रेम आणि भावविश्वातील तरलता व्यक्त झाली. ‘नाते तुझे माझे’ मधून मानवी नात्यांतील जिव्हाळा आणि भावबंध उलगडले, तर ‘भैरवी’ने कार्यक्रमाची भावपूर्ण सांगता झाली.

गायकवाड यांच्या काव्यवाचनाचे वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक वास्तवावर मार्मिक भाष्य, उपरोधाची धार, मानवी नात्यांची हळुवार जाणीव आणि जीवनाकडे पाहण्याची चिंतनशील दृष्टी. त्यांच्या कवितांना रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.

यानिमित्ताने झालेल्या खुल्या कवी संमेलनात प्रा. शुभदा खानोलकर, अपर्णा पाटील, प्रा. मनीषा नाडगौडा, रोशनी हूंदरे, नेहा जोशी, भरत गावडे, सीमा कनबरकर, नंदिनी दामले, अशोक सुतार, स्मिता किल्लेकर, गुरुनाथ किरमटे, जितेंद्र रेडेकर, प्रा. स्वरूपा इनामदार, प्रकाश अनवेकर, किरण पाटील, दत्ता घोडके, प्रकाश पाटील, कृष्णा पारवाडकर, सुधाकर गावडे, बसवंत शहापूरकर, मनोहर घडी आदी कवींनी विविध विषयांवरील स्वरचित कविता सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र रेडेकर यांनी केले, तर आभार नेहा जोशी यांनी मानले.

The post ‘कळा या लागल्या जीवा’ काव्यवाचनाने रसिकांना अंतर्मुख केले appeared first on News 24 Tass Marathi.

कवी चंद्रशेखर गायकवाड यांच ‘कळा या लागल्या जीवा’ कार्यक्रम आणि कवी संमेलनाचे शनिवारी आयोजन
बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने ‘कळा या लागल्या जीवा’ हा कवी चंद्रशेखर गायकवाड यांच्या कवितांचा विशेष कार्यक्रम तसेच उपस्थितांचे खुल्या काव्यसंमेलनाचे आयोजन शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता सरस्वती वाचनालयाच्या माई ठाकूर सभागृहात करण्यात आले आहे.

चंद्रशेखर गायकवाड हे गेली अनेक वर्षे सातत्याने मराठी साहित्य क्षेत्रात कार्यरत असून मराठी कविता, कथा लेखनसह हिंदी आणि इंग्रजी भाषेतही लेखन केले आहे. त्यांचा ‘कळा या लागल्या जीवा’ हा कविता संग्रह प्रकाशित असून खानापूर येथील निसर्ग साहित्य संमेलनाचा कै प्रा. वसंत कुलकर्णी काव्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच विविध नियतकालिकात त्यांच्या साहित्यकृती प्रसिद्ध झाल्या आहेत. बेळगावच्या साहित्य-सांस्कृतिक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. गोवा येथील काव्यहोत्र या विश्वविक्रमी कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. त्याचबरोबर पुणे, परभरणी, रायगड, सातारा येथील कवी संमेलनात त्यांनी काव्य वाचन केले आहे.

या कार्यक्रमात एका संवेदनशील कवीचा साहित्यिक प्रवास उलगडणार असून त्यांच्या भावस्पर्शी कवितांचा आस्वाद घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. यावेळी प्रारंभी स्थानिक कवींसाठी खुले काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.

या साहित्यिक कार्यक्रमास सर्व साहित्यप्रेमी, कवी, रसिक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगावचे सचिव श्री. सुधाकर गावडे यांनी केले आहे.

उद्योजकता, नेतृत्व, नम्रता आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम असलेला हा कार्यक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष योगदान दिल्याबद्दल रोटे. गीता गायकवाड यांचे आभार मानण्यात आले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित राहून सहभाग नोंदविणाऱ्या सर्व सदस्यांचेही आयोजकांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

The post कवी चंद्रशेखर गायकवाड यांच ‘कळा या लागल्या जीवा’ कार्यक्रम आणि कवी संमेलनाचे शनिवारी आयोजन appeared first on News 24 Tass Marathi.

कवयित्री सौ. स्मिता किल्लेकर यांच्या ‘गंध मातीचा’ काव्यवाचनाने रसिक मंत्रमुग्ध
शब्दगंध कवी मंडळातर्फे कवी समजून घेताना उपक्रमाचे आठवे पुष्प

बेळगाव : शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘गंध मातीचा’ या कवयित्री सौ. स्मिता दीपक किल्लेकर यांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम आणि खुले कवी संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. मराठी विद्यानिकेतन येथे झालेल्या या कार्यक्रमाला साहित्यप्रेमी, कवी, कवयित्री आणि रसिकांची मोठी उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शब्दगंध कवी मंडळ संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी, उपाध्यक्ष बसवंत शहापूरकर आणि सचिव सुधाकर गावडे उपस्थित होते. प्रास्ताविक रेखा गद्रे यांनी केले.

काव्यवाचन सत्रात स्मिता किल्लेकर यांनी विविध विषयांवरील आपल्या निवडक कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. ‘आदिमाया’ या कवितेतून आईच्या वात्सल्याचा आणि त्यागाचा हृदयस्पर्शी आविष्कार,’आधुनिक ओवी’ मधून बदलत्या समाजाचे वास्तव, तर ‘अस्तित्व’ या कवितेतून स्त्रीच्या स्वाभिमानाचा आणि आत्मभानाचा प्रभावी वेध त्यांनी घेतला.

