National Archives | News 24 Tass Marathi

बेळगाव केंद्राला राष्ट्रीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या बेंगलोर येथील बक्षिस समारंभात गौरव

बेळगाव / प्रतिनिधी

बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली मध्यवर्ती संघटना व मराठी प्रतिष्ठान बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने बेंगलोर येथील महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात राष्ट्रीय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. या समारंभात बेळगाव केन्द्राला द्वितीय क्रमांकाच्या बक्षिसाने गौरविण्यात आले.

बेंगलोर येथे रविवारी झालेल्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. संजीव केसकर व श्री. जयदीप भालेराव (बेंगलोर), अध्यक्ष श्री. दिलीप कुंभोजकर, महाराष्ट्र राज्याच्या मराठी भाषा संवर्धन मंत्रालयाचे प्रशासकीय अधिकारी श्री. गिरीष पतके, सह-कोषाध्यक्ष श्री. नितीन कपिलेश्वरकर, विभागीय कार्यवाह श्री. परशराम माळी व संयोजक श्री. बापूसाहेब शिंदे उपस्थित होते.

प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रमुख पाहुणे तसेच महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा संवर्धन मंत्रालयाचे प्रशासकीय अधिकारी श्री. गिरीष पतके यांनी याप्रसंगी बोलताना मराठी भाषा व जन यांचा आता जगभरातील विविध देशांत वावर आहे . तेथे मराठी संस्कृती प्रकर्षाने पाळली जाते, असे सांगितले.

राज्य मराठी विकास संस्था मुंबई व बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली यांचा मराठी संस्थांना व सभासदांना कसा फायदा होतो याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

मराठी भाषा निबंध स्पर्धा व मराठी व्याकरण स्पर्धेच्या 2025-26 या वर्षातील विजेते विद्यार्थी, विषय मार्गदर्शक शिक्षक व निबंध केन्द्रप्रमुख यांचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

याप्रसंगी बृहन्महाराष्ट्र मंडळाचे राष्ट्रीय सहकोषाध्यक्ष नितीन कपिलेश्वरकर व विभागीय कार्यवाह (कर्नाटक) परशराम माळी यांच्यासह बेळगावातील सौ. किर्ती टेंबे (मंथन), श्रीमती प्रिया कवठेकर (शारदोत्सव), सौ. स्वरुपा इनामदार (वसंत व्याख्यानमाला), सुहास सांगलीकर (सरस्वती वाचनालय), कुमार पाटील (मराठी भाषाप्रेमी मंडळ), रवि शंकर मालशेट (बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघ), विलास पेडणेकर (युवा समिती), सी. आर. पाटील (लोकमान्य ग्रंथालय) आदी संलग्न संस्थांच्या प्रतिनिधींचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

The post बेळगाव केंद्राला राष्ट्रीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक appeared first on News 24 Tass Marathi.

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या दिशा होंडीला एक सुवर्ण, दोन रौप्य पदके
बेळगाव : जयपूर येथे झालेल्या ४२ व्या राष्ट्रीय सब ज्युनियर जलतरण स्पर्धेत बेळगावच्या दिशा होंडी हिने उत्कृष्ट कामगिरी करत तीन पदकांची कमाई केली. कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करताना दिशाने एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदके पटकावली.

४x१०० मीटर फ्रीस्टाईल रिले प्रकारात कर्नाटक संघाकडून सहभागी होत दिशाने सुवर्णपदक मिळवले. तसेच ५० मीटर फ्रीस्टाईलमध्ये २८ सेकंदांची वेळ नोंदवत आणि १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात १ मिनिट ८ सेकंदांची वेळ नोंदवत तिने दोन रौप्य पदकांवर आपले नाव कोरले.

