order Archives | News 24 Tass Marathi

बेळगाव जिल्ह्यात डीजे वापरावर निर्बंध
विशेष प्रसंगी पूर्वपरवानगी आवश्यक : नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहर आणि जिल्ह्यात ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी डीजे वापरावर निर्बंध घालण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला आहे. काही विशेष प्रसंग, सार्वजनिक कार्यक्रम किंवा मिरवणुकीदरम्यान पोलीस दलाची पूर्वपरवानगी घेतल्यासच कमी आवाजात साऊंड सिस्टीम वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यासंबंधीचा आदेश काढला असून त्याची अंमलबजावणी तात्काळ करण्यात येणार आहे.

पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीसप्रमुखांनी पाठवलेल्या पत्राच्या आधारे ७ मार्च रोजी हा आदेश जारी करण्यात आला. ध्वनीप्रदूषण (नियंत्रण व नियमन) नियम २००० तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार डीजे, बेस बुस्टर, मोबाईल डीजे वाहने तसेच ७५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज करणाऱ्या ध्वनीक्षेपक साधनांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच लोकवस्ती, सायलेंस झोन, रुग्णालये, शाळा, न्यायालये आणि धार्मिक स्थळांच्या १०० मीटर परिसरात रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत डीजे वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.

या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना कार्यक्रम किंवा मिरवणूक त्वरित थांबवण्याचे, डीजेचे साहित्य जप्त करण्याचे तसेच आवश्यक असल्यास वीजजोडणी खंडित करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. याशिवाय आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील परवानगी रद्द करण्याची कारवाईही करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणताही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करताना लेखी पूर्वपरवानगी घेऊन नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले आहे.

The post बेळगाव जिल्ह्यात डीजे वापरावर निर्बंध appeared first on News 24 Tass Marathi.