‘आनंदाचा ठेवा’ या अभंगातून “ग्रंथ हेच गुरु, जीवन साकारू” असा वाचनसंस्कृतीचा संदेश त्यांनी दिला. ‘बरसान’, ‘झिम्माड पाऊस’ आणि ‘आक्रोश’ या कवितांमधून निसर्ग, शेतकरी जीवन आणि विकासाच्या नावाखाली उद्ध्वस्त होणाऱ्या शेतीची वेदना प्रभावीपणे मांडण्यात आली. ‘गड जेजुरी’, ‘शुभमंगल सावधान’ आणि ‘भारूड’ या रचनांमधून भक्ती, सामाजिक वास्तव आणि विसंगतींवर भाष्य करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी सादर झालेल्या ‘माझी सखी’ या कवितेने विशेष दाद मिळवली. “एका एका अक्षरात सजते, शब्दा शब्दात रंगून जाते…” या ओळींमधून कवितेशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे नाते रसिकांच्या मनाला भावले. प्रत्येक कवितेनंतर टाळ्यांच्या कडकडाटात रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यानंतर झालेल्या खुल्या कवी संमेलनात मनीषा नाडगौडा, अस्मिता आळतेकर, स्नेहल बर्डे, गुरुनाथ किरमटे, चंद्रशेखर गायकवाड, रेखा गद्रे, सीमा कणबरकर, गौरी धामणेकर, अपर्णा पाटील, मधु पाटील, शुभदा खानोलकर, बसवंत शहापूरकर, प्रा. महादेव खोत, सुधाकर गावडे आणि परशराम खेमने यांनी पाऊस, निसर्ग, समाज, राष्ट्रभक्ती, स्त्रीजीवन आणि मानवी मूल्ये या विषयांवरील स्वरचित कविता सादर केल्या.

अध्यक्षीय समारोपात प्रा. अशोक आलगोंडी यांनी स्मिता किल्लेकर यांच्या कवितांचा चिकित्सक आढावा घेत त्यांच्या कवितांमध्ये मातृत्व, ग्रामीण संस्कृती, निसर्ग, सामाजिक भान, अध्यात्म, स्त्रीमन आणि मानवी संवेदनांचा सुंदर संगम असल्याचे सांगितले. त्यांची सहज, प्रवाही आणि थेट मनाला भिडणारी भाषा हे त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा गद्रे यांनी केले, तर सुधाकर गावडे यांनी आभार मानले.

The post कवयित्री सौ. स्मिता किल्लेकर यांच्या ‘गंध मातीचा’ काव्यवाचनाने रसिक मंत्रमुग्ध appeared first on News 24 Tass Marathi.

कवयित्री सौ. स्मिता किल्लेकर यांचा ‘गंध मातीचा’ काव्य कार्यक्रम शनिवारी
साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे ; शब्दगंध कवी मंडळ संघाचे आवाहन

बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने ‘गंध मातीचा’ हा कवयित्री सौ. स्मिता दीपक किल्लेकर यांच्या कवितांचा विशेष कार्यक्रम तसेच उपस्थितांचे खुल्या काव्यसंमेलनाचे आयोजन शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता मराठी विद्यानिकेतन, ज्योती महाविद्यालय कॅम्पस, बेळगाव येथे करण्यात आले आहे.

सौ. स्मिता किल्लेकर या गेली अनेक वर्षे सातत्याने मराठी साहित्य क्षेत्रात कार्यरत असून कविता, कथा, ललित लेख, प्रवासवर्णन आदी विविध साहित्यप्रकारांत त्यांचे लेखन प्रकाशित झाले आहे. सकाळ, तरुण भारत, पुढारी यांसह अनेक दैनिके तसेच विविध दिवाळी अंकांत त्यांच्या साहित्यकृती प्रसिद्ध झाल्या आहेत. बेळगावच्या साहित्य-सांस्कृतिक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग असून, शब्दगंध कवी मंडळ संघाच्या माजी सचिव म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. दिल्ली येथे भरलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘कवी कट्टा’ या निमंत्रित व्यासपीठावर त्यांनी कवितांचे सादरीकरण केले आहे. विविध काव्य, निबंध व ओवी स्पर्धांमध्ये त्यांनी अनेक पुरस्कार प्राप्त केले असून सध्या त्या मंथन कल्चरल अँड सोशल वेल्फेअर सोसायटीच्या सचिव म्हणून कार्यरत आहेत.

या कार्यक्रमात कवयित्रींच्या संवेदनशील, जीवनस्पर्शी आणि मातीतल्या सुगंधाने नटलेल्या कवितांचा आस्वाद घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. त्यानंतर उपस्थित कवींसाठी खुले काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.

या साहित्यिक मेळाव्यास सर्व साहित्यप्रेमी, कवी, रसिक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगावचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी व सचिव श्री. सुधाकर गावडे यांनी केले आहे.

The post कवयित्री सौ. स्मिता किल्लेकर यांचा ‘गंध मातीचा’ काव्य कार्यक्रम शनिवारी appeared first on News 24 Tass Marathi.