दिशा सध्या भुवनेश्वर येथील इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये जलतरणाचे प्रशिक्षण घेत आहे. तिच्या क्रीडा कारकिर्दीत वडील राजेश, आई श्वेता, हिंद स्पोर्ट्स क्लब आणि एनआयएस प्रशिक्षक विश्वनाथ पवार यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

दिशाच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे बेळगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, तिच्या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

The post राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या दिशा होंडीला एक सुवर्ण, दोन रौप्य पदके appeared first on News 24 Tass Marathi.

भुवनेश्वर येथे ऑल इंडिया शिल्गंशाट स्पर्धेत प्रज्वल हिरोजीची सुवर्ण कामगिरी
१५ वर्षांखालील वयोगटात पटकावले सुवर्णपदक

बसरीकट्टी गावच्या सुपुत्राचा गौरव

बेळगाव : ओडिशातील भुवनेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रथम ऑल इंडिया शिल्गंशाट स्पर्धेत बसरीकट्टी(ता. बेळगाव) गावचे सुपुत्र कु. प्रज्वल लक्ष्मण हिरोजी याने उल्लेखनीय कामगिरी करत १५ वर्षांखालील वयोगटात सुवर्णपदक पटकावले. या यशामुळे बसरीकट्टी (बेळगाव) गावासह आजरा तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

प्रज्वल हा बसरीकट्टी गावचे सुपुत्र तथा इंडियन आर्मीतील हवालदार लक्ष्मण अनंत हिरोजी यांचे चिरंजीव आहेत. त्याने अत्यंत मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत आपले कौशल्य सिद्ध केले. विविध भागांतून सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत प्रज्वलने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

प्रज्वल हा दि डायनॅमिक पब्लिक स्कूल, सुळेरान, ता. आजरा (महाराष्ट्र) येथे शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत मिळवलेल्या या यशामुळे त्याच्या क्रीडा कारकिर्दीला निश्चितच नवी दिशा मिळाली आहे.

प्रज्वलच्या या यशामागे त्याचे प्रशिक्षक दिनेश जाधव सर आणि . सी. एन. खिल्लारे सर, मुख्याध्यापक संतोष पाटील, संस्थेचे अध्यक्ष संजय दाभोळे, सचिव चैतन्य दाभोळे, कार्यकारी संचालक अमित पाटील तसेच आजोबा कंत्राटदार अनंत हिरोजी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ग्रामीण भागातून पुढे येत राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करणाऱ्या प्रज्वलच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कष्ट, योग्य प्रशिक्षण आणि जिद्दीच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही राष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता सिद्ध करू शकतात, याचे प्रज्वल हिरोजीचे यश हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. भविष्यातही त्याने क्रीडा क्षेत्रात मोठी भरारी घ्यावी, अशा शुभेच्छा त्याला देण्यात येत आहेत.त्याच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

The post भुवनेश्वर येथे ऑल इंडिया शिल्गंशाट स्पर्धेत प्रज्वल हिरोजीची सुवर्ण कामगिरी appeared first on News 24 Tass Marathi.

मंत्रिमंडळ विस्तार अंतिम टप्प्यात ; लवकरच निर्णय
मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार ; कावेरी पाणीप्रश्नी न्यायालयीन लढाईची भूमिका

जंतरमंतर एफआयआरवर केंद्राकडे स्पष्टीकरणाची मागणी

दिल्ली : कर्नाटकातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात असून, पक्षश्रेष्ठींसोबतची चर्चा पूर्ण झाली आहे. आता मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदल आणि नव्या समावेशाबाबत हायकमांडच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा असल्याची माहिती मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली.

दिल्ली दौऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारासह कावेरी पाणीवाटप आणि जंतरमंतर एफआयआर प्रकरणावर सरकारची भूमिका स्पष्ट केली.

कावेरी नदीच्या पाणीवाटपाबाबत बोलताना, राज्यात अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूला पाणी सोडण्याच्या कावेरी जल नियमन समितीच्या आदेशाला राज्य सरकारने न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालय आणि कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाकडे अपील करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील जलसाठ्यांची सद्यस्थिती लक्षात घेऊन तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची तयारी असल्याचे सांगत, दोन्ही राज्यांच्या हिताचा तोडगा काढण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले.

जंतरमंतर आंदोलनाशी संबंधित एफआयआर प्रकरणावरही मुख्यमंत्री शिवकुमार यांनी प्रतिक्रिया देत, या प्रकरणी केंद्र सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली. तसेच या संदर्भात दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

The post मंत्रिमंडळ विस्तार अंतिम टप्प्यात ; लवकरच निर्णय appeared first on News 24 Tass Marathi.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
मंत्री प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार

नवी दिल्ली : कथित परीक्षा पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर देशभरात उभ्या राहिलेल्या तीव्र आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला असून, या निर्णयाची अधिकृत घोषणा शनिवारी करण्यात आली. दरम्यान, केंद्र सरकारने प्रमुख मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली.

गेल्या काही आठवड्यांपासून कथित परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर देशभरात विद्यार्थी, विविध संघटना आणि कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरू होते. दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या ३५ व्या दिवशी धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला. आपल्या राजीनाम्यानंतर त्यांनी अधिकृत ‘एक्स’ खात्यावर प्रसिद्ध केलेल्या संदेशात विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी चार दशकांहून अधिक काळ कार्य केल्याचे नमूद करत, सक्षम आणि सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्था ही मजबूत राष्ट्राचा पाया असल्याचा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशसेवेची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सध्या केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री असलेले प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. नियुक्तीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत ही जबाबदारी निष्ठेने आणि कर्तव्यभावनेने पार पाडण्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरणासह शिक्षण क्षेत्रात धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या कामाचेही त्यांनी कौतुक केले.

दरम्यान, केंद्र सरकारने परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता वाढविणे, प्रश्नपत्रिका फुटीविरोधात कठोर उपाययोजना करणे आणि शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. या घडामोडींमुळे देशातील परीक्षा प्रणाली अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच नव्या उपाययोजना जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

The post केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा appeared first on News 24 Tass Marathi.

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ज्योती सेंट्रल स्कूलच्या मास्टर वेदांतची रौप्यपदकाला गवसणी
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प-बेळगाव येथील राष्ट्रीय जलतरणपटू मास्टर वेदांत आनंद मिसाळे याने कर्नाटक स्विमिंग असोसिएशन आयोजित NRJ State Sub-Junior Swimming Championship 2026–27 या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत 14 वर्षांखालील मुलांच्या 200 मीटर बटरफ्लाय (Butterfly) प्रकारात द्वितीय क्रमांक (रौप्यपदक) पटकावून शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.

दि.3 ते 5 जुलै 2026 या कालावधीत येम्मेकेरे स्विमिंग पूल, मंगळुरू येथे झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातील उत्कृष्ट जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत वेदांतने 2 मिनिटे 21.70 सेकंदांची उत्कृष्ट वेळ नोंदवत द्वितीय क्रमांक मिळवला. त्याच्या या यशामुळे शाळा, शिक्षक, विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय कामगिरीनंतर राज्यस्तरावरही वेदांतने सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. या दैदिप्यमान यशाबद्दल शाळेचे एस.एम.सी. चेअरमन प्रा. श्री. आर. के. पाटील, व्हाईस चेअरमन प्रो. श्री. आर. एस. पाटील, सेक्रेटरी प्रो. श्री. नितीन घोरपडे यांनी वेदांतचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

तसेच शाळेचे प्राचार्य श्री. प्रदीप पाटील यांनी वेदांतच्या या अभिमानास्पद यशाबद्दल त्याचे विशेष अभिनंदन करून भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही अशीच उज्ज्वल कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

The post राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ज्योती सेंट्रल स्कूलच्या मास्टर वेदांतची रौप्यपदकाला गवसणी appeared first on News 24 Tass Marathi.

राम मंदिर देणगी घोटाळा प्रकरणी ८ जणांना अटक
सरचिटणीसांचा राजीनामा

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिर देणगी घोटाळ्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी गुरुवारी सर्व आठही आरोपींना अटक केली. या प्रकरणाशी संबंधित पहिला एफआयआर (गुन्हा) दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच ही कारवाई करण्यात आली.

यात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचा चालक रमाशंकर यादव ऊर्फ टिन्नू याचाही यात समावेश आहे.सध्या सर्व आठही आरोपींची चौकशी केली जात असून अटक मेमो आणि इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. ‘श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’चे सदस्य कृष्ण मोहन यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) प्राथमिक अहवालानंतर ही तक्रार नोंदवण्यात आली.

दानपेटीतून 7 ते 7.5 कोटींची चोरी झाल्याचा आरोप समाजवादी पक्षाच्या एका आमदाराने सर्वप्रथम केला होता. त्यानंतर विरोधी पक्षातील इतरही नेत्यांनी आरोप केले. रामाच्या नावावर राज्य करणाऱ्या भाजपच्या काळातच ही घटना घडल्याने खळबळ उडाली. देणगी घोटाळ्याप्रकरणी रमाशंकर यादव ऊर्फ टिन्नू, अनुकल्प मिश्रा, अविनाश शुक्ला, मनीष यादव, रमाशंकर मिश्रा, सुभाष, करुणेश आणि लवकुश मिश्रा यांना अटक करण्यात आली आहे. या आठ जणांवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली चोरी, गुन्हेगारी कट, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The post राम मंदिर देणगी घोटाळा प्रकरणी ८ जणांना अटक appeared first on News 24 Tass Marathi.

देशातील ७ नवीन बुलेट ट्रेन मार्गांना केंद्र सरकारची मंजुरी
मुंबई, दिल्ली, हैदराबाद, पुणे, चेन्नईसह अनेक प्रमुख शहरे हाय-स्पीड रेल्वेने जोडली जाणार

नवी दिल्ली : देशात हाय-स्पीड रेल्वेचे जाळे विस्तारण्यासाठी केंद्र सरकारने आणखी सात नवीन बुलेट ट्रेन मार्गांना तत्त्वतः मंजुरी दिली आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू असतानाच आता देशातील महत्त्वाच्या आर्थिक, औद्योगिक आणि तांत्रिक शहरांना जोडण्यासाठी नवीन कॉरिडॉर विकसित करण्याची तयारी सुरू झाली आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे दिल्ली, वाराणसी, पुणे, हैदराबाद, बंगळूरु आणि चेन्नई यांसारख्या प्रमुख शहरांदरम्यान जलदगती रेल्वेसेवा सुरू करण्याचा मार्ग अधिक मोकळा झाला आहे. देशातील प्रवासाचा कालावधी कमी करणे आणि आर्थिक विकासाला गती देणे हा या प्रकल्पामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

प्रस्तावित हाय-स्पीड रेल्वे मार्गांमध्ये मुंबई–पुणे, पुणे–हैदराबाद, हैदराबाद–बंगळूरु, हैदराबाद–चेन्नई, चेन्नई–बंगळूरु, दिल्ली–वाराणसी आणि वाराणसी–सिलीगुडी या कॉरिडॉरचा समावेश आहे. या मार्गांमुळे देशाच्या पश्चिम, दक्षिण आणि उत्तर-पूर्व भागांमध्ये दळणवळण अधिक वेगवान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हा देशातील पहिला हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प असून त्याचे काम सध्या विविध टप्प्यांमध्ये सुरू आहे. या अनुभवाच्या आधारे इतर कॉरिडॉर विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने नियोजन सुरू केले आहे.

दरम्यान, नव्या बुलेट ट्रेन मार्गांच्या प्रत्यक्ष बांधकामासाठी अद्याप कोणतीही निश्चित कालमर्यादा जाहीर करण्यात आलेली नाही. या प्रकल्पांना अंतिम स्वरूप देण्यापूर्वी व्यवहार्यता अहवाल, प्रशासकीय मंजुरी, निधी उभारणी तसेच भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतरच संबंधित मार्गांवरील प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

The post देशातील ७ नवीन बुलेट ट्रेन मार्गांना केंद्र सरकारची मंजुरी appeared first on News 24 Tass Marathi.

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा दिल्ली दौरा
राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांची घेतली भेट

दिल्ली : कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर आलेल्या डी. के. शिवकुमार यांनी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांची भेट घेऊन राज्याच्या विकासासह विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली.

दिल्ली दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. तसेच उपराष्ट्रपती निवासस्थानी जाऊन उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांच्याशीही सौजन्य भेट घेत विविध चालू घडामोडी आणि कर्नाटकच्या विकासविषयक मुद्द्यांवर चर्चा केली.

मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच दिल्ली दौरा असून, या दौऱ्यात ते देशातील प्रमुख नेते आणि मान्यवरांची भेट घेत आहेत. राज्याच्या नेतृत्वाची जबाबदारी दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत विविध विषयांवर संवाद साधला.

यापूर्वी दिल्लीत आगमनानंतर शिवकुमार यांनी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन राजकीय आणि प्रशासकीय विषयांवर चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी देशाच्या घटनात्मक प्रमुखांची भेट घेत आपला दिल्ली दौरा पुढे सुरू ठेवला आहे.

The post मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा दिल्ली दौरा appeared first on News 24 Tass Marathi.

आरसीबी सलग दुसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन !
अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा ५ गडी राखून पराभव

अहमदाबाद : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात दमदार कामगिरी करत गुजरात टायटन्सवर मात केली आणि सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याचा मान मिळवला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या रंगतदार सामन्यात बंगळुरूने १५६ धावांचे लक्ष्य १८ षटकांत पूर्ण करत ट्रॉफीवर पुन्हा एकदा आपले नाव कोरले.

लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात भक्कम झाली. सलामीवीर विराट कोहली आणि वेंकटेश अय्यर यांनी पहिल्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी उभारून संघाचा पाया मजबूत केला. अय्यरने ३२ धावांचे योगदान दिले, तर विराट कोहलीने नाबाद ७५ धावांची खेळी साकारत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. देवदत्त पडिक्कलला मोठी खेळी करता आली नाही. त्यानंतर टीम डेव्हिडने २४ धावा केल्या, तर कृणाल पंड्या एक धावेवर बाद झाला. अखेरीस विराटच्या षटकाराने बंगळुरूच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

यापूर्वी नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीस उतरलेल्या गुजरात टायटन्सला अपेक्षित सुरुवात मिळाली नाही. साई सुदर्शन १२ आणि कर्णधार शुबमन गिल १० धावांवर माघारी परतल्याने संघ दबावात आला. निशांत सिंधूने २० धावा केल्या, तर जोस बटलर १९ धावांवर बाद झाला. मधल्या फळीत अर्शद खानने १५, राहुल तेवतिया आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी ७ धावांचे योगदान दिले. अखेर वॉशिंग्टन सुंदरने संयमी अर्धशतक झळकावत नाबाद ५० धावा केल्या. त्याच्या खेळीमुळे गुजरातने २० षटकांत ८ बाद १५५ धावांपर्यंत मजल मारली.

सलग दोन हंगामांतील ऐतिहासिक यश :

आयपीएलच्या सुरुवातीपासून अनेक वर्षे विजेतेपदाची प्रतीक्षा करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गेल्या दोन हंगामांत इतिहास रचला आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली संघाने प्रथम मागील हंगामात पंजाब किंग्सचा पराभव करून पहिले जेतेपद जिंकले होते. त्यानंतर २०२६ च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सवर विजय मिळवत बंगळुरूने विजेतेपदाचे यशस्वी संरक्षण केले आणि सलग दुसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन बनण्याचा पराक्रम केला.

The post आरसीबी सलग दुसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन ! appeared first on News 24 Tass Marathi.